मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

अनटायटल टेल्स ५

Primary tabs

मकरंद घोडके's picture
मकरंद घोडके in जनातलं, मनातलं
20 Nov 2020 - 6:43 pm

सुरवात अशी काही नाहीच मधेच हे रस्त्याच्या कडेला उगवलेलं आहे झाडासारखं! त्याला भिकारी पण म्हणता येत नाही कारण त्याचं ते स्वतंत्र पणे कमावून खात आहे.
त्याला फ्रीजमध्ये ठेवलेले नंतर खाऊ म्हणून ठेवलेले शिळे पदार्थ ठाऊक नाहीत!
आवडीने चवीने खाईल असा पदार्थ आहारात नाही की चार पैसे गाठीला बांधून ठेवावेत अशी मध्यमवर्गीय की काय असते ती बैठक त्याच्या विचारात नाही!
मग का जगत सुटलंय हे खाजेसारखं? माहीत नाही!
मग काय चाललंय काय हे! चैतन्यदायी रस्ते असले काय किंवा थुलथूलीत रोडवणारा मोठा महामार्ग असला काय? त्याने काहीं फरक पडत नाही- बस तो रस्ता असला पाहिजे आणि त्यावरून जाणारी आपलीच बकवास स्वप्ने ड्रीम्स म्हणून कवटाळणारी माणसे असली पाहिजेत तरच त्याच्या बाजूला हा बावळटासारखा वेडा म्हणून उभा राहतो!
सिग्नल लागतो तसा तो धावत येतो पेन वाटतो नोकरी ची कार्डे वाटतो तोंडाला रुमाल असतो त्यामुळे तो कसा दिसतो ते कळत नाही पण त्याचा वावर अगदी सराईत असतो.
सिग्नल सुटतो गाड्या बुंग करून जातात आणि पुन्हा तो रस्त्याच्या कडेला रस्त्यातूनच उगवलेल्या झाडासारखा दिसतो! उंच काळा आणि डांबरट!
किती असं मिळत असेल दिवसाकाठी कोण पोसत असेल त्याला?
त्याला परिवार आणि त्या तसल्या काळज्या असतील का?
दिवस संपतो तसा तो रस्त्यात गुडूप होतो!
धर्म जात पोट आणि जीव हे एकाच वेळी वाचवण्यासाठी म्हणून असं जगत नाही कधी तो!
पेशाने काहीही असो स्वतःची स्वैर अशी जगणावेळ जमवून स्वतःला वेडं ठरवून घेऊन तो नुसता पेन आणि कार्डे वाढत चालला आहे!
त्याला कुणी अडवत नाहीये तसं स्वीकारतही नाहीये!
त्याचं काम संपलं की तो निघून जातो.पैसे घेतो काहीतरी असंच वडापाव चायनीज खातो आणि झोपतो रस्त्याच्या आडोशाला! दिसलाच कधी तर सलाम सांगा त्याला!
कुणीतरी दखल घेतलीये त्याची म्हणा त्याला...

व्यक्तिचित्रणलेख

प्रतिक्रिया

हो ना कितीतरी लोक असे दिसतात.
प्रश्न पडतो या लोकांचा भूतकाळ काय असेल? ते या अवस्थेला कसे आले असतील
हेलोक जगण्यासाठी नक्की काय करतात कसे रहातात तेच समजत नाही.
काळजी वाटते ती महिलांची , मुलींची, त्या अत्याचाराला सहज बळी पडत असतील.