बेसन लाडू (व्हिडिओ सोबत)

मी_देव's picture
मी_देव in पाककृती
13 Nov 2020 - 6:58 pm

तर मंडळी फराळ तर करून झालाच असणार, पण तरीही पाकृ आणि व्हिडिओ देत आहे..
*** सर्व मिपा सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा **

जिन्नस:

साजूक तूप - १ कप
बेसन - २ कप
काजू - पाव कप
पिस्ता - पाव कप
वेलची पावडर - १ टीस्पून
पिठीसाखर - दिड कप

कृती:

जाड बुडाच्या भांड्यात मंद आचेवर तूप गरम करा.
त्यात बेसन घालून परतत रहा. आच मंद असुद्या
आधी बेसन आणि तुपाच्या गुठळ्या होतील पण साधारण २०-२५ मिनिटानंतर बेसन तूप सोडायला लागेल आणि मिश्रण सैलसर होऊ लागेल.
अजून साधारण १५-२० मिनिटं मंद आचेवर परतत रहा. मिश्रण भांड्याच्या तळाला लागणार नाही याची काळजी घ्या.
आता मिश्रणात काजूचे तुकडे घालावेत आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या.

बेसन पूर्ण थंड झालं कि त्यात वेलची पावडर आणि पिठीसाखर घालून मिश्रण एकजीव करा आणि लाडू वळा. सजावटीसाठी लाडूंना पिस्ता/मनुका लावा.

साजूक तुपाचं प्रमाण जास्त असल्याने लाडू मऊ एकदम मऊ होतात आणि आकार बदलतात. पण चव म्हणजे स्वर्गसुख.
आपल्या आवडीनुसार तुपाचे प्रमाण कमी करू शकता.

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

13 Nov 2020 - 7:07 pm | संजय क्षीरसागर

त्यात लाडूवरती एक बेदाणा लावला तर आणखी भारी टेस्ट येईल.

मी_देव's picture

14 Nov 2020 - 9:47 am | मी_देव

नक्कीच

चामुंडराय's picture

13 Nov 2020 - 9:34 pm | चामुंडराय

दोन बेदाणे आणि एक अख्खा काजू लावलात तर स्मायली बेसन लाडू होईल :)

मी_देव's picture

14 Nov 2020 - 9:48 am | मी_देव

तुमच्या कंमेंट वरून अंदाज आला ;)

मदनबाण's picture

14 Nov 2020 - 11:48 am | मदनबाण

पाकृ / फोटो / व्हिडियो सगळं लयं भारी ! :)
बेसन लाडवात काजू घालताना पहिल्यांदाच पाहिल.

सर्व मिपाकरांना दिपावलीच्या शुभेच्छा !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC
[ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]