ना.सी. फडके यांनी शृंगारिक लिखाणाने समाज बिघडवला काय ?

सागरलहरी's picture
सागरलहरी in काथ्याकूट
25 Nov 2008 - 12:48 pm
गाभा: 

ना.सी. फडके यांनी शृंगारिक लिखाणाने समाज बिघडवला काय ?
आपणा सर्वांचे विचार आमंत्रित...

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

25 Nov 2008 - 1:45 pm | विनायक प्रभू

ना. सि. फडके म्हणजे १९४२ अ लव स्टोरी
आमच्या पिढीला आदरणीय

बाकरवडी's picture

25 Nov 2008 - 2:57 pm | बाकरवडी

"संपादित"

विनायक प्रभू's picture

25 Nov 2008 - 1:39 pm | विनायक प्रभू

करुन गेला गाव
ना.सि. फड्क्यांचे नाव
हे राम

धोंडोपंत's picture

25 Nov 2008 - 8:12 pm | धोंडोपंत

श्री. फडके यांचा अवमान करणारे आणि विषयाशी विसंगत असलेले अभिप्राय सरपंचांच्या सूचनेनुसार पटलावरून उडविण्यात आले आहेत.

वैयक्तिक हमरीतुमरीसाठी खरडवहीची सुविधा उपलब्ध आहे. एकमेकांना शिव्या देण्यासाठी तिचा वापर करावा.

संकेतस्थळाच्या पटलावर फक्त विषयाशी सुसंगत असलेलेच लेखन राहील याची नोंद घ्यावी.

धोंडोपंत
मॉडरेटर, मिसळपाव डॉट कॉम

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

ना सी फडके यांनी शृंगारीक कादंबर्‍या लिहून समाजातील कोमल भावना फुलवायचा प्रयत्न केला आहे यात संशय नाही

शृंगार हा जीवनाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे.
वैवाहिक जीवनाचा पाया विश्वास असतो , आणि तो निर्माण करण्यात शृंगार रस मुख्य भूमिका निभावतो असे माझे मत आहे.

प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केल्याबद्दल या माननीय लेखकाला कोटी कोटी प्रणाम.

अवांतरः ना.सी. फडके यांचे संकेतस्थळ पण आहे

http://www.naasiphadke.com/
मराठी पानाची लिंक : http://www.naasiphadke.com/frames1.htm

इथे त्यांची सगळी ग्रंथसंपदा यादी स्वरुपात मिळेल

धन्यवाद
(ना.सी.फडके प्रेमी ) सागर

विजुभाऊ's picture

25 Nov 2008 - 2:35 pm | विजुभाऊ

भालचन्द्र नेमाड्यानी ; फडके खांडेकर काकोडकर या सगळ्यांचा मस्त बोळाच काढून टाकला. वाचकना जमिनीवरचे लिखाण वाचायची सवय लावली
अवांतरः केवळ लिखाणाने समाज बिघडला असता तर सन्ध्यानन्द वाचून समाज विकृत झाला असता

मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणार्‍या थंडीची आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सखाराम_गटणे™'s picture

25 Nov 2008 - 3:02 pm | सखाराम_गटणे™

सहमत

--
मुम्बैच्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी रंगीत आठवण येऊन तुमचे गाल आरक्त होत असतील तर याचे आश्चर्य बाळगु नका. त्या उकाड्यातही अंगावर शिरशिरी आणणारी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

टारझन's picture

25 Nov 2008 - 3:02 pm | टारझन

केवळ लिखाणाने समाज बिघडला असता तर सन्ध्यानन्द वाचून समाज विकृत झाला असता

=)) =)) =)) =)) खरंय

- टारानंद

सुनील's picture

25 Nov 2008 - 3:37 pm | सुनील

ना.सी. फडके यांनी शृंगारिक लिखाणाने समाज बिघडवला काय ?

ना सी फडक्यांच्या काळात मराठी भाषकांत साक्षरांचे प्रमाण किती टक्के होते?
त्यांतील किती टक्के लोक पुस्तकांचे वाचन करीत?
त्या पुस्तकांत ना सी फडक्यांची पुस्तकांच्या प्रमाणाची टक्केवारी किती होती?
त्यांची पुस्तके वाचून "बिघडणार्‍यांची" टक्केवारी किती होती?

थोडक्यात, त्या "बिघडणार्‍याची" एकूण मराठी भाषकांत टक्केवारी किती होती?

हा विदा असल्यास द्यावा, म्हणजे "समाज बिघडला काय" यावर छान चर्चा करता येईल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऍडीजोशी's picture

25 Nov 2008 - 4:10 pm | ऍडीजोशी (not verified)

श्रुंगारीक साहित्य वाचायची हौस असणार्‍यांसाठी ना. सि. फडके ह्यांचे लिखाण हा एकमेव स्त्रोत नाहिये.

मराठी_माणूस's picture

25 Nov 2008 - 4:23 pm | मराठी_माणूस

जाला वर जे उपलब्ध आहे , त्याच्याशी तुलना करता फडक्यांचे लीखाण हे खुप सोवळे आहे. जाला मुळे जो बिघाड
(वाचा: मिपा वरील धागा पदर) होत आहे तो जास्त गंभीर आहे.

अभिरत भिरभि-या's picture

25 Nov 2008 - 4:30 pm | अभिरत भिरभि-या

आज २५-नोव्हे-२००८ रोजी मांडलेल्या या विषयाची सापेक्षता समजली नाही.
>>जाला वर जे उपलब्ध आहे , त्याच्याशी तुलना करता फडक्यांचे लीखाण हे खुप सोवळे आहे
म_मा शी सहमत

धोंडोपंत's picture

25 Nov 2008 - 7:56 pm | धोंडोपंत

मराठीतील थोर प्रतिभावंत श्री . ना. सी. फडके यांचा जो एकेरी उल्लेख काही अभिप्रायात नोंदविण्यात आला आहे, त्यावर आमचा अत्यंत तीव्र आक्षेप आहे.

श्री. फडके कोण होते हे सुद्धा ज्यांना माहित नाही, त्यांचे वाङ्मय तर दूरच राहो, त्यांनी या थोर सारस्वताचा असा उल्लेख करावा हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.

श्री. फडके यांच्या वाङ्मयावर साधक बाधक चर्चा होऊ शकते त्यांच्या साहित्याचा विरोधात मते असू शकतात हे आम्ही जाणतो. पण याचा अर्थ त्यांचा अवमान केला जावा हा नव्हे.

श्री. फडके यांचा अवमान करणारे अभिप्राय पटलावरून त्वरीत उडविण्यात यावेत आणि संबंधितांना योग्य समज देण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

आपला,
(संतप्त) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

छोटा डॉन's picture

25 Nov 2008 - 8:25 pm | छोटा डॉन

धोंडोपंताशी सहमत आहे ...
चर्चा जरुर व्हावी पण कुणाला "टार्गेट" ढरवुन आक्रस्ताळे व ( स्वतःला ) आक्रमक वाटणारे प्रतिसाद देऊन आपल्या बुद्धीचे तोकडेपण सर्वांसमोर सिद्ध करु नये ही विनंती. चर्चा ( जर व्हायची इच्छा असेल तर ) खेळीमेळीतच व्हावी ...
कितीही आदळाआपट केली तरी ना.सी. फडके यांचे लिखाण व कर्तुत्व याची नोंद मराठी साहित्यात सन्मानाने झालीच पाहिजे , नव्हे ती होतच आहे.
प्रत्यक्ष अत्रेसाहेबांना त्यांच्याशी लढताना बराच दम खर्च करावा लागला यातुन काय ते लक्षात घ्यावे, आपण तर फारच छोटी माणसे त्यांच्या मानाने ...

तर चर्चाच व्हावी ती पण संयमाने, उगाच "जळजळीत वाक्ये" वापरुन आपण फार काहीतर ग्रेट करतो अशा संभ्रमात असु नये.
बाकी जाणकार सुज्ञ आहेतच ...
इति लेखनसीमा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिरत भिरभि-या's picture

25 Nov 2008 - 8:37 pm | अभिरत भिरभि-या

>> प्रत्यक्ष अत्रेसाहेबांना त्यांच्याशी लढताना बराच दम खर्च करावा लागला यातुन काय ते लक्षात घ्यावे,

ते दोघे कशावरुन लढत होते ?

अवलिया's picture

25 Nov 2008 - 8:40 pm | अवलिया

म्हणजे नक्की काय विचारायचे आहे ?
विषय काय होता त्यांच्या लढण्याचा ?
की घोड्यावरुन की उंटावरुन बसुन लढत होते ?
कि ते खरोखर लढत होते का असे विचारायचे आहे?
खुलासा करा

अभिरत भिरभि-या's picture

25 Nov 2008 - 8:47 pm | अभिरत भिरभि-या

काय राव .. म्हाईती असत तर प्रश्न कशाला इचारला असता?
पुन्यांदा

कोण मतप्रभेदाने हे महानुभाव युद्ध आरंभण्यास प्रयुक्त जाहले ?

सुनील's picture

25 Nov 2008 - 8:42 pm | सुनील

माझ्या माहितीनुसार फडके हे कले करीता कला ह्या मताचे होते. म्हणजेच, कलावंताने नीती, बोघ, सामाजिक बांधिलकी मानलीच पाहिजे असे नव्हे.

अत्रे यांचे म्हणणे याउलट होते.

जाणकार प्रकाश टाकतीलच!

चुभुद्याघ्या

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन's picture

25 Nov 2008 - 8:56 pm | छोटा डॉन

मला तरी "ह्याच आशयाचा वाद" ज्ञात आहे.
आता लढले म्हणजे शब्दशः घेऊ नकाच, काही तात्विक व साहित्तीक मतभेद होते व त्यातुन "आरोप - प्रत्यारोप , वाद - प्रतिवास " चालत.
त्यालाच आम्ही साधी माणसे "लढले" असे म्हणतो ...

तुर्तास इतकेच.
घरी गेल्यावर सवडीने शोध करुन सविस्तर प्रतिसाद टाकेन, मात्र त्या दोघांचा "वाद" झाला होता ह्याबद्दल ठाम आहे.
तो शाब्दिक ह्याच अर्थाने घ्यावा ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिरत भिरभि-या's picture

25 Nov 2008 - 9:01 pm | अभिरत भिरभि-या

नुसती कलेकरता कला म्हटले की एम एफ हुसेन समर्थनिय ठरतो;

आणि नीती , बोध वगैरे म्हटले तर इस्लामची संगित/ चित्र आदी कलांवरची बंदी समर्थनिय ठरते.

पेच अवघड आहे, बेमट्या

छोटा डॉन's picture

25 Nov 2008 - 9:17 pm | छोटा डॉन

हे पहा " एम एफ हुसेन आणि त्यांची चित्रकला" ह्याचा संबंध डायरेक्ट बहुसंख्य हिंदुंच्या भावना दुखावण्याशी येतो म्हनुन ते आमच्या मते "निंदनीय", त्यांनी काढलेले भारतमातेचे, देवदेवतांची विकॄत चित्रे निंदनीय ...
तसेच कुठल्यातरी महाभागाने काढलेले महंमद पैगंबरांचे व्यंगचित्रही "निंदनीयच " ...
त्याचा निषेध व त्याला विरोध हा व्हायलाच हवा ...

फडक्यांची गोष्ट निराळी ,,,,
फार फार तर त्यांना आपण "साचेबद्ध न लिहता" काहीतरी वेगळा प्रयत्न करणारे असे म्हणु शकतो, इथेही मतांतरे असतीलच.
काही जणांना ते वेगळे प्रयत्न "अश्लिल " वाटुन त्याचा निषेध करावा वाटतो कारण ते आपल्या सामाजीक रुढीपरंपरांपासुन फारकत घेणारे आहेत व जरा जास्तीच "पुढारलेले व स्वतंत्र" आहेत, अत्रसाहेबांनी तेच केले ...
तर काहीजणांना तेच लिखाण "आवडु" सुद्धा शकते कारण ते साहित्याचा वेगळा पैलु दाखवतात ...
त्यांना सरसगट "अश्लिल , कमरेखालचे" म्हणणे हा अन्याय आहे व ढोंगीपणा आहे.
ह्या हिशोबाने "लावण्या" सुद्धा सरसकट "अश्लिल" ठरतात का ? बैठकीच्या लावण्यांची किती मोठ्ठी परंपरा आहे हे सर्वांना ज्ञातच आहे.
त्याला हाच न्याय लावणार का ????

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विकास's picture

25 Nov 2008 - 9:18 pm | विकास

फडके आणि अत्रे यांच्या वृत्ती-प्रवृत्ती भिन्न होत्या. फडक्यांचे लेखन हे वर सुनील यांनी म्हणल्याप्रमाणे "कलेसाठी कला" सदरात मोडणारे होते असे किमान त्यांचे स्वतःचे म्हणणे होते. अत्रे यांना त्यांचे लेखन आवडायचे नाही. तसे अत्र्यांचे अनेकांशी वाजायचे पण तितक्याच तत्परतेने ते विसरून जायचे. पण तो नियम अत्रे-फडके वादाला लागू होत नाही.

फडक्यांनी एक साहीत्यकृतीवरून एक खंडात्मक ग्रंथ लिहीला होता. त्याचे नाव आत्ता आठवत नाही, पण "सारथी आणि घोडे" नावाचे त्यातील प्रकरण आम्हाला अभ्यासाला होते. ऐकीव माहीती प्रमाणे ते पुस्तक प्रकाशीत होई पर्यंत अत्रे गप्प बसले होते (त्या ग्रंथाला आधी प्रसिद्धी मिळत होती तरी). पण नंतर त्यांनी कुठल्या पाश्चात्य पुस्तकावरून उचलले आहे हे सप्रमाण सिद्ध केले...

अत्रे-फडके वाद चवीन चघळले जायचे पण मी देखील नंतरच्या पिढीतील असल्याने त्याबद्दल जास्त माहीती नाही. फक्त त्यावरून तयार झालेले पांचट विनोद ऐकले होते...

माझ्या लेखी दोघे प्रतिभावान होते. दोघांनी मराठी साहीत्यात मोठे योगदान केले आहे. त्यामुळे इतरांनी केवळ तोच भाग लक्षात ठेवावा आणि कोण श्रेष्ठ या वादात पडू नये.

राहता राहीला चर्चेतील मूळ प्रश्न: मला वाटते फडक्यांच्या लेखना ऐवजी पत्र नव्हे मित्र स्वतःच्या संकेतस्थळावर सनसनाटी आणि वाचकांना आकर्षित करता येईल अशा वरकरणी बातम्या छापतो त्याने समाज बिघडू शकतो. आणि त्याचे कारण शॄंगार नसेल तर, "कुठे, काय, आणि कशाला वाचावे, तसेच त्याचा सामाजीक/व्यक्तीगत उपयोग कसा करावा ह्या बद्दलचा वैचारीक गोंधळ" हे कारण असेल.

आजानुकर्ण's picture

25 Nov 2008 - 9:24 pm | आजानुकर्ण

अत्रे की खांडेकर?

अत्रे फडके वाद हा जीवनासाठी कला यावरुन नव्हता असे वाटते.

आपला
(साशंक) आजानुकर्ण

छोटा डॉन's picture

25 Nov 2008 - 9:31 pm | छोटा डॉन

>>अत्रे फडके वाद हा जीवनासाठी कला यावरुन नव्हता असे वाटते.
????
आता मात्र कर्णाच्या टिप्पणीने गोंधळ उडाला, अतरीही पुर्वीचेच मत "योग्य" वाटत आहे.

असो. कर्णा, जरा विस्ताराने सांगशील तर बरे होईल, तुला नक्कीच माहित आहे ह्यात शंका नाही.
सांग, त्या निमीत्ताने आमचेही ( जे काही असतील ते ) गैरसमज दुर होतील ...

( उत्सुक ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विकास's picture

25 Nov 2008 - 9:47 pm | विकास

अत्रे की खांडेकर?

खांडेकर पण शक्य आहेत. अधिक माहीती असल्यास अवश्य सांगावी.

महाराष्ट्रात गाजलेले दोन वाद हे अत्रे-मामा वरेरकर आणि फडके-खांडेकर या जोड्यांचे होते.
अत्रे-फडके वाद होता असे वाटत नाही.

- अभिजीत

लिखाळ's picture

25 Nov 2008 - 10:02 pm | लिखाळ

ते लोक मराठी संकेतस्थळांवर लेखन करत का? इतके भांडले का असतील? :)
-- लिखाळ.

अभिरत भिरभि-या's picture

25 Nov 2008 - 10:21 pm | अभिरत भिरभि-या

सध्या दिग्गज उत्तरसूरी वारसा तितक्याच सामर्थाने सांभाळत आहेत ;)

सुनील's picture

25 Nov 2008 - 10:10 pm | सुनील

गोंधळ उडालाय खरा!

पण फडके म्हणजे "कलेकरीता कला" हे आठवतयं.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आजानुकर्ण's picture

25 Nov 2008 - 10:15 pm | आजानुकर्ण

अत्र्यांनी केलेली वरील टिप्पणी ही फडके-अत्रे वादाचा लोकप्रिय पुरावा आहे. दोघांची भांडणे आणि त्यानिमित्ताने मराठा मधून आलेले अर्वाच्य लेखही प्रसिद्ध आहेत.

अत्रे फडके वाद हा फडके खांडेकर यांच्यातील मतभेदांपेक्षा जास्त गाजलेला आहे.

आपला
(ऐतिहासिक) आजानुकर्ण

लिखाळ's picture

25 Nov 2008 - 10:22 pm | लिखाळ

अत्रे-फडकेवाद त्या काळात शिगेला पोहोचला होता.. असे एक विधान आणि ओघाने काही माहिती त्या लेखात आलेली आहे.
-- (शोधक)लिखाळ.

इनोबा म्हणे's picture

26 Nov 2008 - 1:45 am | इनोबा म्हणे

संत ज्ञानेश्वरांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि काही अन्य महापुरुषांच्या नावाचा वापर करुन असेच काही अवमानकारक(कुठल्याही ऐर्‍यागैर्‍या‍ला'संत ज्ञानेश्वर' किंवा 'शिवाजी महाराज'म्हणणे हा त्यांचा अवमानच आहे) लेखन गेल्या काळात झाले होते. ते लेख मात्र(अजूनही)उडवले गेले नाहीत.आता जितक्या तत्परतेने या फडक्यांविषयीचा मजकूर असलेले प्रतिसाद उडवले गेले आहे त्या अर्थी ते नक्कीच संत ज्ञानेश्वर आणि शिवाजी महाराजांपेक्षा मोठे महापुरुष असले पाहिजेत.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रामदास's picture

25 Nov 2008 - 8:54 pm | रामदास

हा त्या काळी फार वादचा विषय झाला होता.
मला फडक्यांची दौलत ही कादंबरी लहानपणी आवडली होती.

चतुरंग's picture

25 Nov 2008 - 10:38 pm | चतुरंग

अत्र्यांच्या सडेतोड आणि निर्भीड व्यक्तिमत्त्वाने त्यांचे अनेकांशी वाद झाले. त्यातला अत्रे-वरेरकर वाद गाजला. अत्रे-फडके वादही गाजला (बर्‍याचदा त्याला अतिशय हीन स्वरुपही आलेले मागल्या पिढीतले लोक सांगतात). फडके-खांडेकर वादही गाजला त्यात बहुदा कलेसाठी कला वाद असावा असे वाचल्याचे अंधुक आठवते.

वाद आणि फडक्यांचे वाङ्मयीन कर्तृत्त्व ह्यांचा अर्थाअर्थी संबंध लावून त्यांना हीन दर्जाचे साहित्यिक लेखण्याची चूक करु नये. ते अतिशय प्रतिभावान साहित्यिक होते ह्यात वाद नाही. मराठी भाषेतले प्रमाणभूत मानले जावे असे लेखन त्यांनी 'प्रतिभासाधन' सारख्या ग्रंथातून केले.
http://www.naasiphadke.com/frames1.htm ह्या दुव्यावरती फडक्यांविषयी बरीचशी माहिती मिळेल.

चतुरंग

लिखाळ's picture

25 Nov 2008 - 10:45 pm | लिखाळ

>> फडके-खांडेकर वादही गाजला त्यात बहुदा कलेसाठी कला वाद असावा असे वाचल्याचे अंधुक आठवते. <<
होय.. नेटावर शोधताना खांडेकरांच्या पुस्तकाची ओळख लोकसत्तेत सपडली. त्याच्यात कलेसाठी कला हे खांडेकरी तत्त्व होते असे वाचले.
-- (नेटाने नेटावर शोधणारा) लिखाळ.

नंदन's picture

26 Nov 2008 - 12:04 am | नंदन

फडके-खांडेकर वाद कलेसाठी कला की जीवनासाठी कला यावर होता. अत्रे-फडके वादाचे कारण आठवत नाही, पण अत्र्यांनी 'शालूसमान मिळतो फडक्यास मान' असे विडंबन लिहिले होते आणि फडक्यांच्या कमलाबाईंशी झालेल्या दुसर्‍या विवाहावरून बरीच राळ उठवली होती, असं वाचल्याचं आठवतं.

बाकी अनैसर्गिक पॉर्नच्या चर्चेबरोबर ही चर्चा पाहून गदिमांची (बहुतेक वंदे मातरम चित्रपटातील) काही वाक्ये सेन्सॉर बोर्डाने उडवून लावली होती त्याची आठवण झाली. (लग्न न झालेल्या तरूण मुलीला एका लहान मुलाला पाहून भविष्यात आपणही कधीतरी आई होऊ असे वाटणे, तेव्हाच्या बोर्डाला समाजविघातक वाटले होते - कुमारिकेने आई होण्याचा विचार करणे म्हणजे पाप असे कारण दिले गेले होते.)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अभिज्ञ's picture

26 Nov 2008 - 12:35 am | अभिज्ञ

ना.सी.फडके हे कुटुंब नियोजन वगैरे चळवळींशी संबंधित होते.
"संतती नियमन" ह्याचा प्रसार करत असत.
परंतु वास्तविक पाहता त्यांचे व्यक्तिगत आयुष्य हे ह्याच्या अगदि उलट होते.
ना.सी.फ़डक्यांना ६ मुले होती.
त्यावर ते म्हणत की "संतती नियम" म्हणजे "नियमाने संतती."

;)

अभिज्ञ.

ना.सि.फ्डक्यांच्या लेखनाने समजा समाज बिघडला असे जरी क्षणभर गृहीत धरले तरी आत्ताच्या टी.व्ही.चॅनेल्सचे काय? फडक्यांमुळे समाज एक टक्का बिघडला असे गृहीत धरले तर चॅनेल्समुळे समाज हजार टक्क्यांनी बिघडला असे म्हणावे लागेल. फडक्यांनी अश्लील आणि अर्वाच्च्य भाषेत लिखाण केलेले नाही. प्रेम ही तारुण्यसुलभ आणि नैसर्गिक भावना आहे. ती व्यक्त करणे त्याकाळी शिष्टसंमत मानले जात नव्हते. तिचा आविष्कार त्यांनी त्या काळी केला म्हणून त्यांना बंडखोर लेखक म्हणता येईल. पण त्यांनी समाज बिघडवला असे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. आणि अशी फूटपट्टी लावली तर अनेक नामवंत मराठी लेखक समाज बिघडविण्यास कारणीभूत आहेत असे म्हणावे लागेल.

उदय पतकि's picture

23 Dec 2008 - 9:27 pm | उदय पतकि

असे काहि होत नाहि बिघद नारा बिघद तोच