कामामुळे ताण तणाव

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
26 Aug 2020 - 9:59 pm
गाभा: 

मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय.
" स्ट्रेस मॅनेजमेंट " स्ट्रेस ताण तणाव यामुळे बरेच काही घडते आणि बिघडते देखील.
"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो
काही जणांसठी कामाचा ताण प्रेरक असते. तर काहींसाठी तो मनस्वास्थ्य बिघडवणारा उत्पात घडवतो.
मनस्वास्थ्य बिघडते तब्येतीची वाट लागते. हाय ब्लड प्रेशर, पाठ दुखी, संताप , फ्रस्ट्रेशन डिप्रेशन , डायबिटीस , हार्मोनचे संतुलन बिघडणे , दारू सिगरेट सारखी व्यसने असे बरेच काही होते.
या साठी एक मिशन हातात घेतोय. स्ट्रेस कमी करण्याचे . खास करून माहिती तंत्र क्षेत्रातील मित्रांचे .आयुष्य सुखकर करण्याचे.
तुम्हाला. तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.
त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच.
शक्य असेल तसे फेसबुक लाईव्ह वरुन किंवा टेक्स्ट पोस्ट करूनही देईन.
विजयकुमार शाह
फ्रीडम लाईफ कोच फॉर वेलनेस.

प्रतिक्रिया

रातराणी's picture

26 Aug 2020 - 11:18 pm | रातराणी

अरे वा! मस्त! उपयुक्त माहिती मिळेल.

विजुभाऊ's picture

27 Aug 2020 - 1:07 am | विजुभाऊ

आपले प्रश्न विचारावेत
ते स्ट्रेस ची लक्षणे . आजार. अपाय उपाय आहार उपचार
आपले व्यवहार, बदलणाचे मूड्स , रागीट पणा . चिंता ( अँक्झायटी) टेन्शन , डिप्रेशन, वजन वाड/ कमी या आणि तत्सम प्रकारातले काहिही असू शकते.
( व्यनी देखील करू शकता )

संजय क्षीरसागर's picture

27 Aug 2020 - 1:17 am | संजय क्षीरसागर

कामाची मजा न येणं हे आहे. लोक्स काम आनंदाचं करण्याऐवजी स्ट्रेस कसा मॅनेज करता येईल ते बघतात, पण त्या मार्गानं विषेश काही साधत नाही.

तो वेस्टर्नसनी डिवेलप केलेला बिहेविअरल थेरपी अप्रोच आहे. काम म्ह्टलं की ताण येणारच या चुकीच्या गृहितावर तो आधारित आहे.

त्या अनुषंगानं मग डायबेटीस, बिपी, कार्डिअ‍ॅक इश्यूज, हार्मोनल इंबॅलन्स....हे सगळं लाईफ स्टाईलचा अनिवार्य भाग असं सांगितलं जातं. लोकही नित्यनेमानं औषध सुरु करतात आणि न चुकता घेतात ! याप्रमाणे मूळ प्रश्ण कायम राहतो.

अर्धवटराव's picture

27 Aug 2020 - 3:37 am | अर्धवटराव

.

विजुभाऊ's picture

27 Aug 2020 - 11:05 am | विजुभाऊ

संक्षि. तुमची समस्या सांगा.
खूपदा आपल्या मनाविरुद्ध कामे करावी लागतात.
अगदी न आवडणार्‍या कामातही मजा येवू शकते. तेच तर शिकायचे असते.
मूळ प्रश्नाला थेट भिडायचं आहे .

संजय क्षीरसागर's picture

27 Aug 2020 - 12:27 pm | संजय क्षीरसागर

अहो, मी उत्तर दिलंय !

तुम्ही स्ट्रेस कसा मॅनेज करायचा याचा अभ्यास केलायं, मी जीवनात काम रंगवलंय ! काम हा माझा छंद आहे. तो माझा बेस्ट टाईमपास आहे. मला कामातून उर्जा मिळते, आयुष्य दिवसेंदिवस वृक्षासारखं बहरत जातं. वर्क इज अ‍ॅन अपॉर्च्युनिटी टू ग्रो, एंजॉय द लाईफ मोर. जितका चायलेंज तितकी बुद्धी शार्प होत जाते. मी वाट्टेल त्या गोष्टी सिंप्लीफाय करु शकतो.

इथेच बघा, संपूर्ण विषय एकदम सोपा केला आहे !

आपल्या विचारसरणीत एकदम काँट्रास्ट आहे.

कपिलमुनी's picture

27 Aug 2020 - 9:27 pm | कपिलमुनी

सर्वज्ञानी संक्षीना समस्या असेल विजुभाऊंना वाटलेच कसे ?

आनन्दा's picture

27 Aug 2020 - 11:07 am | आनन्दा

बराच विचार करतोय.. थोडे discrete thoughts आहेत
सामान्यपणे आपण काम करतो पैशासाठी.. पैसे कशाला तर आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा कमी कष्टात राहावी म्हणून..

उदा.. माझ्या लहानपणी अपयश हे यशाची पहिली पायरी वगैरे केवळ पुस्तकात होते.. वास्तवात अपयश म्हणजे आयुष्यातून उठणेच होते. वयाच्या 22-23 व्या वर्षी तुम्ही व्यवस्थित कमावते असणे हे अत्यावश्यक होते.

पुढच्या पिढ्याना कदाचित इतका स्ट्रेस घ्यावा लागणार नाही. त्यांना जास्त लेव्हरेज आहे. पण मागची पिढी आपल्यासाठी कष्ट घेत होती याची कल्पना त्यांना असेल की माहीत नाही.

पण आता असा प्रश्न पडतो, की केवळ मला जे स्ट्रगल करावे लागले ते पुढच्या पिढीला करावे लागू नये हा विचार योग्य आहे का? मी अनेकांशी मराठी माध्यमातून शिकण्यावरून वाद घातला, त्यात महत्वाचा मुद्दा हाच होता मी माझ्या पुढच्या पिढीला हे भाषेचे स्ट्रगल करावे लागू नये.. पण मग मी त्यांना विचारतो की स्ट्रगल नाही तर तुम्ही त्यांना वारशामध्ये देणार काय?

मला खरे तर वाटते की *अपयशाला घाबरू नकोस* आणि *कष्टाला कचरू नकोस* या दोनच गोष्टी खरे तर खरा वारसा आहेत, जो आम्हाला मागच्या पिढीकडून मिळाला आहे.. आम्ही तो कितपत पुढे देतोय हे कळत नाहीये..

याच वारशात मिळाली दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचे आणि चाकोरीचे महत्व, जे आज सगळ्या तणावाचे करण बनले आहे.. पैसे ठीक आहे, पण चाकोरीबद्ध मार्गावर चालणे आणि peer pressure कसे manage करावे याचे धडे आज आमच्या पिढीला घेणे आवश्यक आहे..

नोकरीत 10 वर्षे झाली की तुम्ही मॅनेजर बनलेच पाहिजे, नाही बंनालात तर तुमच्यात काहीतरी कमी आहे.. हे pressure भारतात जास्त आहे, परदेशात तुलनेने कमी.. नोकरीच्या पहिली 10 वर्षात तुमचे घर असलेच पाहिजे.. लग्न करायचे असेल तर मालकीचे घर पाहिजेच, ही प्रेससुरे कशी सांभाळायची?

मला वाटतं हे सगळं स्थिर व्हायला 1/2 पिढ्या लागतील.. ??????

तो वेस्टर्नसनी डिवेलप केलेला बिहेविअरल थेरपी अप्रोच आहे

पाश्चिमात्य जीवन पद्धतीत , "काम आनंदाचं करण्याऐवजी स्ट्रेस कसा मॅनेज करता येईल ते बघतात," हे कसे?
जरा सविस्तर उदाहरणाने सांगाल का?
'स्ट्रेस कसा मॅनेज करता येईल' म्हणजे जे कामाची पद्धत कशी भरवशाची होईल यावर आधी वेळ घालवला जातो मग उलट "दडपण" कमीच होते , डोळे झाकून पद्धत अवलंबली तर "दडपण" वाढणार कि कमी होणार?
आपला तर्क काही कळला नाही या बाबतीतला
एकूणच कामाचा दर्जा चांगलं असतो त्यामुळे दडपण वाढत असं तर तुम्हाला म्हण्याचा नाही ना?

दुसरं असं कि येथे काम आणि खाजगी जीवन याचा ताल मेल घालण्याचाच प्रयत्न करतात ( ते जमवायला येथील परिस्थिती अनुकूल आहे हे जरा बाजूला ठेउया )

प्रणय आणि रेप या दोन्हीत क्रिया एकच आहे, पण एकात बेसुमार ताणे आणि दुसर्‍यात कमालीची मजा ! याचं एकमेव कारण काये ? रेझिसटन्स !

हीच कथा कोणत्याही कामाची आहे. वेस्टर्नर्सना (काय इतरांनाही) हा मुद्दाच लक्षात आलेला नाही.

पाश्चात्यांनी काम स्टँडर्डाइज करण्यावर भर दिलाय आणि आपण काम टाळण्यावर. आपल्याकडे अध्यात्मिक अँगलनी तर कामाची पुरती वाट लावून टाकली आहे त्यामुळे निवृत्तीशिवाय या चक्रातून सुटका नाही या भावनेतून सगळे काम रेटतांना दिसतात ( रेझिसटन्स!) .

काम आनंदाचं झालं की जीवन बहारदार झालंच म्हणून समजा कारण आयुष्याचा सगळा प्राईम टाईम म्हणजे कामात घालवलेला वेळंच आहे.

पाश्चात्यांनी काम स्टँडर्डाइज करण्यावर भर दिलाय
हो बरोबर ( मास प्रोडूकशन , उद्धरण माल बनवूंन वाहतूक करताना खोक्यांचाच आकार> पॅलेट्स? कंटेनर > तिथून त्या साजेशी जहाजे " किंवा आयकिया चे फ्लॅट पाक डिझाईन )
पण मग या मुले स्ट्रेस कमीच नाही का होत?

1) माझं स्ट्रेस येण्याचं एक कारण आहे concentration न होने.
बरीचशी कामे पाईप लाईन मध्ये असतात मात्र एक काम करत असताना पुढच्या कामाचा विचार डोक्यात घोळत असतो. त्यामुळे हातात असेलेले काम व्यवस्थित आणि वेळेवर पूर्ण होत नाही.

2) आजच काम उद्यावर ढकलण्याची सवय.
बरीचशी कामे आज नको उद्या बघू.. नंतर बघू असं करण्याची सवय लागलीये त्यामुळे मग ते काम अगदी शेवटच्या क्षणी झाल्यामुळे बऱ्याचदा चुका होतात आणि मग चिडचिड होते.

उदा. द्यायचे झाले तर समजा आत्ता मी एक काम करत आहे.. तर माझ्या डोक्यात खालील भुंगे फिरत असतात.

"अरे हे काम पटकन करायला हवं.. अजुन खूप बरीच कामे शिल्लक आहेत.. त्या xxx कामाचं काय करायचं.. ती xyz टास्क अजुन बाकी आहे. अर्रर्रर्र.. मी इतका वेळ ईमेल चेक केलेच नाहीत. एकदा ते बघितले पाहिजेत. हे काम नंतर करायचं का..?? तसेही हे एवढे इम्पॉर्टन्ट नाहीये. यांच्याऐवजी ते xyz वाले बघू..
जाऊदे यार.. बकवास आहे. कंटाळा आलाय.. आता उद्याच बघू.. "

याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याकडे कामाचं कौशल्य नसणं !

एक काम करतांना अडचण आल्यावर ती डील करता येत नाही म्हणून दुसर्‍या कामाचा विचार येतो, अन्यथा तसा विचार येणंच शक्य नाही.

आणि यामुळे कोणतंही काम धड जमत नाही म्हणून कामं पुढे ढकलण्याचा विचार येतो, असं ते चक्र आहे.

तुमच्या मुख्य कामत वाकबगार व्हा, एका झटक्यात सगळे प्रष्ण सुटतील.

आज शुक्रवारे, फक्त तीन दिवस प्रॅक्टीस करा. सोमवारी मला इथे सांगा !

बाप्पू's picture

28 Aug 2020 - 8:32 am | बाप्पू

@ संक्षी.

असं नाहीये कि कामाचं कौशल्य नाहीये. हीच कामे मी गेली 8-9 वर्ष झाले करतोय. एके काळी याचं कामाची नशा होईपर्यंत काम करायचो. अगदी 20-20 तास सुद्धा कामे केलीयेत.

एक काम करतांना अडचण आल्यावर ती डील करता येत नाही म्हणून दुसर्‍या कामाचा विचार येतो

हो. पहिल्यांदा काम करताना अडचणी आल्या तरी मस्त मजेने त्या सोडवायचो.
पण आता एक जरी अडचण आली तरी ते संपूर्ण काम च अर्धवट सोडून द्यावे वाटते. जास्त डोकं चालवायची इच्छा होत नाही.
त्यापेक्षा आधी दुसरे एखादे काम करावे असं वाटत. मग ते पाहिले काम अर्धवट राहते.

सॅच्युरेशन कि काय म्हणतात ते आलेय का माझ्यामध्ये. नवीन गोष्टी किंवा अडचणी यांचा सामना करण्याची ताकद कमी झालेय.
असं काहीस..

सॅच्युरेशन कदापिही नाही

१.

आता एक जरी अडचण आली तरी ते संपूर्ण काम च अर्धवट सोडून द्यावे वाटते. जास्त डोकं चालवायची इच्छा होत नाही. त्यापेक्षा आधी दुसरे एखादे काम करावे असं वाटत. मग ते पाहिले काम अर्धवट राहते.

हेच तर मी सांगितलंय !

२.

सॅच्युरेशन कि काय म्हणतात ते आलेय का माझ्यामध्ये. नवीन गोष्टी किंवा अडचणी यांचा सामना करण्याची ताकद कमी झालेय. असं काहीस.

कामात वाकबगार असणार्‍याची ग्रोथ होते, सॅच्युरेशन नाही. याचा अर्थ तुम्ही मुख्य कामाचं सहजतेनं करु शकत नव्हता, त्यात पुरेसं कौशल्य नव्हतं. हेच तुम्ही लेखकाला खाली दिलेल्या प्रतिसादात म्हटलंय, वाचा : मला माझ्या कामाला इंटरेस्टिंग बनवावे लागेल.

४.

काम नेहमीच कठीण असते असं नाही. पण मानत भीती असते कि जमेल कि नाही.. मग तेव्हा 1-2 फुटकळ प्रयत्न करून ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती वाढलीय. ( हा माझा स्वभाव रेसेन्टली डेव्हलोप झालाय. याआधी मी असा नव्हतो. )

आधीही तुम्ही निष्णात नव्हतात. भयंकर कष्ट करुन ते काम रेटत होता (बघा : हीच कामे मी गेली 8-9 वर्ष झाले करतोय. एके काळी याचं कामाची नशा होईपर्यंत काम करायचो. अगदी 20-20 तास सुद्धा कामे केलीयेत ).

सुरुवातीपासून माझा व्यावसाय एकच आहे तरी नशा रोज नवी आहे. काम मला कायम उर्जा आणि आनंद देतं. सगळे मित्र थकलेत पण दिवसेंदिवस माझं कौशल्य आणखी वृद्धींगत होतंय.

बाप्पू's picture

28 Aug 2020 - 12:14 pm | बाप्पू

Hmm.
तुमच्या प्रतिसादावरून स्वतः ला परत एकदा तपासून पाहावे लागेल असं वाटतंय.

तुम्ही म्हणल्याप्रमाणे काही पुढचे काही दिवस प्रयत्न करून पाहतो आणि सांगतो.

संजय क्षीरसागर's picture

3 Sep 2020 - 12:15 am | संजय क्षीरसागर

काय प्रगती आहे ?

विजुभाऊ's picture

28 Aug 2020 - 12:24 pm | विजुभाऊ

हे इतकेही सरळ सरधोपट नाहिय्ये.
बरेचदा आपण ज्या कामात वाकबगार आहोत त्या कामातही मन लागत नाही असे होते.
खास करून खेळाडूंच्या आणि कलाकारांच्या बाबतीत ही समस्या येते. लेखक या गोष्टीला रायटर्स ब्लॉक असे म्हणतात.
खेळाडू त्या प्रकाराला फॉर्म जाणे असे म्हणतात तर कलाकार त्याला काही वेळा मूड नसणे असे म्हणतात.
जर काम करणार्‍याला दामटून काम करायला लावले तर त्यातून शारीरीक व्याधी उद्भवतात.
या बहुतेक करून सायकोसॉमॅटीक प्रकारच्या व्याधी असतात.
स्त्रीयांच्या बाबतीत हे प्रकरण काही वेळा कंडीशनल हिस्टेरीया पर्यंत ही जाऊ शकते

बाप्पू's picture

28 Aug 2020 - 1:14 pm | बाप्पू

संक्षी, विजुभाऊ, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माफ करा पण मी संक्षी च्या म्हणण्याशी सहमत नाहीये. मी जेवण खूप चांगले बनवतो म्हणून मला जेवण बनवण्याच्या कामाची आवड आहे असं म्हणू शकत नाही.
प्रत्येक क्रिकेट रसिक खूप आवडीने क्रिकेट खेळतो, पाहतो पण प्रत्येक जण सचिनच बनतो असं नाही.. म्हणजेच एखादे काम तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही त्यात वाकबगार आहात असे नाही आणि vice versa एखाद्या कामात तुम्ही वाकबगार आहात म्हणून तुम्हाला ते काम आवडतेच असं नाही.

मी थोडा वेळ आत्मचिंतन केले.
समजत नाहीये नेमके चुकतेय कुठे?

कारण जर मी माझ्या कामात कौशल्यपूर्ण आणि वाकबगार नसतो तर आजवर इतके अवॉर्ड्स, भरोघोस बोनस आणि क्लायंट कडून ढीगभर ऍप्रिसिएशन्स आले नसते. माझी तुलना इतरांशी केल्यास मी नक्कीच सगळी काम चांगल्या पद्धतीने आणि सर्वांच्या आधी करायचो. हे सगळं करिअर च्या सुरवातीच्या 6-7 वर्ष्यात चलले. पण नंतर परिस्थिती बदलत गेलीये.

मला अजूनही माझ्या 2 वर्ष्यापुर्वीच्या मॅनेजर चे कंपनीतल्या माझ्या शेवटच्या दिवशी बोललेले वाक्य आठवतंय जिथे मी 4-5 महिन्यातच काम सोडून दिले कारण होते - रोज होणारे फ्रस्ट्रेशन .
शेवटच्या दिवशी माझा मॅनेजर बोलला - *** तुम अच्छा काम कर रहे थे. लेकिन मुझे ऐसा लागता है कि तुम्हारे खुद से बोहोत ज्यादा एक्सपेक्टशन्स है और वो तुम्हे आगे प्रॉब्लेम मे लेके जायेंगे.
अच्छा होगा तुम थोडा खुद का दुसरो से कंपॅरिजन करना कम करो. और रिऍलिस्टिक सोचो.

आणि हे वाक्य मला खरे होताना वाटतेय.
हे सगळं सांगायचे कारण एवढेच कि आपण काम करताना स्वतः कडून काय एक्सपेक्टशन्स ठेवाव्यात? Goals सेट करताना किती दूरचे गोल्स सेट करावेत. नेमका किती वेळ द्यावा त्यांच्यावर काम करायला.? काम करताना डिसीप्लिन कसा पाळावा. ?
आणि सगळ्यात महत्वाचे -
एखाद्या ठिकाणी नवीन रूजू झाल्यावर पाहिले काही महिने आपण पाहतो कि आपल्यला काहीच येत नाही आणि इतर लोकं खूप पटपट काम करतायेत. हा न्यूनगंड आणि त्यातून स्वतः चे रोज डेमोटिवेट होणारे मन यांना कसे सांभाळायचे. ?
नवीन ठिकाणी नेमक्या काय गोष्टी करायच्या ज्यामुळे आपला turnover time कमी असेल. ?
करिअर च्या सुरवातीला मी एवढा सगळा विचार करायचो नाही.. फ्लो सोबत जायचो आणि मग आपसूकच तिथे कामात पारंगत व्हायचो.
पण गेल्या 3 वर्ष्यात चित्र बदललेय. काम आणि जबाबदाऱ्या वाढत जातायेत ( सोबत पैसा ही वाढतोय ) कदाचित हेच दडपण आहे का?

मी वर सांगितल्याप्रमाणे जिथे मी 4-5 महिन्यात कंपनी सोडली तिथे शेवटी शेवटी काम करण्यापेक्षा जास्त लक्ष माझे याकडे असायचे कि माझं काही चुकत तर नाही ना.. !!
आणि हा xyz माणूस इतकं फटाफट करतोय तेच काम मला का जमत नाहीये..!
मग आपसूकच चुका व्हायच्या. काही लोकं मुद्दामहून मजा करायचे.

मला वाटत सारे फासाद कि जड यही है. !!
करिअर मध्ये एखाद्या वळणावर कोणा मिपाकरांना अश्या समस्या आल्यात का??

उत्तरांच्या प्रतीक्षेत. -

संजय क्षीरसागर's picture

28 Aug 2020 - 6:32 pm | संजय क्षीरसागर

१. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट :

या जगातलं प्रत्येक काम निर्वैयक्तिक आहे. आपण रंग आहोत जो कामात उतरतो. मग तो आगासी असो, कुणी लेखक असो की गृहिणी की कामवाली बाई, कशानंही काहीएक फरक पडत नाही. तुम्हाला पटायला हे जडे पण ती वस्तुस्थिती आहे.

आगासी निवृत्त होतो, लेखकाला ब्लॉक येतो, गृहिणी कंटाळते हा दोष कामाचा नाही, कर्त्याचा आहे. म्हणजे कामाचा कंटाळा येणं स्वाभाविक आहे पण याचा अर्थ ते काम निरर्थक झालं असा होत नाही. तुम्ही काही काळ दुसरं काही तरी करा आणि वाट पहा; तुम्हाला पुन्हा मूड येईल.

जर मूड येतच नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्या कामात नव्या पॉसिबिलीटीज एक्स्प्लोअर केलेल्या नाहीत. माझ्या दृष्टीनं कार्यकौशल्य म्हणजे कामाचा वेग नाही (तो यथावकाश प्राप्त होतोच); तर ते करण्याच्या नव्या शक्यतेचा शोध घेत राहण्याची मानसिकता. मी कित्येक वर्ष एकच काम करतोयं, पण मला कधीही तेच काम रोज करतोयं असं वाटत नाही. त्यामुळे आगासीला पुन्हा मूड नक्कीच आला असता आणि तुम्हाला ही येईल, घाई करु नका, थोडं थांबा.

२.

जिथे मी 4-5 महिन्यात कंपनी सोडली तिथे शेवटी शेवटी काम करण्यापेक्षा जास्त लक्ष माझे याकडे असायचे कि माझं काही चुकत तर नाही ना.. !!आणि हा xyz माणूस इतकं फटाफट करतोय तेच काम मला का जमत नाहीये..!मग आपसूकच चुका व्हायच्या. काही लोकं मुद्दामहून मजा करायचे.

तुम्ही कामात पारंगत असाल तर दुसर्‍याकडून नवं शिकायला कायम उत्सुक असता आणि आपलं कौशल्य दुसर्‍याशी बिनदिक्कत शेअर करता. तुम्ही पुन्हा तुमची कार्यप्रणाली (द वे यू वर्क) तपासा मग मी काय म्हणतोयं ते लक्षात येईल.

कानडाऊ योगेशु's picture

28 Aug 2020 - 12:22 pm | कानडाऊ योगेशु

बाप्पू, ही समस्या थोडी अधिक आपणा सर्वांचीच असावी.
मला वाटत असलेले एक कारण म्हणजे आपला कामामधला इंटरेस्ट संपला आहे पण इतर जबाबदार्या असल्याने ते सोडु शकत नसल्याने नाईलाजाने करावे लागते आहे.
खेळात असलेल्यांना तर निवृत्ती घेता येते पण तिथेही वय उलटुन गेले अथवा कर्तुत्वाचा काळ उतरणीला लागला तरीही पूर्वपुण्याई मुळे पाट्या टाकणारी काही उदाहरणे दिसतात.
आंद्रे आगासी किंवा अश्याच एका टेनिसपटुने निवृत्ती घेताना त्यामागचे कारण असे सांगितले होते कि आज जेव्हा रॅकेट हातात घेतली तेव्हा पूर्वीसारखा उत्साह जाणवला नाही आणि कोर्टवर उतरण्याबद्दल काहीच थ्रिल वाटले नाही म्हणुन निवृत्त होण्याचा विचार केला. आपल्याबाबतीत वेगवेगळ्या जबाबदार्यांमुळे आपल्याला एक दिवस अशी अचानक निवृत्ती घेता येत नाही त्यामुळे आपण नाईलाजाने पाट्या टाकत बसतो.
@विजुभौ व इतर, ह्यावर काही उपाय सुचवला तर बर्याच जणांना फायदा होईल.

विजुभाऊ's picture

28 Aug 2020 - 12:25 pm | विजुभाऊ

क्या बात है योगेश.
मी ही हेच लिहीत होतो

बप्पौ मला समजल्या त्यानुसार तुमच्या समस्या खालील प्रमाणे आहेत.
१) कामात कोंसेन्ट्रेशन न होणे
२) काम पुढे ढकलावेसे वाटणे.

ही दोन्ही लक्षणे आहेत स्ट्रेस असल्याची. अर्थात यावर नक्कीच मार्ग आहेत.

बाप्पू's picture

27 Aug 2020 - 11:18 am | बाप्पू

काय मार्ग आहेत??

अर्थात, स्ट्राईकींग एंडला विजूभाऊ आहेत, ते पहिल्यांदा बॅट फिरवतील.

विजुभाऊ नवीन उपक्रमास हार्दीक शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2020 - 12:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ, नव्या उपक्रमास शुभेच्छा......!

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

27 Aug 2020 - 3:06 pm | चौकस२१२

विजुभौ मला आजकाल " छोट्या लोकशाही" चे दडपण येत... आता हे काय काढलं म्हणाल तर ते असं
- मी गेली काही वर्षे २-३ गृहसंकुलाच्या कमिटी वर काम केले... त्यात लोकांबरोबर काम करण्याचा दडपण यायला लागलं... नको वाटू लागल ... पण करणार काय पैसे आपले गुंतवलेले असल्यामुळे दुर्लक्ष हि करता येत नाही...
कारण / परिस्थिती अशी ( हे भारताबाहेरच्या आहे त्यामुळे काही गोष्टी वेगळ्या असतील पण मनुष्य स्वभाव हा साधारण सगळी कडे सारखा असावा बहुतेक )
- मला प्रोजेक्ट मॅनेज करणे , खास करून इंजिनीरिंग पद्धतीचं असेल तर आवडत आणि त्यातील अनुभव हि आहे तिन्ही ठिकाणी काही ना काही तरी सिविल आणि मेकॅनिकल पद्धतीचे काम कमिटी ला अखत्यारीत करून घेणे जरुरीचे होते . आणि म्हणून मला जास्त रस होता ..आणि ते करिताना कमिटी आणि इतर मालक यांना लोकशाही पद्धतीने वागवावे लागते आणि ते मी अगदी प्रामाणिक पणे करतो...कोणताही वयक्तिक स्वार्थ ना ठेवता , येथील नियम हि कडक आहेत आणि स्पष्ट आहेत पण कधी कधी गुंतागुंतीचे पण असतात थोडे
- कमिटी हि म्हणजे काही नोकरी नसते त्यामुळे प्रत्येक जण राजा असल्यासारखं वागतो..
- कित्येकांना कार्यपद्धती माहिती नसते / अर्थकारण माहिती नसते
- तांत्रिक बाबी माहित नसताना वाटेल ते सुचवतात ( अलुमिनिम कि स्टेनलेस स्टील याचे जिन्याला आवरण लावावे यात फायदे तोटे समजावून ना घेता काय वाटेल ती तुलना करतात )
- सभेमध्ये मुद्दे सोडून भलतेच बोलण्यात वेळ जातो
- किंवा याउलट म्हणजे एखाद्या मुद्य्यांच्या मागे सविस्तर माहिती असेल तर ती खोलात जाऊन चर्चा ना करताच मत नोंदवली जातात
- दूरवरचा विचार करीत नाहीत ( दरवेळी सर्वात स्वस्त तो पर्याय निवडणे हे नेहमीच उचित असते असे नाही )
- माझी अरे ला कारे विचारण्याची पद्धत ( यामुळे जरी काही लोकांना मी आवडत असलो , माझी कार्यपद्धती आवडत असली तरी कहि लोकांनी कायमचा पूर्वग्रह करून घेतला आणि मग फक्त विरोधाला विरोध )
- काही कमिट्या फक्त एका माणसामुळे चालत असतात कारण अनके वर्षे त्यात बाकी मालकांनी लक्ष घातलेले नसते अचानक माझ्यासारखा प्रश्न विचारणारा गेला कि इतर "भक्त लोकांना ते नकोसे वाटते !
हे सगळं बघून या "छोटी लोकशाही कमिटी" चा कंटाळा आला आणि दडपण हि . छोटी म्हण्यायचा अर्थ असं कि मी विचार केला कि जर आपलं पैसे गुंतलं असेल तर आपल्याला विचार करावं लागतो ..मग हे थांबणार कुठे? मग नगरपालिकेच्या ( स्थानिक कौंसिल) कमिटी ( मोठी लोकशाही ) वर पण जावे काय? .वैगरे

शेवटी ३ हि कमिटीवर एकाच वर्षात असल्यामुळे फार दडपण येऊन लागलं आणि कुठेतरी थांबावे म्हणून
- हळू हळू राजीनामे दिले
- एक नियम ठेवला, जिथे राहत आहोत तेथील कमिटी वर जायचे इतर ठिकाणी दुर्लक्ष करायचे फक्त एक गुंतवणुकीचा हिशेब म्हणून बघायचे
- असं विचार केला कि आपणच का एवढी तळमळ कार्याची.. इतर मालक लोकांचा सुधाच पैसा गुंतलेले आहे ना मग आपण जरी नाही गेलो कमिटी वर तरी काय बिघडणार आहे बाकीचे बघून घेतील
यानंतर दडपण कमी झाले पण अधून मधून अस्वस्थ होतोच

-

चौकस२१२'s picture

27 Aug 2020 - 3:45 pm | चौकस२१२

एक शंका विजुभौ
'"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो"
याला कारण कदाचित हे असेल का ? कि भारतातील बहुतेक इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात चालणारे काम हे सर्व्हिस म्हणून क्लायंट साठी केले जाते , मूळ क्लायंट कडे जे नोकर असेल ,इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करतात त्यांना एवढा स्ट्रेस असतो का?

उत्पादन क्षेत्रातील उधाहरण द्यायचे तर एखादा माणूस डिझाईन कन्सल्टन्ट कडे काम करीत असेल आणि त्याचा ग्राहक समजा फोर्ड किंवा टाटा मोटार असेल आणि दुसरा माणूस जर फोर्ड किंवा टाटा मोटार चा नोकर असेल तर दोघांच्या '"स्ट्रेस" मध्ये फरक असेल , दोन्हीही लोक डिझायनम्हणूनच काम करीत आहेत . पण

शाम भागवत's picture

27 Aug 2020 - 4:37 pm | शाम भागवत

करारावर काम करणार्‍यांवर नेहमीच कामाचा ताण असतो. त्यामानाने मू़ळ कर्मचारी आरामात जगत असतो व तेही जास्त पगार व जास्त सोयीसुविधांसहित. हे सगळीकडे लागू आहे असे मला वाटते. फक्त आयटीमधे असते असे वाटत नाही.

शाम भागवत's picture

27 Aug 2020 - 4:39 pm | शाम भागवत

"आणि जास्त सुरक्षीतता" हे लिहावयाचे राहिले

विजुभाऊ's picture

27 Aug 2020 - 10:17 pm | विजुभाऊ

आय टी मधे काम करणारांचे स्ट्रेस हे एक वेगळेच जग आहे.
कमी कालावधीत नवीन तंत्र शिकून डेडलाईन्स वर प्रोजेक्ट पूर्ण करणे हे कायमच बोकांडी बसलेले असते.
त्यामुळे त्यांचे वैयक्तीक आयुष्य अक्षरशः हळू हळू मर्यादीत होत जाते.
इतर आयुष्याची कसलीच मजा घेता येत नाही.
या बद्दल सविस्तर लिहायचेय

विजुभाऊ's picture

28 Aug 2020 - 12:28 pm | विजुभाऊ

'"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो"
यावर सविस्तर उत्तर देतो.
पण त्यापूर्वी टाटा मोटर्स मधे काम करणारा कामगार आणि आयटी मधे काम करणारा यांच्या त एक महत्वाचा फरक असतो तो म्हणजे. शिफ्ट सम्पली की टाटा मोटर्स मधील कामगार मशीन बंद करतो. आणि घरी जातो. तो घरी मशीन सोबत नेत नाही. आयटी क्षेत्रातल्या माणसाला हे करणे अवघड जाते

चौकटराजा's picture

27 Aug 2020 - 5:53 pm | चौकटराजा

१) शक्यतो दुसऱ्यावर अवलंबून न राहणे . उदा क्रिकेट मध्ये रन्स ना काढता चौकारच मारणे ज्यात फिल्डर पोचण्याआगोदर चेंडू सीमापार झालेला असेल.
२) हे माझे स्वतः: चे वाक्य आहे . अमुक तत्ववेत्ता असे म्हणतो स्टाईलचे नाही - ते असे " देअर इज सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम इफ यू हव गटस तू किक ॲस ऑफ प्रॉब्लेम मेकर !" अशावेळी एकतर त्याला हाकला आयुष्यातून वा तुम्ही दूर व्हा -- मी असे बजाज आटोला माझ्या आयुष्यातून हाकलले मी फक्त ५० वर्षाचा असताना. व सुखी झालो .
३)आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवे याची निश्चित कल्पना तारुण्यातच तयार करून ठेवणे.
४) प्रत्येक माणसाचे मन ,क्षमता या वेगळ्या असतात सबब दुसर्यांची दु:खे हलकी करा पण अन्गावर घेऊन नका, व्यर्थ आहे असे करणे . उदा तुमचा मुलगा अभ्यास करीत नाही त्याचा ताण घेउ नका ,लेट हिम फेस द म्युझिक इन फ्युचर !
५) आपले मित्र नातेवाईक यान्च्या जास्त जवळ जाउ नका मग अपेक्षा निर्माण होतात स्वतः चे छन्द ही त्यासाठी मस्त सोय आहे. गुण आपलेच दोष ही आपलेच !
६) नवनवीन काहीतरी शिकायची खटपट ही पैसे मिळवून देणार नाही कदाचित पण अधिक कौशल्ये विकसित केली ,ज्ञान मिळविले तर अनेक वेळा आपले पैसे वाचू शकतात .त्यातून ताण नक्की कमी होतो.

कोहंसोहं१०'s picture

27 Aug 2020 - 7:29 pm | कोहंसोहं१०

"त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच.">>>>>>>>

चांगला उपक्रम. काही आयडींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचायला आवडेल.
ताणाबाबत संक्षींच्या मतांशी सहमत पण बहुतांश लोक करिअर निवडत नाहीत तर करिअर त्यांना निवडते असे वाटते. त्याचे मूळ कारण म्हणजे सोसायटी प्रेशर. लोक काय म्हणतील आणि आवडीच्या कामातून पैसा कमी मिळाला तर काय या मूळ ताणावरच इतर ताणांची दुनिया उभी राहिली आहे. जेंव्हा या दोन गोष्टींचा विचार करणे बंद होईल तेंव्हा अर्धा अधिक ताण असाच निघून जाईल.

बाप्पू मला समजल्या त्यानुसार तुमच्या समस्या खालील प्रमाणे आहेत.
१) कामात कोंसेन्ट्रेशन न होणे
२) काम पुढे ढकलावेसे वाटणे.

ही दोन्ही लक्षणे आहेत स्ट्रेस असल्याची. अर्थात यावर नक्कीच मार्ग आहेत.
१) कामात काँसेंट्रेशन न होणे.
कोणतेही काम जर आपल्याला त्या कामाचे महत्व वाटत आणि ते रंजक असेल तर ते प्रमुख च ठरते.
एखाद्या कामाची प्राथमिकता ठरवणे हे मेंदू ते काम आपल्याला किती रंजक आहे किंवा आपल्यातील इतर भावना ( उदा जबाबदारी / दु:ख / राग / आनंद / भिती यांचे प्रमाण कसे आहे त्यावर ठरवते.
उदा : परीक्षेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मैत्रीणीला भेटायला जाणारा जाणार्या एखाद्याने अभ्यास जर नीट केला असेल तर अशा वेळेस मनात भिती कमी असते आणि रंजकता ( एक्साईटमेम्ट ) अधीक वाटत असेल तर तो माणूस मैत्रीणीला भेटल्यावर त्याच्या मनात थरावीक काळासाठी परिक्षेचे विचार कमी असतील. त्याला इतर काही कामे आहेत हे ही आठवणार नाही. पण एकाच वेळॅस जर मेंदूत एक्साईटमेंट आणि भिती हे दोन्ही विचार सारख्याच प्रमाणात आले तर तो माणूस मैत्रीणीला भेटायला जाईल त्यावेळेस परिक्षेचा विचार करत राहील. आणि परिक्षेचा अभ्यास करताना मैत्रीणीला भेटायचा विचार करत राहील.
त्याचे कुठेच काँसनट्रेशन होणार नाही. आणि मनावरचा ताण वाढत राहील.

२) काम पुढे ढकलावेसे वाटणे .

एखादे काम पुढे ढकलावेसे वाटणे याला बरीच कारणे असू शकतात.
अ) त्या कामाचे श्रेय मिळणार नसते
ब) ते काम इतर कोणीतरी आपल्ल्यावर लादलेले आहे
क) ते काम आत्ता लगेच केले पाहिजे अशी गरज नसेल
द) त्या कामासाठी आपल्याकडे आवश्यक रीसोर्सेस ( पैसे / मनुष्य बळ/ ज्ञान ) नसेल तर
ई) त्या कामासाठी आपल्याला हवे तशी परफेक्ट ( सुयोग्य) परिस्थितीअजून आली नाही ( वेळ / पैसे / घटना वगैरे) असे वाटते
फ) त्या कामासाठी आपणा ते काम करू शकू हा विश्वासच मनात नसणे.( काम खूप कठीन असणे)
ग) ते काम खूपच सोप्पे आहे. कधीही करता येईल असे वाटावे इतके सोप्पे
ह) त्या कामाची काहीच उपयुक्तता नसणे

काम पुढे ढकलल्याने ते टळत नाही. मात्र रेंगाळलेले काम आपल्या इतर कामात अडचणीचेच ठरते. आणि इतर कामांच्या गडबडीत रेंगाळलेल्या कामामुळे अडचण आली की आपली चिडचिड होते. आपण स्वतःचाच रागराग करू लागतो.
काम आपण नक्की कशामुळे टाळतो आहोत हे समजले तर त्याचे काय करायचे हे ठरवता येते.

बाप्पू's picture

28 Aug 2020 - 8:39 am | बाप्पू

धन्यवाद विजुभाऊ.
पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात दिलेले उदाहरणं रेलट झाले.
मला माझ्या कामाला इंटरेस्टिंग बनवावे लागेल.

दुसऱ्या उत्तरात माझ्या अभ्यासानुसार खालील कारणे आहेत. -

फ) त्या कामासाठी आपणा ते काम करू शकू हा विश्वासच मनात नसणे.( काम खूप कठीन असणे)
- काम नेहमीच कठीण असते असं नाही. पण मानत भीती असते कि जमेल कि नाही.. मग तेव्हा 1-2 फुटकळ प्रयत्न करून ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती वाढलीय. ( हा माझा स्वभाव रेसेन्टली डेव्हलोप झालाय. याआधी मी असा नव्हतो. )

ग) ते काम खूपच सोप्पे आहे. कधीही करता येईल असे वाटावे इतके सोप्पे

हो असेही होते खूप वेळेला. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ताणल्याने, काम लवकर संपवण्याचा प्रेशर येतो. आणि ऐन वेळेला अचानक एखादी unknown अडचण आली कि मग चीड चीड होते..

कानडाऊ योगेशु's picture

28 Aug 2020 - 1:07 am | कानडाऊ योगेशु

"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो"

एक कारण म्हणजे आय.टी मधली कामे डेडलाईन नुसार केली जातात आणि टाईम मार्जिन बरेच छोटे असते. दुसरे कारण हे असावे कि इथे मेंदु ह्या अवयवाचे काम प्रामुख्याने जास्त आहे त्यामुळे येणारा ताण हा अंतर्गत अवयवांवर ही येत असावा (जसे कि ह्रदय्,जठर इ.).

एकूण मिपाकरांनी स्ट्रेसवर मात केली आहे.

सनईचौघडा's picture

28 Aug 2020 - 12:29 pm | सनईचौघडा

या प्रकरणात महोदय संक्षी साहेबांनी जे काही म्ह्टलेले सर्व पटले आहे.

ज्या दिवशी कामातली रंजकता निघुन जाईल आणि कामे रेटण्याचे प्रकार चालु होईल त्या दिवशी आपण स्वतः च्या निवृतीचा विचार चालु करावा माणसाने.

बरोबर ना संक्षी साहेब ?.

संजय क्षीरसागर's picture

28 Aug 2020 - 6:45 pm | संजय क्षीरसागर

एक ज्योक म्हणून सांगतो. बायको आणि काम एकसारखंचे.

लोकांना बायकोत इंटरेस्ट का वाटत नाही (किंवा द अदर वे), कारण तिला एक्सप्लोअर करण्याच्या सर्व शक्यता संपल्या असं त्यांना वाटतं. मग बायको रोज तीच ती वाटायला लागते. नोकरी किंवा कामाचं सेमे. काम करण्याच्या, नवं शिकण्याच्या इतक्या शक्यता आहेत की बोलता सोय नाही पण लोक्स काम उरकायच्या मागे असतात. ओशो म्हणतात : पिपल जस्ट टर्न टाईम इनटू मनी; यापलिकडे लोकांना कामात रस नसतो. फरक इतकाच की नोकरी बदलणं सोपंय तितकं बायको बदलणं नाही म्हणून लोक्स (सहसा) त्या फंदात पडत नाहीत.

जर तुम्ही काम (किंवा पत्नी) एक्स्प्लोअर करायला शिकलात तर तीच पत्नी रोज नवी वाटते आणि तेच काम तुमच्या व्यक्तिमत्व विकासाच्या नव्या दिशा निर्माण करतं.

विजुभाऊ's picture

28 Aug 2020 - 10:50 pm | विजुभाऊ

आदरणीक संक्षी काका
तुमच्या चौफेर आणि सर्वज्ञात असण्याबद्दल आदर च आहे. आणि एका व्यक्तीला सर्वच क्षेत्रातली इतकी इत्यंभूत माहिती कशी काय असते याबद्दल अचंबीत देखील झालोय.
एन एल पी बद्दल तुम्हाला किती ज्ञान आहे हे माहीत नाही त्यामुळे .एक नम्र पण स्पष्ट विनंती कराविशी वाटते.
१) धागा कशा साठी काढलाय हे पहा आणि त्यानुसार तुमच्या काही व्यथा असतील किंवा शंका असतील तर त्या मांडाव्यात.
लोकांना त्याम्च्या शंका व्यथा मांडू द्या अगोदर . विचारल्याशिवाय तुमचे मत व्यक्त करू नका. कामातील ताणतणाव हा एक प्रत्येकाला ग्रासणरा व संवेदनशील विषय आहे. मानसशास्त्रा च्या दृष्टीने तो सोडवूया. याचे अधिकृत शिक्षण घेतेलेल्या व्यक्तीकडून ते करून घेऊया. उगाच धसमुसळे प्रतिसाद देऊ नका.
संक्षीकाका ;एक मिपाकर आणि धागा कर्ता म्हणून तुम्हाला _/\_ जोडून विनंती. करतो की या धाग्यावर जसे अपेक्षीत आहे तसेच म्हणजे केवळ व्यथा किंवा शंका लिहून व्यक्त होउया.
तुम्हाला एखादे सोल्यूशन माहीत असेल तर ते मला व्यनी ने कळवा. तज्ञाकरवी पाहून योग्य असेल तर तुमच्या नावानिशी इथे प्रकाशित करेन.

२) एन एल पी बद्दल जर गहन ज्ञान असेल तर एखादा नव्या विषयावर नवीन धागा काढा. लोकांना भरभरून व्यक्त होऊ द्या. मिपाकारांचा फायदाच आहे त्यात.

माझ्या या प्रतिसादावर आक्रस्ताळी उत्तरे तुम्ही देऊन धागा हॅक करायचे स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे.. पण त्यामुळे मिपाकरांचेच नुकसान होईल.
या प्रतिसादाव्यक्तिरीक मी आपल्या कोणत्याच प्रतिसादास उत्तर देणार नाहिय्ये.

उंटावरून शेळ्या हाकणारे कधीच जबाबदारी घेत नाहीत..
त्यांना कसला आलाय ताण आणि तणाव?

वामन देशमुख's picture

28 Aug 2020 - 11:56 pm | वामन देशमुख

तुमच्या चौफेर आणि सर्वज्ञात असण्याबद्दल आदर च आहे.

विजुभाऊ,

आपल्या या वाक्यातला उपरोध पुरेसा स्पष्ट होत नाहीय.

नवीन मिपाकरांचा उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रतिसाद-प्रपंच.

१. धागा तुमचा आहे आणि त्यामुळे प्रत्येक शंकेला उत्तर देण्याचा पहिला हक्क तुमचा आहे. इथे पहिल्या प्रतिसादापासून मी ती सभ्यता पाळली आहे. धागा हॅक करण्याचा कदापिही उद्देश नाही आणि मला तशी गरजही नाही.

मी स्वतः काम हा विषय जीवनात कमालीचा रंगवलायं त्यामुळे त्याचे एकूण एक पैलू माहिती आहे. इन फॅक्ट काम हा मन या विषयाचाच एक महत्तम पैलू आहे आणि मन हा विषय मी आरपार केला आहे.

२. एनएलपी आणि माझ्या अप्रोचमधे जमीन आस्मानाचा फरक आहे.

एनएलपी हा analyzing strategies used by successful individuals and applying them to reach a personal goal. It relates thoughts, language, and patterns of behavior learned through experience to specific outcomes; असा बिहेविअरल अप्रोच आहे. माझ्या दृष्टीनं कामापेक्षा कर्ता मह्त्वाचायं आणि त्याची सोडवणूक करायची आहे. मी कामाची मजा हेच ध्येय समजतो, तुमच्या अप्रोचमधे ध्येय कामातून साध्य करायचंय आणि ते भविष्यात आहे. तुम्ही कामातला ताण काढायची गोष्ट करतायं मी काम मजेचं करण्याची कहाणी सांगतोयं.

३. थोडक्यात, जिथे एनएलपी पोहोचू शकत नाही तिथे माझी सुरुवात आहे. तुमचा अप्रोच सदस्यांचा ताण दूर व्हावा हा आहे आणि माझा अप्रोच त्याच्यासाठी कामाची खुमारी वाढवण्याचा आहे. हेतूतः दोघांचा मकसद एकच आहे. तरीही तुमचा प्रतिसाद आल्याशिवाय मी प्रतिसाद देणार नाही किंवा स्पेसिफिकली तुम्हाला विचारलेल्या प्रश्णाचं उत्तर तुम्हीच द्या.

जिथे तुमचं किंवा एनएलपीच्या कोणत्याही तज्ञाचं उत्तर माझ्या दृष्टीनं अयोग्य असेल तिथे मी उत्तर देईन. हा ओपन फोरम आहे आणि चर्चा चालू आहे त्यामुळे इथे धागा काढल्यावर तुम्हाला ते मान्य असायला हवं.

तुमच्याकडून किंवा एनएलपीच्या कोणत्याही तज्ञाकडून मला एकाही उत्तराची अपेक्षा नाही किंवा माझे प्रतिसाद कुणी तपासावे याचीही गरज नाही. अर्थात, माझ्या प्रतिसादांचा तुम्हाला किंवा कुणालाही उपयोग झाला तर तो माझ्या नांवानिशी क्वोट करावा वगैरे काहीही अट नाही.

विजुभाऊ's picture

28 Aug 2020 - 4:50 pm | विजुभाऊ

बाप्पु
बरोबर स्वतःची कामात इतरांच्या बरोबर तुलना केली. पण बरेचदा परफेक्षनिस्ट होण्याच्या नादात आपला गोल हरवून बसतो.
आपल्याला परफेक्षन जमत नाही याचाही ताण येतो.
याचे मूळ फीअर ऑफ सोशल रिजेक्षन मधे आहे.
कळपाचा भाग होणे या इतकी सुरक्षितता नाही हे खरे पण तो होत असताना आपण त्या कळपाचा भाग नसू तर हे अवघड बनते.
कौवा चला हंस की चाल
हंस तो नही बन पाया
कौवा भी , कौवा नही रहा
अशी अवस्था होते.
प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट यायलाच हवी अस नाही.
नाहीतर तेंडूलकर ऑलिंपीक मधे १०० मीटर स्पर्धा धावला असता.

वामन देशमुख's picture

28 Aug 2020 - 11:57 pm | वामन देशमुख

मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय...
... स्ट्रेस कमी करण्याचे . खास करून माहिती तंत्र क्षेत्रातील मित्रांचे .आयुष्य सुखकर करण्याचे.

मोहिमेबद्धल अभिनंदन - विजुभाऊंचे आणि संबंधित मिपाकरांचेही !

तुम्हाला. तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.

नक्कीच !

त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच.

आगाऊ धन्यवाद!

BTW, आळशीपणावर उपाय सांगा राव. अर्थात हे खूपच त्रोटक problem statement आहे हे मान्य.

Rajesh188's picture

29 Aug 2020 - 2:05 am | Rajesh188

उपक्रम छान आहे पण कामाच्या ठिकाणी असणार तणाव (स्ट्रेस) हा फक्त स्वतःच्या कामाशी च संबंधित असतो असे नाही.
आणि इथे एकध्या व्यक्ती नी त्याला कशाचा स्ट्रेस वाटतो हे सांगितले तर त्याचे उत्तर एका वाक्यात नसेल किंवा एका paragraph मध्ये
नसेल.
मुळात ह्याचा संबंध च मनाशी आहे .
अनेक संपुदेशन ची आवर्तन झाल्या शिवाय मनावरील तान कमी होवू शकत नाही.
जास्त वेळ माणूस तणावात राहिला तर तो नैराश्य मध्ये तरी जातो किंवा हिंस्त्र तरी होतो,किंवा व्यसनी सुद्धा होतो.
आपल्या पेक्षा कमी दर्जा च्या व्यक्तीची आपला बॉस म्हणून नेमणूक होणे आणि लायकी काय तर फक्त हुजरेगरी, लावलाव्या.
नोकरी ची शास्वती नसणे.
आपल्या लायकी पेक्षा कमी मोबदला मिळणे.
आपल्या दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण न होणे.
कामात च आयुष्य जात आहे स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असे वाटणे किती कारण आहेत त्या मुळे मनात तणाव निर्माण होतो.

Rajesh188's picture

29 Aug 2020 - 2:05 am | Rajesh188

उपक्रम छान आहे पण कामाच्या ठिकाणी असणार तणाव (स्ट्रेस) हा फक्त स्वतःच्या कामाशी च संबंधित असतो असे नाही.
आणि इथे एकध्या व्यक्ती नी त्याला कशाचा स्ट्रेस वाटतो हे सांगितले तर त्याचे उत्तर एका वाक्यात नसेल किंवा एका paragraph मध्ये
नसेल.
मुळात ह्याचा संबंध च मनाशी आहे .
अनेक संपुदेशन ची आवर्तन झाल्या शिवाय मनावरील तान कमी होवू शकत नाही.
जास्त वेळ माणूस तणावात राहिला तर तो नैराश्य मध्ये तरी जातो किंवा हिंस्त्र तरी होतो,किंवा व्यसनी सुद्धा होतो.
आपल्या पेक्षा कमी दर्जा च्या व्यक्तीची आपला बॉस म्हणून नेमणूक होणे आणि लायकी काय तर फक्त हुजरेगरी, लावलाव्या.
नोकरी ची शास्वती नसणे.
आपल्या लायकी पेक्षा कमी मोबदला मिळणे.
आपल्या दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण न होणे.
कामात च आयुष्य जात आहे स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असे वाटणे किती कारण आहेत त्या मुळे मनात तणाव निर्माण होतो.

कानडाऊ योगेशु's picture

29 Aug 2020 - 12:47 pm | कानडाऊ योगेशु

आज सकाळीच एक घटना घडली त्यामुळे तणावात आहे. कामकाजासंबंधित घटना नाहीये पण असा प्रकार सर्वांच्या बाबतीत घडु शकतो म्हणुन इथे लिहितोय.
रिअल टाईम प्रॉब्लेम म्हणुन ह्याकडे बघु शकतो.
सकाळी एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने सांगितले कि तो जिथे मी सदनिका घेतली होती तिचा मेंटेनन्स मॅनेजर आहे. त्याने सांगितले कि तुमच्या फ्लॅटच्या खाली असलेल्या फ्लॅट मध्ये बाथरूम च्या सिलिंग वॉलवर सिपेज आहे. कदाचित तुमच्या बाथरूममधुन पाण्याची गळती होतेय. मी सध्या बेंगलोरस्थित नसल्याने त्याला तसे सांगितले व मी गेले वर्षभरतरी तो फ्लॅट उघडला नाही. बंदकरताना सर्व टॅप/ स्विचेस खात्रीने बंद केले आहेत त्यामुळे माझ्या बाथरूममध्ये पाण्याचा नळ उघडा असल्याची शक्यता नाही. त्याला पटल्यासारखे वाटले व चर्चा संपली. पुढे मी त्या फ्लॅटधारकाला फोन करुन कल्पना दिली व मग समजले कि सिपेज बाथरुममध्ये नाही तर युटीलिटी भागात आहे कि जो ओपन आहे त्यामुळे माझ्या युटीलिटी भागात पावसाचे पाणी साचले असावे व म्हणुन सिपेज होत असावे ही एक शक्यता बोलुन दाखवली. चर्चा संपली.
पण ताण येण्याची कारणे अशी आहेत कि खरेच एखादा नळ उघडा तर राहिला नसेल? दुसरे म्हणजे माझ्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. (९ व्या माळाव्यावरचा फ्लॅट आहे.) व मी प्रॉपर्टी मॅनेजरकडे तक्रार ही केली होती. पण त्यानंतर ही धाकधुक कायम राहिली. आताही फ्लॅटमध्ये पुन्हा घरफोडी तर झाली नसेल? आणि आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे सध्याची महामारीची परिस्थिती पाहता मी इतक्यात तरी बेंगलोरमध्ये जाऊ शकत नाहीये? आणि अश्या वेळी मनात फक्त नकारात्मक विचार येतात. तर आता ह्या घटनेमुळे येणार्या ताणापासुन सुटका कशी मिळवावी?

विजुभाऊ's picture

29 Aug 2020 - 1:56 pm | विजुभाऊ

वामन देशमुख -- आळशीपणा - प्रोक्रॅस्टीनेशन - काम टाळण्याची /कसेतरी उरकण्याची प्रव्रूत्ती
राजेश १८ - फ्रस्ट्रेशन - डिप्रेशन
कानडाऊ योगेश - अँक्झायटी
सगळ्यांची फलनिष्पत्ती स्ट्रेस ( तणाव) यातच होते. पण या गोष्टी एका सायकल मधे फिरत रहातात.
हे सगळे विषय नीट लिहायचे तर प्रत्येक विषयाला भरपूर वेळ द्यावा लागेल.
लिहायचा प्रयत्न करतो

वामन देशमुख's picture

29 Aug 2020 - 3:11 pm | वामन देशमुख

हे सगळे विषय नीट लिहायचे तर प्रत्येक विषयाला भरपूर वेळ द्यावा लागेल. लिहायचा प्रयत्न करतो

वेळ काढून नक्की लिहा विजुभाऊ. दोस्तारचा एक प्रचंड मोठा फॅन या नात्याने तुम्हाला आग्रहाने सांगतो आहे.

रच्याक, दोस्तार हेच एक खूप मोठं स्ट्रेस बस्टर आहे, नाही का!

कानडाऊ योगेशु's picture

29 Aug 2020 - 3:00 pm | कानडाऊ योगेशु

हे सगळे विषय नीट लिहायचे तर प्रत्येक विषयाला भरपूर वेळ द्यावा लागेल.
लिहायचा प्रयत्न करतो

लिवा लिवा विजुभौ.
धागा काढलाच आहे तर होऊनच जौ दे!

धर्मराजमुटके's picture

29 Aug 2020 - 4:53 pm | धर्मराजमुटके

आयटी हमालांना जास्त तणाव सहन करावा लागतो याची कारणे उघड आहेत पण त्यावर उपाययोजना करण्यास आयटी हमालांच्या मुकादमास इंटरेस्ट नसणे हे आहेच पण हमाल देखील जास्त बोजा वाहून नेण्यास विरोध करत नाहीत हे आहे. यांचे ग्राहक तिकडे आम्रविकेत किंवा युरोफात बसलेले असतात. हे इकडे दिवसा पण ओझी वाहतात आणि इकडच्या रात्री ग्राहकाच्या देशात सकाळ असते म्हणून रात्री उशीरा पण जागरणे करत बसतात. त्याऐवजी सरळ तुमची दुकाने रात्रपाळीतच उघडा ना भो !

ताण येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे "नाही" म्हणता न येणे. मुळात आपणच समोरच्याच्या अपेक्षा वाढवत बसतो आणि मग त्या अपेक्षांचे ओझे झेपत नाही म्हणून रडत बसतो. मी देखील आयटी मधे ८-१० वर्ष काम केले पण रात्री १०.३० वाजता मोबाईल बंद म्हणजे बंद. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ असे १० तास काम करायला पुरेसे असतात. तेवढ्या वेळात मन लावून काम करावे. एखाद दोन तास आपल्या आवडत्या छंदात रमून जावे. ऑफीस ला घरी आणु नये आणि घर ऑफीस मधे घेऊन जाऊ नये.

मी ज्या उत्पादनासाठी सेवा देत असे ती आम्रविकास्थित होती आणि जगभर त्यांची कार्यालये होती.आम्ही इकडुन मदतीसाठी संपर्क साधला की त्या त्या वेळेत जगातल्या ज्या ज्या भागात दिवस असेल आणि कामाची वेळ असेल तिथले कर्मचारी मदत करायचे आणि त्यांची घरी जाण्याची वेळ झाली की सरळ ती केस दुसर्‍या देशात / खंडातील कार्यालयाला पाठवून देत. त्यांची कार्यपद्धती खुपच उत्तम पद्धतीने विकसीत केलेली होती. आपल्या समस्येची चा पुर्ण इतिहास त्यांच्याकडे व्यवस्थित नोंदलेला असायची आणि समोरचा सेवा देणारा व्यक्ती बदलला तरी "पुनश्च हरीओम" करावा लागत नसे. याउलट भारतातील मुकादमांची आम्ही दिवस रात्र काम करावे अशी अपेक्षा असते. रात्री बेरात्री फोन उचलून / मेल करुन यांना अपडेट करावे अश्या अपेक्षा असायच्या. हा एक प्रकारचा चक्रव्युह आहे. त्यात कितीही निष्णात व्यक्तीचा "अभिमन्यू" होतोच होतो. त्यात न अडकण्याचा एकच मार्ग आहे म्हणजे मुळात त्या चक्रव्युहात न शिरणे. आपण करीयरच्या सुरुवातीपासूनच अशा "वाईट्ट" गोष्टींना नाही म्हणायला शिकणे आवश्यक आहे.

ताण येण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे नावडती गोष्ट टाळत राहणे. ह्यावर मी माझ्यापुरता उपाय शोधला.
उदा.मला जेवणात ताटातील काही पदार्थ आवडत नसत ते शिल्लक राहत आणी आवडत पदार्थ सुरुवातीला खाऊन संपवले जात. मग मी हा क्रम बदलला. नावडते पदार्थ पहिले संपवायचे आणि आवडता पदार्थ शेवटी चवीचवीने खायचा. तोच मार्ग कामात अनुसरला. टाळाव्याश्या कामाला पहिला हात घालायचा आणि आवडते काम शेवटी करायचे. प्रश्न बर्‍यापैकी संपला.

खरे तर भारतीयांना अध्यात्माचा किती सुंदर वारसा लाभला आहे. तो मार्ग अंगिकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच ताण तणावातून मुक्ती मिळू शकते. बाकी विजूभाई आणि इतर जाणकार मिपाकर आपल्याला इथे मार्गदर्शन करतीलच.

कानडाऊ योगेशु's picture

29 Aug 2020 - 8:02 pm | कानडाऊ योगेशु

मुटके साहेब प्रतिसाद आवडला. सुचवलेले उपाय पटले पण त्यांची अंमलबजाणी अवघड आहे.

ताण येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे "नाही" म्हणता न येणे.

तुम्ही नाही म्हणाला तर होय म्हणाला कोणी होतकरु हमाल पुढे येतोच येतो व मग तुम्हाला नंतर डावलले जाण्याची शक्यत असते.

ह्यावर मी माझ्यापुरता उपाय शोधला.
उदा.मला जेवणात ताटातील काही पदार्थ आवडत नसत ते शिल्लक राहत आणी आवडत पदार्थ सुरुवातीला खाऊन संपवले जात. मग मी हा क्रम बदलला. नावडते पदार्थ पहिले संपवायचे आणि आवडता पदार्थ शेवटी चवीचवीने खायचा. तोच मार्ग कामात अनुसरला. टाळाव्याश्या कामाला पहिला हात घालायचा आणि आवडते काम शेवटी करायचे. प्रश्न बर्‍यापैकी संपला.

तुम्ही पंगतीत जेवायल बसला असाल तर हा प्रकार अंगलट येईल. कारण पंगतीत वाढताना जनरली जे पदार्थ संपलेत तेच पुन्हा वाढले जातात.
माझ्या मित्राच्या बाबतीत असा प्रकार झाला होता. ताटात गव्हाची खीर होती त्याने ती प्रथम संपवली व मग बोलण्यात गुंतला. पुन्हा ताटात पाहिले तो वाढपी ढीगभरुन अजुन गव्हाची खीर ओतुन गेला होता.

आनन्दा's picture

30 Aug 2020 - 9:05 am | आनन्दा

हा हा, यावरून आठवले.

जावई पहिल्यांदा सासुरवाडीला गेला.. दुपारी जेवायला बसलो तर पानात वाटीभर कारल्याची भाजी.. तोंड वाकडं करायची पण सोय नाही..
मग हसत हसत जावयाने गुपचूप प्रथम टी भाजी खाऊन टाकली आणि मग बाकीच्या पदार्थांकडे वळला..

सासूबाईंचं पानात लक्ष गेलं,

अरे, कारल्याची वाटी रिकामी, एव्हढी भाजी आवडते होय जावायबापुना, सासूबाईंनी आग्रह करून अजून एक वाटी वाढलेली.. आवडत नाही असे म्हणायची पण सोय नाही.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार. जावई शहाणा झाला.. तो आता आवडता पदार्थ अगोदर पण खात नाही आणि शेवटी पण.. तो जेवणात मध्ये मध्ये चवीला न आवडणारा पदार्थ संपवत राहतो.

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

उपयोजक's picture

29 Aug 2020 - 8:44 pm | उपयोजक

भारताची लोकसंख्या १३५ कोटी आहे. साहजिकच त्यामुऴे स्पर्धाही खूप आहे. अमेरिकेसारखी आटोक्यात असणारी लोकसंख्या भारतात नाही. तिकडच्यासारखे वर्क कल्चरही इथे नाही. आस्थापनांमधे कामासाठी हव्या त्या क्षमतेचा माणूस अल्पकाळात उपलब्ध होऊ शकतो. मग असे असताना जो काही ताण येतो त्याला इथल्या कंपन्या कितीसे महत्व देतील? त्यांनी महत्व न दिल्याने त्यांचे कितीसे नुकसान होईल? किंबहूना एम्प्लॉयीला पिळून घेण्याच्या कौशल्याचेच पैसे मिळत असावेत का? ताणामुळे एखादा नोकरी सोडून गेला तर अल्पकाळात दुसरा माणूस इथे उपलब्ध होतो. हा भारत आहे.इथे असेच चालायचे.वड्रा म्हणाला ना "बनाना कंट्री"!

विजुभाऊ's picture

29 Aug 2020 - 9:26 pm | विजुभाऊ

उपयोजक साहेब
आपल्या इथले वर्क कल्चर हे जरा वेगळे आहे.
भारतीय ( दक्षीब अशियाई ) माणसाला सुट्टीच्या दिवशी कामाला बोलावले तर तो येतो. ( थोडी कुरबुर करेल )
इथला माणूस अजूनही नोकर मालक या मनोअवस्थेत वावरतो.
मात्र पिळून घेणे असे इतके नसावे . प्ण लोक जबाबदारीने घरूनही काम करतात.
पण त्यामुळे ताण येण्याचे कारण वेगळे आहे.
आपल्याकडे वय जसे वाढेल तसे माणसाला मॅनेजर बनवले जाते. त्याच्याकडून तशा अपेक्षा ठेवल्या जातात.
एखाद्याला जरी प्रोग्रामिंग मधे काम करावेसे वाटत असते तरीही हडेलहप्पी करून त्याला मॅनेजरचा रोल दिला जातो.
त्या कामात तो सिनीयर माणूस अयशस्वी होतो. आणि इथेच स्ट्रेस यायला सुरवात होते.
कामाचा तिटकारा यायला लागतो. या उलट एखादा ज्युनियर रीसोर्स हा जात्याच लीडर असतो. बोलका असतो. डॉमिनेटिंग असतो. त्याला जर हाताखाली बराच वेळा रहावे लागले/ हुकूम पाळायला लागले. तेही एखाद्या हिटलर मॅनेजर कडून तर तो रीसोर्स कामापासून दूर रहाणे पसंत करतो.
यामुळे त्याच्या कामावर परिणाम व्हायला लागतो.
या मुळॅ स्ट्रेस वाढायला लागतो. आणि तो माणूस करीयर पासून दूर जाऊ लागतो

मराठी_माणूस's picture

30 Aug 2020 - 9:07 am | मराठी_माणूस

आपल्याकडे वय जसे वाढेल तसे माणसाला मॅनेजर बनवले जाते. त्याच्याकडून तशा अपेक्षा ठेवल्या जातात.
एखाद्याला जरी प्रोग्रामिंग मधे काम करावेसे वाटत असते तरीही हडेलहप्पी करून त्याला मॅनेजरचा रोल दिला जातो.

आईटी मधील अगदी चपखल उदाहरण.

तांत्रिक कामा मधे अधिक रुची असणर्‍याने जर मॅनेजरचा रोल नाकारला तर , त्याच्या डोक्यावर सुमार दर्जाचा अधिकरी आणुन ठेवतात. ते अजुन अपमानास्पद होते . मग तो कसे बसे मॅनेजर बनण्याचा प्रयत्न करतो.
ह्या मुळे ह्या क्षेत्रात आपल्याकडे सुमार (mediocre) लोकांची संख्या खुप आहे.

उपयोजक's picture

29 Aug 2020 - 10:04 pm | उपयोजक

ज्युनिअरने मला मॅनेजर करा असा प्रस्ताव ठेवणे किंवा मॅनेजरने मला मॅनेजरची जबाबदारी देऊ नका असे सांगणे? ऐकतील का असे सांगितले तर?

मुटके साहेबांचा प्रतिसाद आवडला. त्यांची रॅशनल विचारसरणी आहे आणि त्यानं फक्त आयटीच नाही तर जवळपास कोणत्याही क्षेत्रात फायदाच होतो. पण आयटी हमाल या शब्दा मागील हीन भावनेला माझा आक्षेप आहे. मी स्वतः आयटीत आहे आणि त्या कामात काहीही हीन नाही.

अर्थात् सगळेच रॅशनल विचारानं वागू शकत नाहीत. प्रत्येकाच्या मनाची घडण वेगळी. त्यामुळं विजूभाऊ ज्या अभ्यासाच्या मार्गानं त्यावरील उपाययोजना मांडतील/मांडणार आहेत, ते पाहण्यास मी उत्सुक आहे. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतीलच.

या धाग्याच्या अनुषंगानं काही प्रश्न मांडावेसे वाटलेत, जे मूळ विषयाकडे नेण्यास उपयुक्त होतील अशी आशा वाटते. हे प्रश्न अंतर्मुख करण्यासाठी आहेत. त्यातून विवेक-विचाराला चालना मिळणे अपेक्षीत आहे. याची उत्तरे इथे मांडलीच पाहिजेत असे काही नाही. पण कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये, कुणालाही यात दुखवायचा हेतू नाही.

- कोण आपल्या बॉसला नाही म्हणून ते पचवू देखील शकेल?
- एखाद्या गोष्टीत मन न लागण्याची काय काय कारणं असतील?
- इतर जण आपल्यापेक्षा पुढे जातील ही भिती कोणाला वाटेल? ही भिती अनावश्यक नाही काय?
- जे काम आपण करतो त्यातून काय आणि किती परतावा मिळेल, याचं गणित आपण स्वतः मांडायला नको काय? आपल्या अपेक्षा रिअ‍ॅलिस्टीक आहेत किंवा नाहीत हे आपण ठरवणार नाही काय?
- एकच एक उत्पन्नाचा स्त्रोत आणि त्यातून मनावर येणारा ताण, हे सहन होत नसण्यामागील मूळ कारण काय? ते नीट मांडून त्यावर आपल्या कुवतीनुसार/ताकदीनुसार उपाय अंमलात आणण्याची जबाबदारी कुणाची? नवीन उत्पन्नाचा स्त्रोत कसा तयार करायचा याचा विचार कोणी करायचा?
- आर्थिक स्थिरतेचे मापदंड प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार बदलतील. आपले स्वतःसाठीचे मापदंड काय? कमीतकमी सगळ्यांना सांगता येईलच, पण जास्तीत जास्त काय हे किती जण ठरवू शकतील?
- मी काम का करायचे? मी हेच काम का करायचे? मी हेच काम करत राहणार काय? मला पुढे जाऊन काय करायचे आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे स्वतः आपण शोधू शकतो की आपल्याला दुसरा कुणी चांगली मदत करू शकतो? कुणी मदत केली तर ती मान्य करून तसं आचरायची आपली तयारी आहे काय?
- जे मदत करण्याचा प्रयत्न करतील, त्या मदतीतून येणार्‍या यश-अपयशाची जबाबदारी कोणाची? मुळातच, आपली अडचण कोण सोडवू शकतो?
- जर आपल्याकडे पुरेशी आर्थिक स्थिरता आली तर आपण त्याचा विनियोग कसा करणार?
- जर आपली परिस्थिती भिकार्‍यासारखी किंवा त्याहूनही खराब झाली तर आपण जगणार की नाही? का?
- ध्येय समोर असणं गरजेचं नाही काय? ध्येय कोणतं असलं पाहिजे?

कोहंसोहं१०'s picture

30 Aug 2020 - 5:59 am | कोहंसोहं१०

खरे तर भारतीयांना अध्यात्माचा किती सुंदर वारसा लाभला आहे. तो मार्ग अंगिकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच ताण तणावातून मुक्ती मिळू शकते" -----> धर्मराजजी, हा सर्वात महत्वाचा आणि तरीही सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेला/मुद्दाम केला गेलेला मुद्दा आहे. अपने पास सोना है और हम पत्थर पाने के लिये मरे जा रहे है.

उपयोजक's picture

30 Aug 2020 - 8:49 am | उपयोजक

लोक पैसा मिळवण्यासाठी तुफान धावत सुटलेत.हे करताना आरोग्याच्या चिंध्या झाल्या तरी काळजी करत नाहीत.

डॉ.नीतु मांडके यांनी हॉस्पिटल बांधण्यासाठी दररोज १५-१६ तास काम केलं.हृदयरोगाने मृत्यू.

अनिल पाटील यांचा रक्तदाब बिघडल्याने मृत्यू.

हे लोक डॉक्टर होते.हे ज्या विकारांनी गेले ते विकार अचानक येऊन उभे ठाकलेले नाहीत.पण I can handle it या अतिआत्मविश्वासामुळे जीव गमावून बसले.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या काही लोकांना(सर्वच नव्हे)आरोग्याचं महत्व समजत नसेल.त्याचं गांभीर्य समजत नसेल तर वैद्यकीय क्षेत्रात काम न करणार्‍या लोकांना ते समजावणं किती अवघड असेल?

उपयोजक's picture

30 Aug 2020 - 9:40 am | उपयोजक

सदर धाग्यात फक्त आयटीतल्या ताणाचीच चर्चा का? कोअरमधल्या लोकांचे जीवन सुखी झाले तर चालणार नाही का? किंबहूना कोअरमधे आयटीपेक्षा जास्त ताण असतो.
हो.कष्ट दोन्हीकडे असले तरी पगारात तफावत मात्र कमालीची असते.फ्लॅटसच्या किंमती वाढल्या त्या कोणामुळे? ;)
गल्लीतल्या एका मुलाने PLC चा कोर्स केला होता.फ्रेशर आहे,कामाचा अनुभव नाही म्हणून एका कंपनीने ३ हजार महिना पगार अॉफर केला होता.इतक्या कमी पगारात शिपाई तरी काम करेल का? समजा आयटीत राबणूक असलीच तरी ती एसी अॉफिसमधे बसून तरी आहे.त्यामानाने पॅकेजसुद्धा मिळते. कोअरमधे मशिन्सच्या कर्कश आवाजात,घामाघूम होत काम करावे लागते.बरं इतकं करुन मालकांकडून/कंपनीकडून ट्रीटमेंट तरी चांगली मिळावी तर ते सुद्धा नाही. ७-८ किंवा फारतर २० कामगारांना घेऊन इन्स्टॉलेशनचा छोटा व्यवसाय करणार्‍या किंवा काहीतरी पार्ट बनवून देणार्‍या कंपन्या(?) तर अक्षरशः कळस असतात.कामगार हा आपला कर्जदार आणि आपण १०% व्याजाने कर्ज देणारे सावकार असल्याच्या थाटात अशा कंपन्यांचे मालक कामगाराला पळवत असतात.बरं यांची कंपनी कायम तोट्यातच असते.निरनिराळी कारणे देतात.पगारवाढ तर मुंगी मुतावी तशी मिळते.उपकाराचीच भावना असते.

ही अशी हालत/कस्पटासमान लेखणे आयटीत होत नसावी ना?

की आयटीत गणित/बुद्धिमत्ता चाचणी यात अग्रेसर असणार्‍यांना घेतले जाते,आयटीवाले अमेरिकन कंपनीसाठी काम करतात म्हणून त्यांना जास्त महत्त्व आणि कोअरवाले धुळीत कपडे,हात काळे करत काम करतात म्हणून ते बिनमहत्त्वाचे असे काही आहे का? :(
तसेच असेल तर इथल्या तज्ञांनी सर्व कोअरवाल्यांना आयटीत कसे शिरता येईल याबद्दल उद्बोधन करावे व दुवा घ्यावा.

कानडाऊ योगेशु's picture

30 Aug 2020 - 1:44 pm | कानडाऊ योगेशु

कोअरमध्ये आय.टी पेक्षा पगार कमी मिळतो ह्या विधानातही फार तथ्य नाही.आय.टीतही सुमार दर्जाच्या होतकरुंना प्रथम कमी पगारावरच राबावे लागते.करिअरच्या सुरवातीलाच जास्त पैसा वगैरे लाड कॅम्पस मध्ये निवड झालेल्या हुशार विद्यार्थ्यांच्याच वाट्याला येते. ज्यांना कॅम्पस मधुन नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी शोधायच्या प्रक्रियेतुन जावेच लागते जिथे सुरवातीला कमी पगाराची नोकरी करावी लागते. हा एक इन्क्युबेशन पिरियड आहे. तो आय.टीमध्ये कदाचित तुलनेने कमी असेल.पण तिथेही हातपाय मारावे लागतातच.
मध्यंतरी आधीच्या कोअर कंपनीतला एक सहकारी लोकल मध्ये अचानक भेटला होता. अ‍ॅप्रेंटीस म्हणुन एकत्रच एका यांत्रिकी कंपनीत लागलो होतो. साधारण १० वर्षांनंतर भेटत होतो. बर्याच जणांनी आय.टीमध्ये करिअर शिफ्ट केले होते ज्यात मी ही एक होतो. त्याला काय करतोस कुठे असतोस असे विचारले असता तो म्हणाला कि अजुन यांत्रिकी क्षेत्रातच आहे वगैरे. तो आमच्या वेळेचा टॉप परफॉर्मर व हुशार इंजिनिअर होता. त्याला विचारले कि आय.टीत का घुसला नाहीस? कोअर मधेय पैसा आहे का? वगैरे तो म्हणाला आय.टी इतकाच किंबहुना जास्त पैसा कोअर मध्ये आहे कारण आज जो कोणी उठतो तो काहीएक कोर्स करुन आय.टीत घुसतो त्यामुळे कोअर मध्ये कोअर अनुभव असलेल्यांची प्रचंड कमतरता आहे आणि जे आहेत त्यांना फार मागणी आहे. त्यामुळे आय.टी मध्येच जास्त पैसा मिळतो ही एक चुकीची समजूत आहे.

रीडर's picture

30 Aug 2020 - 6:32 pm | रीडर

जनरली IT मधल्या ताणाला खूप ग्लॅमराईझ केलं गेलं आहे. त्यामुळे ते एकच ताणाचे क्षेत्र आहे आणि बाकी क्षेत्रात सगळे निवांत आहे असे चित्र उभे केले जाते.
वैद्यकीय सेवा क्षेत्र, पोलीस, माध्यम क्षेत्र, मनोरंजन, शेती यांसारख्या अनेक क्षेत्रातील ताण हा ताण नाहीच जणू.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

30 Aug 2020 - 1:59 pm | सौ मृदुला धनंजय...

माझा मुलगा कॅनडामध्ये असतो त्याने आताच प्रेझर युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन आयटी मध्ये कम्पलेट केले आहे जॉब च्या शोधात आहे जॉब मिळवण्यासाठी काय करावे लागते

विजुभाऊ's picture

30 Aug 2020 - 2:44 pm | विजुभाऊ

मृदुला ताई हे तिथे असलेल्यालाच माहीत असेल.
या धाग्यावर ही चर्चा टाळूया.
आयटी मधे खूप पैसा मिळतो. त्यातही एस ए पी / ऑरॅकल इ आर पी मधे जास्त मिळतो असा एक प्रवाद आहे.
यात तथ्य आहे आणि नाही.
चांगला पगार नक्कीच मिळतो पण इन्क्यूबेशन पिरीएड खूप जास्त आहे.
ई आर पी मधे तर माझ्या पहान्ञात बरेच जण असे आहेत की त्यांनी अनुभव मिळावा म्हणून स्वतः होऊन पैसे देऊन लहन कम्पनीत सहा सात महिने काम केले आहे.
मी एस ए पी शिकत होतो तेंव्ह्या लोकाना जॉब मिळायला बराच वेळ लागायचा. ( अजूनही लागतो) त्या काळात एस ए पी चा लाँगफॉर्म सेल्फ अ‍ॅक्वायर्ड पॉव्हरटी असा चेष्टेने करायचे. ते खरेही होतेच. एस ए पी मधे जॉब मिळावा म्हनून बरेच जण नौकर्‍या सोडून शिक्षण घेत होता

मराठी_माणूस's picture

30 Aug 2020 - 2:49 pm | मराठी_माणूस

अवांतरः अजुन एक लाँगफॉर्म , सगळे अमेरीकेला पळा :)

क्षेत्र कोणते ही असू ध्या सर्वात एक कॉमन अडचण म्हणजे अंतर्गत राजकारण.
बॉस लोकांचे चुकीचे निर्णय त्याचा काहीच चुकीचं काम करत नसलेल्या व्यक्तीवर परिणाम झाला की तो व्यक्ती स्ट्रेस मध्ये येतो
चमचे गिरी च्या जोरावर promotion मिळणे हा प्रकार पण प्रामाणिक लोकांना तणावात टाकतो.
कसलीच चूक नसताना तुमचे प्रमोशन.
पगारवाढ थांबणे.
ह्या वर उपाय म्हणजे महिन्यातून एक दिवस टॉप बॉस नी सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यंसाठी अडचणी सांगण्यास मोकळीक द्यावी.
गुप्त पणे कोणी ही कर्मचारी त्यांच्या बॉस च्या चुकीच्या निर्णय ची complete करू शकतो.

विजुभाऊ's picture

31 Aug 2020 - 6:23 am | विजुभाऊ

कंपनीतील अंतर्गत राजकारण / कंपुगिरी ही कुठेही गेले तरीही असणारच आहे.
पण त्यामुळे तुमचे होणारे नुसकान कसे टाळता येईल हे पहाणे महत्वाचे.
खरे तर कंपूगिरी मुळे अल्पकालीन फायदा होतो. तुमचे सोशल स्कील्स चांगले अस्तील तर तुम्ही हे मॅनेज करू शकता.
पण याच्या जोडीला आवश्यक तांत्रीक स्कील्स असतील तर ते आणखी सोपे जाते.
स्कील नसल्यामुळे धडपडणारे, लवकरच मागे पडतात.
पण बोलबच्चनगिरी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हे एक स्कील आहे हे अमान्य कशाला करायचे.
माझा एक कलीग या गुणावर नव्या कम्पनीत जातो. ( तेथे मोठा पगार मिळवतो) मात्र वर्ष दोन वर्ष भरात तेथली मॅनेजमेंट त्याला ओळखून चुकते.
त्याचे वैयक्तीक संबन्ध बिघडत नाहीत. आणि तो नवी कम्पनी जॉईन करतो.
( नुकताच तो कलकत्त्याला एका कम्पनीत ५६ लाख या पॅकेजवर जॉईन झालाय)
अर्थात हे तो असे किती वर्षे करू शकेल कोण जाणे ( आत्तापर्यंत पंधरा कंपन्या बदलल्यात)
बोलबच्चनगिरी हे स्किल मानायलाच हवे

कानडाऊ योगेशु's picture

1 Sep 2020 - 12:34 am | कानडाऊ योगेशु

कंपनीतील राजकारण बोलबच्चनगिरी ...वगैरे

महत्वाच्या मुद्द्याला हात घातलात विजुभौ. जसे एखाद्याकडे अ‍ॅनालिटीकल माईंड असते तसे एखाद्याकडे चांगली कन्विसिंग पॉवर असु शकते. बोलबच्चनगिरी करतानाही समोरच्याचा इगो कुरवाळावा लागतो आणि हे बर्याच जणांना जमत नाही त्यामुळे चिडचिड होते.
चौकट राजांनी एका धाग्यावर सर्वाय्वल ऑफ फिटेस्ट चा अर्थ सांगताना लिहिले होते कि त्याचा अर्थ म्हणजे टिकुन राहण्यासाठी जुळवुन घेणारा..त्यामूळे कंपनीत एखाद्याकडे टेक्निकल स्किल्स असतील पण मॅनेज्मेंटशी जो जुळवुन घेतो तो टिकतो.

प्रसाद गोडबोले's picture

1 Sep 2020 - 12:10 pm | प्रसाद गोडबोले

भारी धागा !!

विजुभाऊ , मस्त लेखन आहे .

तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.

मला स्ट्रेस्स असा काही खास नाही, जो आहे तो मी व्यवस्थित हाताळत आहे, कदाचित ११-१२ वर्षे कोर्पोरेट मध्ये असल्याने ते टेकनिक साधले आहे ....

माझी समस्या आहे - कॉम्प्लेसन्सी . मला इन जनरल "झाले की आता सगळं करुन , आता काय राहिलंय ?" असे फीलींग आले आहे .
( ज्याला आमचे मित्र - करुन सवरुन भागला अन देव'पुजे'ला ला लागला असे म्हणतात. =)))) )

खरेच कंटाळा आहे सगळ्याच गोष्टींचा. म्हणजे असे नाही की जमत नाही म्हणुन कंटाळा.
असे नाही , इन जनरल लेथार्जी आली आहे .
माझ्या क्षेत्रात, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स , मशीन लर्निंग , डेटा सायन्स सगळं जमतंय की व्यवस्थित , पण त्यात नवीन काही शिकायची इच्छा होत नाही. अगदी फायनान्स मध्येही करोना रिसेशन मध्ये माझा फोलियो ग्रीन आहे , तेही डार्क ग्रीन, पण तो वाढवायची इच्छा होत नाही. घरीही तेच. श्रावणात दर शुक्रवारी घरी पुरणाचा स्वयंपाक होता पण खरं सांगतो मला जेवढा आनंद दालखिचडीतुन होत होता तेवढाच पुरणपोळीतुन होत होता.

आता काहीच करावंसं वाटत नाही , असं वाटतं की मस्त यवतेश्वरच्या पठारावर , गवतात पडुन राहावं अन निळ्याशार आकाशात तंरंगत जाणार्‍या ढगातील आकार शोधत बसावं बस्स्स.

अर्थात ह्यात, ह्या विचारचक्रात, काही थोडाफार करोना इफेक्ट आहे, रुटीनचा आळस आलाय, ब्रेक पाहिजे , हे मलाही जाणवत आहे पण सध्यातरी त्याला पर्याय नाही, त्यामुळे मी करोना संपुर्ण संपेपर्यंत म्हणजे अजुन १- २ वर्षे लागली तरीही बेह्हत्तर, पण तोवर अगदी शांत बसायचे , कोणताही साधासा देखील निर्णय घ्यायचा नाही असे ठरवले आहे .

पण तरीही ह्या कॉम्प्लेसन्सी / लेथार्जी बद्दल तुम्ही काय सुचवाल ?

विजुभाऊ's picture

1 Sep 2020 - 10:27 pm | विजुभाऊ

तुमचा प्रॉब्लेम नोट केलाय
नवीन शिकण्याची इच्छा नाहिय्ये ( उत्साह नाहिय्ये) You can't teach an old dog new tricks

अगदी असे नाही तरी पण या सारखेच असते.
कामातले नाविन्य सम्पले किंवा सतत नाविन्य अनुभवण्याचाही कंटाळा येतो.
कामात ब्रेक न मिळणे किंवा रुटीन मधे अजिबात बदल न होणे ( रुटीन मधे बदल येण्यासाठी जे केले जाते ते देखील एक रुटीन बनून जाते)
उदा : प्रत्येक वीक एंड ला आउटिंग ला जाणे हे देखेले रुटीन होते.न्यू नॉर्मल बनते.
हे मोडायचा प्रयत्न करायचा. फार काही वेगळे करावे लागत नाही
डिजीटल डीटॉक्स करुन पहा ( सुट्टी घेऊन गावी जा . तेथे मोबाईल / लॅपटॉप / सोशल मिडीया असे पूर्ण बंद ठेवायचे.
ट्रेकिंग चा ग्रूप असेल तर उत्तम.
असे काम हातात घ्यायचे की ज्यात मेंदूला पूर्ण विश्रांती मिळेल उदा: भांडी घासणे , घराची भिंत रंगवणे, सायकल चालवणे ,स्वयंपक करणे , घरातली फरशी पुसून घेणे. बागकाम करणे ,मैदानात फुटबॉल खेळणे,
( एकट्याने खेळला तरी चालेल) पण कामात पूर्ण घामटा निघायला हवा आणि मन एकाग्र व्हायला हवे. काम करताना हवे तर विवीध भारती ऐका ( पुस्तक वाचणे , टीव्ही , बातम्या , वर्तमानपत्र , म्यूझिक ऐकणे, सिनेमा पहाणे , नाटक पहाणे यात मन गुंतते. मेंदूला विश्रांती मिळत नाही) विवीध भारती ऐकताना त्यातील गाण्यांचे मूड बदलते असतात त्यामुळे अडकायला होत नाही.
याच सोबत कपाल भाती देखील चालू ठेवा. ( रिझलट्स मिळायला एक दोन आठवडे लागतील), मात्र कपाल भाती करायच्या अगोदर
तुम्ही शरीराला ब्रेक देता मात्र मेंदूला ब्रेक मिळत नाही. सतत एकाच पद्धतीने विचार करून मेंदु थकतो. डावा आणि उजवा मेंदू आलतून पालटून वापरला तरीही तो थकतोच.
दुसरे म्हणजे हे की आपल्या मेंदूत पाच वेगळी ज्ञानेंद्रिये आहेत. आपण कोणतीही गोष्ट करताना या ज्ञानेंद्रियांना ( न्यूरोन्सना ) वापरून एखादी गोष्ट जाणून घेत असते.
हे न्यूरोन्स तो अनुभव एकमेकाम्ना जोडून साठवून ठेवता. ज्या वेळेस ऑफिसचे काम करत असतो त्या वेळेस एका ठरावीक प्रकारचीच कामे केली जातात. त्यामुळे एका ठरावीक प्रकारच्या न्यूरॉन्स ना काम पडते. इतर प्रकारची न्यूरोन्स वापरलीच जात नाहीत. उदा : एखादा पदार्थ चाखताना आपण तो डोळ्यानी पहातो, हाताने त्याचा स्पर्ष घेतो. जिभेने चव घेतो. चावताना त्याचा होणारा आवाज ऐकतो, नाकाने त्याचा गंध अनुभवतो . या सगळ्याची सांगड घातली गेली की तो पदार्थ आपल्या आवडतो.
काम करत असताना या कडे आपले दुर्लक्ष्य होते. आणि केवळ पोटभरी साठी खात रहातो. यातही खारट , तिखट आणि अती गोड या चवीच जास्त चाखल्या जातात. तुरट आंबट कडू या चवींकडे काणाडोळा होतो.
आपल्या शरीराची जडणघडण अशी आहे की ज्या गोष्टी वापरल्या जात नाहीत त्या कमकुवत होत जातात. विस्मरणात जातात. उदा: तुम्ही जर हात दुमडणे बंद केले तर हात दुमडणारे स्न्यायू कमकुवत होतात. आणि हात दुमडणे विसरून जातात.
तसेच न्यूरॉन्स च्या बाबतीतही होते.
न्यूरोन्स पुन्हा कार्यरत करण्यासाठी एक उपाय आहे. अ‍ॅक्टीव्ह मेडीटेशन. त्या बद्दल स्वतंत्र लिहीन.

चांगल्या मार्गदर्शनाबद्दल आभार
अंतर्गत राजकारण ,गॉसिपिंग आणि न आवडणारे जॉब प्रोफाइल, बदलीचा अर्ज करूनही बदली न मिळणे ह्या सगळ्यामुळे वरवर चांगला सुरक्षित आणि चांगल्या पगाराचा बँकेतील जॉब सोडून दुसरीकडे खाजगी क्षेत्रात कमी पगाराचा,असुरक्षित (खाजगी क्षेत्र असल्याने ) पण जॉब प्रोफाइल आवडलेला जॉब करत आहे तर सामाजिक वर्तुळातील प्रतिक्रियांमुळे येणारा ताण (बॅंकेतली नोकरी सोडली!!!! अशा टाईपच्या ) तसेच आत्ताच्या करोना काळात बँकेत असतो तर अर्धवेळ काम करून पगार तरी पूर्ण मिळाला असता ह्या भावनेने येणार ताण (सध्याचे काम बँकेच्या तुलनेत जास्त किचकट असून पगार कमी )
आणि बँकेतल्या बदली हव्या असणाऱ्या ठिकाणच्या मैत्रिणींचे स्टेटस बघून आपण का नाही तिथे ह्या भावनेने येणारा ताण कसे हाताळावे?
धन्यवाद