शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती

जानु's picture
जानु in राजकारण
9 Dec 2020 - 10:43 pm

सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्‍यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्‍याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्‍याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्‍यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्‍यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्‍या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

22 Feb 2024 - 8:08 am | अहिरावण

सहमत आहे.

घाबरत नाही ती फक्त कॉग्रेस .. कारण कॉग्रेस गर्विष्ट नाही आणि कॉग्रेसचा कुणी मित्र नाही..

अकेले के दम पर नैया पार ...

मुक्त विहारि's picture

19 Feb 2024 - 11:32 am | मुक्त विहारि

राजनीतिक एजेंडे वाला आंदोलन, किसान संगठनों की कुछ मांगे ऐसी जिन्हें बिल्कुल नहीं स्वीकारा जा सकता

https://www.jagran.com/editorial/apnibaat-kisan-andolan-with-political-a...

चित्रगुप्त's picture

19 Feb 2024 - 7:21 pm | चित्रगुप्त
चित्रगुप्त's picture

19 Feb 2024 - 7:21 pm | चित्रगुप्त

खनौरी बॉर्डर पर हंगामा, पराली में मिर्च पाउडर डालकर पुलिस को घेरा, लाठी और गंडासे से हमला

"Farmers Protest: खनौरी बॉर्डर पर हंगामा, पराली में मिर्च पाउडर डालकर पुलिस को घेरा, लाठी और गडासे से हमला - farmers protest khanauri border police attacked with sticks stones surrounded by chilli powder in stubble – News18 हिंदी" https://hindi.news18.com/amp/news/nation/farmers-protest-khanauri-border...

अजूनही कुणाला, हे शेतकरी आंदोलन आहे, असे वाटत असेल तर, हरकत नाही....

https://www.amarujala.com/chandigarh/kisan-andolan-23-injured-in-clash-a...

मला तर आता दाट शंका येत आहे की, हे _किसान आंदोलन" वगैरे काही नसून, "आप" चे राजकारण आहे..

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 1:37 pm | अमरेंद्र बाहुबली

थोडे दिवस थांबा तुम्हाला हे किसीन आंदोलन खलिस्तानी चळवळही वाटेल. आयटी सेलचं काम चाललंय ह्यावर.

https://youtu.be/XuPlBZY1kfo?si=OJ6mMSK6k0oGamCE

खास तुम्हाला म्हणुन सांगतो, जर तुम्हाला खरोखरच, शेतकरी कसा असावा? हे जाणून घ्यायचे असेल तर, नेरळ येथील, भडसावळे यांच्या फार्मला जरूर भेट द्या.

कोकणातील शेतकरी, आत्महत्या का करत नाहीत? ह्याचा स्वतः अभ्यास करा... आणि कोकणातील शेतकरी ह्या आंदोलनात अद्याप तरी सहभागी झालेले नाहीत...

शक्यतो, मी तुम्हाला प्रतिसाद देत नाही... पण , एकाच नाण्याला, असंख्य बाजू असतात... त्यामूळे, वरवर जितके साधे हे, शेतकरी आंदोलन, वाटते... तितके नसावे...

बाकी, परमपूज्य केजरीवाल, अद्याप तरी ईडी समोर हजर झालेले नाहीत ... आणि केजरीवाल यांच्या वर बजावण्यात आलेले ईडीचे समन्स आणि त्याच सुमारास होणारे, किसान आंदोलन, हा निव्वळ योगायोग आहे... हे माझे निरिक्षण...

असाच एक योगायोग म्हणजे, हॅरोल्ड प्रकरण आणि परमपूज्य राहूल गांधी यांनी सुरु केलेले भारत भ्रमण....

जगभरात असे योगायोग होतच असतात...

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 2:03 pm | अमरेंद्र बाहुबली

ईडी वर माझा तितकाच विश्वास आहे जितका पाळलेल्या शेरू कूत्र्यावर.

मुक्त विहारि's picture

22 Feb 2024 - 4:05 pm | मुक्त विहारि

अयोग्य प्रतिसाद....

ED, CBI, NIA , निवडणुक आयोग , इन्कम टॅक्स खाते, न्यायालय वगैरे काही संस्था कायद्याला बांधील असतात.

आणि जर तुम्ही कुठलाही गुन्हा केला नसेल तर, वेळ प्रसंगी न्यायालय हस्तक्षेप करतेच.

आणि कृपया , अशा संस्थांचा जाहीर रित्या अपमान करु नका, ही नम्र विनंती.... पटत नसेल तर सोडून द्या...

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 4:27 pm | अमरेंद्र बाहुबली

ED, CBI, NIA , निवडणुक आयोग , इन्कम टॅक्स खाते, न्यायालय वगैरे काही संस्था कायद्याला बांधील असतात.

हाहाहाहा. किती मोठा विनोद. आजपर्यंत ऐकला नव्हता. हा विनोद म्हणजे मुविकाकांनी केलेल्या आजपर्यंतच्या सर्व विनोदांत मास्टरस्ट्रोक म्हणायला हवा.
आणि कृपया , अशा संस्थांचा जाहीर रित्या अपमान करु नका, करनार.

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 4:28 pm | अमरेंद्र बाहुबली

न्यायालयांवर आहे विश्वास अजून पण ईतर संस्था प्रामाणीक आहेत अगदी तश्याच जसा शेरू कुत्रा मालकाला प्रामाणीक आहे.

नठ्यारा's picture

22 Feb 2024 - 9:00 pm | नठ्यारा

सक्तवसुली ( ईडी ), राष्ट्रीय अन्वेषण आयोग ( एनाये ), इत्यादी संस्था कायद्याने न्यायालयास बांधील असतात. ज्या लोकांवर या संस्थांनी आरोप केले आहेत त्या लोकांपैकी कोणीही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला नाहीये. मजबूत पुरावे असल्याखेरीज शेरू कुत्रं भुंकंत नाहीये, असं दिसतंय एकंदरीत.

-नाठाळ नठ्या

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 9:02 pm | अमरेंद्र बाहुबली

शेरू कुत्रा खातो सरकारचं पण काम मात्र गावगूंडाचं करतो.

बैरिकेड्स तोड़ने के लिए लाई गईं मशीनें देख हरकत में आया प्रशासन, हरियाणा DGP ने पंजाब DGP को लिखा पत्र

https://haryana.punjabkesari.in/haryana/news/haryana-dgp-wrote-a-letter-...

आंदोलन आहे की युद्ध?

Kisan Andolan: प्रदर्शनकारियों को हाईकोर्ट की फटकार, कहा- शांतिपूर्ण प्रदर्शन में ट्रैक्टरों का इस्तेमाल क्यों

कोर्ट देखील हेच म्हणत आहे की, "शांतिपूर्ण प्रदर्शन में ट्रैक्टरों का इस्तेमाल क्यों?"

------

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 10:43 pm | अमरेंद्र बाहुबली

शेतकरीद्वेष्टे कोर्टात गेले तर

सुबोध खरे's picture

23 Feb 2024 - 9:54 am | सुबोध खरे

शांता कुमार समिती(2015) च्या संशोधनात असे आढळून आले आहे की केवळ 6 टक्के भारतीय शेतकऱ्यांना, बहुतांश मोठ्या जमीनधारकांनाच MSP आणि सरकारी खरेदीची हमीभाव योजने (assured govt procurement) चा फायदा झाला आहे .

हा एक असा गट आहे जो सिंचन पाणी आणि रासायनिक खते किंवा शेती कर्ज यांसारख्या अनुदानित फायद्याचा लाभ लाटतो आणि तरीही कोणताही आयकर भरत नाही. फायद्यांचे विसंगत वितरण अशा प्रकारच्या खरेदी मॉडेलच्या आर्थिक टिकाऊपणा आणि सामाजिक न्यायाबद्दल प्रश्न निर्माण करते. याव्यतिरिक्त, श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये अनुदानाचे केंद्रीकरण कृषी क्षेत्रातील असमानता कायम ठेवते.

सध्याची सरकारी खरेदीची हमीभाव योजना आणि निश्चित किंमतींची व्यवस्था (MSP), बदलत्या ग्राहकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशात अतिरिक्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या लागवडीस अनवधानाने प्रोत्साहन देते.

पंजाबमध्ये भात (तांदूळ) किंवा महाराष्ट्रातील पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशात उसाची लागवड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

पंजाबच्या एकूण लागवडीत धानाचा वाटा 1960 मधील 5 टक्क्यांवरून 2020 मध्ये 40 टक्क्यांपर्यंत सातत्याने वाढला आहे, तर डाळींचा वाटा या काळात 19.1 टक्क्यांवरून 0.5 टक्क्यांवर घसरला आहे.

सध्याच्या शेतकरी आंदोलनात हेच पंजाबातील श्रीमंत शेतकरी आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी सरकारला वेठीस धरत आहेत.

अहिरावण's picture

23 Feb 2024 - 10:01 am | अहिरावण

चक चक चक

असं बोलायचं नसतं राव !!

पुरोगामी, शांतीचे पुस्तक आणि शेतकरी यांच्या विरोधात बोलायचे नसते.

शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे धरणे आंदोलन

https://www.loksatta.com/thane/sharad-pawar-group-protest-in-support-of-...

-----

ये तो होना ही था....

एकीकडे, परमपूज्य राहुल गांधी यांची यात्रा , एकीकडे आरक्षण आंदोलन आणि एकीकडे शेतकरी आंदोलन...

तिरंदाज अनेक आणि लक्ष एक.... दुसरे काही नाही...

आता तर त्यांना तुतारी मिळालीय...

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Feb 2024 - 12:23 pm | अमरेंद्र बाहुबली

राजकारणावर बंदी आहे काका, थोडा समजूतदारपणा दाखवा.

मुक्त विहारि's picture

23 Feb 2024 - 12:50 pm | मुक्त विहारि

हे तुम्ही सांगायला नको... तो, अधिकार संपादक मंडळाला आहे..

चौकटीत रहा....

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Feb 2024 - 1:48 pm | अमरेंद्र बाहुबली

संपादक मंडळानेच जाहीर केलंय. मी तर आठवण करून देतोय. का लहानमूला सारखं वागता??

मुक्त विहारि's picture

23 Feb 2024 - 6:19 pm | मुक्त विहारि

हा चोंबडेपणा करायची तुम्हाला गरज नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Feb 2024 - 6:33 pm | अमरेंद्र बाहुबली

एक मिपाकर म्हणून तुम्हाला शहाणपण शिकवणे माझे कर्तव्य आहे.

सुबोध खरे's picture

23 Feb 2024 - 7:55 pm | सुबोध खरे

एक मिपाकर म्हणून तुम्हाला शहाणपण शिकवणे माझे कर्तव्य आहे.

आपण सर्वज्ञ असाल पण

आपला वय काय, आपला हुद्दा काय? आपला अनुभव किती? याचा जरा विचार करून असले प्रतिसाद टाकत जा

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Feb 2024 - 8:02 pm | अमरेंद्र बाहुबली

मिपावर बंदी असूनही राजकीय प्रतिसाद टाकले जाताहेत. इकडे आपलं लक्ष आहे की नाही?? की ऊगाच ते पण भाजप समर्थक तुम्हीही भाजप समर्थक म्हणून आपल्यायभाजपबंधूच्या बाजूने लढायला आलात? वर त्यांना चोंबडेपणा वगैरे शब्द वापरलेत हे वाचलेत की नाही?

अमरेंद्र यांचे बरोबर आहे, भक्तविहारींना सगळी सूट आहे

तुमच्या सल्ल्याची मला गरज नाही...

आणि तसेही, हे आंदोलन राजकीयच आहे, असा माझा तरी ठाम ग्रह होत चालला आहे.

असो,

तुमच्या बरोबर संभाषण करून काही फायदा पण नाही. ना तुमचे विचार मला पटतात ना तुमचे तर्क...

त्यामूळे, तुम्ही माझ्या बरोबर कितीही वाद घालायचा प्रयत्न केलात तरी, मी तुमच्या बरोबर वाद घालायचे सोडून दिले आहे...

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Feb 2024 - 6:34 pm | अमरेंद्र बाहुबली

काल एक शेतकरी ठार झाला ( की केला गेला?)

आखिर आंदोलन में शामिल क्यों नहीं हो रहे पंजाब के खेतों में काम कर रहे ज्यादातर किसान? पढ़ें ग्राउंड रिपोर्ट

https://www.aajtak.in/india/news/story/farmers-protest-why-big-farmer-or...

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Feb 2024 - 8:46 am | अमरेंद्र बाहुबली

आजतत हे शेतकरीद्वेष्ट्यांना विकले गेलेले चॅनल आहे.

विवेकपटाईत's picture

24 Feb 2024 - 10:12 am | विवेकपटाईत

हे आंदोलन शेतकर्यांचे नाही. खालिस्तानी समर्थक आणि सरकार विरोधी टिकैत चे आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Feb 2024 - 12:23 pm | अमरेंद्र बाहुबली

व्वा व्वा. छान शेतकरी खलिस्तानी झाले तर.

हेच तर काही लोकांना पटत नाही...

जाऊ द्या...

https://www.indiatv.in/india/national/naxalites-come-out-in-support-of-f...

दिवसेंदिवस, हे आंदोलन म्हणजे, एक प्रकारचे राजकिय आंदोलन आहे, हेच स्पष्ट होत आहे...

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Feb 2024 - 9:59 am | अमरेंद्र बाहुबली

शेतकरीद्वेष्टे शेतकर्यांना त्रास द्यायचा अतोनात प्रयत्न करताहेत पण भूमीपूत्रही द्वेष्ट्यांना पुरून ऊरताहेत. शेतकर्यांचे मनोबल वाढू दे ही प्रार्थना.

किसान आंदोलन में 30 पुलिसकर्मी घायल, 3 की मौत, भड़का रहे नेता... हरियाणा पुलिस ने दी पूरी जानकारी

https://www.jansatta.com/national/farmers-protest-kisan-andolan-policeme...

पोलिसांवर दगडफेक करणारे शेतकरी कसे असू शकतील? हा मूलभूत प्रश्न देखील , काही लोकांच्या मनात येणार नाही...

मी स्वतः शेतीचे ज्ञान घेण्यासाठी, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात फिरलो... प्रत्येक शेतकऱ्याने मला मनापासून शिकवले आणि कधीच उपाशी ठेवले नाही. मला भेटलेला प्रत्येक शेतकरी कधीच हिंसक होणार नाही. वेळप्रसंगी उपाशी राहील पण, कायदा हातात घेणार नाही...

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Feb 2024 - 10:03 am | अमरेंद्र बाहुबली

पोलिस नी शेतकर्यांत शत्रूत्व तयार करनार्या शेतकरीद्वेष्ट्यांचा निषेध.

MSP तक ठीक, लेकिन WTO से भारत के बाहर निकलने की मांग क्यों कर रहे किसान? समझें- पूरा लॉजिक

https://www.aajtak.in/explained/story/farmers-protest-wht-farmers-demand...

-----

वरील article, व्यवस्थित वाचले तर, काही वेगळे पैलू नक्कीच समजतील...

मुक्त विहारि's picture

26 Feb 2024 - 9:37 pm | मुक्त विहारि

क्या MSP की कानूनी गारंटी ही है समस्या का हल? समझें- NDA और UPA सरकार में किसानों को क्या मिला

https://www.aajtak.in/explained/story/farmers-protest-delhi-chalo-march-...

WTO में भारत का प्रस्ताव सुनकर हिल गए 164 देश, दुनिया में शुरू हुई चर्चा

https://www.tv9hindi.com/business/wto-ministerial-conference-which-india...

-----

भारत सरकारच्या या निर्णयामुळे, शेतकरी वर्गाचाच फायदा होईल... आणि हे आंदोलक मात्र, भारताने WTO मध्ये सामील होऊ नये, अशी मागणी करत आहेत...

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Mar 2024 - 2:25 pm | अमरेंद्र बाहुबली

आजतक गोदी मिडीया आहे.

मुक्त विहारि's picture

1 Mar 2024 - 3:44 pm | मुक्त विहारि

कारण असे असेल तर, आमच्या राज्यात आत्ता सकाळ झाली... असत्याशी सामना करायला आम्ही तयारच असतो..

अहिरावण's picture

2 Mar 2024 - 12:59 pm | अहिरावण

म्हणूनच नेमक्या आणि सत्य बातम्या समोर येत आहेत.

इतके परखड सत्य, प्रत्येकाला झेपत नाही....

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Mar 2024 - 1:56 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणूनच नेमक्या आणि सत्य बातम्या समोर येत आहेत.

गोदी मिडीयाच्या बातम्या फक्त अंधांनाच सत्य वाटतात.

वामन देशमुख's picture

2 Mar 2024 - 2:12 pm | वामन देशमुख

गोदी मिडीयाच्या बातम्या फक्त अंधांनाच सत्य वाटतात..

अंध, मूक, बधीर, अपंग अश्या कोणत्याही दिव्यांगांचा अवमानकारक उल्लेख करणे अनैतिक आहे, (कदाचित बेकायदेशीरही असेल).

लिखाण करताना सावधगिरी बाळगावी.