मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
2 Apr 2021 - 10:11 am

ढिशुम क्लेमर:-
(सदर लेखन आम्हास काल इमेल बॉक्स चे उत्खनन करताना सापडलेले आहे,म्हणून त्यास हे टायटल दिले आहे. आमचे टायटल पाच वर्षांपूर्वी क्लिअर-झालेले असल्याने "असे" नाव सुचले,हे वाचकांपैकी गरजूंनी नीट ध्यानाच्या आत घ्यावे! गरजू 'नसलेल्यांबद्दल' आमची काहीही आरजूच नाही! ;) त्यामुळे त्यांनी नुसतेच वाचावे)

मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न!

1) मला (सकाळची) वेळेवर आपोआप जाग आलेली आहे.

2) मेसवर शेपूची भाजी खायला मिळते आहे.

3) मी दररोज कपडे धुतो आहे.

4) रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावला आहे.

5) शॅम्पूच्या बाटलीचे झाकण लावून मगच बाथरूम मधून(टॉवेल गुंडाळून) बाहेर आलेलो आहे.

6) कामाची पिशवी घरी परत आल्या आल्या लगेच आवरतो आहे. (अर्थात हे स्वप्न चिरतरुण आहे,याला भूतकाळ कधी लाभणार?, कोण जाणे!?)

7) घरी मित्रमंडळी वगैरे कोणीही-कधीही-कशाही साठी येत नाहीत..

अजून एक भाग आहे, तो चालू उत्खननात हाताशी लागला ,तर टाकेन.
=================

उपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बेचलर हा शब्द काळजाला भिडला.

हो हो..अगदीच. ढीशुंम कलेमर सुद्धा.

अन् शेवटचं वाक्य अगदी वैशिष्ट्य पूर्ण आहे.
ते वाचून कुणाची उत्कंठा वाढेल तर कुठं काळजाचा थरकाप!

प्रचेतस's picture

2 Apr 2021 - 11:24 am | प्रचेतस

aaaaaaaaaa

आंद्रे वडापाव's picture

2 Apr 2021 - 11:30 am | आंद्रे वडापाव

गुर्जी आम्हाला वाटलेलं तुम्हाला बेचलेर काळात अशी स्वप्न पडत होती आधी....

ब

असे उत्खन्न करुन पहायवास हवे...
बाकी, आमची बरीच स्वप्ने अ‍ॅडल्ट व्हती आणि कोणाला पण [ हे समजलाच असाल म्हणा ] सरळपणे सोडले नव्हते ! एव्हढे बर्‍यापैकी आठवते. :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scatman (ski-ba-bop-ba-dop-bop) Official Video HD -Scatman John

प्रत्येक वाक्यात एक सूक्ष्म व छूपा अर्थ आहे, तो जर समजून घ्यायचा असेल तर गुर्जींची त्यावेळाची बेचलर आवस्था प्रत्येक वाक्यागणिक ध्यानात घ्यावी मगच शँपुची बाटली, शेपुची भाजी, कामाची पिशवी, कपडे धुणे इत्यादी स्वप्नांचे खोलवर दडलेले अ(न्)र्थ समजतील.

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2021 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा

पै.जार.बुवा! :D =))

टवाळ कार्टा's picture

2 Apr 2021 - 5:31 pm | टवाळ कार्टा

कहर =))

पैबु,तुमच्या या प्रतिसादा वरुन बहुधा तुमचीच [ कोणाची ? ] कविता अंधुकशी आठवली पिशवी उघडुन दाखव असं काहीशी रचना होती.
कोणाला आठवते का ती महान रचना ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

ती महान रचना महाकवी धनाजीरावांची आहे.
हा घ्या त्याचा पत्ता
माझं हे सारं सामान गं सखू...

मिपा हॉल ऑफ फेम मधे या रचनेचा समावेश करावा अशी आग्रहाचे विनंती मी संपादक मंडळाला करतो आहे.

पैजारबुवा,

मदनबाण's picture

3 Apr 2021 - 9:22 am | मदनबाण

पैबु, मनापासुन धन्यवाद ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...

तुषार काळभोर's picture

3 Apr 2021 - 3:04 pm | तुषार काळभोर

मूळ लेखाला चार(शे) चांद लावणारा प्रतिसाद!

कोकणातली हाप चड्डी का मड्राशी लुंगी?
चेन्नइ एक्सप्रेस शिनुमा एकट्यानेच पाहायला गेलता का? मग गोव्याचा दुधसागर सोप्नात दिसायचा का?

टवाळ कार्टा's picture

2 Apr 2021 - 5:33 pm | टवाळ कार्टा

यात सकाळचे महत्वाचे कर्मकांड नसल्याने लेख स्मरणरंजन वाटतो आहे

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2021 - 7:06 pm | अत्रुप्त आत्मा

=)))))))) अरे हलकट आचरट बवलत टवाळा, तुझा हुको हिवाळा आणि मिळो तुला उन्हाळा! =)))))))

बुळूक बुळूक बुळूक!

प्रचेतस's picture

2 Apr 2021 - 7:23 pm | प्रचेतस

=))

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2021 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा

दुष्ट दुष्ट हसक आगोबा!
आगोबा,एक जीवन्त नागोबा! लउल्लूल्लूल्लू

मुक्त विहारि's picture

3 Apr 2021 - 9:57 am | मुक्त विहारि

आता, सगा आला की फोरमला खरी सुरूवात होईल ....

जुने दिवस आठवले....

कपिलमुनी's picture

3 Apr 2021 - 1:02 am | कपिलमुनी

बॅचलर आणि बाथरूममध्ये सांडलेला शांपू यांचे अतूट नाते आहे.

तुमी शाम्पूच्या बाटलीचे झाकण लावायचा हे उत्तम हो! नाहीतर कुठेही सांडतो आणि डाग पडतात

मुक्त विहारि's picture

3 Apr 2021 - 9:58 am | मुक्त विहारि

बाटलीला झाकण हे हवेच ....

अनन्त्_यात्री's picture

3 Apr 2021 - 7:24 pm | अनन्त्_यात्री

पॅराशूट बांधून झोपायची सवय असणार्‍यांना पडणारी स्वप्ने "चिरकालापर्यंत" तरंगतात. धपकन् पडतझडत नाहीत हे तेव्हाचे जनरल नाॅलेज होते हे आठवून गेले.

किसन शिंदे's picture

3 Apr 2021 - 10:00 pm | किसन शिंदे

बुवा कसलीही जिल्बी टाकतात मिपावर =))