भाग ६ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
20 Aug 2020 - 8:52 pm
गाभा: 

भाग ६ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल - पुस्तक परिचय

1

१३. कारंंजी उडवायला पाण्याची काय सोय होती?
एबा कोच काय म्हणतात ते पाहू…
“वॉटरवर्क्स जल संचालन कार्य प्रणाली...
कमानीवर आधारलेल्या जलवाहिनीद्वारे यमुनेकडून ताज बागेत पाणी आणणारे वॉटरवॉक(?) पाण्याचे पाट वाहून नेणारे नळ त्याच्या पश्चिमेच्या भिंतीच्या बाहेर बसलेले आहे आणि अजूनही त्यांचे मूळ डिझाईन जपलेले आहे.
1

नदीतील इनलेट आता दिसणार नाही (शिवाचे मंदिर ज्याला आता खान आलम बसाई घाट मंदिर असे म्हणतात, त्यावर मंदिर बांधले गेले आहे). त्यातून एका वाहिनीने आयताकृती इमारतीच्या पुर्वेकडील भिंतीजवळ जमिनीत बुडलेल्या विपुल जलाशयात पाणी वाहून नेले (आता उध्वस्त झाले आहे).

(त्यांच्या शब्दात, “...the water was lifted by means of animal hides attached to pulleys, or Persian wheels turned by bullocks, to tanks at the top of the building…”) (यमुनेच्या पाण्याच्या पातळीच्या जलाशयातून ) (जवळजवळ २०० फूट उंचीवरच्या) माथ्यावर असलेल्या जलसाठवायच्या टाक्यांद्वारे पाणी उचलले गेले. (किंवा जात असे).

1

इराणीयन्स (सध्याचे पारशी भारतात आग्र्यात येऊन राहिलेले नसावेत.)
( इराणी - मुसलमानी लोकांच्या पाणी शेंदायच्या पद्धतीप्रमाणे - असे खरे त्यांना अपेक्षित आहे) बैलांना जोतून, पुढेमागे करून, पुलीच्या - गोल खोबणीच्या लाकडी चाकाच्या - मदतीने खालून वर पाणी आणले जात असावे.(?) (याचा अर्थ असा ही ध्वनित होतो कि भारतीयांना पाणी खालच्या पातळीवरून वर पर्यंत कसे आणायचे ते माहित नव्हते. हजारो वर्षांपासून भारतीयांची शेती मोटेने पाणी शेंदायच्या कामात गेली, या सत्यतेवर कशी डोळेझाक केली आहे ते कळते).

1

जलवाहिनी पश्चिमेच्या बागेच्या -भिंतीच्या मंडपाच्या स्तरापर्यंत दोन वळणासह दक्षिणेकडे धावते. येथे तो पूर्वेकडे वळतो आणि त्याच्यावर विस्तीर्ण? टाक्यात पाणी साठवले जाते आणि बागांच्या भिंतीजवळ जाते.

त्यानंतर पाणी एका सध्या लोखंडी बीडाचा वाटावा अशा पाईपमधून संरक्षक भिंतीला भोक पाडून आणि बागेच्या पायथ्यामधील वाहिन्या पातळीपर्यंत नेण्यात आले. येथे संरक्षक भिंत ०९.४७ मी (३१ फूट. - मापे त्यांच्या ग्रंथातून ) उंच आहे, आणि खाली पडण्याच्या दाबाने कारंजे उडते ठेवण्यास आणि बागांच्या भूखंडांना सिंचनासाठी पाण्याचे आवश्यक तो दाब मिळतो. पुर्वी पाईप्स मातीचे होते. (इंग्रजांच्या काळात) तांब्याचे बनवून वॉक-वेच्या खालून फवारे जिथे उडवले जातात त्या पर्यंत जमिनीतून पुरुन आणले होते. (वीज यायच्या आधी) हातानी पंपाद्वारे चालवले जात, मोगल जलवाहिनी १९०३ पर्यंत वापरात होती, कर्झनच्या अधीन असताना मातीच्या जुन्या नळांची जागा कास्ट-लोह पाईप्सने घेतली होती आणि मॅकडॉनेल पार्कच्या जलाशयापासून एक सिंचन (कॅनॉल) मुख्य टाकीशी जोडला होता, आता (त्याला शाहजहान पार्क म्हणतात. तो सध्या नेमका कुठे आहे?) सध्याच्या पाणीपुरवठ्याचा एक भाग अद्याप जुन्या पाण्याच्या टाकीचा वापर करतो, जो विद्युत पंपांद्वारे विहिरींनी भरला जातो.

1

पाणी पुरवठा व्यवस्था फक्त ताजमहालाला शिवाय इतरत्र कशी केला गेली असावी यावरही विचार करता येतो... एबा कोच यांनी आपल्या ग्रंथात काही चित्रातून काय समजते यावर प्रकाश

दुरून दिसणाऱा ताजमहाल यमुना नदी आणि लाल किल्याचा भाग. नदीचे पात्राची पातळी व उंच इमारती यातील उंचीचा अंदाज यातून यावा...

1

किल्ल्याच्या संरक्षणाचा भाग म्हणून खंदकात खेळते पाणी हवे असते त्यासाठी यमुना नदीतून पाण्याचा पाट काढून व्यवस्था कशी केला होती?
एके ठिकाणी वाचनात आले होते की शहाजहान दिल्लीच्या लालकिल्यातून आपले दर्शन द्यायला ठराविक वेळी उंच झरोक्यात येत असे. त्याचे मनरंजन करावे म्हणून त्या काळात देखील खंदकात पाणी नसल्याने खंदकातील मोकळ्या जागेत येऊन ४ पैसे मिळवत असत.

1

बागकाम, इतर वापरायचे पाणी साठवणी टाक्या या उंच ठिकाणी आहेत तिथवर पाणी कसे नेले जात असावे...

या ठिकाणी जहांगिराला उघड्यावर स्नानाला निदान गरम पाणी हवे...

1

यमुनेच्या डाव्यातीरावरील आराम बागेतील उंच इमारतीवरील कारंजा

1

1

वरील नमुना म्हणून दाखवलेल्या इमारती हिंदू राजे राजवाड्यांनी बांधल्या व ज्यांनी नंतरच्या काळात त्या जिंकल्या किंवा विकत घेतल्या असे मानले तर त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन कसे केले होते यावर विचार व्हायला हवा.

वीज न वापरता एक तर माणसांना पाणी आणायच्या कामाला लावून वर न्यायची व्यावस्था जोरदार प्रमाणात करायला हवी...
किंवा इराणी पद्धतीने ते वर आणायला जागोजागी मोटांची सोय करयाला हवी...

आग्र्यात ताजमहालाच्या प्रतिमेला साजेल असे भव्य बांधकाम राधास्वामी मंदिर म्हणून उभे आहे. त्याच्या उंचीवरून, बांधकामाची ढब आणि कलाकुसर नजरेत भरणारी आहे. या इमारतीची देखभाल व दुरुस्ती करायला सध्याच्या आधुनिक तंत्रांचा व यंत्रांचा कसा वापर केला जात आहे याची झलक सादर

1

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

23 Aug 2020 - 7:11 am | जयन्त बा शिम्पि

सविस्तर वाचन करावे लागेल.विचारप्रवर्तक लेख आहे.फोटो टाकले असल्याने ,आकलन सोपे झाले आहे, त्याबद्दल धन्यवाद.पुलेशु.

जरूर पहायला जावे. वेळ कमी, पहायला जास्त, पर्यटक लोकांची गर्दी यातून ते पाहिले जाते. म्हणून अभ्यासांचे काम जास्त जिकीरीचे होते...

शशिकांत ओक's picture

23 Aug 2020 - 10:14 pm | शशिकांत ओक

सुरू झाले की ज्या कोणाला जायची इच्छा होईल त्यांनी मला अगोदर कळवले तर काही जागांचे मुद्दाम फोटो, व्हीडीओ शूट वगैरे काढणे शक्य झाले तर या लेखमालेचा सदुपयोग झाला आहे असे वाटेल.

दुर्गविहारी's picture

25 Aug 2020 - 10:18 pm | दुर्गविहारी

उत्तम, माहितीपुर्ण आणि विचारप्रर्वतक लेख ! प्राचीन्जलव्यवस्थापन अभ्यासायचे असेल तर बाजबहाद्दरच्या मांडू किल्ल्यातील जलव्यवस्थापन जरुर अभ्यासावे.