एक न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह (कोड्याचं माळ , योगेवाडी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
7 Dec 2020 - 5:26 pm

एक न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह

जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध  आहे. भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते . आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात .
त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी मिळाली .
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध आणि अभिमन्यू वध आपणाला माहीतच आहे . युद्धाच्या त्या दिवशी द्रोणाचार्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये 'चक्रव्यूह ' रचना केली होती आणि अभिमन्यू त्यामध्ये मारला गेला . त्याला आत जायचा कसा हे माहित होत पण बाहेर पडायचं कसा हे माहित नव्हता आणि पुढची स्टोरी तुम्हाला माहितीच असेल .
तर मुख्य मुद्दा त्या चक्रव्यूह रचनेचा , ती रचना तेंव्हा आणि त्यानंतर भारतात , भारतीय समाजात , संस्कृतीमध्ये खूप रुजली . लोकांनी चित्र काढण्यासाठी , रांगोळी , भिंती रंगवणे , कपड्यावरचे नक्षी यामध्ये त्या रचनेचा उपयोग केला . आजही उत्तर भारतात जुन्या मंदिरामध्ये  दगडावर कोरलेली , जुन्या भिंती चित्रात दिसते .
आणि आपल्या कोड्याच्या माळावरचे ते रचनाकार ठेवलेले दगड हे ती चक्रव्यूह रचनाच आहे , याची रचना मध्ययुगीन भारतात झाली असावी . तेंव्हा सिनेमा , TV , मोबाईल वगैरे काही नव्हते  त्यामुळे  करमणुकीच्या हेतूने याचा उपयोग केला असावा .
आज याठिकाणी tourism साठी चांगला वाव आहे . शेजारी मणेराजुरी मोठा तलाव हि आहे जो इथल्या निसर्ग सौन्दर्यात अजून भर टाकतो  योग्य नियोजन केले तर लोकांना १ day trip पण होईल आणि ग्रामपंचायतीला चांगला महसूल हि भेटेल .
कोणत्याही गोष्टीत अडकणे सोपं पण बाहेर पडणं खूप अवघड . ती रचना आणि चक्रव्यूह आपणाला तेच शिकवते . बाहेर आता आलं पाहिजे अडचणी असो वा संकट तरच अर्जुन बनता येईल . त्यासाठी श्री कृष्णासारखा सारथी मार्गदर्शक पण आपल्याला नेहमी जवळ ठेवावा लागेल .

ठिकाण -
कोड्याचे माळ
(योगेवाडी / मणेराजुरी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )

माहिती आणि लेखन -
डॉ . शशिकांत पाटील , संदीप पाटील

संपूर्ण माहती साठी विडिओ लिंक -

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

7 Dec 2020 - 5:54 pm | सिरुसेरि

कुतुहल वाढवणारी माहिती . बाकी अशी दगडांची वैशिष्ट्यपुर्ण रचना अनेक ग्रामीण भागांमधे माळावर पाहायला मिळते . हि रचना वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते . ( https://www.misalpav.com/node/37324 )

हो , प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दंतकथा च्या रूपात या रचना पाहायला मिळतात

दुर्गविहारी's picture

7 Dec 2020 - 6:46 pm | दुर्गविहारी

कशी कोण जाणे, कथा वाचायची राहून गेली होती.लिंक दिल्याबध्दल धन्यवाद."दाद" ला दाद दिली आहे. ;-)

लहानपणी आम्ही सुटीत चारी रस्त्यांवर दूर भटकायला जायचो. पश्चिमेला मुंबई रस्ता ,दक्षिणेला कवठे ( सांगली) रस्ता, उत्तरेला विटा रस्ता, आणि पूर्वेला मणेराजुरीकडे जाणारा. वाटेत एक डोंगर फार मजेशिर होता. नाव 'चिलिमखडा'. फार पूर्वी एक राक्षस होता तिकडे राहायचा. त्याला चिलिम प्यायची आवड होती. चिलमीचं थोटूक त्याने या डोंगरावर टोचले आणि नंतर तो परत इकडे आलाच नाही. ते थोटूक अजूनही तसेच आहे. (चिलमीसारखा एक मोठा उभा दगड शिखरावर दिसतो लांबूनही. )

एकदा त्या डोंगरावर जाण्यासाठी लवकरच निघालो. तरी वर पोहोचायला तीन वाजले. सर्व बाजूला वरून पाहायला खूप गंमत वाटली. पण बरोबरचा मित्र म्हणाला "अरे तिकडे पाहा मोठा काळा ढग येतोय इकडेच. पळा." इकडे अचानक काळोखी येऊन उन्हाळ्यात गारांचा पाऊस येतो आणि आडोसा कुठेच नाही. गारा डोक्यात पडतील. मग सुसाट निघालो. त्या काळ्या राक्षसाची आठवण येते अजून.

हे चित्रातले दगडी चक्रव्युह तिकडेच आहे का कुठे?

चिलीम खडा भिवघाट रोड ला आहे , हे कवठे महांकाळ रोड ला योगेवाडी आणि बोरगावच्या मध्ये आहे . व्हिडीओ नक्की पहा .

दुर्गविहारी's picture

7 Dec 2020 - 6:45 pm | दुर्गविहारी

खुपच अनोख्या ठिकाणाबध्दल माहिती दिली आहे.वाचून पहायची उत्सुकता वाटली.शक्य झाल्यास थोडे फोटो पोस्ट केले तर बरे होइल.
बाकी असेच एक कोडे पुसेसावळी -औन्ध यांच्या दरम्यान थेट पायवाट आहे,त्यावर असल्याचे वाचले होते,मात्र ते प्रत्यक्ष पाहिले नाही.शिवाय माहिती वाचून फार काही समजले नाही.तुमच्या या धाग्याने बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या.धन्यवाद.

कपिलमुनी's picture

8 Dec 2020 - 2:31 pm | कपिलमुनी

उत्तम व्हिडीओ

व्लॉगर पाटील's picture

9 Dec 2020 - 10:08 am | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

MipaPremiYogesh's picture

8 Dec 2020 - 10:54 pm | MipaPremiYogesh

वाह अप्रतिम ठिकाण आहे तो तलाव तर मस्तच आहे. तिकडे जाण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी काही permissions लागतात का?

बाकी विडिओ पण मस्त आहे

व्लॉगर पाटील's picture

9 Dec 2020 - 10:08 am | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!
काही परमिशन नाही लागत'

साधारणपणे रूढार्थाने प्रचलित असणार्‍या चक्रव्यूहाच्या रचनेसारखीच ही रचना दिसत असली तरी ती त्याचीच रचना आहे का हे नक्की कळून येत नाही. ही शिलावर्तुळे असावीत अशी एक शंका मनात येऊन गेली. मात्र शिलावर्तुळ हे सर्वसाधारणपणे वर्तुळाकारच असते. शिलावर्तुळ म्हणजे अश्मयुगीन मानवांची दफनांची जागा. वर्तुळाकार रचनेत प्रेत पुरुन त्यावर वर्तुळात शिळा रचलेल्या आढळतात. ही शिलावर्तुळे आजदेखील आढळतात, बरीचशी बुजलेली आहेत. अगदी इकडं भोसरीत देखील एक शिलावर्तुळ आहे.

बाकी महाभारतात मात्र चक्रव्यूहाच्या रचनेचे भिन्न वर्णन आहे. त्यात आत शिरायला एकच वाट आणि बाहेर पडायला वाट नाही असे काहीच नाही. अभिमन्यू फक्त म्हणतो ह्या व्यूहाचा भेद करणे मला शक्य आहे, मात्र ह्यातून बाहेर पडणे मला ठाऊक नाही.
चक्रव्यूहाच्या रचनेविषयक महाभारतकार म्हणतात.

चक्रव्यूहो महाराज आचार्येणाभिकल्पितः |
तत्र शक्रोपमाः सर्वे राजानो विनिवेशिताः ||

सङ्घातो राजपुत्राणां सर्वेषामभवत्तदा |
कृताभिसमयाः सर्वे सुवर्णविकृतध्वजाः ||

रक्ताम्बरधराः सर्वे सर्वे रक्तविभूषणाः |
सर्वे रक्तपताकाश्च सर्वे वै हेममालिनः ||

द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना करुन त्यात इंद्रतुल्य पराक्रमी राजांची योजना केली. त्या चक्राच्या आरांच्या ठिकाणी सूर्यासारखे तेजस्वी राजपुत्र होते. त्या राजपुत्रांनी निकराने युद्ध करण्याची प्रतिज्ञा केली होती. सुवर्णालंकृत ध्वज त्यांनी उभारले असून लाल रंगाची वस्त्रे आणि त्याच रंगाची आभूषणे त्यांनी धारण केली होती. त्यांच्या पताकाही रक्तवर्णी असून सर्वांनी चंदनाची उटी अंगाला लावली होती.

कर्णदुःशासनकृपैर्वृतो राजा महारथैः |
देवराजोपमः श्रीमाञ्श्वेतच्छत्राभिसंवृतः ||

कर्ण दु:शाशन, कृप इत्यादी महारथांनी वेढलेला राजा दुर्योधन व्यूहाच्या मध्यभागी स्थित होता. श्वेत क्षत्र धारण केलेल्या देवराज इंद्रासमान असलेल्या त्या राजावर चवर्‍या ढाळल्या जात होत्या.

उपरोक्त वर्णनावरुन चक्रव्यूह हा भूलभुलैय्या नसून सर्वसाधारण रथाच्या चाकाच्या आकाराचीच त्याची रचना दिसून येते. चक्र आणि त्याला जोडलेल्या आरा.

ह्या वर्णनाव्यतिरिक्त चक्रव्यूहाच्या इतर रचनेविषयी महाभारत मुग्धच आहे.

व्लॉगर पाटील's picture

11 Dec 2020 - 9:29 am | व्लॉगर पाटील

दिलेल्या अधिक माहिती बद्दल धन्यवाद ...

विशल्पर्बत's picture

13 Jan 2021 - 7:27 pm | विशल्पर्बत

नुकताच नाताळ च्या सुट्टी निमित्ताने वासुंबे तासगाव इकडे जायचा योग आला... सासुरवाडी आहे हो...
तसं ऐकलं होतं ह्या जागेबद्दल... परंतु तुमच्या लेखामुळे जातानाच मनाशी ठरवले होते... कि ह्या ठिकाणी नक्की जायचे...
छान जागा आहे... जवळच मणेराजुरी तलावावर सुद्धा गेलो....

व्लॉगर पाटील's picture

18 Jan 2021 - 5:20 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!