सी.एन.जी. असलेली कोणती कार घ्यावी?
नमस्कार लोकहो,
सध्या मिपावर मु.विं. चा फार्म हाऊसचा धागा चर्चेत आहे. तेव्हा असाच एक माझं शेतघर नागोठणे येथे तयार झाले आहे आणि अंदाजे या मे महिन्यात रहायला जावु अशी शक्यता वाटत आहे. सध्या घरुन काम करित असल्याने पुढे मग कं. नी ने परत कामावर बोलवे पर्यंत मे पासुन तिथे राहुन काम करण्याचा मनसुबा आहे.
तसे आठवड्यातुन ३-४ वेळा बंगल्याच्या कामाचे देखरेखीसाठी तिथे सकाळी जावुन संध्याकाळी परत घरी येतो असेच चालले आहे. त्यामुळे मोबाईलच्या जिओच्या डेटावर काम करुन पाहिले आहे. जिओ नेटवर्क तिथे खुप छान चालतंय.
आता मुळ मुद्याकडे वळुया.
सध्या मला आठवड्यातुन ३ वेळा येजा करावी लागते त्याला खुप वेळ जातो आणि सकाळी जाताना ठाण्यावरुन कोकणात जाणार्या एस्टी गाड्या मिळतात. पण वाकणला पाली फाट्यावर उतरुन टमटमने ३ कि.मी. पुढे जावे लागते व त्या ठिकाणाहुन रस्त्च्यापासुन आतमध्ये ८०० मीटरवर बंगला आहे. सामान वगैरे न्यायचे झाले तर स्वःताची गाडी निदान दुचाकी तरी हवीच.
पण मग तिकडुन येताना परत पाली फाट्यापर्यंत वाकण येथे कोणत्या तरी वाहनाला हात करुन विनंती करावी लागते. आणि मग तिकडून एसटी किंवा परत दुसरे कोणाते ही वाहन मिळते.
तर मला सध्या एक सी.एन.जी. वर चालणारी कोणती गाडी घ्यायची झाली तर २.५० ते ३.०० लाखापर्यंत कोणती वापरलेली कार घ्यावी.ही गाडी पुढे मला त्या ठिकाणी खुप उपयोगी पडणार आहे.
पण मी सी.एन.जी चे बद्दल खुप तोटे असतात असे ऐकले आहे जसे की ती रोजचं चालवावी लागते, घाट चढताना किंवा जास्त चालवली तर इंजिन गरम होते, मेंटनंन्सचे जास्त काम निघते , सी.एन.जी. चे स्टेशन्स ची उपलब्धता वगैरे वगैरे.
मला आवडणारी डिझायर किंवा टियागो आहे.
पेट्रोल डिझेल चे दर पाहता सी.एन.जी. कारच सध्या परवडणार आहे . तेव्हा जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
ता.क.या आधीचे सर्व ४ ही धागे वाचुन झालेले आहेत तेव्हा त्याच्या पुनरेकवार इथे उल्लेख नको.
धन्यवाद.
वाचने
13458
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
प्रतिक्रिया
मस्त डिझायर घ्या
मित्राची इको घेऊन नुकताच गुहागर पर्यंत जाऊन आलो
In reply to मित्राची इको घेऊन नुकताच गुहागर पर्यंत जाऊन आलो by मुक्त विहारि
मारूती इको
तुमच्या बजेट मध्ये चांगल्या
पर किलोमीटर चा हिशोब केल्यास
In reply to पर किलोमीटर चा हिशोब केल्यास by बापूसाहेब
+१
In reply to +१ by चौथा कोनाडा
अल्टो?
हुंदाई ची aura पण चेक करा.
डिझायर किवा अर्टिगा घ्या
इको
असे काहीही होत नाही
In reply to असे काहीही होत नाही by कपिलमुनी
इकोच्या बाबतीत चौकशी केली
घाट म्हणाल तर
घाट म्हणाल तर
CNG अनुभव !
In reply to CNG अनुभव ! by स्वतन्त्र
माहिती बद्दल धन्यवाद
मारुती ट्रू व्हॅल्यू कडून
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रमोद देर्देकर
गाड्यांच्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही...
In reply to धन्यवाद by प्रमोद देर्देकर
त्यांनी तुमच्या बजेट मधीलगाडी
In reply to धन्यवाद by प्रमोद देर्देकर
प्रमोद देर्देकर साहेब,
किती रनिंग झाले आहे?
सर्वात उत्तम एक पर्याय आहे ....
प्रमोद सर,
गाडी ही कधीच जुनी घ्यायची नाही
सहमत आहे. नवीन गाडी ती नवीन
In reply to सहमत आहे. नवीन गाडी ती नवीन by बापूसाहेब
कित्ती छान आहे मुक्तक :)
In reply to कित्ती छान आहे मुक्तक :) by अर्धवटराव
धन्यवाद.. बाकी ब्लफमास्टर
In reply to कित्ती छान आहे मुक्तक :) by अर्धवटराव
अर्धवटराव, +१
In reply to सहमत आहे. नवीन गाडी ती नवीन by बापूसाहेब
गाडीच्या बाबतीत सहमत आहे
In reply to सहमत आहे. नवीन गाडी ती नवीन by बापूसाहेब
+१