न्यूड फोटो शूट

Primary tabs

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in काथ्याकूट
1 Feb 2021 - 8:25 pm
गाभा: 

एका अभिनेत्रीची न्यूड फोटोशूटवरची मुलाखत पाहीली. तिचं नाव वनिता खरात. ती म्हणतेय, "आत्तापर्यंत आयुष्यात कधी स्लीव्हलेस सुद्धा घातलं नव्हतं आणि आता न्यूड फोटो. या सगळ्याच्या यशाचं श्रेय जातं ते दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांना त्यांनी हे सगळं अक्षरशः पटापट दोन तासात उरकलं.
हे दोघे आजूबाजूला असताना माझ्या अंगावर कपडा नाही याचं मला काहीही वाटलं नाही"
पुढे ती म्हणते, "या शूटनंतर छान वाटते आहे. कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. आज मी पतंग तरी समोर धरला भविष्यात भूमिकेची गरज असेल तर मी समोर पतंगसुद्धा ठेवणार नाही"
मुलाखतकार विचारते, तुमच्या या शूटचा पतंग हा अविभाज्य भाग आहे पण मग पतंगच का ? याबाबत ती म्हणते की मला उंच उडायचे आहे. पतंगासारखं फ्लाय हाय हा संदेश यातून द्यायचा आहे. आतापर्यंत सौंदर्याच्या कल्पना म्हणजे सडपातळ, गोरा रंग अशा होत्या. पण आता यापुढे गोरं नसलेलं, जाड हेही सौंदर्य असू शकतं हे यातून मला सांगायचं आहे. यातून सौंदर्याच्या व्याख्या बदलायच्या आहेत.
पण प्रश्न हा की खरंच या खटाटोपामधून सौंदर्याच्या व्याख्या बदलतील का ?

मुलाखतीची लिन्क पहील्या कमेंटमधे

प्रतिक्रिया

नर्मदेतला गोटा's picture

1 Feb 2021 - 8:26 pm | नर्मदेतला गोटा
विंजिनेर's picture

2 Feb 2021 - 3:49 am | विंजिनेर

काय रे गोट्या, कसले व्हिडियो बघतोयेस? शाळाबिळा नाही का? काकूंना सांगू का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2021 - 4:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्याबद्दल आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

1 Feb 2021 - 8:34 pm | मुक्त विहारि

शालीनता ते नग्नता,

आनंद आहे ....

विंजिनेर's picture

2 Feb 2021 - 3:42 am | विंजिनेर

आपण महानगर पालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात असलो तरी मराठी बाई जागतिक स्तरावर शालीनतेत (नग्नतेत?) मागे का - मत ठोकून द्यायचं
-पु.मु.ल.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 7:45 am | मुक्त विहारि

कुठे झाशीची राणी, आणि कुठे ह्या नविन आदर्श घालणार्या आदर्श स्त्रीया ...

व्यक्तीपूजेचे अजून एक उदाहरण ...

आनंद आहे

विंजिनेर's picture

2 Feb 2021 - 8:28 am | विंजिनेर

आंतरजालावरच्या कुठल्याही व्हिडियो आणि ईंस्टाग्राम पोस्टला व्यक्तिपूजेचे आदर्शच माणनारे* जूनी लोकं पाहून ड्वाले पाणावले - अभ्यास वाढवा मुवि - व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिपूजेचे आदर्श ह्यात गल्लत होतीये!

* (हो, टारुबाळाला मिपावरून हाकलल्यानंतर त्याच्या स्मृतीनिमित्य आम्ही हा शब्द असाच लिहितो)

त्याचाच आदर्श मानणे, ही व्यक्तिपूजाच आहे ...

रजनीकांतची मंदिरे स्थापन ह्याच देशात होतात ...

थोडा अभ्यास तुम्ही पण केलात तरी चालेल ...

विंजिनेर's picture

2 Feb 2021 - 10:57 pm | विंजिनेर

अरे वा!, हजारो वर्षे जून्या भारतीय संस्कृतीचे आणि भारतीय नारीच्या शालीनतेचे तोंड फाटेपर्यंत गोडवे गाणार्‍या सनातनी तर्कशास्त्रींना कोणार्कची मंदीरे दिसत नाहीत पण हीच लोकं कुठल्याश्या मॉडेलच्या एका युट्युब व्हिडियोमुळे "शालीनतेला काळिमा फासला गेला रे" म्हणून आकांत करतायेत! तुमचे दांभिक विचार बदला!
राहता राहिला रजनीकांतच्या मंदिराचा प्रश्न! रजनीकांतचा पुतळासुद्धा अनावृत्त आहे का? नसेल तर त्याचा उल्लेख गैरलागू आहे.
शिवाय, एका युट्युब व्हिडियोमुळे व्यक्तिपूजक तूमची मंदीरं बांधणार असतील तर मी सुद्धा कपडे काढून उभा राहयला तयार आहे. कुठे आहे शूटींग लोकेशन?

हा एक मुद्दा ...

दुसरा मुद्दा असा आहे की, शिल्पकला, चित्रकला हे वेगळे विषय आहेत..

तिसरा मुद्दा असा आहे की, नग्नतेचे जाहीर समर्थन करणे चुकीचे आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे ...

विंजिनेर's picture

3 Feb 2021 - 8:08 am | विंजिनेर

तुम्हाला व्यक्तीपुजाच समजलेली नाही ...

काय करणार, आम्हाला व्यक्तीच्या गुणांची पूजा करायला शिकवलं - व्यक्तीची नाही हा आमच्या "पेरेंट्स"चाच दोष -
ते एक असो. तुम्हाला व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा कळलाय का? का कळूनही बगल देताय?

दुसरा मुद्दा असा आहे की, शिल्पकला, चित्रकला हे वेगळे विषय आहेत..

होक्का? मग छायाचित्रकलेने काय घोडं मारलंय?

तिसरा मुद्दा असा आहे की, नग्नतेचे जाहीर समर्थन करणे चुकीचे आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे ...

जाहीर नाही तर गूपचूप समर्थन करणे बरोबर आहे का?

एकूण काय तर दांभिकतेचे चष्मे उतरवा - जग आपोआप स्वच्छ दिसू लागेल (आणि, लगे हाथ त्या तथाकथित गुरूजींना पण सांगा - ते ही ओकतायेत स्वतःची बुरसटलेली दुट्टपी मतं खाली ह्याच धाग्यावर...)

असो. तुमचं चालूद्या..

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2021 - 9:07 am | श्रीगुरुजी

तिसरा मुद्दा असा आहे की, नग्नतेचे जाहीर समर्थन करणे चुकीचे आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे

+ १

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 9:14 am | मुक्त विहारि

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

4 Feb 2021 - 5:46 pm | चौथा कोनाडा

निकिताताईंचा व्हिडो पाहिला.
नॉर्वेतल्या झुळझुळ्णारा ओढा, नदी, डोंगर आणि धबधब्यांची गरज म्हणुन असे शूट केले असावे असे म्हणायला प्रथमदर्शनी वाव आहे.

अरे च्या हे काय प्रमाण झालं ? म्हणजे तिने निसर्गाच्या कुशीत जावुन नैसर्गिक रित्या शुट केलं असं म्हाणायचंय का तुम्हाला?

मग स्टुडियो मध्ये असा निसर्ग निर्माण केला तर किंवा, सिमेंटच्या जंगलाला तुम्ही जर एखाद्या इमारतीच्या गच्चीवर हे चित्रीकरण झालं तर तुम्ही त्याला निसर्ग नाही म्हणणार काय?

चौथा कोनाडा's picture

5 Feb 2021 - 1:16 pm | चौथा कोनाडा

मग स्टुडियो मध्ये असा निसर्ग निर्माण केला तर किंवा, सिमेंटच्या जंगलाला तुम्ही जर एखाद्या इमारतीच्या गच्चीवर हे चित्रीकरण झालं तर तुम्ही त्याला निसर्ग नाही म्हणणार काय?

म्हणू शकतो ना !

संपादक मंडळ करा इकडे लक्ष द्या, हे सरळ सरळ जातीयवादी वाटत नाही का?

तुम्हाला काय वाटत, आडनाव खरात आहे म्हणून लोक ओरडतायत?

शा वि कु's picture

4 Feb 2021 - 8:47 pm | शा वि कु

नग्नतेचे जाहीर समर्थन का चुकीचे वाटते ?
(निव्वळ उत्सुकता. व्यक्तिगत आवड नावड जनरली इतरांच्या कृत्याला वाईट/किंवा चुकीचे ठरविण्यास जात नाही. पण, इथे नग्नतेची तुमची व्यक्तिगत नावड, इतरांच्या कृतीला अयोग्य/न करण्यायोग्य ठरवते आहे, म्हणून विचारतो आहे.)

बाकी, ह्या बाईंची किंवा मिलिंद सोमण बीचवर नागडा पळाला होता ती आणि जैन दिगंबर साधू निर्वस्त्र फिरतात, ह्यात कोणती नग्नता समाजमान्य, आणि का बरे ?

सवंग प्रसिद्धीसाठी नग्न फोटो काढून त्याला नैतिकतेचा मुलामा देणे केव्हाही वाईटच..

जैन साधू नग्न फिरत असले तरी ते आणि यांची तुलना केली जाऊ शकत नाही, करण त्यांना लोकेशणा नसते, ते कपड्यांच्या बाबतीतच नव्हे, तर एकूण वासनांच्या बाबतीतच निरलिप्त असतात. त्यांचे खाणे पिणे अबी अन्य सर्व बाबींवर कठोर संयम असतो.
या बाईंची तसे जैन साधूनसारखे सार्वजनिक आणि सदैव नग्न राहायची तयारी आहे का? आम्ही समर्थन करतो..

कृती वाईट नसते, हेतूवरून ते योग्य आहे की अयोग्य ते ठरते..

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 10:02 pm | श्रीगुरुजी

मिलिंद सोमण बीचवर नग्नावस्थेत धावल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जैन साधूंच्या नग्नावस्थेमागे धार्मिक कारण पुढे केले जात असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद नाही. परंतु त्यांची नग्नावस्था समाजमान्य नाही. त्यांना नग्नावस्थेत परदेशात जाता येत नाही. परदेशात नग्नावस्थेची कायदेशीर व्याख्या आहे. आपले प्रायव्हेट पार्टस सार्वजनिक दाखविण्यास बंदी आहे.

शा वि कु's picture

4 Feb 2021 - 10:10 pm | शा वि कु

तुम्हाला जैन साधू अनैतिक वाटतात का ?

(कारण, कायद्यातून तर ह्या बाई पण नग्न नाहीयेत ! मग त्या पण नैतिक काय ?)

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 10:16 pm | श्रीगुरुजी

होय

चलत मुसाफिर's picture

1 Feb 2021 - 9:23 pm | चलत मुसाफिर

मिसळपाववर लेखामागून लेख लिहिले म्हणून जग वीतभर तरी सुधारतं का?

नाही ना?

तरीही होतकरू लोक लेखांच्या जिलब्या पाडतच असतात.

मग तिनेच काय घोडं मारलंय?

:-) :-)

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 7:48 am | मुक्त विहारि

भारत सरकारच नव्हे तर, इतर राष्ट्रे देखील, त्यांची धोरणे ठरवतात...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

1 Feb 2021 - 11:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"पण प्रश्न हा की खरंच या खटाटोपामधून सौंदर्याच्या व्याख्या बदलतील का ?"
गेले ५० वर्षे हा खटाटोप जगभर चालू आहे. पण त्यात विशेष फरक पडला आहे असे वाटत नाही. अगदी तुमच्या त्या बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये नायकाच्या बाजुला नाचायला रशिया/पुर्व युरोपातून गोर्या तरूणी येतात. नायजेरिया/केनियामधुन येत नाहीत.

आणि सडपातळ सुद्धा असतात !

साहना's picture

1 Feb 2021 - 11:56 pm | साहना

नग्नता नैसर्गिक आहे. त्याच्याविषयी गंड निर्माण करणे हि व्हिक्टोरियन काळांतील मानसिकता भारतीयांनी आत्मसात केली आहे. अर्थांत इस्लामिक आक्रमणे त्यानंतर बिघडलेली कायदा सुव्यवस्था इत्यादी गोष्टींचाही प्रभाव होताच. जसा काळ बदलत आहे तस तसे भारतीय लोक सुद्धा आपल्या जुन्या संस्कृतीच्या दिशेने जाऊन ह्या विषयावर आपले मत हळू हळू बदलतील.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 7:52 am | मुक्त विहारि

मौर्य काळात देखील, जाहीर नग्नतेला, सामाजिक मान्यता न्हवती ...

Rajesh188's picture

2 Feb 2021 - 12:24 am | Rajesh188

शक्य होईल तेवढी भारतीय जुन्या मागास परंपरा सोडून स्त्रिया नी नागडे च फिरावे.
काही तासात च स्त्री शरीराचे नाविन्य संपून जाईल आणि कोणी लक्ष पण देणार नाही नागड्या स्त्री कडे.

चौथा कोनाडा's picture

2 Feb 2021 - 1:15 pm | चौथा कोनाडा

माझ्या माहितीप्रमाणे काही दशकांपुर्वी ओशो रजनीश असंच काहीसं म्हणाले होते.

कट्टर इडलामिक राष्ट्र असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश ची पंतप्रधान स्त्री होती.
पण सुधारित अमेरिकेची अध्यक्ष स्त्री अजुन पण होवू शकली नाही.
पण सुधारित कोण इस्लामिक राष्ट्र की कथित प्रगत राष्ट्र.

नागडे राहणे ही खूप मागास पद्धत आहे जेव्हा लोक जंगलात राहत होती आणि माणूस प्राणी हा प्राणी च होता बाकी प्राण्या सारखा तेव्हा तो नागडा च असायचा.
बाकी गाई,म्हशी,आणि सर्व प्राणी नागडे च फिरतात ते नैसर्गिक आहे.
प्राण्यांना मेंदू कमी क्षमतेचा असल्या मुळे ते आहेत तिथे च आहे माणूस कपडे वापरायला लागला.

ज्यांना प्राण्यांशी स्पर्था करायची आहे त्यांना करू ध्या.
आणि त्यांच्या माणूस प्राणी ग्रुप ला बाकी आधुनिक कपडे वापरणाऱ्या ग्रुप पासून वेगळे पाडून त्यांना नैसर्गिक जगू ध्या.
अशा लोकांकडे दुर्लक्ष करून बहिष्कृत करणे हेच उत्तम

गंमत अशी आहे की, जे लोक जाहीर नग्नतेला पाठिंबा देतात, ते स्वतःचे नग्न फोटो टाकत नाहीत...

मी स्वतः मद्यपान करत नाही. परंतु मी मद्यप्रेमी लोकांची टर उडवत नाही, निर्भर्त्सना करत नाही किंवा त्यांच्याशी संबंध तोडत नाही. याचा अर्थ मी मद्यप्राशनाला'पाठिंबा' देतो असा होत नाही.

टीप: माझे वस्त्ररहित फोटो पाहण्याची उत्सुकता ज्यांना असेल त्यांनी निर्भयपणे तसे सांगावे :-) :-)

कंजूस's picture

2 Feb 2021 - 8:45 am | कंजूस

देवळे बांधणे प्रकार गुप्त काळानंतर सुरू झाला. सहावे शतक. त्या थोडे अगोदर गुंफा मंदिरे होती. आणि मग त्यावरील शिल्पे पाहा. देवदेवता यक्षी किन्नर गंधर्व नग्नच.
महाबलिपुरम शिल्पे घडवली पल्लवा राजे नरसिंह वर्मन पहिला,दुसरा. सातवे आठवे शतक. मग त्या राजा राणीचे शिल्पही नग्नच आहे.
ज्यांना पाहावते ते पाहतात. कुणी आत्मापरमात्मा मिलन म्हणून पाहतात यमुनेकाठी.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2021 - 9:56 am | श्रीगुरुजी

नग्ननतेचे समर्थन करून नग्नताविरोधकांना कर्मठ, पुराणमतवादी, बुरसटलेल्या मानसिकतेचे म्हणणाऱ्यांनी नग्नतेचे केवळ शाब्दिक समर्थन करून थांबू नये.

अशा समर्थकांनी स्वतः व स्वत:च्या कुटुंबातील सर्वांनी सार्वजनिक नग्नावस्थेत वावरून नग्नतेच्या पुरोगामी चळवळीस सक्रीय पाठिंबा द्यावा. स्वत:ची व स्वतःच्या कुटुंबियांची नग्नावस्थेतील चित्रे सार्वजनिक करावी. अशा पाठिंब्याने सार्वजनिक नग्नतेची चळवळ वेगाने पुढे जाईल.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 9:57 am | मुक्त विहारि

सहमत आहे

तेच तर केले आहे खरात मुलीने आणखीन काय करायला पाहिजे होते ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Feb 2021 - 10:19 am | माईसाहेब कुरसूंदीकर

हे सगळे २/४ चित्रपट मिळण्याच्या अपेक्षेने आहे असे ह्यांचे मत.महेश भट्ट किंवा अनुराग कश्यपचा एखाद दुसरा चित्रपट मिळाला की मग वनिता त्या रुजुता दिवेकरची शिकवणी लावेल.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 10:28 am | मुक्त विहारि

हे सगळे काही, पैसे आणि प्रसिद्धि साठी...

येन केन प्रकारेण, अशी गत आहे ...

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2021 - 10:20 am | श्रीगुरुजी

अजून पुरेसं केलं नाही. पतंगाआड नग्नता लपविलीये.

फोटो पहिला नव्हता आता पहिला. काय खोटारडे पणा आहै. ह्या फोटोत काय न्यूड आहे हे समजले नाही वरून विनाकारण virtue सिग्नलिंग. हिचे बॉडी पॉसिटीव्ह इत्यादी भाषण त्या फोटो इतकेच खोटे आणि दुटप्पीपणाचे आहे असे नमूद करू इच्छिते.

चौकटराजा's picture

2 Feb 2021 - 10:13 am | चौकटराजा

मी प्रवासाचा शौकिन आहे ! पण माझे वय व पैसा विचारात घेता जगप्रवास शक्य नाही म्हणून मी विविध ठिकाणचे सम्बन्धित व्हिडीओ यू ट्यूबवर पाहात असतो अर्थात यात काही परदेशी किनारे बिकिनी घातलेलया वय वर्षे सात ते सत्तर अशा गटातल्या महिनांनी व त्यांच्या बरोबर आलेल्या त्यांच्या नवर्यानी ,मुलांनी,,अगदी नातवंडांनी देखील भरलेले असतात . यात मी निरखून असे पाहिले आहे ही ते लोक कोणत्याच वयातील स्त्रीकडे पुरूषी उत्सुकतेने पहाताना दिसत नाहीत. भारतातील स्त्रीचा स्वभाव एकंदरीतच अनावश्यक इतका संकोची आहे ! अगदी फेसबुकवर देखील तुमचे वय लक्षात घेता देखील मैत्रीस प्रतिसाद देणार नाहीत !सबब भारतीय समाजात हे नग्नतेचं प्रदर्शन व त्यास जोडून " वैचारिक " मंथन जोडले जाते !

नग्नतेपेक्षा काही वेळेस लेखन अधिक काही सांगून जाते ..खालील उदाहरण अच्युत बर्वे यांच्य " कॅलोडोस्कोप" या कादंबरीतील आहे ...
साहित्य संघातला नाटकाचा प्रयोग काही रंगला नाही .नाटक संपल्यावर ते मला कुलाब्याला घेऊन गेले , अशी घाई ,,अशी घाई की मेकप देखील उतरवू दिला नाही जणू त्यांना नाटकातील रुक्मिणीच हवी होती .. उत्तर रात्रीतील तो प्रयॊग मात्र रंगला .. सारा बिछाना भर मेकप मेकपच झाला होता ...

बरोबर आहे. शरीर हि नैसर्गिक गोष्ट आहे त्यांत संकोच करण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे आपल्या मनाला आवडेल आणि इतरांना विनाकारण संकोच होणार नाही अश्या पद्धतीने वागण्यात हरकत नाही. अर्थांत, भारतीय स्त्रियांची संकोची वृत्ती किंवा ज्या महिला आपल्या शरीसंबंधी जास्त संकोचित असतील त्यात सुद्धा काहीही गैर किंवा बुरसटलेले असे काही नाही. (विधवा विवाहाचे समर्थन करणार्यांनी आधी आपल्या आईला विविध करून तिचे लग्न लावू द्यावे असे काही तर्कातशास्त्री म्हणतील पण ती तर्कदुष्टता थोडेफार डोके असलेल्या माणसाला सहज दिसून येईल. )

ज्या पद्धतीने भारत प्रगती करत आहे त्या प्रगतीच्या ओघांत शरिर सौंदर्य आणि जीवनाचा उपभोग घेण्याची वृत्ती वाढत जाणार आहे. भारतीय महिला बिकिनी वगैरे घालून गोव्यांतील समुद्रकिनाऱ्यावर जास्तच दिसत आहेत आणि लॉन्ग बीच किंवा जमैका मध्ये तर अनवरृत सुद्धा दिसत आहेत. ह्यांत असुंसंस्कृत किंवा जंगली पणा नाही पण मोठा सद्गुण आहे असेही नाही.

बहुतेक विदेशी जिम्स मधील चेंगिन रूम्स मध्ये कपडे असत नाही, सोना, होत टब्स मध्ये कपडे असत नाहीत, लास वेगास चे पूल टॉपलेस असतात. आणि त्याच वेळी ह्या सर्व ठिकाणी लैगिकता असत नाही.

जपानी लोक ह्यांत विशेष वेगळे आहेत. परदेशांत सुद्धा वडील आई मुले इत्यादी एकत्र फार कमीच आढळून येतात पण जपानात सर्वानी एकत्र अंघोळ करणे सुद्धा त्यांच्या संस्कृतीस धरून आहे. ह्याच कारणास्तव डोरेमॉन आणि निन्जा हातोडीचे काही एपिसोड्स भारतांत दाखवले जात नाहीत.

राजाभाउ's picture

2 Feb 2021 - 11:32 am | राजाभाउ

सहमत आहे.

तसा आपला नसतो. म्हणून आपण झाकतो.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2021 - 10:22 am | श्रीगुरुजी

नग्नता नैसर्गिक असेल तर मलमूत्र विसर्जन, शरीरसंबंध इ. सुद्धा नैसर्गिक आहे. मग त्यासाठी चार भिंतींचा आडोसा कशाला?

मुक्त विहारि's picture

2 Feb 2021 - 10:30 am | मुक्त विहारि

सहमत आहे

विधवा विवाह मध्ये काहीही गैर नाही ह्याचा अर्थ आपल्या आईला आधी विधवा करून तिचे लग्न आणि कुणाबरोबर लावायचे असा होत नाही. समलिंगी लोकांना अधिकार मिळावेत ह्याचे समर्थन केले म्हणून आपण सुद्धा समलिंगी व्हावे असाही अर्थ होत नाही आणि वेश्या हित आणि कायद्यापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी झटणाऱ्यानी स्वतः वेश्या व्हावे असाही तर्क बरोबर वाटत नाही.

ज्या लोकांना संकोच नाही आणि इतरांना त्यांच्या इच्छेशिवाय ते पाहायला लागत नाही त्यांनी काही वाट्टेल ते केले म्हणून आपले काय घोडे जाते ?

टीप : नको ते विषय काढू नये. काही दिवस मागे राखी सावंत ने बिग बोस टीव्ही सिरीयल मध्ये लघवी केली, त्याच्या आधी स्वामी ओम कोणी तरी लघवी करून इतर टीम मेट्स वर फेकली सुद्दा त्याशिवाय प्रियांका जग्गा ह्यांनी सुद्धा तेच केले होते. गोव्यांत स्विनगर्स क्लब मोठ्या प्रमाणात चालू आहेत. थोडे जरी सर्च केले तरी श्रीगुरुजी तुम्ही ह्या रंगमहालात अडकून पडाल त्यामुळे ती वाट न धरलेलीच बरी.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2021 - 11:21 am | श्रीगुरुजी

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ।

मुळात कपडे हे शरीराचे थंडी,उन,धूळ,कीटक ह्या पासून रक्षण करण्यासाठी वापरले जातात.
आणि पायात चप्पल किंवा बुट वापरायचे कारण पायाचे रक्षण करणे विंचू काटे ह्या पासून.
नंतर त्या मध्ये बदल होवून शरीर सुंदर दिसण्यासाठी कपडे वापरू जावू लागले आणि मुळ हेतू च बाजूला ला पडला.
अत्यंत तंग कपडे परिधान करणे हा त्या मधिकच प्रकार पण तंग कपड्याने शरीराला त्रास होतो.नसा दबल्या जातात,हालचाल करण्यास मर्यादा येते आणि बरेच अनिष्ट परिणाम होतात.
चप्पल बाबतीत तेच उंच टाचेच्या चप्पल मुळे पायावर अनंत अत्याचार होतात.
आणि मुळ हेतू लाच हरताळ फासला जातो.
खूप थंडी आहे तरी काहीतरी फॅड मनात ठेवून आघुड कपडे वापरणे म्हणजे माणूस खरोखर बुध्दीमान आहे ह्या वर च प्रश्न चिन्ह निर्माण करणे आहे.
बाकी काही हार्मोन्स मुळे सुंदर तेचा भास होतो.
रिअल मध्ये ते सौंदर्य असतं नाही.
Mansa पेक्षा बाकी प्राणी,पक्षी हे अत्यंत सुंदर आहेत पण हार्मोन्स आपल्याला त्यांना सुंदर समजण्याची अनुमती देत नाही.(सुंदर ह्या शब्दाचा अर्थ काही ठिकाणी आकर्षक असा घ्यावा )

राजाभाउ's picture

2 Feb 2021 - 11:25 am | राजाभाउ

कुणी कुठले कपडे घालावेत , किंवा घालू नयेत हा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्येकाची सौंदर्याच्या व्याख्याही वेगवेगळी असु शकते आणि ती काळानुरुप, वयानुरुप बदलू शकते. तसेच या ताईनी फोटोशुट केले तेही ठिकच, ज्याना बघयचे त्यानी बघा नाहीतर बघु नका.

पण या ताई मुलाखतीत बॉडी पॉसिटीव्ह वगैरे बोलतात, तर या ताई एका मराठी प्रसिध्द विनोदी कर्येक्रमात काम करतात आणि त्यात (ईतर अनेक कर्येक्रमात प्रमाणे) लट्ठपणा, कातडीचा रंग, टकलेपणा यावर जोरदार विनोद असतात मग हे कस चालत ?हा प्रश्न निर्माण होतो.

एकुणच हा प्रसीध्दीचा भाग असावा, ही मुलाखत दिली नसती तर कितीजणाना अस काही फोटोशुट झाल हे कळल असत ?

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2021 - 11:35 am | श्रीगुरुजी

सवंग प्रसिद्धीसाठी पूर्वी ममता कुलकर्णी, पूनम पांडे, प्रोतिमा बेदी अशांंनी हे प्रकार केले आहेत.

साहना's picture

2 Feb 2021 - 11:47 am | साहना

सहमत.

न्यूड चित्रं/फोटो शूट हे खरंतर चित्रकार/फोटोग्राफरची कला दाखवण्याचं साधन आहे. बॉडी आर्टीस्टचं त्यात तसं महत्त्व कमी असतं.
ज्यांना फॉर्म वर मेहनत घेऊन चित्रं अधिक चांगली करायची आहेत त्यातले अनेकजण ह्या पद्धतीचा उपयोग करत असतात.

न्यूड चित्रकला/फोटोशूटकडे कला या दृष्टीनं बघणं हे सगळ्यांना सहज शक्य नसतं. त्यासाठी जो कलाकार ही कलाकृती करतोय, त्याच्या दृष्टीकोनातून याकडे बघायला हवं.

न्यूड्सच्या अतिशय सुंदर अशा कलाकृती जालावर सापडतील. रंगसंगती, प्रकाशछाया, प्रसंग ह्या आणि अशा अनेक गोष्टी त्यात महत्त्वाच्या असतात. मुख्य म्हणजे विषय काय, कशासाठी हे न्यूड चित्र/फोटो करायचाय तो त्यात मांडता आला पाहिजे आणि तो तसा लोकांपर्यंत फोचला देखील पाहिजे. ज्या कलाकारानं हे शूट केलेलं आहे त्यानं खरतंर याबद्दल बोललं पाहिजे, बॉडी आर्टीस्ट याबद्दल काय आणि किती बोलणार?

बाकी अश्लीलता वगैरे सामाजिक संस्कृतीच्या कॅटेगरीत येतात.
समाज जर तेवढा प्रगल्भ नसला आणि न्यूड वगैरेचे प्रयत्न सार्वजनिक जागेत केल्यास, गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याचीच शक्यता जास्त. तारतम्य बाळगून वागलेले कधीही चांगले.

चांदणे संदीप's picture

2 Feb 2021 - 2:33 pm | चांदणे संदीप

राघवशेठ, प्रतिसाद आवडला.
वरचे काही प्रतिसाद वाचून जाम हसायला आलं.

सं - दी - प

शा वि कु's picture

2 Feb 2021 - 2:37 pm | शा वि कु

सहमत.

राजाभाउ's picture

2 Feb 2021 - 3:56 pm | राजाभाउ

+१
सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2021 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला....!

-दिलीप बिरुटे

वनिता ने जरूर नग्न फोटो शूट करावे...
पण त्या आधी जरा शरीरा कडे पण लक्ष द्यावे...
आधी व्यायाम, सुडोलता या कडे पण पहावे..
निदान न्यूड फोटो शूट मध्ये काय दाखवायचे ते तरी नीट असावे..

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 9:14 am | मुक्त विहारि

अशी गोष्ट आहे ...

कामे मिळवायला अशी प्रसिद्धि उपयोगी पडण्याची शक्यता असते ...

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2021 - 10:01 am | श्रीगुरुजी

अशा प्रसिद्धीने भविष्यात अशीच कामे मिळू शकतात.

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 10:08 am | मुक्त विहारि

मग झाले...

राम तेरी गंगा मैली, हा सिनेमा आठवला ...

सुबोध खरे's picture

3 Feb 2021 - 10:23 am | सुबोध खरे

अश्लीलता आणि नग्नता यांचा एकमेकांशी थेट संबंध नाही.

पूर्ण कपडे घातलेलय व्यक्तीने कामुक हावभाव करणें यात अश्लीलता असू शकते आणि संपूर्ण नग्न असताना सुद्धा त्यात अजिबात अश्लीलता नसते.

सुडौल शरीराचे नग्न चित्र, शिल्प किंवा छायाचित्र मनात कामुक भावना चाळवतीलच असे नव्हे. अर्थात आंबट शौकीन आणि हलकट लोकांना काहीही चालतं.

परंतु सवंग लोकप्रियते साठी "कलेची गरज" इ मुलामा देऊन अशा मुलाखती देणाऱ्या नट्या या तर वारयोषितेच्या पेक्षा निम्न दर्जाच्या असतात.

वारयोषिता तरी पोटाची खळगी भरण्या साठी असे करत असतात.

तात्पर्य-- अश्लीलता हि नग्नतेत नसून नग्नता कशा तर्हेने मंडळी जाते यात आहे.

बाकी सर्वाना माझे मत पटेल असे नाही आणि तसा आग्रहही नाही

मुक्त विहारि's picture

3 Feb 2021 - 10:25 am | मुक्त विहारि

पटत आहे ...

साहना's picture

3 Feb 2021 - 10:30 am | साहना

सहमत !

स्वलिखित's picture

3 Feb 2021 - 7:26 pm | स्वलिखित

Sahamat

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Feb 2021 - 11:02 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

अवांतर, या विषयावर राजेश आणि मुवि हातात हात घालून भांडताना बघितले आणि कृतकृत्य झालो :)
बाकी तो फोटोशूट बघितला मुद्दाम जाउन, त्यात काय नग्न आहे काहीच कळले नाही.. जे काही होते ते फार किळसवाणे होते.
अवांतर, हार्मोन प्रोब्लेम व्यतिरिक्त अन्य कारणाने येणारी स्थूलता स्वीकारार्ह नाही, किमान गौरवली तरी जाऊ नये असे माझे मत आहे.
ते त्या व्यक्तीसाठी देखील चांगले नाही.

असो, मला कोण विचारतय?

सर्वसाक्षी's picture

3 Feb 2021 - 3:04 pm | सर्वसाक्षी

देह सुडौल असेल तर अभिमानाने दाखवावा, नपेक्षा 'झाकली मूठ'बंदच ठेवावी.
या बाइंना एका अत्यंत दर्जेदार अशा विनोदी कार्यक्रमात आधी पाहिलेलं होतं त्यामुळे केवळ ह्याच का त्या हे पाहायला चित्र पाहिलं. ओंगळ वाटलं, झालंच तर चित्रणकौशल्य वगैरेही काही जाणवलं नाही
असो, कदाचित संक्रातीत पतंग ऊड्वण्याची प्रथा लक्षात घेता एखाद्या पतंग निर्मात्याने तर हा उपद्व्याप केला नसेल ना? (चित्राचा उत्कर्षबिंदू पतंग हे वे.सा.न.ल.)

चौथा कोनाडा's picture

4 Feb 2021 - 5:31 pm | चौथा कोनाडा

@ आनन्दा,

ते फार किळसवाणे होते.

किळसवाणे अजिबात वाटले नाही मला, इन फॅक्ट काहीच वाटले नाही !
बाकी विनोदी कार्यक्रमातील त्या ताईंच्या सादरीकरणाचा मी फॅन आहे.

ह्या वाक्याचा खरा अर्थ काय हे अजुन तरी मला समजला नाही.
स्त्री शरीर नग्न दाखवणे ही कथेची गरज असते की नग्न प्रसंग एक तरी कथेत असावा अशी च कथा असावी ही निर्मात्याची गरज असते नक्की काय अर्थ घ्यावा.
फक्त चेहऱ्यावर चे हावभाव बदलून उत्तम रोमान्स दाखवता येतो हे जुन्या चित्रपटातील नायिकांनी सिद्ध केलेले आहे आता शरीर नग्न दाखवून सुद्धा त्या नायिकांनी सारखा परिणामकारक प्रसंग चित्रित होत नाही
इथे डायरेक्टर कमी पडतात .
वर राघव ह्यांनी सांगितल्या प्रमाणे आर्ट म्हणजे काय हेच खोलात जावून समजून घेतले जात नाही म्हणून शरीर उघडे करायला लागत आहे.

शा वि कु's picture

3 Feb 2021 - 5:42 pm | शा वि कु

इतर व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने नग्न चित्रण केल्यावर आपण तिरस्टायचे काय कारण ?

चौथा कोनाडा's picture

3 Feb 2021 - 5:56 pm | चौथा कोनाडा

संस्कृती बुडते, भावना दुखावतात म्हणून ....

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2021 - 6:16 pm | श्रीगुरुजी

असे चित्रीकरण सार्वजनिक केल्यानंतर त्यावर व्यक्त होण्याचा सर्वांना हक्क आहे.

सुबोध खरे's picture

3 Feb 2021 - 6:38 pm | सुबोध खरे

इतर व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने नग्न चित्रण केल्यावर आपण तिरस्टायचे काय कारण ?

तोंडाला लिपस्टिक लावून माडीच्या खिडकीत बसलं तर खालून जाणार्याने शिट्टी मारली तर रडारड करू नये.

सदर बाईंना उद्या एखाद्याने "बोट लावीन तिथे वळकट्या" म्हणून हिणवले तर त्यांनी "बॉडी शेमीन्ग" म्हणून बोंबाबोंब करू नये.

शा वि कु's picture

3 Feb 2021 - 6:47 pm | शा वि कु

लिपस्टिक अनालॉजी वाचून हात जोडावेच लागले.

स्वतः आपल्या निर्णयाने कपडे उतरवले म्हणून व्यक्तीच्या शरीरावर हिणकस बोलणे तुम्हाला पटत असेल तर जरूर बोला. मला नाही पटत.

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2021 - 7:19 pm | श्रीगुरुजी

बरं, सौम्य उदाहरण देतो.

एखादा माणूस विदूषकी प्रावरणे परीधान करून भर रस्त्यात सर्वांसमोर वेडेवाकडे अंगविक्षेप करीत नृत्य करायला लागला, तर त्यावर फिदीफिदी हसणे हा उपस्थितांचा हक्क आहे. वैयक्तिक कृत्यांवर उपस्थितांनी हसणे अयोग्य आहे, असा आक्षेप अयोग्य ठरेल कारण सार्वजनिक केलेली गोष्ट फक्त वैयक्तिक असू शकत नाही.

शा वि कु's picture

4 Feb 2021 - 9:04 pm | शा वि कु

तुम्हाला हसू येणे आणि हसणे ह्याबाबत काहीच प्रॉब्लेम नाही.

मात्र, विवस्त्र छायाचित्राने अशी कोणती गोष्ट बदलली म्हणे, किंवा अशी कोणती माहिती दिली, ज्याने तुम्हाला ह्याधीची संभाषणाची आणि काय बोलावे या संदर्भातल्या नैतिकतेची जाणीव बदलली, आणि शरीरावरचे जोक, किंवा शरीर कसं आहे ह्यावर बोलणं तुम्हाला मान्य होतं ? हा स्टॅन्ड मधला बदल (अस्युमिंग, कि वस्त्रांकीत व्यक्तीच्या शरीरावर जोक करणे, हे काहीप्रमाणात तरी तुम्हाला अयोग्य वाटते. तसं नसेल तर इग्नोर मारा पूर्ण प्रतिसाद.)

मग, त्या व्यक्तीने आपला वस्त्रविरहित फोटो टाकल्यावर ह्यात काय बदलले ? त्या व्यक्तीने असे जोक करायचा लायसन्स दिला, कि आपण ह्या जोक्स बाबत निगरगट्ट आहोत असा निर्वाळा दिला ? नक्की काय झालं ? आधी ती व्यक्ती जाड दिसत नव्हती का ?

तुमच्या उदाहरणांचा संदर्भात, वेडेचाळे हे तुमच्यासाठी कायमच हास्यास्पद होते. विदूषक कपडे घालून होता तेव्हा वेडेचाळे जोक करण्यासाठी ऑफ द लिमिट नव्हते. कपडे काढल्यावर पण ह्यावर तुम्ही हसालच. माझा प्रश्न तो नाही. ह्याधी ऑफ द लिमिट जोक कपडे काढल्यावर कसा स्विकार्ह्य होतो, हा प्रश्न आहे.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 9:12 pm | श्रीगुरुजी

हे नक्की काय लिहिलंय आणि मला नक्की काय विचारलंय ते समजले नाही.

सार्वजनिक नग्नावस्थेत वावरणे हे माझ्यासाठी कायमच अनैतिक होते, आहे व असेल.

शा वि कु's picture

4 Feb 2021 - 9:50 pm | शा वि कु

हे नक्की काय लिहिलंय आणि मला नक्की काय विचारलंय ते समजले नाही.

"बोट लावीन तिथे वळकट्या" (श्रेय) हा विनोद, एखाद्या नववारी साडी घातलेल्या स्थूल बाईवर केला तर चालेल का तुम्हाला ? नसल्यास का नाही चालत ?

विवस्त्र फोटो असलेल्या व्यक्तीवर हा विनोद चालतो का तुम्हाला ? असल्यास का चालतो ? हा स्टॅन्ड बद्दलण्यामागचं कारण काय ?

याउप्पर, विदूषक पब्लिक मध्ये चाळे करतो, त्याप्रमाणे, साड्यांमधून सुद्धा पोटं दिसतातच. तिथेही, सार्वजनिक ठिकाणी पोटं दाखवली म्हणून, "बोट लावीन तिथे वळकट्या" जोक चालतील का ? :)
नसल्यास का नाही ?

सार्वजनिक नग्नावस्थेत वावरणे हे माझ्यासाठी कायमच अनैतिक होते, आहे व असेल.

ओके.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 10:05 pm | श्रीगुरुजी

मुळात धाग्याचा विषय विनोद हा नाहीच.

शा वि कु's picture

4 Feb 2021 - 10:14 pm | शा वि कु

इथं तुम्हीच फिदीफिदी हसणे कसे स्वाभाविक आहे म्हणत होता. विनोद किंवा बाईंची थट्टा कशी स्वीकाराह्य आहे सांगत होता...

असो.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2021 - 10:20 pm | श्रीगुरुजी

सार्वजनिक विनोदी चाळे हे हास्यास्पदच असतात. पण त्याचा येथे काय संबंध आहे?

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 8:06 am | मुक्त विहारि

सहमत आहे

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 8:07 am | मुक्त विहारि

सहमत आहे

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 8:07 am | मुक्त विहारि

+1

सुबोध खरे's picture

3 Feb 2021 - 7:23 pm | सुबोध खरे

स्वतः आपल्या निर्णयाने कपडे उतरवले म्हणून

कशाला उगाच लंगडे समर्थन करताय?

कपडे उतरवून सार्वजनिक न्यासावर टाकलाय त्यांनी आणि वर मुलाखत पण दिली आहे ती कशासाठी?

आपल्या घरात विवस्त्र नाही झाल्या आहेत त्या.

या दोन्हीत फरक समजून घ्यायचाच नसेल तर तुमचंच खरं

सामान्यनागरिक's picture

3 Feb 2021 - 5:36 pm | सामान्यनागरिक

ही कोण वनिता खरात ? कोणी खास व्यक्ती आहे का? जिच्यामुळे समाज परिवर्तन घडु शकेल? तुमच्या आमच्या जीवनांत काहीतरी वेगळे घडू शकेल ?

तुम्ही आम्ही तिच्याबद्दल का चर्चा करतोय ? अश्या लोकांना अनुल्लेखानेच मारावे.

आपल्याबद्दल लोकांनी चर्चा करावी, प्रसिद्धी व्हावी हाच तिचा उद्देश होता आणि तो सफ़ल झाला अन्यथा मिपावरील विद्वान मंडळींनी तिची कधी दखल तरी घेतली असती का?

नग्न होऊन कॅमेऱ्यासमोर येणे याशिवाय तिच्याकडे ईतर काही आहे का? मग ती तेच करणार !
तुम्ही आम्ही वायफ़ळ चर्चा करुन वाय-झेड पणा करणार

Bhakti's picture

3 Feb 2021 - 10:47 pm | Bhakti

बर ती न्यूड फोटोग्राफीपण नाहीये.हाफ न्यूड फोटोग्राफी पण नाही.चतकोर वगैरे आहे.वनिताजी प्रोतिमा बेदी यांच टाईमपास पुस्तक वाचा, मुंबई किनाऱ्यावरचा फोटो पहा..पण त्यांना नंतर लक्षात आलं की हा स्टंटबाजीचा प्रकार घडला आहे आणि आपला वापर झालाय.
न्यूड आर्टिस्टचा अपमान करू नका.

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Feb 2021 - 11:00 pm | अनिरुद्ध.वैद्य

बाकीच्या गोष्टींवर चर्चा केली तर फरक पडतो का आयुष्यात?

अमूक तमूक एका व्यक्तीने असं का केलं,तसं का नाही केलं अशी चर्चा करत बसलो आणि ती अमूक तमूक पाहिजे तेच करणार मग कशाला उपद्व्याप! उदात्तीकरण !

नर्मदेतला गोटा's picture

4 Feb 2021 - 1:55 pm | नर्मदेतला गोटा

बाकीच्या गोष्टींवर चर्चा केली तर फरक पडतो का आयुष्यात?

सही

सामान्यनागरिक's picture

10 Feb 2021 - 1:23 pm | सामान्यनागरिक

ईतर काही चांगल्या गोष्टींवर चर्चा केली तर ज्ञानात भर पडते. त्या ज्ञानाचा वापर करुन आयुष्यात काही बदल घडवायचा की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.

य:कश्चित वनिता खरात आणि तुचे नग्न अंग या बद्दल चर्चा करुन काय मिळणार आहे ?

मराठी कथालेखक's picture

3 Feb 2021 - 6:48 pm | मराठी कथालेखक

सदर व्हिडिओ मी बघितला नाही पण सिनेमा वगैरे क्षेत्रातील व्यक्ती बहूधा प्रसिद्धीकरिताच काही तरी करत राहतात, हॉट फोटोशूट वगैरे नेहमीचंच झालंय. एखादी अभिनेत्री अंगभर कपड्यांत खूप सुंदर दिसत असली तरी तसा फोटोशूट करुन तो बातमीचा विषय होणार नाही.

आपण काय कपडे घालायचे हा प्रत्येकाचा व्यक्तीगत प्रश्न होईल. पण नग्नता मग ती किती प्रमाणात चालू शकेल वगैरे पण ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.
मी घरात देखील बर्मुडा वगैरे घालत नाही. घरात , तसेच सोसायटीत फिरताना नेहमी फॉर्मल फुलपँट /ट्रॅक पँट/नाइट पँट व टी शर्ट घालतो. एखाद्या कामानिमित्त वा फिरायलाही बाहेर जाताना बहूधा टीशर्टही नको वाटतो, फॉर्मल फुल शर्टच घालायला आवडते. एखाद्या छोट्या ग्रुपमध्ये वगैरे बाहेर गेलो तरी स्विमिंग पुल मध्ये उतरत नाही. पोहता येत नाही हे तर आहेच पण कपडे उतरवून नुसती चड्डी घालून पाण्यात उतरायला प्रशस्त वाटत नाही.
मला जे आवडत नाही ते इतरांनाही तसंच वाटावं असा माझा आग्रह नाही... पण तरी माझ्या आसपासच्या लोकांनी (स्त्री,पुरुष, लहान मुले अशा सर्वांनीच ) व्यवस्थित कपडे घातलेले असतील तर मला अधिक बरं वाटतं पण आग्रह नाही.

मदनबाण's picture

3 Feb 2021 - 7:16 pm | मदनबाण

गोट्या... अरे अगदी ज्वलंत विषयावर धागा विणला आहेस की रे !
उघडा डोळे आणि पतंग पहा नीट ! :)))
सामन्य मुलगी जेव्हा "बोल्ड" होते असं वाक्य व्हिडियोच्या खाली आहे, म्हणजे नग्न फोटो शुट करणे हीच बोल्डनेसची नवी व्याख्या झाली हे आज समजले ! :)))
बरं बोल्डनेसच्या गप्पा व्हिडियोत आहेत म्हणाव्या तर... तसा फोटो काढण्याची भूमिका काय ? हा प्रश्न चुकीचा ठरावा, सरळ नागडा / नग्न फोटो म्हणावे ! बोलण्यात / लिहण्यात तरी लाज का बाळगावी ? शरीरापलिकडे जाउन माणूस पहा असं व्हिडियोत लिहलेलं पाहुन जाम हसलो ! साला, नागडं होउनच कॉन्फिडन्स वाढत असेल तर कठीण आहे ! :)))

असो,,, हल्लीच सोमण काका देखील नागडे धावले आहेत, हे तुम्हाला कळलचं असेल म्हणा !

जाता जाता :- ०:५९ सेकंदाला एक मेसेज दिसतो :- This effect requires GPU acceleration !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Counting Stars - OneRepublic (violin/cello/bass cover) Simply Three

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Feb 2021 - 10:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

त्यांच्यावर केस झाली !!

नर्मदेतला गोटा's picture

4 Feb 2021 - 1:55 pm | नर्मदेतला गोटा

हो हो

अनिरुद्ध.वैद्य's picture

3 Feb 2021 - 10:56 pm | अनिरुद्ध.वैद्य

शरीर तेवढं सुदृढ ठेवा! फॅट शेमिंग नै, पण आजार होतात हो लठ्ठ माणसांना उगाच म्हणून आपलं मत!

बाकी चालू द्या!

ग्रीक रोमन भारतीय मंदिरांमधल्या शिल्पाएव्हढे नाही तरी अगदी बेढब कॅटेगरीत पडाल असलं घेऊन काय फोटोशूट करायला बंदी असायला हवी !

विंजिनेर's picture

3 Feb 2021 - 11:27 pm | विंजिनेर

देह सुडौल असेल तर अभिमानाने दाखवावा, नपेक्षा 'झाकली मूठ'बंदच ठेवावी.

सौंदर्याच्या आणि सुडौलपणाच्या कल्पना कालानुरूप बदलत जातात. अश्मयुगात हाच देह सुंदर म्हणून गणला जात होता (तेव्हा सुदैवाने मिसळपाव नव्हतं, नाही तर खैर नव्हती :) )

venus

बहुधा हे गर्भिणी स्त्रीचे शिल्प असावे..

सर्वसाक्षी's picture

4 Feb 2021 - 3:59 pm | सर्वसाक्षी

१) आपण अश्मयुगात नाही
२) आश्मयुगात देखिल हे शिल्प सुडौल सौंदर्यावतीचे होते की शिल्पकला संकल्पना नुकतीच उगवल्याने कुणी स्त्रीदेह आपल्या परीने कोरायचा प्रयत्न होता.

असो. आपण सप्तस्वातंत्र्याच्या देशात राहतो तेव्हा तुम्ही बाइंना सुडौल, सुंदर अवश्य म्हणु शकता.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2021 - 5:26 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

अनिरुद्ध.वैद्य's picture

4 Feb 2021 - 9:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

विंजिनेर's picture

5 Feb 2021 - 1:31 am | विंजिनेर

मेरा और एक...

गोट्या, शंभरी गाठली बघ तुझ्या धाग्याने, आता आभार मान आमचे (मन लावून काथ्या कुटल्याबद्दल)

नर्मदेतला गोटा's picture

6 Feb 2021 - 6:06 pm | नर्मदेतला गोटा

छान

मुक्त विहारि's picture

5 Feb 2021 - 8:06 am | मुक्त विहारि

जेपी, इरसाल, नाखू...

योग्य तो प्रतिसाद देऊन अभिनंदन करतीलच ...