शेअर मार्केट आणि माझा वर्षापुर्वी तसा काही संबंध नव्हता.. आज Share market मध्ये आलेल्यास १ वर्ष पुर्ण होत आहे.
गेल्या एक वर्षभर जो अभ्यास केला त्यावरुन हि लेखमाला सुरु करत आहे. मी तसा काही कॉमर्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाहिये, पण mathematics & statistics हे माझे आवडते विषय होते. त्याचा शेअर मार्केट मध्ये खुप फायदा झाला. विशेषता Technical भ्यासा मध्ये .आणि या १ वर्षात १.५ लाखाचे ४ लाख करण्यात मी यशस्वी झालो. ते ही Intraday आणि future - Options न करता.
--
शेअर मार्केट हा तसा risky प्रकार समजला जातो.. पण तुम्ही जर अभ्यास करुन यात उतरत असाल तर नक्कीच risk खुप कमी असते ..
यात ढोबळ मनाने Long term आणि Short term ( positional) असे दोन भाग आहेत. Intraday आणि future - Options ( speculative ) हे विभाग अनुभवा नंतरच करावेत हे माझे म्हणणे आहे.
शेअर मार्केट म्हणजे निर्णय क्षमता, patience , timing आणी consistency ह्यांचे अचुक मिश्रण होय. शेअर मार्केट कडे व्यवसाय म्हणुन बघितला गेला की slow and steady wins the race ही म्हण लागु पडते. कुठल्याही प्रलोभनांकडे दुर्लक्ष करुन किंवा अभ्यास पुर्ण लक्ष दिले तर शेअर मार्केट मध्ये यशस्वी होता येते.
शेअर मार्केट मध्ये बौधीक कष्ट असतात.. कुठे ही फक्त बातम्या आणि प्रलोभनांमुळे तुम्ही तात्पुरते पैसे कमवु शकता परंतु कायम आणि सातत्य दाखवुन तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये आला तर नक्कीच तुम्ही यसस्वी होउ शकता.
ज्यांना अभ्यास करायचा नसतो तेच लोक शेअर मार्केट मध्ये अयशस्वी होतात.
शेअर मार्केट मध्ये आपण आपले Target set करायचे.. Long term Target आणि Short term Target set केल्यावर त्या साठी लागणारा अभ्यास आपण करत जायचा..
महिन्याला आपण जे पैसे टाकु ते कश्या पद्धतीने गुंतवायचे , Short termसाठी काय काय गणिती साणि सांखिकी अभ्यास आपण करायचा ते आपण हळु हळु पुढे पाहु.
आपला portfolio आपण बनवायचा. त्या साठी आपण किती वर्षासाठी किती रक्कम जमा करतोय हे सेट करुन त्या प्रमाणे महिन्याला त्या त्या कंपणीमध्ये पैसे टाकायचा निर्णय घ्यायचा, त्याच बरोबर दर महिन्याला आपण Long term (fundamental नुसार) आणि Short term (Technical नुसार) साठी investment करत असु तर आपल्या महिन्याच्या रक्कमेतुन त्याचे distribution करायचे.
आता माझे २ उदा. देतो
समजा मी असे ठरवले आहे, की माझे जे १५ वर्ष राहिलेले होम लोन मला ५-८ वर्षात पुर्ण करायचे आहे, किंवा मला लॉंग टर्म साठी काही पैसे पाहिजेत तर मी ते पैसे Fundamentally strong असलेल्या shares मध्ये टाकत जायचे. १२-१५ Fundamentally strong shares अभ्यासांती आपण वेगवेगळ्या sector मधुन घ्यायचे आणी आपल्या Long term Investment च्या फक्त 7-8 % एका कंपणीत टाकायचे. यालाच तुम्ही स्वताचा Personal mutual fund पण म्हणु शकता.
या बरोबर , तुम्ही Short term Investment goal ठरवुन, उदा. मी माझ्या मुलीची पुढच्या वर्षीची फी जमा करण्यासाठी, माझा Term Insurance भरण्यासाठी Investment करत असेल तर Technical, graphs, indicators यांचा अभ्यास करुन त्यातुन कमी वेळेत पैसे निर्माण करायचे. या साठी वेगवेगळे portfolios बनवले तरी चालतील.
१. या फोटो मध्ये, मी अर्धे अर्धे पैसे दोन्ही Long term आणि Short term विभागात टाकत आहे. १० लाख मी ८ वर्षात टाकेल असे धरले आहे.
२. यामध्ये मी मुलीच्या फी जमण्यासाठी चा portfolio , काही ३०-४० हजार पहिल्यांदा(जमल्यास टाका) आणि नंतर महिन्याचे ३-५ हजार टाकुन दर महिन्याला ५ हजार काढतो आहे दो दाखवला आहे. आणि लागेल तसे Withdrawal पण केले आहेत पैसे .
profit/month हा graph दाखवत आहे.
यात दिसते आहे की थोड्या थोड्या profit ने माझ्या एका वर्षाच्या फी चे पैसे निघाले आहेत. म्हणजे येथे माझी Investment ६०-७० हजार झालीये आणि मला तितकेच रुपये मिळाले ( ८ मार्च ला फी भरली मी :-)
----
पुधील भागात आपण
Share market fundamentals यावर भर देवु
आणि नंतर Technical कडे जावु.
क्रमशः
अवांतर :
तुमचे ही संपुर्ण ज्ञान यात देत राहिल्यास जास्त मज्जा येइल, आणि माझे ही त्यामुळे ज्ञान वाढेल. शेअर मार्केट हा खुप मोठा पसारा आहे आणि यात जितके शिकेल तितके कमीच आहे.
technical short term shares च्या discussions साठी एक वेगळा धागा असावा असे वाटते आहे, जेथे रोजचे शेअर्स बोलले जातील, पण तो थोडा risky प्रकार वाटतोय.
(मी जी माहिती लिहितोय ती नंतर English मध्ये लिहिणार आहे, English चांगले नसल्याने तेथे ही अवघड वाटते आहे :-), पण link देइल नंतर)
- गणेशा
(IT मध्ये असला तरी लेखक Account - finance कंपणीचा मालक आहे :-) :-) :-)
)
प्रतिक्रिया
20 Mar 2021 - 2:14 pm | अनन्त अवधुत
जागा धरून ठेवतो.
20 Mar 2021 - 2:16 pm | प्रचेतस
मस्त सुरुवात रे गणेशा,
तपशीलवार लिहीत जा,, लेखमाला वाचत असेनच.
20 Mar 2021 - 2:18 pm | कुमार१
मस्त सुरुवात
20 Mar 2021 - 2:18 pm | कुमार१
मस्त सुरुवात
20 Mar 2021 - 2:31 pm | Rajesh188
बऱ्याच शंका आहेत हळू हळू विचारल्या जातील.
20 Mar 2021 - 2:51 pm | Bhakti
वाह! एकदम छान सुरुवात!
Excellent effort!!
20 Mar 2021 - 3:38 pm | आंद्रे वडापाव
तुमच्या या उपक्रमास शुभेच्छा
20 Mar 2021 - 3:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं झालं, उत्तम सुरुवात आभार. शक्यतो मराठीतच माहिती द्यावी असे सुचवतो. बाकी, तुम्ही जे ठरवाल ते मान्य.
काही टीप वगैरे, आम्ही आमच्या फायदा आणि नुकसानीस जवाबदार असू या अटीवर तरीही चालेल. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
(मार्केटवर लक्ष असलेला मिपाकर)
20 Mar 2021 - 3:54 pm | मुक्त विहारि
शेयरमध्ये अजिबात रस नाही ...
पण, वाचणार नक्कीच ...
भेंडी, राजकारणी लोक नसते तर, जनता खरेच सुखी झाली असती...
20 Mar 2021 - 4:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वॉव...!थँक्यू व्हेरी मच. देवाचेही खूप खूप आभार.
-दिलीप बिरुटे
20 Mar 2021 - 4:28 pm | मुक्त विहारि
अर्थात, काही जणं, सर्वज्ञ असल्याचा आव आणतात, त्यांची गोष्टच वेगळी आहे...
20 Mar 2021 - 4:42 pm | कंजूस
आम्ही वाचू. पण आपटबार आहोत.
20 Mar 2021 - 6:08 pm | शाम भागवत
👌
20 Mar 2021 - 6:20 pm | आग्या१९९०
छान सुरुवात. शुभेच्छा
20 Mar 2021 - 8:06 pm | बिटाकाका
खूप छान धागा!! शुभेच्छा! शॉर्ट टर्म मी गेली अनेक वर्षे केले पण गेल्या एक वर्षात मी इंट्राडे मध्ये उतरलो. एक वर्षात असे लक्षात आले की मी वर्षानुवर्षे इंट्राडे करण्याची संधी घालवली. पण देर आये दुरुस्त आये! आपल्या धाग्यावर जमेल तसे अनुभव टाकेन, आपली हरकत नसल्यास!
20 Mar 2021 - 8:07 pm | मास्टरमाईन्ड
कृपया मध्येच बंद करु नका किंवा शक्यतो मोठे गॅप टाकू नका ही नम्र विनंती.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा _/\_
20 Mar 2021 - 11:13 pm | गणेशा
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार..
बिटाकाका,
नक्कीच उलट तुमचे अनुभव लिहा.. आवडेल.
Intraday मी करत नाहीये अजून, शिकणे जास्त महत्वाचे, त्यानंतर आपोआप सगळे सोप्पे वाटत असेलच.
तुमच्या मुळे मला intraday च्या स्ट्रॅटेजी कळतील जे मी करत नाही अजूनही.
Intraday ला time द्यावा लागतो हि आणखिन एक गोष्ट, आणि कंपनीचे काम बघुन (IT) स्वतःची कंपनीच्या मिटींग्स (जी नविन सुरु केलीये ) बघुन तो time देता येणार नसल्याने, आणि माझे उद्धीष्ट साध्य होत असल्याने ते नंतर निवांत करेल..
मास्टरमाईंड
मोठे गॅप न टाकण्याचा प्रयत्न करतो, पण वेळेच्या कमतरते मुळे थोडे अवघड वाटतेय.
हा भाग छोटा होता, पुढील भाग fundamental चा मोठा असेल.. शनिवारी रविवारी लिहीत राहील नक्क्कीच.. त्या आधी हि वेळ मिळाल्यास लिहिणारच..
माझी सुद्धा रिव्हिजन होतेय आणि.
प्राध्यापक बिरुटे सर
नक्कीच, धन्यवाद. टिप्स वगैरे नाही, पण पुर्ण सिरीज नंतर एक धागा रोजच्या विश्लेषणास काढणार आहे.. त्या आधी बेसिक पुर्ण करूयात
राजेश जी
नक्कीच विचारा, आवडेल.
इतर सर्वांचे आभार...
हे असे लिखान नक्की कसे आणि कुठून करायचे, काय काय कव्हर करायचे हे खरे तर अवघड काम आहे, कारण हा व्हास्ट विषय आहे.. पण थोडक्यात कळेल असे लिहिण्याचा प्रयत्न करतो..
21 Mar 2021 - 12:04 am | पिनाक
सध्याचे Fundamentally strong shares कोणते
21 Mar 2021 - 10:22 am | श्रीगुरुजी
माझ्या मते अनुभवानुसार खालील कंपन्यांचे समभाग fundamentally strong असून कायमच उत्तम परतावा देतात.
- Infosys, TCS, L & T, Reliance, Maruti Suzuki, Hero Motors, SBI
यातील कोणत्याही ३-४ कंपन्यांच्या (जमल्यास सर्व कंपन्यांच्या) समभागाचा साठा करीत रहा. शक्यतो कधीही विकू नका. खूप भांडवली नफा मिळत असेल तर विकून नफा मिळवा आणि कालांतराने जेव्हा समभागाचा भाव कमी होईल तेव्हा परत विकत घ्या.
22 Mar 2021 - 12:05 pm | पिनाक
धन्यवाद. लक्ष ठेवेन या शेअर्स वर.
21 Mar 2021 - 10:55 am | गणेशा
श्री गुरुजी धन्यवाद..
@ पिनाक
फंडामेन्टल धाग्यावर या बाबत जास्त चर्चा करता येइल ..
लिहिण्याचे माणस आहे, परंतु मध्येच Fundamentals किंवा technical कोणी विचारले तर त्यावर चर्चा किंवा विचार येथेच वाढत जाइल ...
तरीही Fundamental शेअर म्हणजे काय, कसे ओळखायचे हे त्या भागात हा प्रश्न जास्त योग्य पध्तीतेने सांगता येइल.
तरीही सेक्टर प्रमाणे निवडायचे -
उदा. Material (chemical) sector घेतला तर Asian paint आणि pidillite inida
Fmcg - colgate pomolive, ITC, HUL, TATA Consumer
IT : Infy, TCS
Bank : HDFC bank
AMC : HDFC AMC
Digital : SBI cards
Pharma: auro pharma, cipla
असे शेअर्स असतील.
त्या त्या क्षेत्रातील मोठ्या/मिड कॅप कंपण्या आणि त्यांचे पुर्ण विशेल्षण, इतर त्याच सेक्टर मधील कंपण्यांबरोबर त्यांचे Comparison असे महत्वाच्या गोष्टी आपण पुढे पाहुच.
फक्त एकच, जास्त कंपण्या घ्यायच्या नाहीत १०-१५ कपंन्या घेतल्या की त्यांना व्यवस्थित ट्रॅक करता येते.
मी माझा फंडामेंटल अभ्यास, २-३ महिने केला होता, तेंव्हाच ते शेअर्स घेतले. आणी तो अभ्यास करताना, इतर आनखिन कंपण्या ही चांगल्या वाटल्या किंवा युनिक होत्या त्या कंपण्या मी पोझिशनली म्हणुन माझ्याकडे १-२ महिन्या साठी घेत राहिलो ..
उदा. (यात Small cap पण घेतो मी )
Biocon , hdfc life, HEG, BOB,SBI,Fed BANK, Marksans pharma
Cement sector chyaa shreedigvijay cement ,ambuja cement
तुम्ही एकदा अभ्यास सुरु केला की आपोआप पुढील अभ्यास होत राहतो..
आणि येथे आपण वयक्त्यिक अभ्यास यावर भर देवु.
गुगल ओपन केले तरी अशी कोणते शेअर्स घ्यावे असे अनेक विडीओ समोर येतात, त्यामुळे तेच का हे शोधने महत्वाचे ..
धन्यवाद.
22 Mar 2021 - 12:03 pm | पिनाक
धन्यवाद. वरील पैकी काही शेअर्स माझ्याजवळ आहेत, पण ते अभ्यास न करता घेतलेले आहेत. वेळ मिळाला तर थोडे वाचन करून पाहीन.
21 Mar 2021 - 12:09 am | कपिलमुनी
टिप्स आणि ट्रिक नकोत फ़क्त अभ्यास कसा केलात एवढेच लिहा.
21 Mar 2021 - 6:24 am | चामुंडराय
स्तुत्य उपक्रम आणि छान, माहितीपर धागा.
माझ्या सारख्या शेअराडाणी व्यक्तीसाठी अति उपयुक्त !
मात्र धाग्याचे शीर्षक वाचून एक शंका -
आता बाराखडी ऐवजी चौदाखडी आहे ना ? कारण अँ आणि ऑ चा मराठीमध्ये समावेश केला गेला. त्यामुळे bank हा शब्द मराठीत बँक असा लिहिता येतो हिंदी मध्ये मात्र तो बैंक असा (माझ्या मते चुकीचा) लिहिला जातो.
उदाहरणार्थ (चौदाखडी) :-
क का कि की कु कू के कै को कौ कं कः आणि कॅ कॉ (१३ व १४)
अवांतराबद्दल क्षमस्व परंतु ह्या शंकेचे जाणकारांकडून निरसन व्हावे ह्यासाठी हा पंक्ती प्रपंच.
21 Mar 2021 - 6:29 am | कंजूस
ही लेखमाला वाचून मिपाकर हं आणि ह: पर्यंत जाणार.
21 Mar 2021 - 12:45 pm | अनिंद्य
@ गणेशा,
हा धागा/सिरीज मिपाच्या 'अर्थजगत' मध्ये शोभून दिसेल.
वाचत आहे.
28 Mar 2021 - 9:01 am | गणेशा
मला अर्थजगत हा विभाग नविन लेख लिहिताना दिसत नाही.. प्रशांत यांनी व्यनी केलाय..
28 Mar 2021 - 9:47 am | शाम भागवत
माझाही हाच प्रश्न होता.
असो.
21 Mar 2021 - 5:20 pm | nanaba
वाचतेय
21 Mar 2021 - 5:55 pm | आरवी
छान धागा. वाचते आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा
22 Mar 2021 - 1:01 pm | Rajesh188
बालिश पण प्रश्न असेल तरी विचारतो.
कारण शेअर बाजाराशी कधीच संबंध आला नाही पण
सर्वच विषयात थोडी फार माहिती असावी म्हणून वाचत असतो.
त्या मुळे इंडेक्स कसे ठरतात. शेअर म्हणजे काय,divident म्हणजे काय.
पूर्ण शेअर मार्केट ची माहिती घेण्या पेक्षा आपल्या शी संबंधित शेअर वरच लक्ष असले पाहिजे.
हे थोडेफार माहीत आहे.
प्रश्न हा आहे.
बाजाराच्या नियमा प्रमाणे ज्या वस्तू महाग असतात त्या वस्तू ल ग्राहक कमी असतात.
आपण भाजी बाजारात गेलो तरी महाग भाज्या न घेता स्वस्त भाज्या घेतो.
मग शेअर बाजारात ज्या कंपन्यांचे शेअर चे खूप जास्त आहेत ते कोण खरेदी करते.
म्हणजे थोडक्यात मी घेतलेल्या शेअर चा भाव खूप वाढला तर मी तो कोणाला विकायचा?
विकत घेणारा ग्राहक कोणी शोधायचा.?
विकत घेणारा कोण नसेल तर भाव वाढून सुद्धा मला पैसे कसे मिळतील?
आणि ह्या सर्व प्रश्न च एकच प्रश्न महाग शेअर झाले तर ग्राहक नसतील तरी त्याची वाढलेली किंमत आपल्याला कोण देते
22 Mar 2021 - 1:17 pm | आग्या१९९०
किमती वरून कुठलाही शेअर महाग आणि स्वस्त ठरत नसतो,त्याचे निकष वेगळे असतात. किमतीने स्वस्त आहे म्हणून विकलाच जाईल ह्याची खात्री नसते. म्हणून शेअरची liqidity बघणे.
22 Mar 2021 - 1:34 pm | बिटाकाका
असे बघा, ज्या वस्तूला ग्राहक आहे त्याच वस्तूचे भाव जर जातात (निदान शेअर्स च्या बाबतीत तरी). त्यामुळे जर तुम्ही तुमचा शेअर वर गेला आहे असे गृहीत धरत असाल तर त्याचा अर्थ त्याला घ्यायला ग्राहक ही भरपूर आहेत असेही होते ना.
**************
त्या वाढलेल्या किमतीला घेणारे ते लोक असतात जे त्या शेअर ची किंमत अजून वर जाणार आहे असे गृहीत धरून असतात. ते तसे का गृहीत धरतात याला निरनिराळी कारणे आणि त्यांचा अभ्यास कारणीभूत असू शकतात.
*************
तुम्हाला ग्राहक शोधावा लागत नाही कारण तुम्ही विकणारे आणि अजून कुणीतरी घेणारे हे एकाच प्लॅटफॉर्म वर खरेदी विक्री करत असता. हा प्लँटफॉर्म प्रोव्हाईड करणारी संस्था म्हणजे एक्सचेंज. एक्सचेंज घेणाऱ्या आणि विकणाऱ्या लोकांच्या ऑर्डर्स मॅच करून execute करते. याव्यतिरिक्तही कस्टडीअन, क्लिअरिंग हाऊस, ब्रोकरेज हाउस अशा काही गोष्टींची या फेअर खरेदी विक्री मध्ये भूमिका असते.
************
*मुद्दाम इंग्रजी टर्म्स चा वापर करतोय म्हणजे त्या जास्त सोप्या पद्धतीने लक्षात येतील.
22 Mar 2021 - 1:58 pm | Rajesh188
माहिती बद्द्ल धन्यवाद म्हणजे विकत घेणारे जास्त म्हणून भाव जास्त हा शेअर मार्केट चा पाया आहे.
मी कमतरता म्हणून भाव जास्त असे समजतं होतो..
हे तर समजलं.
समजा शेअर विकायचा नाही फक्त divident वर च समाधान मानायचे तर .
हा निर्णय योग्य असेल का..
आपण शेअर विकत घेणारी कंपनी निरंतर नफा कमवत असेल तर divident हक्का नी मिळतो की.
Promotor share holder ल किती divident द्यायचा हे ठरवतात?
22 Mar 2021 - 3:21 pm | बिटाकाका
डिव्हिडंड वर समाधान मानायचे हा निर्णय योग्य की नाही हे तुमच्या ट्रेडिंग स्टॅटेजीवर ठरेल. म्हणजेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून काय आणि किती परतावा मिळावा याबद्दल तुमची जी अपेक्षा आहे त्यावर. उदा. तुम्ही ६ महिन्यांपूर्वी अबक कंपनीचा शेअर १०० रुपयाला एक असे १०० घेतले. त्याची आताची किंमत समजा १२५ रु. आहे तर तुम्ही २५०० रु. फायद्यात आहात( ब्रोकरेज आणि टॅक्सेस सध्या बाजूला ठेऊ). समजा अबक कंपनीने २ रु. प्रति शेअर डिव्हिडंड घोषित केला तर तुम्हाला २०० रु. फायदा होईल. आता असेही होऊ शकते की तो शेअर १२५ वरून पुढच्या सहा महिन्यात ११० ला येईल किंवा १३५ ला येईल. माझ्यामते इथे त्या शेअर चा अभ्यास कामाला येईल. त्यानुसार तुम्ही डिव्हिडंड घेत राहायचे की मूळ प्रॉफिट बुक करून घ्यायचा हे ठरेल. अर्थात प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीज आणि अपेक्षित परतावा वेगवेगळा असून शकतो.
22 Mar 2021 - 6:24 pm | गणेशा
राजेश जी आणि बिटाकाका , खाली स्वतंत्र प्रतिसाद लिहित आहे या दोन प्रश्नांवर. धन्यवाद
22 Mar 2021 - 6:51 pm | शा वि कु
नुसता नफा पाहून चालत नाही. नफ्याचा पैसा पुन्हा कंपनीत गुंतवल्यास कंपनीला व्यवसाय करून किती परतावा मिळेल, आणि हा परतावा गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे की कमी हे पाहावे लागते. जर गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा नफा व्यवसायात गुंतवून येणारा परतावा जास्त असेल, तर डिव्हिडन्ट न देणे योग्य ठरते. कारण नफा वाटल्यापेक्षा गुंतवल्यास परतावा जास्त येऊन शेअर वधारेल.
या उलट पुनःगुंतवणूक करून मिळणारा परतावा अपेक्षेपेक्षा कमी असल्यास डिव्हिडन्ट वाटणे योग्य. कारण परताव्यामुळे शेअर मूल्यात वाढ झाली ती गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा कमीच असणार.
22 Mar 2021 - 1:02 pm | चौथा कोनाडा
उपयुक्त लेखमाला !
पुढील लेखनभागाच्या प्रतिक्षेत !
22 Mar 2021 - 3:16 pm | गणेशा
सर्वांचे धन्यवाद.
राजेश जी तुमचे प्रश्न चांगले आहेत, उलट devidend चा प्रश्न तर correct विचारला आहे..
ही लेखमाला अश्याच प्रश्नांसाठी आहे, जेणे करून बेसिक ज्ञान वाढेल आणि असे प्रश्न वेगवेगळ्या नजरेने उत्त्तरले जातील...
मला थोडा टाइम द्या, आज रात्री उत्तरे देतो..
22 Mar 2021 - 3:24 pm | टवाळ कार्टा
Excellent effort!!
22 Mar 2021 - 3:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
काही मुद्दे चांगले आहेत
१. निवडक १०-१२ कंपन्यांचे समभाग ठेवावे, शक्यतो वेगवेगळ्या सेक्टरमधले(बँकिंग, आय टी,फार्मा,ऑटो,कन्झ्युमर)
२. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोलसाठी वेगळे समभाग ठेवावे
३. मधे मधे समभाग खालच्या किमतीला विकत घेउन सरासरी खाली आणत राहणे
अजुन वाचण्यास उत्सुक
22 Mar 2021 - 4:23 pm | बिटाकाका
सहमत, आपले मुद्दा नं १ आणि ३ खूप महत्वाचे आहेत. मुद्दा नं ३ शॉर्ट टर्म गोल्स साठी विशेष महत्वाचा आहे.
22 Mar 2021 - 6:49 pm | गणेशा
प्रश्न : समजा शेअर विकायचा नाही फक्त Dividend वर च समाधान मानायचे तर .
हा निर्णय योग्य असेल का..
आपण शेअर विकत घेणारी कंपनी निरंतर नफा कमवत असेल तर Dividend हक्का नी मिळतो की.
Promoter share holder ल किती Dividend द्यायचा हे ठरवतात?
-- >
Dividend बद्दल प्रत्येकाची मते वेगळी असतात..
परंतु Fast growing company शक्यतो Dividend देत नसेल तर जास्त उत्तम असते.
कारण Dividend हा profit चा हिस्सा असतो ..
कंपणीच्या cash flow requirements साठी किंवा तो cash flow वाढण्यासाठी जर हे पैसे कंपणी वापरत असेल तर त्या कंपणीच्या Expansion activities साठी हा पैसा जास्त उपयोगी येऊन share holder ला भविष्यात जास्त फायदा मिळु शकतो..
थोडक्यात Dividend ऐवजी Rate of return on Equity हा जास्त लाभदायक असतो. आणि तो महत्वाचा.
हा जर कंपणी Stable असेल आणि growth easily achieve होत असेल आणि surplus cash कंपणीकडे रहात असेल तर तीचा काही portion कंपणी Dividend म्हणुन देतात ( उदा. TCS)
पण एकुणात, Fast growing economy मध्ये Dividend कंपणीच्या Cash flow , reinvestment आणि profit मध्ये dilution चे काम करतो.
त्यामुळे Dividend वर समाधान मानण्यापेक्शा Rate of return on Equity जास्त महत्वाची.
दुसरी गोष्ट .. ५००० च्या पुढील Dividend वरती वर्षाला आता(२०२० पासुन) सरकार १० % tax आकारत आहे, त्यामुळे त्या पेक्षा कधी ही Fast growing कंपणी आणि जी Cash flow व्यवस्थीत वापरते भले ती Dividend देत नसेल किंवा अत्यल्प Dividend देत असेल तरी त्या कंपणीत investment करणे कधी ही फायद्याचे .
(tax साठी नंतर वेगळा धागा काढणार आहे मी)
22 Mar 2021 - 8:48 pm | श्रीगुरुजी
दुसरी गोष्ट .. ५००० च्या पुढील Dividend वरती वर्षाला आता(२०२० पासुन) सरकार १० % tax आकारत आहे,
आता संपूर्ण लाभांश करपात्र आहे. लामांश एकूण करपात्र उत्पन्नात मिळवून त्या एकूण रकमेवर tax slab नुसार कर आकारणी होईल. ५००० पेक्षा जास्त लाभांश असेल तर उद्गम करकपात होईल.
22 Mar 2021 - 9:13 pm | चंद्रसूर्यकुमार
तसा पूर्वी पण लाभांश करपात्रच होता. पण त्यावेळी लाभांश देण्यापूर्वी कंपनी १५% डिव्हीडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स कापून उरलेला लाभांश शेअरधारकांना द्यायची. त्यामुळे आयकर भरताना मिळालेल्या लाभांशावर कर भरावा लागायचा नाही. त्यातून व्हायचे असे की मोठ्या कंपन्यांचे प्रोमोटर्स वगैरेंना कमी कर भरायचा लागायचा. उदाहरणार्थ रिलायन्सच्या प्रोमोटर्सकडे कंपनीचे तब्बल ३३२ कोटी शेअर्स आहेत. त्यापैकी खुद्द मुकेश अंबानींकडे किती हे तपासून बघायला हवे पण तो आकडा पण कित्येक कोटींमध्ये जाणार हे नक्की. तेव्हा प्रति शेअर ६ रूपये प्रमाणे किमान हजारेक कोटी अंबानींना नुसत्या लाभांशातून मिळाले असतील. आयकरात तो लाभांश उत्पन्न म्हणून धरला तर त्यावर ३०% म्हणजे ३०० कोटी कर भरायला हवा पण डिडिटीप्रमाणे १५० कोटीच भरला जात होता. आता डिडिटी काढून टाकण्यात आला आहे आणि आयकर विवरणपत्र भरताना लाभांश हे पण उत्पन्न धरले जाऊन त्यावर कर भरणे अपेक्षित आहे. या बदलाचा ज्यांना लाभांशामधून घसघशीत उत्पन्न येते त्यांनाच त्रास होईल. इतरांना फार फरक पडणार नाही.
22 Mar 2021 - 11:38 pm | गणेशा
श्री गुरुजी आणि चंद्रसूर्यकुमार
Thanks for correcting me.
23 Mar 2021 - 12:05 am | श्रीगुरुजी
इन्फोसिसने मागील काही वर्षांत दिलेला लाभांश -
२०१६-१७: रू. २५.२५
२०१७-१८: रू. २७.७५
२०१८-१९: रू. ४१:५०
२०१९-२०: रू. १८.५०
२०२०-२१: रू. २१:५०
साधारणपणे २०१७-१८ पर्यंत गुंतवणुकदारांना संपूर्ण करमुक्त लाभांश मिळायचा.
आता तुलनेने कमी टक्के लाभांश मिळतो व संपूर्ण लाभांश करपात्र आहे.
22 Mar 2021 - 9:45 pm | आग्या१९९०
लाभांश हा शेअरच्या दर्शनी मुल्यावर मिळतो , बाजारातील त्या शेअरच्या किंमतीवर नाही. त्यामुळे प्रत्यक्षात परतावा कमीही मिळू शकतो. फायदा एकच म्हणता येईल की शेअर न विकता हातात लाभांशरूपी रक्कम मिळते. लाभांश वाटल्यावर त्या शेअरचा भाव पूर्व लाभांश इतका होतो.
22 Mar 2021 - 7:26 pm | गणेशा
मग शेअर बाजारात ज्या कंपन्यांचे शेअर चे खूप जास्त आहेत ते कोण खरेदी करते.
याच्या उत्तरासाठी मी एक Case study सांगतो :-
समजा मी एक साधा व्यवसाय टाकला, आपण असे समजु की मी पेन्सिल बनवण्याचा व्यवसाय टाकला. नंतर मला नफा व्हायला लागला, तर मला असे वाटते की मला माझा Business वाढवण्यास भांडवल लागेल जेणे करुन मी दुकान्/कंपणी टाकुन जास्त प्रमाणात विक्री करुन जास्त नफा कमवेल. मग मी Entity निर्माण करतो , तुम्ही याला कंपणी पण म्हणु शकता.
माझ्याकडे दोन रस्ते आहेत, पहिला लोन घ्यायचे, पण यात रिस्क आहे, जर माझा व्यवसाय निट चालला नाही तर मला त्या कर्जाचे हप्ते तर नियमित फेडावे लागेलच. आणी यात मुद्दल बरोबर व्याज पण जाईलच.
दुसरा मार्ग समजा मी माझ्या काही मित्रांना सांगितले की माझ्या व्यवसायात येव्हडा profit होतो आहे तर तुम्ही पैसे गुंतवत असाल तर मी तुम्हाला भागिदार (partner ) करुन घेतो. त्या बद्दल तेव्हड्या हिस्स्याचा नफा तुमचा. यात मला व्याज ही जात नाही आणि मुद्दल हि परत द्यावी लागत नाही.
यात जे मित्र म्हणजे भागिधारक जे आहेत, ते म्हणजे share holder/भागिदारक.
आता समजा मी १० रुपये face value ने shares allot केले ( through IPO) आणि माझ्या कंपणीचा व्यवसाय, त्याच्या पुढील ऑर्डर्स, माझे balance sheet असे पाहुन जास्त लोकाना हे allot झालेले shares पाहिजे असतील तर ते जास्त भावाने ते विकत घेतात.
म्हणजे १० रुपये भाव असेल तर ११ रुपयांनी घेतील, मग काही अजुन जास्त .. अशी त्या shares ची किंमत वाढत जाते, shares ची quantity हि ठराविक असते, त्यामुळे Seller असले तरच buyer buy करु शकतात. त्यामुळे जास्त buyer असल्यास share price वाढत जाते. जास्त Seller असल्यास share price कमी होत जाते.
त्यामुळे जास्त भाव म्हणजे खरीददार नाही असे होणार नाही. उलट बर्याचदा चांगली कंपणी तीचा चांगला Cash flow तीच्या ऑर्डर्स या पाहुन तीचा भाव वाढत जातो.
(मला वाटते नंतर share market basics असा एक धागा काढुन असे प्रश्नांची उत्तरे एकत्र टाकता येतिल )
- गणेशा
22 Mar 2021 - 7:32 pm | बिटाकाका
दोन्ही प्रतिसाद आवडले.