सी.एन.जी. असलेली कोणती कार घ्यावी?

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in काथ्याकूट
9 Mar 2021 - 1:38 pm
गाभा: 

नमस्कार लोकहो,

सध्या मिपावर मु.विं. चा फार्म हाऊसचा धागा चर्चेत आहे. तेव्हा असाच एक माझं शेतघर नागोठणे येथे तयार झाले आहे आणि अंदाजे या मे महिन्यात रहायला जावु अशी शक्यता वाटत आहे. सध्या घरुन काम करित असल्याने पुढे मग कं. नी ने परत कामावर बोलवे पर्यंत मे पासुन तिथे राहुन काम करण्याचा मनसुबा आहे.

तसे आठवड्यातुन ३-४ वेळा बंगल्याच्या कामाचे देखरेखीसाठी तिथे सकाळी जावुन संध्याकाळी परत घरी येतो असेच चालले आहे. त्यामुळे मोबाईलच्या जिओच्या डेटावर काम करुन पाहिले आहे. जिओ नेटवर्क तिथे खुप छान चालतंय.

आता मुळ मुद्याकडे वळुया.

सध्या मला आठवड्यातुन ३ वेळा येजा करावी लागते त्याला खुप वेळ जातो आणि सकाळी जाताना ठाण्यावरुन कोकणात जाणार्‍या एस्टी गाड्या मिळतात. पण वाकणला पाली फाट्यावर उतरुन टमटमने ३ कि.मी. पुढे जावे लागते व त्या ठिकाणाहुन रस्त्च्यापासुन आतमध्ये ८०० मीटरवर बंगला आहे. सामान वगैरे न्यायचे झाले तर स्वःताची गाडी निदान दुचाकी तरी हवीच.

पण मग तिकडुन येताना परत पाली फाट्यापर्यंत वाकण येथे कोणत्या तरी वाहनाला हात करुन विनंती करावी लागते. आणि मग तिकडून एसटी किंवा परत दुसरे कोणाते ही वाहन मिळते.

तर मला सध्या एक सी.एन.जी. वर चालणारी कोणती गाडी घ्यायची झाली तर २.५० ते ३.०० लाखापर्यंत कोणती वापरलेली कार घ्यावी.ही गाडी पुढे मला त्या ठिकाणी खुप उपयोगी पडणार आहे.
पण मी सी.एन.जी चे बद्दल खुप तोटे असतात असे ऐकले आहे जसे की ती रोजचं चालवावी लागते, घाट चढताना किंवा जास्त चालवली तर इंजिन गरम होते, मेंटनंन्सचे जास्त काम निघते , सी.एन.जी. चे स्टेशन्स ची उपलब्धता वगैरे वगैरे.

मला आवडणारी डिझायर किंवा टियागो आहे.

पेट्रोल डिझेल चे दर पाहता सी.एन.जी. कारच सध्या परवडणार आहे . तेव्हा जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

ता.क.या आधीचे सर्व ४ ही धागे वाचुन झालेले आहेत तेव्हा त्याच्या पुनरेकवार इथे उल्लेख नको.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

9 Mar 2021 - 1:44 pm | नेत्रेश

डोक्याला ताप नाही :)

काहीच अडचण आली नाही

ड्राइवर अधिक 5 जणांना, मस्त वाटली

बापूसाहेब's picture

9 Mar 2021 - 2:59 pm | बापूसाहेब

तुमच्या बजेट मध्ये चांगल्या कंडिशन मधली टियागो किंवा डिझायर मिळणे अवघड आहे.

इको, वागेनॉर मिळू शकतील..

बापूसाहेब's picture

9 Mar 2021 - 3:09 pm | बापूसाहेब

पर किलोमीटर चा हिशोब केल्यास Cng गाडी पेट्रोल पेक्षा कितीतरी पटीने परवडते.
Cng गाडीचा पर किमी खर्च अंदाजे 2-2.5 रुपयापर्यंन्त जातो तर पेट्रोल चा जवळपास दुप्पट म्हणजे 4-5 रुपये. आता दिवसेंदिवस पेट्रोल महाग होतेय त्यामुळे CNG गाडी घेणे कधीही फायदेशीर. पण गाडी व्यवस्थित कंडिशन मध्ये नसेल तर तीच गाडी एक डोकेदुखी बनेल.

CNG हा कंपनी फिटेड हवा. बाहेरून बसवलेला CNG किट फार क्वचित सक्सेसफूली काम करतो... कधीकधी तो जीवावर बेतु शकतो.

मेंटेनन्स च्या बाबतीत CNG आणि पेट्रोल जवळपास सारखेच आहेत.
Cng किट ची व्यवस्थित देखभाल आणि गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यास गाडीत गॅस चा वास येतो.

घाट, तीव्र चढ इत्यादी ठिकाणी CNG गाडी चालवणे त्रासदायक असते. गाडी लवकर पिकअप घेत नाही.. तुम्हाला पेट्रोल गाडी चालवायचा अनुभव असल्यास तुम्ही हा फरक एका सेकंदात ओळखाल..
असो त्याव्यतिरिक्त गाडी चालवताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही. Highway आणि city दोन्हीकडे गाडी एकदम स्मूथ चालते.

मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चांगली गाडी हवी असल्यास बजेट थोडंस वाढवावे लागेल.

शुभेच्छा.

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2021 - 5:31 pm | चौथा कोनाडा

+१

आणखी एकः सी एन जी सिलेंडर जागा व्यापतो, त्या मुळे तेव्हढी सामनजागा कमी होते.

यांच्या बजेटमध्ये फक्त वॅगनार बसण्याची शक्यता आहे.

पिनाक's picture

9 Mar 2021 - 5:36 pm | पिनाक

अल्टो?

हुंदाई ची aura पण चेक करा. एका मित्राने घेतली आहे. चांगली आहे म्हणतोय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Mar 2021 - 5:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

बजेट्बाहेर जातील, पण दोन्हि गाड्या मस्त. शक्यतो मारुती ट्रु व्हॅल्यु कडुन घ्या.

कपिलमुनी's picture

9 Mar 2021 - 6:09 pm | कपिलमुनी

ईको घ्या , तुम्हाला सामान न्यायला आणायला उपयोगी आहे.
सी एन जी नंतर भरपूर जागा राहते. त्या बजेट मध्ये आहे .

कपिलमुनी's picture

9 Mar 2021 - 6:11 pm | कपिलमुनी

ती रोजचं चालवावी लागते, नाही
घाट चढताना किंवा जास्त चालवली तर इंजिन गरम होते, नाही, घाटात पिक अप मिळत नाही
मेंटनंन्सचे जास्त काम निघते , नाही
सी.एन.जी. चे स्टेशन्स ची उपलब्धता - परिसरावर अवलंबून आहे , एकदा टाकी फुल्ल केली कि २३० किमि जाते शिवाय नंतर पेट्रोल चा ओप्श्न आहे

मुक्त विहारि's picture

9 Mar 2021 - 7:00 pm | मुक्त विहारि

इको अतिशय उत्तम गाडी आहे, अर्थात मध्यम वर्गीय गाडी आहे...

3 फायदे आहेत

एक, जागा चांगली आहे, चार माणसे असतील तर, सामान ठेवता येते

दोन, CNG असेल तर परवडते

तीन, शाॅर्ट डिस्टन्स असेल तर, इंजिन गरम होत नाही,

आणि तसेही 2-3 तास गेले की, आपण चहापाणी घेतोच

कंजूस's picture

9 Mar 2021 - 6:56 pm | कंजूस

नेरळ माथेरान फेऱ्या करणाऱ्या बऱ्याच प्राइवेट taxis ECCO आहेत. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.

कंजूस's picture

9 Mar 2021 - 6:56 pm | कंजूस

नेरळ माथेरान फेऱ्या करणाऱ्या बऱ्याच प्राइवेट taxis ECCO आहेत. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.

स्वतन्त्र's picture

10 Mar 2021 - 11:10 am | स्वतन्त्र

माझ्याकडे २ CNG गाड्या आहेत.एकात कंपनी fitted किट आहे -- Maruti Alto आणि एकात मी बसवून घेतले आहे -- VolksWagen Vento.

अल्टो CNG.
-९ वर्ष वापरतो,१० kg टाकी क्षमता,एकदा टाकी फुल्ल केली (साधारण ५०० रु ) कि २५०-२७५ किमी अजूनही जाते. शून्य Maintenance.
-वर्षातून एकदा सेर्विसिन्ग.

Volkswagen Vento - petrol (CNG -कॉन्व्हर्टेड )
-१० वर्ष वापर (पहिले पाच वर्ष पेट्रोल - नंतरचे पाच CNG).
-१.६ लिट एंजिन असल्यामुळे अर्थातच अल्टो पेक्षा परफॉर्मन्स चांगला.एकदा टाकी फुल्ल केली (साधारण ५०० रु ) कि १७०-२०० किमी जाते.
-वर्षातून एकदा सेर्विसिन्ग.

माझा अनुभव दोन्ही गाड्यांच्या बाबतीत उत्कृष्ट आहे.

Pickup ला थोडा फरक पडतो CNG ला ,पण highway ला एकदा स्पीड पकडला कि काही फरक जाणवत नाही.आणि गरज पडल्यास एका बटण प्रेस वर पेट्रोल वर काही क्षणात गाडी जाते.
रुंनींग कॉस्ट जवळपास पेट्रोल दुचाकी एवढा त्यामुळे गाडी वापरताना खर्चाचा फार विचार डोक्यात येत नाही.

मुक्त विहारि's picture

10 Mar 2021 - 11:13 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

सुबोध खरे's picture

10 Mar 2021 - 1:19 pm | सुबोध खरे

मारुती ट्रू व्हॅल्यू कडून कंपनी फिटेड सी एन जी गाडीच घ्या.

मारुती ट्रू व्हॅल्यू च्या गाड्या एक वर्षाची गॅरंटी देतात आणि कसून तपासून मगच घेतली आणि विकलेली असते. गाडी १०-१५ हजार महाग पडेल पण नंतर होणार डोक्याचा ताप वाचतो

मारुतीचे कंपनी फिटेड सी एन जी सर्वात भरवशाचे आहेत. तितके कोणताही लोकल मेकॅनिक करू शकत नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे.

बाकी साधारण ४-५ वर्षे व्यवस्थित वापरलेली गाडी घ्यावी आणि आपण ४-५ वर्षे वापरून फुकून टाकावी असे माझे मत आहे.

गाडी हि आपल्या सुखसोयीसाठी असावी. मेकॅनिक चे पॉट भरावे म्हणून नाही

प्रमोद देर्देकर's picture

11 Mar 2021 - 8:31 am | प्रमोद देर्देकर

मुवि, स्वतंत्र, कपिल, बापूसाहेब, आणि डॉ. खरे साहेब सर्वांच्या सविस्तर प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.

मुविसाहेब तुम्ही दिलेल्या क्रमांकावर श्री.बेहरे साहेबाना फोन केला तेव्हा त्यांच्याकडे मला पाहिजे तशी CNG Dezire 2. 60 लाख पर्यंत मिळेल अशी गाडी आहे.
गाडी 2011 ची आहे. पण मी 4 था मालक होणार आहे.
तर त्याने मला काही तोटा आहे का ? आणि दुसरे म्हणजे रिसेल व्हॅल्यू कमी होणार.
अशी गाडी घेताना काय काळजी (तपासावे)घ्यावी की अशी गाडी घेऊच नये ? कारणं जुन्या गाडी कुठपर्यंत चालवता येते? 2025 पर्यंत का ?

बेहरे, सचोटीने व्यवसाय करतात, असे एकाने सांगीतले, म्हणून तुम्हाला नंबर दिला...

अर्थात, ज्याअर्थी 3-4 मालक होऊन गेले आहेत, त्याअर्थी अशी गाडी घेणे, थोडे रिस्की होऊ शकते, हा माझा अंदाज...

गाडी येतांना खर्च घेऊनच येते, त्यामुळे आधी उत्तम मेकॅनिक पण बघून ठेवा....हा अनुभव आहे...

त्यांनी तुमच्या बजेट मधीलगाडी सुचवली ते आपल्या जागी बरोबर असेल. पण एक तर तीन मालकांनी का विकली?

दुसरे म्हणजे त्या गाडीचा संपूर्ण विमा आहे नकी फक्त थर्ड पार्टी आहे? ( हि शक्यताच जास्त आहे).

अर्थात संपूर्ण विमा असेल तरच गाडीचे काही काम निघाले तर तुम्हाला विम्याचे पैसे मिळतील.

गाडीला १० वर्षे झाली आहेत आणि ती मुंबई ठाण्यातील आहे याचा अर्थच असा आहे कि गाडी बर्यापैकी गंजलेली असेल आणि रबराचे भाग कडक झालेले असतील. अशी गाडी शक्यतो घेऊ नका. कुलंट चा पाईप गळायला लागला, ए सी चा पाईप फुटला, फॅन बेल्ट तुटला, फॅन बंद पडला सारख्या बारक्या बारक्या कटकटी फार निघतात.

मुंबई बाहेर बंद पडू लागली तर फार कटकट होईल.

गाडी ५ वर्षापर्यंतचीच घ्या म्हणजे वर्ष दोन वर्ष तरी काम निघणार नाही.

चौथा कोनाडा's picture

11 Mar 2021 - 1:03 pm | चौथा कोनाडा

प्रमोद देर्देकर साहेब, वापरलेली गाडी विकत घ्यायची तर 4-5 वर्षांपेक्षा जास्त जुनी घेऊ नये असा ठोकताळा आहे.
या मुळे दुरुस्ती खर्च आले तर ते साधारणपणे मर्यादित असतात. नाही तर खुप जुनी गाडी घेतली तर प्रवासपेक्षा गॅरेजला जास्त फेऱ्या माराव्या लागतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Mar 2021 - 10:17 am | राजेंद्र मेहेंदळे

साधारण १ लाख कि.मी.च्या आतील गाडी घ्या. चौथे मालक म्हणजे रिस्की आहे.गाडी खिळखिळी झाली असण्याची शक्यता आहे.
शिवाय २०११ म्हणजे १० वर्षे जुनी, म्हणजे ४-५ वर्षात ग्रीन टॅक्स वगैरे लागणार. ओळखीच्या कोणाची गाडी असल्यास १-२-१ व्यवहार करा. स्वस्त पडेल(कमिशन वाचेल)

मुक्त विहारि's picture

11 Mar 2021 - 10:55 am | मुक्त विहारि

शक्यतो नविन गाडी घ्या...

गणेशा's picture

12 Mar 2021 - 7:55 am | गणेशा

प्रमोद सर,
बंगला/शेतघर ह्या साठी मनापासुन अभिनंदन.. आवडले..

गाडीचे म्हणाल तर,१-२ वर्ष जुनी असेल तर ठीक आहे, else नविन गाडी घ्या.

बजेट वाढवा.. आपल्या साठी गोष्टी घेताना जमली तर कटकसर बाजूला ठेवा..आणि गाडी नविन घेण्यात जास्त आनंद वाटत असेल तर आनंद घ्या नविन गाडीचा..
पैसे काय adjust होतात...

कोणताही व्यक्ती गाडी का विकतो.
१) गाडीचा खूप शोक आहे.
पैसे हा इथे बिलकुल पॉइंट नाही
ह्या व्यक्ती ची गाडी जरूर घ्यावी.
२) गाडी घेतली मोठ्या आवडीने .
पण
मध्येच आर्थिक अडचण आली,गाडीचा खर्च परवडला नाही.
ह्या व्यक्ती कडून गाडी घेण्यास पण हरकत नाही .
पण बाकी.
गाडीत काही तरी प्रॉब्लेम आहे म्हणून गाडी विकतात.
गाडी मध्ये आता काही अडचण नाही पण पुढे अडचण येईल ह्याची जाणीव आहे म्हणून गाडी विकणारे.
ह्या दोन प्रकार च्या व्यक्ती कडून गाडी खरेदी करू नका
आणि शेवटी एकच सल्ला.
गाडी विकत घ्यायची तर नवीन च भले कमी किमती ची असेल तरी चालेल.

बापूसाहेब's picture

12 Mar 2021 - 8:34 pm | बापूसाहेब

सहमत आहे. नवीन गाडी ती नवीन गाडी..
सेकंड हॅन्ड गाडीला ती सर येत नाही. गाडी आणि ती ही चार चाकी ही आपल्या कुटुंबापैकी एक असते. कित्येक वेळेला आपण आणि आपले कुटुंबीय तिच्यावर विसंबून निर्धास्त पणे प्रवास करत असतो.. त्यामुळे तिच्याशी एक भावनिक नातं तयार होते.. अर्थातच हे माझे वयक्तिक मत आहे. तुम्ही तुमच्या बजेट नुसार निर्णय घ्या. पण जुनी गाडी घेणार असाल तर जास्त वापरलेली किंवा जास्त जुनी गाडी घेण्याच्या फंदात पडू नका. मग ती कितीही स्वस्त असली तरी.. वर मी सांगितल्याप्रमाणे CNG कंपनी फिटेड च घ्या..

या निमित्ताने मी माझा गाडी खरेदी चा अनुभव सांगु इच्छितो. थोडेसे अवांतर होईल पण शेअर करावेसे वाटले म्हणून..

मी जेव्हा गाडी घ्यायचा निर्णय घेतला त्यावेळी कोणीही सपोर्ट केला नाही.. ना घरातल्यांनी ना नातेवाईकांनी.. इथे मी आर्थिक सपोर्ट नाही तर फक्त परवानगी बाबत बोलतोय. वडील तर रागावलेच कि कशाला लागतेय गाडी तुला वगैरे वगैरे 2-3 तास लेक्चर दिले....
पण माझी खूप इच्छा होती..! हौस होती.. त्यावेळी पगार जास्त नव्हता पण तरीही आपली स्वतःची गाडी पाहिजेच असं नेहमी वाटायचे..
अशीच 2 वर्षे उलटली.. पण मनातल्या मानत कुठेतरी नेहमी आपली गाडी असायलाच पाहिजे असं वाटत राहायचं पण घरून परवानगी नसल्याने मी गाडी घेण्याचा विचार नेहमी टाळत राहिलो..

पण एकदा नातेवाईकांमध्ये झालेल्या खूप बेक्कार अश्या अपमानामुळे वाईट वाटले. ( ती स्टोरी पुन्हा कधीतरी ) मग मात्र ठरवले कि आता काहीही झाले तरी आपली स्वतःची गाडी घ्यायचीच. मग ऑफिस मधल्या एका मित्राच्या मदतीने गाड्यांचे शोरूम पालथे घालायला सुरवात केली... पण मजेची गोष्ट म्हणजे मला त्यावेळी गाडी चालवता सुद्धा येत नव्हती. ड्रायविंग क्लास करून 2-2.5 वर्षे उलटून गेली होती. ज्या ज्या शोरूम मध्ये जायचो तिथे टेस्ट ड्राइव्ह घेणार का असा प्रश्न आल्यावर गोची व्हायची.
शेवटी एक गाडी आवडली. त्याच गाडीचे कोटेशन जवळपास 10-11 शोरूम मधून काढून आणले. जिथे सर्वात कमी किंमत आहे तिथून गाडी घ्यायचे फायनल केले.

शेवटी तो सुदीन उगवला ज्या दिवशी गाडीची डिलिव्हरी मिळाली. अर्थातच लोन काढून गाडी घेत होतो.. गाडी घरी आली पण घरी कुणालाच माहिती नव्हते कि मी गाडी घेतलीये. घरी मी आणि बायको दोघेच होतो.. आई वडील दुसऱ्या ठिकाणी असल्याने त्यांना माहिती व्हायचा प्रश्न नव्हता.. पहिल्यांदा स्वतः च्या कमाईतून आपल्याला हवी असणारी वस्तु घेतल्याचा आनंद अवर्णनीय आहे. तो मी शब्दबद्ध करू शकत नाही. पहिल्यांदा गाडीच्या स्टिअरिंग वर हात फिरवताना तो स्पर्श अजूनही लक्षात आहे.
गाडी चालवताना स्पीडोमीटर 70-80 च्या आसपास गेला तेव्हाचा रोमांच मी कधीच विसरू शकत नाही.. गाडीवर पाहिला स्क्रॅच पडला तेव्हा होणारा त्रास आणि झालेल्या वेदना आजही लक्षात आहेत.

2-3 महिन्यांनी आईवडील घरी आले तेव्हा गाडी मित्राची आहे आणि तो परदेशात गेलाय त्यामुळे इकडे लावलीये असं थातुर मातुर कारण देऊन वेळ मारून नेली..
त्यावेळी माझी अवस्था पळून जाऊन लग्न करणार्यां जोडप्याप्रमाणे होती..

नंतर जवळपास 2 वर्षांनी आईवडिलांना कुठूनतरी समजले कि ती गाडी माझीच आहे.. तेव्हा मात्र त्यांनी तो निर्णय मान्य केला आणि जास्त बडबड न करता माझ्या गाडीला मान्यता दिली.

आज 4.5 वर्षे झाली तीच गाडी वापरतोय. मी आणि बायकोने ही गाडी कधीही न विकण्याचा निर्णय घेतला आहे...अगदी कितीही अडचण आली तरीही नाही.. गाडी आयुष्यात आल्यापासून आजवर माझ्या आयुष्यात कितीतरी चांगल्या घटना घडल्या. आर्थिक प्रगती झाली....
आज ती निर्जीव गाडी सुद्धा माझ्या कुटुंबाचा एक सदस्य आहे.. ती जरी भावनाहीन असली तरी माझ्या असंख्य भावना तिच्यात गुंतलेल्या आहेत. आजही मी तीची जीवापाड काळजी घेतो आणि ती माझी आणि माझ्या कुटुंबाची...!!

अर्धवटराव's picture

12 Mar 2021 - 8:57 pm | अर्धवटराव

आवडलं :)

ब्लफमास्टरचा हा सीन आठवला.

बापूसाहेब's picture

13 Mar 2021 - 2:15 am | बापूसाहेब

धन्यवाद.. बाकी ब्लफमास्टर माझा त्या वेळचा आवडता चित्रपट होता..

चौथा कोनाडा's picture

26 Mar 2021 - 5:50 pm | चौथा कोनाडा

सुंदर आहे हा ब्लफमास्टरचा हा सीन !

मुक्त विहारि's picture

12 Mar 2021 - 11:16 pm | मुक्त विहारि

हॅरी पाॅटरच्या छडी प्रमाणे, गाडी आपल्याला निवडते...

हा स्वानुभव आहे..

मला आत्ता पर्यंतच्या सगळ्या सेकंड हॅन्ड गाड्या, अक्षरशः नशीबाने मिळाल्या. काल पर्यंत डोक्यात पण गाडी हा विचार नसायचा आणि दुसर्याच दिवशी, गाडीची खरेदी पण व्हायची ...

गोव्याला फिरायला गेलो होतो, येतांना गाडी बूक करून आलो.

त्यातही गंमत अशी की, गाडी साठी, सहज पैसे जमा होत होते...

सेकंड हॅन्ड गाड्यांच्या बाबतीत मी आत्ता पर्यंत नशीबवान ठरलो आहे.

पण, प्रत्येकाचे नशीब इतके बलवत्तर नसते.

चौथा कोनाडा's picture

26 Mar 2021 - 5:44 pm | चौथा कोनाडा

मस्त लिहिलंय, बापूसाहेब !