जिंदगी ख्वाब है.

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
9 Nov 2020 - 6:03 pm

३.

   जिंदगी ख्वाब है..

डोळे उघडले.कुठे होतो हे सुरुवातीला काही कळलेच नाही. 
नवीन जागा होती. दोन्ही हातांना सुया टोचलेल्या.त्यांना जोडलेल्या नळ्या तून सलाईन वाटे औषधे सुरू होती.छातीवर पण काही नळ्या होत्या.एका यंत्राला जोडलेल्या. नाकाला ऑक्सीजन मास्क. कॅथेड्रल,डायपर पण  लावलेले.  मग लक्षात आले. हॉस्पिटलमधील  आय.सी.यु.वॉर्ड. बेडवर होतो..
'कसं वाटतंय आता? ठीक आहात?'_नीलू.
'हो. काय झालंय?' -मी.
मुलगा  तर होताच मुलगी जावाई  पूण्याहून आलेले.इथलेच नाही तर मुंबई,पुण्याहून आलेले नातलग समोर येऊन पाहून जात होते.याचा अर्थ,आपल्या बाबतीत काहीतरी अतिगंभीर घडलंय हे ध्यानात आले.काय झालं ते हळूहळू इतरांशी बोलण्यातून कळले .
आयसीयू च्या वाटेवर मला ह्दयविकाराचा झटकाआला .

ह्रदय बंद झाले काही काळ.
सुदैवाने कार्डिओलॉजीस्ट डॉ.महेश देशपांडे व त्यांचा पूर्ण चमू हजर होता .पंपींग ,मसाज करून,विजेचे शॉक देऊन ,ह्रदय पुन्हा सुरू केले. तातडीने आवश्यक तपासण्या केल्या. ह्रदयाला रक्त पुरवठा करणारे रक्त वाहिन्यांमधे दोन अवरोध (ब्लॉक) होते.पैकी एक मोठा.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पटापट निर्णय घेतले गेले.संध्याकाळीच त्वरित एंजिओप्लास्टी केली.
   शनिवार २२ऑगस्ट ला पावणे तीन चे दरम्यान माझे डोळे मिटले होते. पुर्ण शुद्ध आली रविवार २३ऑगस्टचे संध्याकाळी पाच वाजता.म्हणजे सव्वीस तासाहून जास्त
काळ शुद्धीवर नव्हतो. हा पुनर्जन्मच.सगळेच 'आश्चर्यकारक आणि  नाटकीय'. हे डॉक्टरांचेच शब्द.
त्या' दिवशी अगदी ऐन वेळी, डॉक्टर निघून जाण्यापूर्वी   दवाखान्यात पोहचणे, आणि नंतरह्रदयविकाराचा झटका येणे, आणि तेव्हा हवे ते तज्ञ डॉक्टर त्यांचे सहाय्यक उपलब्ध असणे,हे  नाटकीय आणि आश्चर्यकारक नव्हे तर काय? मी घरी वा बाहेर कुठे असतानाशअसे होते, तर हवी ती वैद्यकीय मदत व उपचार मिळाले असते का? तशि स्थितीत  'मी' उरलो  असतो का ? 
'जिंदगी ख्वाब है.'असे एक गाणे आहे. हे आयुष्य म्हणजेच एक स्वप्नं आहे हे खरेच. पण माझे आताचे असणे हे स्वप्न आहे की  जे झाले ते स्वप्न होते?
                   नीलकंठ देशमुख .

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

9 Nov 2020 - 8:17 pm | चौथा कोनाडा

'जिंदगी ख्वाब है.'असे एक गाणे आहे.
अगदी खरे. त्याची इच्छा आहे तो पर्यंत तो या स्वप्नात रमू देणार, त्याची इच्छा झाली की झोपमोड करून त्याच्या बरोबर घेऊन जाणार !

खडबडून जागं करणारं लेखन !

नीलकंठ देशमुख's picture

9 Nov 2020 - 9:03 pm | नीलकंठ देशमुख

लिखाणावरील प्रतिक्रियेसाठी धन्यवाद