मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

लिखाणाचे काॅपीराईट कसे घ्यावे?

Primary tabs

वेलांटी's picture
वेलांटी in काथ्याकूट
18 Jan 2021 - 4:45 pm
गाभा: 

मी आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखकांसाठी उपयोग होईल या हेतूने हा धागा काढत आहे. बरेच जण कथा, कविता , कादंबरी किंवा एखादे ललित असे काहीबाही लिहून सोशल मिडियावर प्रकाशित करतात. पण काही मोजके किंवा चांगले लिखाण जर कधी पुस्तकरूपाने प्रकाशित करावे वाटले, तर तोपर्यंत ते चोरीला जाऊन त्याची 'दुसरी' आवृत्ती कोठेतरी भलतीकडेच प्रकाशित होऊ नये यासाठी काय करावे किंवा खबरदारी घ्यावी?
काॅपी राईट कसे घेतात?
एखाद्यांच कथा किंवा कवितेचे घेता येते का?
त्यासाठी काही शुल्क लागते का?
सोप्या भाषेत कोणि सान्गेल काय?
यासंबंधी माहितीची देवाणघेवाण झाली तर अनेक जणांना लाभ होईल. त्यामुळे काॅपीराईटबद्दल शक्य ती सर्व माहिती द्यावी अशी विनंती आहे.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

18 Jan 2021 - 4:59 pm | चांदणे संदीप

https://copyright.gov.in/ इथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून कॉपीराईट मिळवता येतो.

मी याआधीही मिपावर कधीतरी माझा अनुभव शेअर केला असेल कदाचित, परत एकदा सांगतो.
२००९ साली मला एक कविता कॉपीराईट करून घ्यायची होती म्हणून मी अर्ज केला, आवश्यक कागदपत्रे वगैरे जोडून नेटबँकींगद्वारे जे काही पेमेंट होतं तेही भरलं. त्याची पोचपावती मिळाली. त्यानंतर आजवर फक्त फॉलोअप घेतोय. साईटवरती लॉगीन करून स्टेट्स चेक केल्यावर कॉपीराईटच प्रमाणपत्र डिस्पॅच झाल्याचं दिसतंय पण अजूनतरी मला ते मिळालेलं नाहीये. त्यावेळेला वरचेवर पोस्टात जाऊनपण चौकश्या केल्या. फोनवरही अजूनपर्यंत मला कोणी उत्तर दिलेलं नाही म्हणजे फोनच कुणी घेत नव्हते. नुसती रिंग जायची. कितीतरी इ-मेल लिहिले पण त्याचेही उत्तर नाही. आता कदाचित परिस्थिती बदललेली असू शकेल पण आता मी नाद सोडून दिला. कधी काळी दिल्लीला गेलो तर मात्र त्यांच्या ऑफिसात जाऊन जाब विचारणार त्यांना :)

सं - दी - प

सर्वांत सोपी पद्धत म्हणजे.

१. Github सारख्या नामवंत आणि ओपन संकेत स्थळावर आपले साहित्य प्रकाशित करावे जिथे त्याचा टाईम स्टॅम्प सुद्धा उपलब्ध असेल.
२. एका कागदावर आपले साहित्य लिहून एका लिफाफ्यांत सीलबंद करावे आणि स्वतःला रजिस्टर्ड पोस्ट ने पाठवावे. भविष्यांत कोर्टांत हा लिफाफा उघडला जाऊ शकतो.
३. https://poex.io/prove सारखी पद्धत वापराने. इथे तुमच्या लिखाणाला ब्लॉकचेन वर टाकले जाते आणि ह्याला कुणीही बदलू शकत नाही.

अर्थानं ह्या तिन्ही पद्धतीने तुमचा कॉपीराईट सिद्ध होत नाही. सिद्ध होतो ते म्हणजे 'अमुक दिवशी अमुक लेखन माझ्या कडे होते'. अर्थांत कोर्टानं वाद झाल्यास हा पुरावा वापरून तुम्ही कदाचित आपला दावा मांडू शकाल.

मी वकील नसले तरी कायद्याप्रमाणे कॉपीराईट हा तुम्हाला घ्यावा लागत नाही. तुम्ही काही निर्माण केले कि आपोआप त्या गोष्टीवर तुमचा कॉपी राईट निर्माण होतो. सरकार दरबारातून फक्त त्याचा अधिकृत दाखल मिळवला जाऊ शकतो.

टीप : मागे एकदा मी मिपावर "तमाम शुड" ह्या केस वर काही लेखन केले होते. ते माझी परवानगी घेऊन काही इतर संकेतस्थळांनी (बूक्सट्रक) प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रतिलिपीवर कुणी तरी आपल्या नावाने हि कथा चिकटवली. मी अनेक तक्रारी देऊन सुद्धा प्रतिलिपीने काहीही कारवाई केलेली नाही.

तुम्ही काही निर्माण केले कि आपोआप त्या गोष्टीवर तुमचा कॉपी राईट निर्माण होतो. Yes it is under Intellectual Property Right!

सोशल मिडीयावर प्रकाशित करू नये! वर संदिप म्हणतोय त्याप्रमाणे कॉपीराईट घेता येतो/येईल. पण पुढे काय? तुमचा कॉपीरायटेड लेख नंतर कोणी फेसबुक / व्हॉट्सअ‍ॅप / ब्लॉग / संस्थळं / ईंन्स्टाग्राम वगैरे वगैरे ठीकाणी टाकलाय हे तुम्हाला कळलं तर त्याचा पाठपुरावा करायला वेळ आहे का तुमच्याकडे? आणि अगदी जरी खूप वेळ असला तरी काही कारवाई करता येईलंच असं नाहीये - व्हॉट्सअ‍ॅप टाकल्या गेल्या लेखाचं काय करणार नक्की? त्यामुळे सोशल मिडीयावर प्रकाशित कराल ते "इदं न मम" अशा वृत्तीने जमणार असलं तरच करा. "माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करून अगदी विश्वासू व्यक्तीनाच ब्लॉगला अ‍ॅक्सेस देईन मी" हा एक पर्याय आहे वाटेल पण मुळात "चार जणाना काय लिहिलंय ते दाखवावं" या लेखकाच्या/लेखिकेच्या मुळातल्या ईच्छेलाच तो मारक आहे!!

एक वाचक म्हणून "लिहू नका" असं तुम्हाला सांगून मी माझ्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतोय कल्पना आहे. पण खरंच सांगतो, असं काही ऐकलं की लेखकाचा जसा तळतळाट होतो तसा वाचक म्हणून माझाही होतो. आणि शिवाय या अशा चौर्याच्या धास्तीने अनेक चांगले लेखक लिहित नाहीत / कमी लिहितात. आणि माझ्यासारखे अनेक वाचक त्यांच्या लिखाणाला मुकतात हे कटू सत्य आहे :-(

मराठी कथालेखक's picture

18 Jan 2021 - 8:23 pm | मराठी कथालेखक

मला वाटतं त्या लिखाणाचं पुस्तकरुपाने ISBN registration करावं.
एकेका कथा व कवितेचं registration करणं महाग वाटू शकेल तर संग्रह करुन registration करावं मग वाटेल तितका भाग वाटेल तेव्हा व तिथे प्रकाशित करावा.
दूसरा उपाय :
चोरीला जावून ऑनलाईन प्रकाशित झाली तरी तिचा प्रकाशन दिनांक मूळ लेखनापेक्षा नवीन असतो त्यामुळे चोरी सहजच समजून येते.
तेव्हा ते चौर्यकर्म जिथे कुठे प्रकाशित झाले असेल तर तुमच्या मूळ लेखनाची लिंक द्या आणि चोराला उघडपणे जोरदार शिव्या घाला

चौथा कोनाडा's picture

18 Jan 2021 - 8:42 pm | चौथा कोनाडा

मिपाचे जुनेजाणते थोर लेखक "चेतन सुभाष गुगळे" यांच्याशी काही दिवसांपुर्वी "काॅपीराईट घेणे" या विषयावर फोनवर बरीच चर्चा झाली होती. काॅपीराईटमधून भरपुर कमाई शक्यता आणि त्या त्या यंत्रणांशी डील करण्याची आमाशासा (पुर्ण रूपः आर्थिक, मानसिक, शारिरिक आणि सामाजिक) कुवत असल्याशिवाय काॅपीराईट घेण्याच्या भानगडीत पडू नये.
सध्या कॉपी-पेस्टचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे हे शोधणे आणि त्याचे कज्जे-खटले करत बसणे व्यवहार्य नाही.

हे मला प्रचंड पटले !

कंजूस's picture

19 Jan 2021 - 7:03 am | कंजूस

म्हणजे अगदी कॉपीराइट नोंदणी केली तरी पुढे 'नॉन लिटररी वर्क'साठी कोर्ट कज्जे महागडे आहेत. असं असं इथे म्हटलं आहे.

काही वर्षांपूर्वी मिसळ पाव वरचं एक प्रतिसाद वाचला होता, "तुमचं लिखाण कुणाला तरी कॉपी पेस्ट करता येईल, पण एखादी उत्तम कथा कविता लिहिल्या नंतर चा आनंद कॉपी पेस्ट करून नक्की च मिळणार नाही."

काही वर्षांपूर्वी मिसळ पाव वरचं एक प्रतिसाद वाचला होता, "तुमचं लिखाण कुणाला तरी कॉपी पेस्ट करता येईल, पण एखादी उत्तम कथा कविता लिहिल्या नंतर चा आनंद कॉपी पेस्ट करून नक्की च मिळणार नाही."

चौथा कोनाडा's picture

20 Jan 2021 - 4:28 pm | चौथा कोनाडा

पण एखादी उत्तम कथा कविता लिहिल्या नंतर चा आनंद कॉपी पेस्ट करून नक्की च मिळणार नाही."

असे करणारे सराईत भुरटे असतात. हे असले भुरटे दुसर्‍याचे कॉपी पेस्ट करून आनंद मिरवणारे लोक असतात !