सहज त्या दिवशी तू
फोटोसाठी पोज़ काय दिलीस,
नकळत माझ्या ह्रदयाची
तार छेडुन गेलीस..
कस् सांगू तुला काय
झक्कास दिसलीस तेव्हा,
असाच मला छळायचा
तुझा छद जगावेग.ळा..
काढलेस जरी असले फोटो तर
प्लीज़ दाखवू नकोस मला,
ते क्षण मिस केल्याचा
त्रास होतोय मनाला..
कधी वाटल नव्हत की
तू मला अशी भेटशील,
भेटली ती भेटलीस पण
माझ ह्र्दय घेऊन गेलीस..
बस जरा तिथेच स्टेज वर
दिलखुलास आवाजचे सूर छेड,
मनासारखे तुझे फोटो काढायचेत
हवाय त्यासाठी थोडासा वेळ..
तुझे फोटो ठेवणार मी
देणार नाही कुणाकुणाला,
किती हटटी आहे तुझ्यासाठी
एकदा सांगायचय तुला...