दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते.
आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील .
युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्यापैकी कमी पडतात.
असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे.
फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism
*घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
प्रतिक्रिया
20 Nov 2020 - 11:27 am | शा वि कु
आरबीआय अधिकाऱ्यांवर टीका फक्त कॉमन सेन्स वापरून करणे काय योग्य वाटत नाही. नक्की काय गोष्टी "नियमित तपासणीत" समजायला हव्या होत्या वैगेरे तपशीलवार द्यायला हवे. हि फारच वरवरची आणि अभ्यासाशिवाय केलेली टिप्पणी वाटते.
20 Nov 2020 - 3:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"त्या मुळे प्रत्यक्षात बँक तोट्यात असून सुद्धा कागदावर प्रचंड फायद्यात आहे असे दिसून येत असे"
पण ह्या बँकाना पैसा, त्यावरचे व्याज(रेपो रेट्/रिवर्स रेपो रेट) आर बी आयच देते ना ?आणी जर बँका अशा तोट्यात होत्या तर मग नविन कर्मचारी भरती, प्रमोशन,भारतभर वाढणार्या शाखा.. ह्या सगळ्यासाठी पैसा कुठून यायचा?
गेले १०/१५ वर्ष आर बी आय असे डोळे मिटून कर्ज कसे काय देत होती बँकाना ? आर बी आय चे निवृत्त अधिकारी/बँकांचे निव्रुत्त संचालक ह्यावर बोलत का नाहीत ?
20 Nov 2020 - 3:28 pm | Rajesh188
ह्या वार्षिक ताळेबंद मध्ये नफ्यात च होत्या त्यांच्या वर प्रचंड कर्ज आहे हे लोकांना त्या बुडे पर्यंत माहीतच नव्हतं
ऑडिटर manage होत असावेत ते दुर्लक्ष करून चांगला वार्षिक अहवाल जाहीर करतात.
समीर ची आणि माहिती मधील उदाहरणे .
अनिल अंबानी आणि
आणि पुण्याचे बांधकाम व्यावसायिक आणि बाकी इतर किती तरी.
20 Nov 2020 - 5:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सामान्य माणसाला माहित कसे असेल? आणी कर्ज देताना मोठ्या बॅण्का झोपेत असतात का ?समजा तुम्ही मला ५० कोटीचे कर्ज दिले तर दर तीन्/सहा महिन्यानी माझ्या कंपनीचा अहवाल मागवाल ना ? की फक्त ऑडिटर म्हणतोय म्हणून मान्य कराल? स्वतःचा अॅनालिसिस करणारच ना?
ओडिटर जगभर मॅनेज होतात हे सर्वाना माहित आहे. एनरॉन-अँडरसन कंसल्टिंग गाजलेली केस होती.
विजय मल्ल्या ह्याच्या किंग फिशरला १७ बॅन्कानी एकूण ९००० कोटी दिले होते. विमान प्रवास आधी भारतात महाग. त्यात किंग फिशरचा प्रवास आणी महागडा होता. हे बिझनेस मॉडेल जास्त टिकणार नाही हे आमचा कोपर्यावरचा ईश्वरदास खीमजीही म्हणायचा.
20 Nov 2020 - 6:04 pm | मराठी_माणूस
आरबीआय ने सामान्य माणसांचे पैसे सर्वात पहील्यांदा मोकळे करुन द्यावेत. प्राधान्य ह्या गोष्टीला दिले पाहीजे. त्या लोकाना वार्यावर सोडणे हे सर्वथा अयोग्य.
ज्या गृहवित्त संस्थेचा उल्लेख अग्रलेखात आहे त्या गोष्टीला आता एक वर्ष होत आले. अजुन काहीच प्रगती नाही. पीएमसी ची हीच कथा.
20 Nov 2020 - 7:46 pm | गामा पैलवान
माईसाहेब,
तुम्हांस एक गंमत सांगतो. त्याचं काये की बँकेत घोटाळे नसतातच मुळी ! कारण की बँकिंग हाच मुळी एक मोठ्ठा घोटाळा आहे.
पैशांचे मोठमोठाले आकडे तोंडावर फेकून सामान्य माणसाला दबावाखाली ठेवायचं. इतकंच बँकिंग क्षेत्राचं प्रामाणिक काम आहे. बाकीची सर्व कामं अप्रामाणिक या सदरात मोडतात.
आ.न.,
-गा.पै.
26 Nov 2020 - 6:53 pm | शा वि कु
https://indianexpress.com/article/explained/who-is-stan-swamy-6717126/
26 Nov 2020 - 6:54 pm | शा वि कु
https://scroll.in/latest/979564/dont-have-stan-swamys-straw-or-sipper-ni...
26 Nov 2020 - 8:34 pm | सुबोध खरे
हा स्टॅन स्वामी आदिवासींना बाटवण्यात पुढे होता आणि त्याचे नक्षली लोकांशी फार जवळचे संबंध होते.
यामुळे हे प्रकरण वाटते तितके साधे सरळ नाही.
अर्थात वाममार्गी लोक अरण्यरुदन करणारच. शिवाय वय वाढलं म्हणू रडारड करणारच.
27 Nov 2020 - 12:33 pm | नीलस्वप्निल
‘कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने,’ मुंबई हायकोर्टाचा महापालिकेला दणका- लोकसत्ता
28 Nov 2020 - 9:31 pm | सॅगी
दुनिया घुम लो! लस पुण्यातच सापडणार
"साहेब पावसात भिजले म्हणून लस सापडली" असे म्हणाल्या नाहीत हे पुणेकरांचे आणि अवघ्या महाराष्ट्राचे नशीब...
30 Nov 2020 - 12:32 pm | मराठी_माणूस
https://www.loksatta.com/mumbai-news/land-scam-in-national-highways-land...
ज्या पध्दतीने उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत ते बघता ह्या प्रकरणात पुढे काही होण्याची, लोकांना न्याय मिळण्याची शक्यता खुप कमी.
30 Nov 2020 - 8:49 pm | माहितगार
बँकांच्या बुडीत कर्जांच्या समस्येचे भारतात एक दुष्टचक्र झाले आहे ते खरे आहे. पण या कडे केवळ एक कडक ऋणको आणि तात्कालिक नी जर्क रिअॅक्शन देणार्या मध्यमवर्गाच्या भूमिकेतून दिल्या जाणार्या भावनिकतेने समस्या मुळातून समजून घेतली जाऊ शकेल का आणि मूळ समजले नाही तर येरे माझ्या मागल्या होत रहाणार त्यास पर्याय असणार नाही.
मध्यम वर्गाच्याच नजरेतून मांडणी करायची झाल्यास किमान लगेच म्हणजे नजीकच्या भविष्यात समाजवादाकडे जगातील कोणत्याही अर्थव्यवस्था जाणार नाहीत, बहुतांश नौकर्या खासगी क्षेत्रातूनच मिळवाव्या लागणार खासगी क्षेत्रे चालवायची व्यवसाय सुलभता हवी आणि योग्यदरात भांडवल उपलब्धता हवी. म्हणजे खुल्या अर्थव्यवहार आणि बँकींग शिवाय तुर्तास पर्याय नाही हे ही लक्षात घेतले गेले पाहीजे. भारतीय सरकारी अर्थव्य्वस्थेचा जेवढा उहापोह अर्थसंकल्प आणि राजकारणाच्या निमीत्ताने होतो तेवढा खासगीक्षेत्रातील समस्यांचा उहापोह होतो का या बद्दल साशंकता वाटते.
1 Dec 2020 - 9:01 pm | गामा पैलवान
कळविण्यास अत्यंत दु:ख होते की असंख्य ठाणेकरांचे जीवन तिखटजाळ करणारे लक्ष्मणशेठ मुरुडेश्वर तथा 'मामलेदार मिसळ'चे मालक यांचे निधन झाले. :-(
त्यांना सद्गती लाभो.
वृत्त : https://www.loksatta.com/thane-news/laxman-murdeshwar-owner-of-mamledar-...
मामलेदार मिसळ आता पोरकी झाली. आता बशीत चमचा खुपसण्यापूर्वीच नयनकंठ भरून येणार.
-गा.पै.