करिअर निवड - भाग १

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
12 Feb 2021 - 11:19 am
गाभा: 

https://youtu.be/yyC7iu8RztI
भाग १

https://youtu.be/emll8GtfJxI
भाग २

https://youtu.be/mreJIrBjfDs
भाग ३

https://youtu.be/ufgP20kkX4U
भाग ४

चारही भाग पहा. यातला बराचसा भाग विचार करण्यासारखा आहे. डॉ. राजेंद्र बर्वे हे सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.त्यांनी मानसशास्त्रीय मार्गदर्शनावर बरीच चांगली पुस्तकेही लिहिली आहेत.

पण काही मुद्दे वैयक्तिक मला थोडे जास्त आदर्शवादी किंवा जुनाट वाटले. या मुद्द्यांवर चर्चा व्हावी. _/\_

१) यात डॉक्टर बर्वे म्हणतात त्याप्रमाणे चार पैसे कमी मिळाले तरी चालेल पण व्यक्तिमत्व फुलवणारं करिअर निवडणं हे भारतासारख्या सातत्याने संघर्ष असणार्‍या देशात परवडणारं आहे का?

२) यात डॉ. बर्वे चांगल्या करिअरसाठी सोशल मिडियापासून लांब राहण्याचा सल्ला देत आहेत. हा कितपत व्यवहार्य आहे? सोशल मिडीया इतका वाईट आहे का? तो सजग राहून वापरावा हे मान्यच आहे पण तो वापरणे बंदच करा हा सल्ला आजची नवतरुण पिढी ऐकेल का? काही वेळेला शाळा-कॉलेज मधल्या शिक्षकांपेक्षा युट्यूब/गुगल हा अधिक दर्जेदार मदत करणारा शिक्षक बनला आहे असा अनुभव आहे. हे एकच उदाहरण पहा.

https://laconicml.com/computer-science-curriculum-youtube-videos/

असे बरेच व्हिडिओ आणि चॅनल्स आहेत जे भारतातल्या कितीतरी शाळा-कॉलेजच्या शिक्षक/प्रोफेसरांना शिकवावं कसं,ज्ञान म्हणजे काय,अभ्यास कशाला म्हणतात याचे धडे देऊ शकतील. असं असेल तर सोमिपासून दूर राहून फायदा आहे की तोटा? का जावं भारतातल्या शाळेत/कॉलेजात? फक्त लॅब एक्सपेरिमेंटससाठी???

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Feb 2021 - 3:35 pm | मुक्त विहारि

त्यामुळे, तुम्ही साधारण रूपरेखा आखू शकता, पण माणसांना ठराविक नियमांत बांधू शकत नाही ....

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,"अणू पासून बाँब पण माणसानेच तयार केला आणि वीज पण."

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Feb 2021 - 11:57 am | माईसाहेब कुरसूंदीकर

बर्वे ह्यांच्याशी आम्ही १००% सहमत आहोत. सोशल मिडिया काही प्रमाणात माहिती मिळवायला उपयोगी आहे खरा पण एक सारखे फक्त व्हिडियो पाहणे म्हणजेच शिकणे..असाही गैरसमज लहान मुलांमध्ये वाढतोय असे दिसतोय.