५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०२१

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
9 Mar 2021 - 10:11 am
गाभा: 

केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम व बंगाल या ५ राज्यांची विधानसभा निवडणुक एप्रिल २०२१ मध्ये होत आहे. निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर होतील.

याच राज्यांच्या २०१६ मधील निवडणुकीनिमित्त काढलेला हा धागा.

५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०१६

या राज्यातील प्रमुख पक्षांची माहिती वरील धाग्यात सविस्तर दिली असल्याने पुनरावृत्ती करीत नाही.

२०१६ च्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्यांमध्ये काही बदल झालेत. २०१६ मध्ये भाजपबरोबर आघाडीत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने आता कॉंग्रेसबरोबर घरोबा केलाय. तामिळनाडूतही नवीन आघाड्या होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ३० वर्षे प्रभाव असलेले जयललिता व करूणानिधी नसलेली ही पहिलीच निवडणुक आहे.

आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या मतपूर्व सर्वेक्षणांनुसार तामिळनाडूत यावेळी द्रमुक आघाडीला मोठे बहुमत मिळून करूणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील १० वर्षे सत्तेत असणाऱ्या अद्रमुकची सत्ता जाणार आहे.

पुदुच्चेरी या अत्यंत लहान असलेल्या केंद्रशासित प्रदेशातही सत्तांतर होण्याची शक्यता असून कॉंग्रेस ऐवजी भाजप आघाडीत असलेले सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मागील अनेक दशकांची परंपरा खंडीत होऊन विद्यमान डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.

बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत असून विद्यमान तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. परंतु तृणमूलला किमान ५७ जागा गमावून १५७ जागा व भाजपला ३ वरून १००+ जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात डावे पक्ष व कॉंग्रेसची वाट लागण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये विद्यमान भाजप आघाडीचे सरकार काही जागा गमावून १२६ पैकी ६७ जागा मिळवून सत्ता टिकविण्याची शक्यता आहे.

एकंदरीत भाजप बऱ्यापैकी फायद्यात दिसतो. कॉंग्रेसला तामिळनाडू वगळता कोठेही भवितव्य दिसत नाही. ममता सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून राष्ट्रीय स्तरावर मोदींना पर्याय म्हणून प्रथम क्रमांकावर पोहोचेल.

हे काल प्रसिद्ध झालेल्या सी-व्होटर मतपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज -

https://maharashtratimes.com/india-news/assembly-election-2021-west-beng...

तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते.

दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे.

आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे.

केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते.

आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे.

तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय.

तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही.
आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार
आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.

पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे.

सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

1 May 2021 - 5:45 pm | शाम भागवत

माझं सामान्य मत म्हणाल तर, मला काम करणारा व भ्रष्टाचारी नसलेला मुमं हवा. तसेच त्याने आपले सगेसोयर्‍यांचे राजकारण केले नाही पाहिजे. सरकार जो काही खर्च करते त्यातला जास्तीत जास्त भाग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आवश्यक वाटते. असे झाले तरच महाराष्ट्राचे भले होईल. ही माझी सर्वसाधारण समजूत आहे.

थोडक्यात, मला महाराष्ट्राचे भले व्हावे असे वाटते. मग ते कोणाकडून होते, किंवा कोणत्या पक्षाकडून होते ही बाब मी दुय्यम समजतो.
त्यामुळे गुरूजींनी मांडलेले जे काही मुद्दे आहेत ते बरोबर का चूक यात मला काडीचाही रस नाही. तसेच त्यांच्या पक्षीय राजकारणातही मला रस नाही. ते त्यांचे त्यांना लखलाभ असो. तसेच मी त्यांचा विरोधक नाही. त्यामुळे उद्या त्यांच्यामताप्रमाणे मोदी वागले तरी मला काही वाईट वगैरे वाटणार नाही. :)

यास्तव मला मुमं म्हणून फडणवीस किंवा पृथ्विराज चव्हाण आवडतील. पण पृथ्विराजांना त्यांचे पक्षश्रेष्ठी कितपत मोकळीक देतील हा प्रश्नच आहे. असो.

तात्पर्य
या वरील दोघां व्यतिरिक्त आणखी कोणी असल्यास ते जाणून घेण्यासाठी मी गुरूजींना प्रश्न विचारला आहे.
🙏

कॉमी's picture

1 May 2021 - 6:00 pm | कॉमी

फेअर इनफ.
हे फक्त पक्षांतर्गत प्रश्न आहेत हे पटले.

__/\__

श्रीगुरुजी's picture

1 May 2021 - 6:30 pm | श्रीगुरुजी

या वरील दोघां व्यतिरिक्त आणखी कोणी असल्यास ते जाणून घेण्यासाठी मी गुरूजींना प्रश्न विचारला आहे.

माझ्या दृष्टीने हे दोघेही पर्याय नाहीत. मुख्यमंत्री म्हणून हे दोघेही अनुत्तीर्ण झाले आहेत. चव्हाणांचे ७५+ वय हा त्यांच्यासाठी अजून एक वाईट मुद्दा आहे.

नव्याने निवडणुक झाल्यानंतर नवीन चेहरा निवडता येईल. त्यासाठी भावी मुख्यमंत्री म्हणून आधीच एखादा चेहरा समोर ठेवण्याची गरज नसते हे अनेक राज्यात अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यातून फडणवीस हाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून निवडणुक लढली तर भाजपची अजून जास्त घसरण होणार हे नक्की.

श्रीगुरुजी's picture

1 May 2021 - 6:00 pm | श्रीगुरुजी

मला भ्रष्टाचार न करणारा मुमं पाहिजे

मला भ्रष्टांशी तडजोड न करणारा, त्यांना क्लीन चिट न देता कारवाई करणारा, खूर्चीसाठी लाळघोटेपणा न करणारा, सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर न खुपसणारा, समर्थक मतदारांच्या पाठीत खंजीर न खुपसणारा, खुर्चीसाठी महत्त्वाचे प्रकल्प रद्द न करणारा, अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्याची चाटुगिरी न करणारा व त्याचा प्रत्येक आदेश न पाळणारा मुख्यमंत्री पाहिजे.

फडणविसांना भरपूर शिव्या देत राहिल्याने मोदी फडणविसांना डच्चू देतील असं वाटत नाही. < /code>

फडणवीसांवर कितीही स्तुतीसुमनांचा वर्षाव केला तरी जनता त्यांना परत संधी देईल असे वाटत नाही.

थोडक्यात फडणविसांना स्वगृही तसेच मवीआ कडूनही जास्त शिव्या मिळाल्याने, मोदींना फडणवीसच जास्त लायक वाटायचे.

शक्य आहे, जनतेला फडणवीस लायक वाटायला हवे.

तसेच निव्वळ पर्याय पुढे न आल्याने परत फडणवीसच मुमं व्हायचे.

आता तसे होणार नाही कारण तसे होण्यासाठी भाजपला बहुमत किंवा बहुमताच्या जवळपास जागा मिळाल्या पाहिजे आणि फडणवीस हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर ते होणार नाही.

२०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा समोर नसतानाही भाजपला १२३ जागा मिळाल्या होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी एखादा चेहरा समोर असण्याची गरज नसते हे अनेक राज्यात अनेकदा सिद्ध झाले आहे.

शाम भागवत's picture

1 May 2021 - 6:05 pm | शाम भागवत

ठीक आहे.
तुमच्याकडे एखादा पर्याय नाही आहे तर.
माझे समाधान झाले.
:)

श्रीगुरुजी's picture

1 May 2021 - 6:22 pm | श्रीगुरुजी

ठीक आहे. असेच समाधानी रहा.

भावी मुख्यमंत्री म्हणून एखादा चेहरा समोर ठेवण्याची गरज नसते हे अनेक राज्यात अनेकदा सिद्ध झाले आहे.

शाम भागवत's picture

1 May 2021 - 7:08 pm | शाम भागवत

हाहाहा
मी असमाधानी कधीच नव्हतो हो.
मला फक्त कुतूहल होते.
तरीपण तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

1 May 2021 - 7:46 pm | श्रीगुरुजी

समाधान झाले असे लिहिले होते, म्हणून मला वाटले की आधी असमाधानी होता. हरकत नाही. असेच समाधानात रहा.

शाम भागवत's picture

1 May 2021 - 10:36 pm | शाम भागवत

हाहाहा

फडणवीसच कशाला?

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, ह्यांना देखील युतीच्या बाबतीत एकटे निर्णय घेऊ दिले नाहीत ....

श्रीगुरुजी's picture

1 May 2021 - 7:48 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रात मागील ३-४ वर्षांपासून फडणवीस म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे फडणवीस अशीच परिस्थिती आहे. मोदी-शहांनी त्यांना महाराष्ट्रात संपूर्ण मुक्तहस्त दिला आहे.

इथेच तर मतभेद आहेत ....

भेटलो की बोलू .....

मला वाटते की नितीन गडकरींनी महाराष्ट्रात यायला पाहिजे आणि मुख्यमंत्री बनून परत महाराष्ट्र ला वर न्यायला पाहिजे, तसेही ते केंद्रात जे काम करतात त्याचे श्रेय त्यांना मिळत नाही

फडणवीस सारख्या माणसापेक्षा उद्धव चालेल मुख्यमंत्री..

आणि चेहराच पाहिजे असेल तर दे धडक बेधडक अजित पवार हाच सर्वोत्तम पर्याय असणार..
कामाचा सपाटा भल्या भल्या ची झोप उडवेल...
असो.. हे मत तुम्हांला पटणारे नसेलच

मुक्त विहारि's picture

2 May 2021 - 7:02 am | मुक्त विहारि

म्हणजे मग निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, तरी चालेल

एका सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, तरी चालेल

तांदूळ घोटाळा केला, तरी चालेल

मेट्रोचे काम रखडले, तरी चालेल

शेतकरी वर्गाला गाजरे दाखवली, तरी चालतील

वीज बिलाच्या बाबतीत, तोंडाला पाने पुसली, तरी चालेल

हिंदू माणसाला जीवे मारण्याची धमकी देणारा, आमदार मंत्री मंडळात असला, तरी चालेल

पण

पण

पण

पण

आम्हाला फडणवीस नकोच ....

व्यक्तीपुजे इतकाच, व्यक्ती द्वेष पण घातकच असतो ....

श्रीगुरुजी's picture

2 May 2021 - 10:29 am | श्रीगुरुजी

फडणवीस व उद्धव समान यूसलेस आहेत. ते दोघेही नको.

अजित पवार बेधडक आहेत, कार्यक्षम आहेत, वेगवान निर्णयक्षमता आहे, लाळघोटेपणा नाही, प्रसंगी काकांच्याही विरोधात जातात, फटकळ आहेत, गुळमुळीत नाहीत या जमेच्या बाजू. परंतु प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप, काहीशी धरसोड वृत्ती, काकांमुळे पुढे जाण्यास मर्यादा, पक्षांतर्गत कमी पाठिंबा, काहीसा बेभरवशीपणा या तोट्याच्या बाजू आहेत.

वामन देशमुख's picture

2 May 2021 - 7:32 am | वामन देशमुख

@श्रीगुरुजी,

आजच्या निकालांचा वेगळा धागा काढाल का?