एक न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह
जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध आहे. भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते . आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात .
त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी मिळाली .
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध आणि अभिमन्यू वध आपणाला माहीतच आहे . युद्धाच्या त्या दिवशी द्रोणाचार्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये 'चक्रव्यूह ' रचना केली होती आणि अभिमन्यू त्यामध्ये मारला गेला . त्याला आत जायचा कसा हे माहित होत पण बाहेर पडायचं कसा हे माहित नव्हता आणि पुढची स्टोरी तुम्हाला माहितीच असेल .
तर मुख्य मुद्दा त्या चक्रव्यूह रचनेचा , ती रचना तेंव्हा आणि त्यानंतर भारतात , भारतीय समाजात , संस्कृतीमध्ये खूप रुजली . लोकांनी चित्र काढण्यासाठी , रांगोळी , भिंती रंगवणे , कपड्यावरचे नक्षी यामध्ये त्या रचनेचा उपयोग केला . आजही उत्तर भारतात जुन्या मंदिरामध्ये दगडावर कोरलेली , जुन्या भिंती चित्रात दिसते .
आणि आपल्या कोड्याच्या माळावरचे ते रचनाकार ठेवलेले दगड हे ती चक्रव्यूह रचनाच आहे , याची रचना मध्ययुगीन भारतात झाली असावी . तेंव्हा सिनेमा , TV , मोबाईल वगैरे काही नव्हते त्यामुळे करमणुकीच्या हेतूने याचा उपयोग केला असावा .
आज याठिकाणी tourism साठी चांगला वाव आहे . शेजारी मणेराजुरी मोठा तलाव हि आहे जो इथल्या निसर्ग सौन्दर्यात अजून भर टाकतो योग्य नियोजन केले तर लोकांना १ day trip पण होईल आणि ग्रामपंचायतीला चांगला महसूल हि भेटेल .
कोणत्याही गोष्टीत अडकणे सोपं पण बाहेर पडणं खूप अवघड . ती रचना आणि चक्रव्यूह आपणाला तेच शिकवते . बाहेर आता आलं पाहिजे अडचणी असो वा संकट तरच अर्जुन बनता येईल . त्यासाठी श्री कृष्णासारखा सारथी मार्गदर्शक पण आपल्याला नेहमी जवळ ठेवावा लागेल .
ठिकाण -
कोड्याचे माळ
(योगेवाडी / मणेराजुरी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )
माहिती आणि लेखन -
डॉ . शशिकांत पाटील , संदीप पाटील
संपूर्ण माहती साठी विडिओ लिंक -
वाचने
9950
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुतुहल वाढवणारी माहिती .
हो , प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दंतकथा च्या रूपात
In reply to कुतुहल वाढवणारी माहिती . by सिरुसेरि
कशी कोण जाणे, कथा वाचायची
In reply to कुतुहल वाढवणारी माहिती . by सिरुसेरि
मणेराजुरी रोडवर एक डोंगर होता.
चिलीम खडा भिवघाट रोड ला आहे , हे कवठे महांकाळ रोड ला
In reply to मणेराजुरी रोडवर एक डोंगर होता. by कंजूस
वाचून पहायची उत्सुकता वाटली
In reply to चिलीम खडा भिवघाट रोड ला आहे , हे कवठे महांकाळ रोड ला by व्लॉगर पाटील
चांगली माहिती
धन्यवाद !!!
In reply to चांगली माहिती by कपिलमुनी
सुंदर जागा
धन्यवाद !!!
In reply to सुंदर जागा by MipaPremiYogesh
साधारणपणे रूढार्थाने प्रचलित
धन्यवाद ...
In reply to साधारणपणे रूढार्थाने प्रचलित by प्रचेतस
धन्यवाद...
धन्यवाद !!!
In reply to धन्यवाद... by विशल्पर्बत