Skip to main content

५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०२१

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 09/03/2021 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम व बंगाल या ५ राज्यांची विधानसभा निवडणुक एप्रिल २०२१ मध्ये होत आहे. निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर होतील. याच राज्यांच्या २०१६ मधील निवडणुकीनिमित्त काढलेला हा धागा. ५ राज्यांची विधानसभा निवडणुक - २०१६ या राज्यातील प्रमुख पक्षांची माहिती वरील धाग्यात सविस्तर दिली असल्याने पुनरावृत्ती करीत नाही. २०१६ च्या तुलनेत यावेळी वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्यांमध्ये काही बदल झालेत. २०१६ मध्ये भाजपबरोबर आघाडीत असलेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंट पक्षाने आता कॉंग्रेसबरोबर घरोबा केलाय. तामिळनाडूतही नवीन आघाड्या होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील ३० वर्षे प्रभाव असलेले जयललिता व करूणानिधी नसलेली ही पहिलीच निवडणुक आहे. आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या मतपूर्व सर्वेक्षणांनुसार तामिळनाडूत यावेळी द्रमुक आघाडीला मोठे बहुमत मिळून करूणानिधींचे चिरंजीव स्टॅलिन मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील १० वर्षे सत्तेत असणाऱ्या अद्रमुकची सत्ता जाणार आहे. पुदुच्चेरी या अत्यंत लहान असलेल्या केंद्रशासित प्रदेशातही सत्तांतर होण्याची शक्यता असून कॉंग्रेस ऐवजी भाजप आघाडीत असलेले सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मागील अनेक दशकांची परंपरा खंडीत होऊन विद्यमान डाव्या आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये अत्यंत चुरशीची लढत असून विद्यमान तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. परंतु तृणमूलला किमान ५७ जागा गमावून १५७ जागा व भाजपला ३ वरून १००+ जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात डावे पक्ष व कॉंग्रेसची वाट लागण्याची शक्यता आहे. आसाममध्ये विद्यमान भाजप आघाडीचे सरकार काही जागा गमावून १२६ पैकी ६७ जागा मिळवून सत्ता टिकविण्याची शक्यता आहे. एकंदरीत भाजप बऱ्यापैकी फायद्यात दिसतो. कॉंग्रेसला तामिळनाडू वगळता कोठेही भवितव्य दिसत नाही. ममता सलग तिसऱ्यांदा निवडणुक जिंकून राष्ट्रीय स्तरावर मोदींना पर्याय म्हणून प्रथम क्रमांकावर पोहोचेल. हे काल प्रसिद्ध झालेल्या सी-व्होटर मतपूर्व सर्वैक्षणाचे अंदाज - https://maharashtratimes.com/india-news/assembly-election-2021-west-ben… तामिळनाडूत भाजपच्या अपेक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिथे यूपीएचे सरकार बनू शकते. दुसरीकडे पुदुच्चेरीत मात्र एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते, असा अंदाज आहे. आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येताना दिसते आहे. केरळमध्ये एलडीएफ पुन्हा सत्तेत येऊ शकते. आसाममध्ये भाजप १२६ पैक ६७ जागा जिंकेल आणि सत्ता कायम ठेवेल असा अंदाज आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मोठी शक्ती लावणाऱ्या भाजपची कामगिरी दमदार असेल. पण सत्ता मिळण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची कामगिरी या निवडणुकीत दमदार असेल. गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणारा भाजप या निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ५७ जागांचे नुकसान होऊ शकते. ममता यांना गेल्या निवडणुकीत २११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसला १५४ जागा मिळतील. तर काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडील ३३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागांसाठी निवडणूक होतेय. तामिळनाडूमध्ये AIADMK सोबत भाजपने युती केली आहे. पण इथे भाजपच्या अपेक्षांना मोठा झटक बसेल असा अंदाज आहे. राज्यातील विधानसभेच्या २३४ जागांपैकी यूपीए (डीएमके-काँग्रेस ) १५८ जागा जिंकेल. तर एआयएडीएमके- भाजप युतीला ६५ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर एमएनएमला ५, एएमएमकेला ३ आणि इतरांना ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तामिळनाडूत डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची पहिली पंसती देण्यात आली आहे. तर कमल हसन, रजनीकांत आणि शशीकला यांना १० टक्के नागरिकांनीही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली नाही. आसाममध्ये एनडीएच्या जागा कमी होतील पण सत्ता राहणार आसाममध्ये भाजपसाठी चांगली बातमी आहे. राज्यात एनडीएची पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. इथे एनडीएला १२६ पैकी ६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर यावेळी यूपीएची कामगिरी चांगली होईल आणि गेल्या वेळेच्या ३९ जागांवरून ५७ पर्यंत जागा वाढतील. तसंच इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज आहे. पुदुच्चेरीतील विधानसभेच्या ३० जागांपैकी एनडीए १६ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे. तर यूपीएच्या खात्यात १३ जागा मिळतील असं बोललं जातंय. पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे. सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे.

वाचने 53086
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

सर्व मतदानोत्तर सर्वेक्षणांच्या अंदाजानुसार - आसामात भाजप, तामिळनाडूत द्रमुक-कॉंग्रेस आघाडी, केरळात डावी आघाडी व पॉंडीचेरीत भाजपचा सहभाग असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. बंगालात ३ संस्थांनी तृणमूलला सर्वाधिक जागांचा अंदाज दिलाय, तर ४ संस्थांनी भाजपला सर्वाधिक जागांचा अंदाज दिलाय. सर्व अंदाजात भाजपला १००+ जागा दिल्या आहेत.

गुरुजी जसे मोदींना पर्याय कोण असे विचारतात तसे त्यांनी फडणवीसांना महाराष्ट्रात भाजप मध्ये पर्याय कोण ते नाव सांगावे नुसतेच कोणीही चालेल असे म्हणू नये

In reply to by Vichar Manus

मोदींना पर्याय कोण हा प्रश्न इतर पक्षांशी संबंधित आहे, भाजपशी नाही. कारण मोदींना भाजपत इतर पर्याय आहेत, परंतु सध्या इतर कोणताही पक्ष वा त्यांचा नेता मोदींना सध्या तरी पर्याय नाही. ज्याप्रमाणे दुसरी अधिक चांगली नोकरी मिळाल्याशिवाय पहिली सुरू असलेली नोकरी सोडत नाहीत, तसेच दुसरा अधिक चांगला पक्ष पर्याय म्हणून असल्याशिवाय सध्याच्या सत्ताधारी पक्षाला जनता बदलत नाही. बाकी फडणवीस नको असतील भाजपत दुसरा पर्याय कोण याचे उत्तर मी आधीच दिले आहे.

उद्या चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होईल. त्याबरोबरच महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही मतमोजणी होणार आहे. या चर्चेत आणि ताज्या घडामोडींच्या कोणत्याही धाग्यात या पोटनिवडणुकीविषयी विशेष काही लिहिले गेले नाही म्हणून त्याविषयी इथे लिहित आहे. ही पोटनिवडणुक राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने होत आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे पुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने समाधान औताडे यांना उमेदवारी दिली आहे. समाधान औताडे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून जवळपास १८% तर २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून २२% मते घेतली होती. तेव्हा समाधान औताडे यांचे पंढरपूर भागात थोडेफार बळ आहे असे दिसते. तसेच भारत भालके यांच्या कोरोनामुळे निधन झाल्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या पुत्राला सहानुभूतीमुळे मते मिळतीलच. तेव्हा या पोटनिवडणुकीचा निकाल काय लागेल याचा अंदाज लावता येणे सोपे नाही. निकाल काहीही लागला तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. मतदार आपण नक्की कोणत्या निवडणुकीसाठी मत देत आहोत याचे भान ठेऊन मत देत असतात. पोटनिवडणुकीत स्थानिक आमदार निवडायला मत देत असतात तर तेच उमेदवार त्याच विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री निवडायला मत देत असतात. २०१७ मध्ये दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत आआपच्या उमेदवाराचा धुव्वा उडाला होता. पण त्याच राजौरी गार्डनमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आआपच्या उमेदवाराने आरामात विजय मिळवला. २०१७-१८ मध्ये भाजपचा अनेक लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. सुरवात पंजाबमधील गुरदासपूरपासून झाली. त्यानंतर उत्तर प्रदेशात गोरखपूर, फूलपूर आणि कैराना या लोकसभा मतदारसंघात, राजस्थानात अजमेर आणि अल्वर लोकसभा मतदारसंघात, महाराष्ट्रात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तर कर्नाटकात बेल्लारी आणि मंड्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा पराभव झाला होता. तेव्हा २०१९ मध्ये नरेंद्र मोदींचा पराभव होणे ही निव्वळ औपचारिकता आहे असेच काहीसे वातावरण मिडियात उभे करण्यात आले होते. पण २०१९ मध्ये प्रत्यक्ष लोकसभा निवडणुक झाली तेव्हा यापैकी प्रत्येक (हो अगदी प्रत्येक) मतदारसंघात भाजप उमेदवारांनी आरामात विजय मिळवला. याचे कारण काय? तर स्थानिक पोटनिवडणुकांमधून राज्याचा मुख्यमंत्री/ देशाचा पंतप्रधान ठरत नसतो तर स्थानिक आमदार/खासदार ठरत असतो त्यामुळे मतदार स्थानिक आमदार/खासदार निवडून द्यायला मत देत असतात. त्याउलट विधानसभा/लोकसभा निवडणुकांमधून राज्याचा मुख्यमंत्री/देशाचा पंतप्रधान निवडला जात असतो. त्यामुळे तेच मतदार त्याप्रमाणे मत देतात. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की पंढरपूरमध्ये समजा राष्ट्रवादीचा उमेदवार हरला तरी लगेच महाविकास आघाडी सरकारविरोधात लोकांचा कौल आहे असे म्हणता येईलच असे नाही. तसेच समजा राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला तरी तो कौल महाविकास आघाडी सरकारच्याच बाजूने आहे असे म्हणता येईल असे वाटत नाही. राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला तर सामनात मोठेमोठे दावे केले जातील ही गोष्ट वेगळी. हा पण जर निवडणुक पूर्ण एकतर्फी झाली आणि जर दुसर्‍या उमेदवाराचा पूर्णच पराभव झाला, दुसर्‍या उमेदवाराची अनामत रक्कम वगैरे जप्त झाली तर काही प्रमाणात असा दावा करता येईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

२०१९ मध्ये राष्ट्रवादी-कॉंग्रेस युतीच्या राष्ट्रवादीच्या भारत भेलकेंना ८९,७८७ मते तर भाजप-सेना युतीच्या भाजपच्या सुधाकर परिचारकांना ५९,९७६ मते मिळाली होती. मतांचा एकूण फरक अंदाजे ३०,००० मतांचा होता. सुधाकर परिचारक पूर्वी अनेक वर्षे कॉंग्रेस व राष्ट्रवादीत होते व काही वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना मिळालेल्या मतांमध्ये काही स्वत:ची मते, काही भाजपची व काही शिवसेनेची मते होती. आता ते नसल्याने त्यांची स्वतःची मते कोठे जातील हे सांगता येणार नाही. शिवसेनेची बरीचशी मते भगीरथ भेलकेंना जातील. समाधान औताडेंना स्वतःची मते व भाजपची काही मते मिळतील. २०१९ च्या तुलनेत या पोटनिवडणुकीत किती टक्के मतदान झाले हे पाहिले नाही. परंतु २०१९ च्या निकालाची पुनरावृत्ती होण्याची बरीच शक्यता वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

दुर्दैवाने पोटनिवडणुकीसाठी सुद्धा भाजपने एखादा पक्षातील स्थानिक उमेदवार न निवडता एक आयाराम पक्षात आणून उमेदवारी दिली.

कालच "जयपूर डायलॉग" या यू ट्यूब चानेल वर २ मे नंतर पश्चीम बंगालमधे काय होणार यावर चर्चा सुरू होती. त्यात विष्णू बिहारी या पत्रकाराने कुठलीही पार्टी निवडून आली तरीही प्रचंड प्रमाणात राजकिय हिंसाचार होईल असे भाकित केले आहे. त्यांच्या मते ममता सरकार स्थापन झाले तर भाजप व वामपंथीयांच्या हत्या मोठ्या प्रमाणात होतील. भाजप सरकार आल्यास भाजप व त्रिणमूल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या फार मोठ्या प्रमाणात हत्या होतील. विष्णू बिहारी निवडणूक काळात बंगाल कव्हर करत होते व त्यांची बंगालच्या राजकिय परीस्थितीची जाण चांगली वाटली. भाजप - ममता च्या नादात ह्या गोष्टी कडे लक्ष गेले नव्हते. बंगाली लोक फारच भावनीक आहेत. मी ८०च्या दशकात कलकत्यात स्वतः फुट्बॉल सामन्यावरून बसेस जाळतांना पाहिल्या आहेत. ट्रामचे तिकीट १० पैशांनी वाढवले म्हणून ट्राम जाळलेल्या पाहिल्या आहेत. आणि हे सर्व कम्युनिस्ट सरकार असतांना. तेंव्हा आता इतक्या हाय व्होलटेज इलेक्षन नंतर कल्पनाच करवत नाही. देव बंगाली जनतेचे रक्षण करो.

प्रतिसाद खूप उजवीकडे गेल्याने मुविंंना येथे प्रतिसाद देतोय. क्रिकेटचेच उदाहरण देतो, संघ निवडायचे काम कॅप्टन करत नाही संघ निवडायचे काम, समिती करते .. हे पूर्णांंशाने खरे नाही. अंतिम संघात कोणते खेळाडू खेळवायचे हे ठरविण्यात कर्णधाराचे मत सुद्धा महत्त्वाचे असते. २००७ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीला कर्णधार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धोनीने सचिन, गांगुली, द्रविड वगैरे तुलनेने वयस्कर खेळाडूंना संघात घेण्यास विरोध केला होता व निवड समितीने त्याचे म्हणणे ऐकले होते. त्यामुळे रोहीत शर्मा, युसुफ पठाण, जोगिंदर शर्मा, रूद्र प्रताप सिंंग अशा तरूण नव्या खेळाडूंना संधी मिळाली होती. फडणवीस केंद्रीय मंत्रीमंडळात, आज नाही तर उद्या, नक्कीच जाणार.... ते केंद्रात जाऊ देत किंवा एखादा राज्याचे राज्यपाल होऊ देत, ते कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात नको आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शेपूटही पाठवा. आणि त्यांना अर्थमंत्री किंवा संरक्षण दल, ह्यापैकी एक खाते नक्कीच मिळेल... काही नेत्यांचा जळफळाट इथेच आहे... अर्थमंत्री नक्कीच नाही, संरक्षण मंत्री शक्य आहे. बघू या ते केंद्रात जाऊन काय दिवे लावतात कारण तेथे जाऊन कोणाची चाटुगिरी करणार? बरं, यामुळे कोणत्या नेत्यांचा जळफळाट होतोय ते सांगा. काही नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्री पदावर नको आहेत आणि त्यासाठी फडणवीस हे सत्तेसाठी कसे हपापलेले आहेत, हे चित्र रंगवण्यात आले आहे.... फडणवीस सत्तेसाठी किती हपापलेले होते हे वेगळे चित्र रंगविण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची सत्तेसाठीची वखवख, त्यासाठी केलेल्या असंख्य तडजोडी, लाळघोटेपणा व जनतेचा आणि समर्थकांचा वेळोवेळी केलेला विश्वासघात हे ५ वर्षात अनेकदा दिसले आहे. तुरूंगात चक्की पिसायला पाठविणार असे जाहीर सांगून त्याच माणसाशी हातमिळवणी करणे, "नाही नाही नाही, भाजप राष्ट्रवादी बरोबर कधीही युती करणार नाही, एकदा नाही, त्रिवार नाही" असे काळी पाच स्वरात किंचाळून सांगूनही भल्या पहाटे राष्ट्रवादी बरोबरच युती करणे हे सत्तेसाठी अत्यंत हपापलेल्या व अत्यंत कासावीस झालेल्या व्यक्तीचेच उदाहरण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मला भ्रष्टाचार न करणारा मुमं पाहिजे. एखादे नाव असेल तर सांगा. हे नको ते नको याचा काय उपयोग? मोदी विरोधक फक्त मोदी नको एवढेच सांगत असतात. मोदींना पर्याय काय ते सांगत नाहीत. त्यामुळे परत मोदीच येतात. 🤣 तसेच निव्वळ पर्याय पुढे न आल्याने परत फडणवीसच मुमं व्हायचे. 😉 तर महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीसांना पर्याय कोण? म्हणजे ज्यांना फडणवीस नकोसे झाले आहेत त्यांनी पर्याय द्यायला पाहिजे. 😜 फडणविसांना भरपूर शिव्या देत राहिल्याने मोदी फडणविसांना डच्चू देतील असं वाटत नाही. उलट जो जास्त शिव्या खातो तो चांगला असतो. कामं करत असताना, स्वत: खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही असंच मोदींना त्यांच्या स्वत:च्या उदाहरणावरून वाटायची शक्यता जास्त वाटते. 😂 थोडक्यात फडणविसांना स्वगृही तसेच मवीआ कडूनही जास्त शिव्या मिळाल्याने, मोदींना फडणवीसच जास्त लायक वाटायचे. 😉

In reply to by शाम भागवत

समजा, फडनवीसांना एकही पर्याय नाही, पण गुरुजींचे फडनवीसांबाबतचे म्हणणे खरे आहे/ फॅक्च्युअल आहे. तर, खालील पैकी काय निवडाल? १. फडनवीसांना पर्याय नसल्याने फडणवीसांच्या चुका दुर्लक्ष करायच्या. २. चुका दाखवायच्या, आणि त्यापुढे फडनवीसांना राज्याबाहेर पाठवावे का नाही विचार करावा. (चुका किती मोठ्या आहेत पाहावे) ३. कायका हुईना, कुणाचं काय जातंय ४. नवीन पर्याय शोधण्यासाठी जगा करन देणे. (माझा मुद्दा- श्री गुरुजींचे आक्षेप कितपत योग्य ह्यावर फोकस व्हावा, पर्याय आहे की नाही, शोधायचा का नाही हे पुढे आले.)

In reply to by कॉमी

माझं सामान्य मत म्हणाल तर, मला काम करणारा व भ्रष्टाचारी नसलेला मुमं हवा. तसेच त्याने आपले सगेसोयर्‍यांचे राजकारण केले नाही पाहिजे. सरकार जो काही खर्च करते त्यातला जास्तीत जास्त भाग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आवश्यक वाटते. असे झाले तरच महाराष्ट्राचे भले होईल. ही माझी सर्वसाधारण समजूत आहे. थोडक्यात, मला महाराष्ट्राचे भले व्हावे असे वाटते. मग ते कोणाकडून होते, किंवा कोणत्या पक्षाकडून होते ही बाब मी दुय्यम समजतो. त्यामुळे गुरूजींनी मांडलेले जे काही मुद्दे आहेत ते बरोबर का चूक यात मला काडीचाही रस नाही. तसेच त्यांच्या पक्षीय राजकारणातही मला रस नाही. ते त्यांचे त्यांना लखलाभ असो. तसेच मी त्यांचा विरोधक नाही. त्यामुळे उद्या त्यांच्यामताप्रमाणे मोदी वागले तरी मला काही वाईट वगैरे वाटणार नाही. :) यास्तव मला मुमं म्हणून फडणवीस किंवा पृथ्विराज चव्हाण आवडतील. पण पृथ्विराजांना त्यांचे पक्षश्रेष्ठी कितपत मोकळीक देतील हा प्रश्नच आहे. असो. तात्पर्य या वरील दोघां व्यतिरिक्त आणखी कोणी असल्यास ते जाणून घेण्यासाठी मी गुरूजींना प्रश्न विचारला आहे. 🙏

In reply to by शाम भागवत

या वरील दोघां व्यतिरिक्त आणखी कोणी असल्यास ते जाणून घेण्यासाठी मी गुरूजींना प्रश्न विचारला आहे. माझ्या दृष्टीने हे दोघेही पर्याय नाहीत. मुख्यमंत्री म्हणून हे दोघेही अनुत्तीर्ण झाले आहेत. चव्हाणांचे ७५+ वय हा त्यांच्यासाठी अजून एक वाईट मुद्दा आहे. नव्याने निवडणुक झाल्यानंतर नवीन चेहरा निवडता येईल. त्यासाठी भावी मुख्यमंत्री म्हणून आधीच एखादा चेहरा समोर ठेवण्याची गरज नसते हे अनेक राज्यात अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यातून फडणवीस हाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर ठेवून निवडणुक लढली तर भाजपची अजून जास्त घसरण होणार हे नक्की.

In reply to by शाम भागवत

मला भ्रष्टाचार न करणारा मुमं पाहिजे मला भ्रष्टांशी तडजोड न करणारा, त्यांना क्लीन चिट न देता कारवाई करणारा, खूर्चीसाठी लाळघोटेपणा न करणारा, सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर न खुपसणारा, समर्थक मतदारांच्या पाठीत खंजीर न खुपसणारा, खुर्चीसाठी महत्त्वाचे प्रकल्प रद्द न करणारा, अर्वाच्य शिवीगाळ करणाऱ्याची चाटुगिरी न करणारा व त्याचा प्रत्येक आदेश न पाळणारा मुख्यमंत्री पाहिजे. फडणविसांना भरपूर शिव्या देत राहिल्याने मोदी फडणविसांना डच्चू देतील असं वाटत नाही. /code> फडणवीसांवर कितीही स्तुतीसुमनांचा वर्षाव केला तरी जनता त्यांना परत संधी देईल असे वाटत नाही. थोडक्यात फडणविसांना स्वगृही तसेच मवीआ कडूनही जास्त शिव्या मिळाल्याने, मोदींना फडणवीसच जास्त लायक वाटायचे. शक्य आहे, जनतेला फडणवीस लायक वाटायला हवे. तसेच निव्वळ पर्याय पुढे न आल्याने परत फडणवीसच मुमं व्हायचे. आता तसे होणार नाही कारण तसे होण्यासाठी भाजपला बहुमत किंवा बहुमताच्या जवळपास जागा मिळाल्या पाहिजे आणि फडणवीस हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर ते होणार नाही. २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा समोर नसतानाही भाजपला १२३ जागा मिळाल्या होत्या. मुख्यमंत्रीपदासाठी एखादा चेहरा समोर असण्याची गरज नसते हे अनेक राज्यात अनेकदा सिद्ध झाले आहे.

In reply to by शाम भागवत

ठीक आहे. असेच समाधानी रहा. भावी मुख्यमंत्री म्हणून एखादा चेहरा समोर ठेवण्याची गरज नसते हे अनेक राज्यात अनेकदा सिद्ध झाले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीसच कशाला? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, ह्यांना देखील युतीच्या बाबतीत एकटे निर्णय घेऊ दिले नाहीत ....

In reply to by मुक्त विहारि

महाराष्ट्रात मागील ३-४ वर्षांपासून फडणवीस म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे फडणवीस अशीच परिस्थिती आहे. मोदी-शहांनी त्यांना महाराष्ट्रात संपूर्ण मुक्तहस्त दिला आहे.

मला वाटते की नितीन गडकरींनी महाराष्ट्रात यायला पाहिजे आणि मुख्यमंत्री बनून परत महाराष्ट्र ला वर न्यायला पाहिजे, तसेही ते केंद्रात जे काम करतात त्याचे श्रेय त्यांना मिळत नाही

फडणवीस सारख्या माणसापेक्षा उद्धव चालेल मुख्यमंत्री.. आणि चेहराच पाहिजे असेल तर दे धडक बेधडक अजित पवार हाच सर्वोत्तम पर्याय असणार.. कामाचा सपाटा भल्या भल्या ची झोप उडवेल... असो.. हे मत तुम्हांला पटणारे नसेलच

In reply to by गणेशा

म्हणजे मग निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, तरी चालेल एका सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, तरी चालेल तांदूळ घोटाळा केला, तरी चालेल मेट्रोचे काम रखडले, तरी चालेल शेतकरी वर्गाला गाजरे दाखवली, तरी चालतील वीज बिलाच्या बाबतीत, तोंडाला पाने पुसली, तरी चालेल हिंदू माणसाला जीवे मारण्याची धमकी देणारा, आमदार मंत्री मंडळात असला, तरी चालेल पण पण पण पण आम्हाला फडणवीस नकोच .... व्यक्तीपुजे इतकाच, व्यक्ती द्वेष पण घातकच असतो ....

In reply to by गणेशा

फडणवीस व उद्धव समान यूसलेस आहेत. ते दोघेही नको. अजित पवार बेधडक आहेत, कार्यक्षम आहेत, वेगवान निर्णयक्षमता आहे, लाळघोटेपणा नाही, प्रसंगी काकांच्याही विरोधात जातात, फटकळ आहेत, गुळमुळीत नाहीत या जमेच्या बाजू. परंतु प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप, काहीशी धरसोड वृत्ती, काकांमुळे पुढे जाण्यास मर्यादा, पक्षांतर्गत कमी पाठिंबा, काहीसा बेभरवशीपणा या तोट्याच्या बाजू आहेत.

@श्रीगुरुजी, आजच्या निकालांचा वेगळा धागा काढाल का?