गोबी मुसल्लम Gobi Musallam Gobhi Musallam

काळे मांजर's picture
काळे मांजर in पाककृती
6 Feb 2021 - 10:46 pm

पूर्वतयारीचा वेळ:
३० मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
अख्खा फ्लॉवर

चटणी साठी
कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लसूण
पंढरपुरी डाळ्याची मिक्सरमधून अगदी बारीक केलेली पूड

ग्रेव्हीसाठी
तेल / तूप / बटर यापैकी काहीही कितीही
मोहरी
जिरे
बडीशेप
आले किस
लसूण किस
बारीक कांदा चिरून
दोन टोमॅटो बारीक चिरून
7,8 टोमॅटो किसून पल्प
मेथी पाला अर्धी किंवा एक मूठ
अर्धी वाटी काजू पाण्यात घालून ठेवावेत , मिक्सर मधून वाटून घ्यावेत
दही अर्धी वाटी
पाणी
मीठ
साखर

मसाले
गरम मसाला
लवंग

----------------

1. अख्खा फ्लॉवर पाण्यात शिजवावा, थोडी हळद , एखादा लवंग , थोडे लाल तिखट , मीठ घालावे , 50 % शिजवून घ्यावा.

Kobi

2. फ्लॉवर शिजत असताना हिरवी चटणी करून घ्यावी. कोथिंबीर , एखादी मिरची , लसूण मिस्करमध्ये फिरवून बारीक चटणी करावी , त्याला थिकनेस यायला पंढरपुरी डाळ्याची पूड मिसळून घ्यावी

3. ग्रेव्ही करताना तेल घ्यावे , मोहरी जिरे बडीशेप घालून तडतडावे , आले , लसूण किस घालावा , मिरचीचे तुकडे घालावेत , कांदा घालावा, एखादा ढब्बू मिरची बारीक करून घातला तरी चालेल , टोमॅटो बारीक चिरलेला घालून शिजवावे , मेथी पाला मूठभर घालून शिजवावा शेवटी टोमाटो प्युरी , घालून हलवून शिजवावे , गरम मसाला, हळद , तिखट , मीठ , थोडी साखर घालावी, मग काजू पेस्ट घालावी , भरपूर हलवून मंद आचेवर शिजवावे , शेवटी दही घालून मिसळून फिरवून घ्यावे, गरजेनुसार पाणी घालावे

4. फ्लॉवर उलट करावा, त्यात खाचात हिरवी चटणी दाबून भरावी , ही चटणी भरण्याची क्रिया रणबीर ब्रार च्या व्हिडिओत आहे , इतर कुठे दिसली नाही.

Ch

5. मग हा फ्लॉवर ग्रेव्हीत सोडावा, त्याला ग्रेव्हीने आंघोळ घालावी व झाकण लावून मंद आचेवर शिजवावे.

Km

चपाती , भात काहीही चालेल , दहीभात यासोबत मस्त लागतो.

वाढणी/प्रमाण:
4

अधिक टिपा:
ग्रेव्हीच्या भरपूर व्हरायटी नेटवर उपलब्ध आहेत
ओव्हनमध्येही करतात , त्याने ग्रेव्हीदेखील लाव्हा क्रस्टप्रमाणे होते
हिरवी चटणी ऑप्शनल आहे.
रणवीर ब्रारने ग्रेव्ही दह्याचीच बनवली आहे.
ओल्या नारळाचे दूधही ग्रेव्हीत वापरतात.
टोमॅटो आणि काजू पेस्ट हे मात्र सर्वत्र कॉमन दिसले आहे

माहितीचा स्रोत:
यू ट्यूब

गोभी मुसल्लम

प्रतिक्रिया

नवीन अवतारात स्वागत डॉ. गजानन कागलकर सर.
हा तुमचा नव-अवतार चिरायू होवो. !!

https://www.maayboli.com/node/77933
.
.
.
छान

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 8:16 am | मुक्त विहारि

राजेश साहेबांना कंपनी मिळाली ...

Vichar Manus's picture

7 Feb 2021 - 9:42 am | Vichar Manus

छान receipe

उपयोजक's picture

7 Feb 2021 - 11:48 am | उपयोजक

येऊ द्या आता

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 11:59 am | मुक्त विहारि

भाजप बिर्याणी ...

मोदी द्वेषाची फोडणी दिलेली शिळ्या भाताची खिचडी ...

सध्या तरी, शिवसेनेच्या नावाने, कांदे सोलत बसणार नाहीत...

मिपाकर सहनशील आहेत, त्यामुळे, ह्या रेसिपी वाचाव्याच लागतील...

शा वि कु's picture

7 Feb 2021 - 12:06 pm | शा वि कु

गोभि हिंदू सारख्या नसरभक्षक डिश कश्याला हव्यात ?
:)

शा वि कु's picture

7 Feb 2021 - 12:07 pm | शा वि कु

सबंध

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2021 - 11:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजुन येऊ द्या....!

-दिलीप बिरुटे

काळे मांजर's picture

7 Feb 2021 - 12:40 pm | काळे मांजर

मुसल्लम म्हणजे संपूर्ण

संपूर्ण पदार्थ तुकडे न कापता शिजवणे

गोभी मुसल्लम
मुर्ग मुसल्लम
माही मुसल्लम ( माही म्हणजे मासा)

अशा काही dishes आहेत

ही रेसिपी बहुतेक 12 व्या शतकातील असावी असे वाटते , त्यामुळे मोगलांचा ह्याच्याशी संबंध नाही.

Bhakti's picture

7 Feb 2021 - 1:51 pm | Bhakti

मेथी पाला म्हणजे?
मेथीने कडसर नाही होत का?

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 2:06 pm | मुक्त विहारि

इतके अवतारी लोक मिपाकर सहन करत आहेत, की, त्यांच्यापुढे (अवतारी लोकांच्या पुढे) कडू कार्ले पण गोडच लागते....

Bhakti's picture

7 Feb 2021 - 2:59 pm | Bhakti

डोक्यावरून विमाने उडाली.
ठीक आहे पण ;)

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 3:25 pm | मुक्त विहारि

अवतारी मंडळी, कधी लिंबू फिरवतील काही सांगता येत नाही ...

काळे मांजर's picture

7 Feb 2021 - 3:45 pm | काळे मांजर

मेथीची पाने , भाजीची , थोडी टाकायची , म्हणजे चव बॅलन्स होते

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 4:02 pm | मुक्त विहारि

एकवेळ, भाजीची चव बॅलन्स होऊ शकते ....

आम्ही, आमचा एकच अवतार, टिकवून आहोत...

तसेच, अजून किती अवतार झाले, की तुम्ही समाधानी होणार?

रीडर's picture

7 Feb 2021 - 4:22 pm | रीडर

छान रेसेपी

छान रेसीपी.पंढरपुरी डाळ्या ऐवजी डाळीचे पीठही चालेल. चवीत किंचितच फरक पडेल.