Skip to main content

मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 02/04/2021 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
ढिशुम क्लेमर:- (सदर लेखन आम्हास काल इमेल बॉक्स चे उत्खनन करताना सापडलेले आहे,म्हणून त्यास हे टायटल दिले आहे. आमचे टायटल पाच वर्षांपूर्वी क्लिअर-झालेले असल्याने "असे" नाव सुचले,हे वाचकांपैकी गरजूंनी नीट ध्यानाच्या आत घ्यावे! गरजू 'नसलेल्यांबद्दल' आमची काहीही आरजूच नाही! ;) त्यामुळे त्यांनी नुसतेच वाचावे) मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न! 1) मला (सकाळची) वेळेवर आपोआप जाग आलेली आहे. 2) मेसवर शेपूची भाजी खायला मिळते आहे. 3) मी दररोज कपडे धुतो आहे. 4) रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावला आहे. 5) शॅम्पूच्या बाटलीचे झाकण लावून मगच बाथरूम मधून(टॉवेल गुंडाळून) बाहेर आलेलो आहे. 6) कामाची पिशवी घरी परत आल्या आल्या लगेच आवरतो आहे. (अर्थात हे स्वप्न चिरतरुण आहे,याला भूतकाळ कधी लाभणार?, कोण जाणे!?) 7) घरी मित्रमंडळी वगैरे कोणीही-कधीही-कशाही साठी येत नाहीत.. अजून एक भाग आहे, तो चालू उत्खननात हाताशी लागला ,तर टाकेन. =================

वाचने 13779
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

हो हो..अगदीच. ढीशुंम कलेमर सुद्धा. अन् शेवटचं वाक्य अगदी वैशिष्ट्य पूर्ण आहे. ते वाचून कुणाची उत्कंठा वाढेल तर कुठं काळजाचा थरकाप!

असे उत्खन्न करुन पहायवास हवे... बाकी, आमची बरीच स्वप्ने अ‍ॅडल्ट व्हती आणि कोणाला पण [ हे समजलाच असाल म्हणा ] सरळपणे सोडले नव्हते ! एव्हढे बर्‍यापैकी आठवते. :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Scatman (ski-ba-bop-ba-dop-bop) Official Video HD -Scatman John

प्रत्येक वाक्यात एक सूक्ष्म व छूपा अर्थ आहे, तो जर समजून घ्यायचा असेल तर गुर्जींची त्यावेळाची बेचलर आवस्था प्रत्येक वाक्यागणिक ध्यानात घ्यावी मगच शँपुची बाटली, शेपुची भाजी, कामाची पिशवी, कपडे धुणे इत्यादी स्वप्नांचे खोलवर दडलेले अ(न्)र्थ समजतील. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पै.जार.बुवा! :D =))

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैबु,तुमच्या या प्रतिसादा वरुन बहुधा तुमचीच [ कोणाची ? ] कविता अंधुकशी आठवली पिशवी उघडुन दाखव असं काहीशी रचना होती. कोणाला आठवते का ती महान रचना ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

In reply to by मदनबाण

ती महान रचना महाकवी धनाजीरावांची आहे. हा घ्या त्याचा पत्ता माझं हे सारं सामान गं सखू... मिपा हॉल ऑफ फेम मधे या रचनेचा समावेश करावा अशी आग्रहाचे विनंती मी संपादक मंडळाला करतो आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैबु, मनापासुन धन्यवाद ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मूळ लेखाला चार(शे) चांद लावणारा प्रतिसाद!

कोकणातली हाप चड्डी का मड्राशी लुंगी? चेन्नइ एक्सप्रेस शिनुमा एकट्यानेच पाहायला गेलता का? मग गोव्याचा दुधसागर सोप्नात दिसायचा का?

In reply to by टवाळ कार्टा

=)))))))) अरे हलकट आचरट बवलत टवाळा, तुझा हुको हिवाळा आणि मिळो तुला उन्हाळा! =))))))) बुळूक बुळूक बुळूक!

In reply to by अत्रुप्त आत्मा

आता, सगा आला की फोरमला खरी सुरूवात होईल .... जुने दिवस आठवले....

बॅचलर आणि बाथरूममध्ये सांडलेला शांपू यांचे अतूट नाते आहे. तुमी शाम्पूच्या बाटलीचे झाकण लावायचा हे उत्तम हो! नाहीतर कुठेही सांडतो आणि डाग पडतात

पॅराशूट बांधून झोपायची सवय असणार्‍यांना पडणारी स्वप्ने "चिरकालापर्यंत" तरंगतात. धपकन् पडतझडत नाहीत हे तेव्हाचे जनरल नाॅलेज होते हे आठवून गेले.