मोडी ब्लॉग

सांरा's picture
सांरा in काथ्याकूट
17 Aug 2020 - 1:09 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

मी मोडी लिपीसाठी एक ब्लॉग बनवला आहे. तसा हा ब्लॉग फार जुना (२०१७ मध्ये बनवलेला) आहे तरी बराच काळ दुर्लक्ष झाल्याने लिंक्स वगैरे काम करीत नव्हत्या. त्यामुळे मी सर्व गोष्टी पुन्हा अपलोड केल्या आहेत. मध्यंतरी तीन वर्षांत अनेक बदल झाले आहेत. युट्यूबवर अनेक चांगल्या मोडी शिकवण्या सध्या दृक श्राव्य माध्यमात उपलब्ध आहेत, त्यामुळे मी ब्लॉगचा जुना उद्देश (मोडी शिकवणे) बदलून इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टी एकत्र उपलब्ध करणे हा ठरवलेला आहेत. ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि तुमच्या काही सूचना किंवा अभिप्राय असतील तर कृपया नक्की कळवा.

प्रतिक्रिया

हा ब्लॉग तुमचा आहे तर, मला या ब्लॉगचा फार उपयोग झाला.

मी भारताबाहेर असल्याने महाराष्ट्रात सहज मिळणारी पुस्तके मला उपलग्ध नव्हती. इतर जी pdf पुस्तके मी वापरत होतो त्यात अक्षरे हाताने लिहिणे, गिरवणे, xerox ची स्कॅन करणे या कारणांमुळे इतकी सुबक दिसत नाहीत. तुमच्या blog मुळे मला त्यातले बारकावे दिसून एकसारखे दिसणाऱ्या अक्षरांमध्ये (उदाहरणार्थ या/मा/का/ला) फरक करता आला.

मी स्वतः बारकाईने एक बाराखडी तुमच्या ब्लॉगवरून कॉपी करून संगणकावर करत होतो, पण त्याला जास्त वेळ लागत होता, म्हणून हातानेच बनवली. ती, आणि एकसारखी दिसणारी अक्षरे यांचे एक cheat sheet यांच्या साह्याने मी जवळपास ८० मोडी अप्रकाशित पाने वाचू शकलो, त्याबद्दल खूप धन्यवाद.

शेवटी एक संपूर्ण बाराखडी टाकलीत आणि पुढे काय करावे (उदा. मंदार लवाटे/भास्वती सोमण यांचे सोपी मोदी पत्रे) याचे मार्गदर्शन केलेत तर अजून छान होईल ब्लॉग. मला अडलेले शब्द वाचण्यासाठी एखादा गुरू अथवा इतर अभ्यासक यांची कमी भासली, त्यासाठी एखादा अभ्यासक whatsapp ग्रुप असेल तर तो ही share करता येईल. आणि सगळ्यात शेवटी मुंबई, पुण्यात आणि इतरही ठिकाणी १०० ते २०० रुपये दर पान या दराने अनेक लोक मोडी कागद वाचून देतात त्याची माहिती असेल तर मग तो एक परिपूर्ण ब्लॉग होईल. (अर्थात तुमचा हेतू नवीन पिढीला शिकवण्याचा असल्यामुळे या सूचना तुमच्या मूळ हेतूही विसंगत वाटत असतील तर इतर कुठे ही माहिती टाकता येईल.)

सांरा's picture

18 Aug 2020 - 1:55 pm | सांरा

आपल्या प्रयत्नातून कोणालातरी फायदा होत आहे/झाला आहे हे कळणे फार आनंददायक आहे. प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

हे पान मी त्यामुळेच मोडीची सध्या वेब वर उपलब्ध असलेली सगळी साधने एका ठिकाणी मिळण्यासाठी मी बनवले आहे. त्यामध्ये अनेक साइट्स, व्हिडीओज, पुस्तके आणि एक फेसबूक समूह यांच्या लिंक्स मी दिलेल्या आहेत. बाराखडी मी लवकरच तिथे अॅड करीन.

हो, मी प्रतिसाद दिल्यानंतर पाहिलं. धन्यवाद.

नूतन's picture

17 Aug 2020 - 9:35 am | नूतन

नक्की बघते.

सांरा's picture

18 Aug 2020 - 1:56 pm | सांरा

प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2020 - 11:07 am | धर्मराजमुटके

खुपच स्तुत्य प्रयत्न.वेळ काढून तुमच्या प्रयत्नांनी बनलेला ब्लॉग बघून सावकाश प्रतिक्रिया देतो.

सांरा's picture

18 Aug 2020 - 1:58 pm | सांरा

प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. संपूर्ण ब्लॉग मिळून एकूण 50 पाने आहेत. फक्त मोडीचे पाठ मिळून कदाचित 20-25 पाने असतील.

शाम भागवत's picture

17 Aug 2020 - 11:39 am | शाम भागवत

खूपच चांगला प्रयत्न आहे. तुमचा ब्लाॅग वाचायला सुरवात केल्यावर, मोडी खूप अवघड आहे असे वाटेनासे झालंय.
_/\_

सांरा's picture

18 Aug 2020 - 2:45 pm | सांरा

प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. मोडी फार कठीण अशी लिपि नाही. जर पुरेसा वेळ असेल तर मोडी शिकला एक आठवडा फार आहे.

तुषार काळभोर's picture

17 Aug 2020 - 2:13 pm | तुषार काळभोर

आणि साईट खूप सुंदर बनवली आहे. इलुस्ट्रेशन्स अतिशय छान आहेत.
मोडी ही देवनागरीची 'कर्सिव' लिपी म्हणता येईल का?

तुषार काळभोर's picture

17 Aug 2020 - 3:11 pm | तुषार काळभोर

लैच बारकावे आहेत, जितकं पुढे जाईल तितकं!
अजूनच गुंतागुंत (pun intended) वाढत चाललीये!

यावेळी सगळे मिनिमल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या ब्लॉग मध्ये भगवा रंग आणि ब्लॉग डिजाइन अंगावर यायचे. फाफटपसारा पण फार होता.

मोडी ही देवनागरीची 'कर्सिव' लिपी म्हणता येईल का?

नक्कीच. जुन्या काळी सहसा बोरू मधली शाई संपेपर्यंत लेखनी वर उचलत नसत. देवनागरी मोडून मोडी बनली त्यामुळे तिचे नाव मोडी पडले असे बरेच अभ्यासक मानतात.