अथ स्त्रीलीळा ।

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
24 Jul 2020 - 2:50 pm

माझी एक मैत्रीण आहे. टू बेडरुममधे राहते. तिला एक नवरा(सुदैवानं एकच असतो.अधिक लफडी करण्याचे गटस् बहुतेक स्त्रियांमधे नसतात.) आणि दोन मुलगे आहेत. (दोन दोन मुलगे म्हणजे तिचा "स्त्रीजन्म धन्य" झालेला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात तिचा नवरा बेडरुममध्ये बसून लॅपटॉप जोडून वर्क फ्रॉम होम करत असतो. त्याला कॉनकॉल्स असतात. त्याला डिस्टरबन्स चालत नाही. एक मुलगा सेकंड बेडरुममधे आणि एक मुलगा हॉलमधे झूम वगैरेवर ऑन लाईन शिकत असतात. त्यांनाही शांतता लागते. डिस्टरबन्स चालत नाही. मग मैत्रीणीने बसायचं कुठे? तर स्वयंपाकघरात. गुपचूप. घरात टीव्ही लावायचा नाही. गाणी लावायची नाहीत. फोनवरही हळू आवाजात ,चोरट्यासारखं,घाईघाईनं,थोडक्यात बोलायचं.

हे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातलं अनेक घरातलं चित्र. स्त्रीचं स्थान स्वयंपाकघरात. मग ती नोकरी करत असो की नसो.अर्थात् हे मी मध्मवर्गीय स्त्रीबद्दल लिहतेय. कारण मी तिचंच प्रतिनिधित्व करतेय. मला पेज थ्री,कॉरपोरेट सेक्टरमधल्या उच्चपदस्थ स्त्रियांबद्ल आणि कष्टकरीस्त्रियांबद्दल आत्ता तरी बोलायचं नाही. कारण त्या जगाशी माझा जवळून परिचय नाही. तेव्हा स्त्रीलीळा मधे मी मध्मवर्गीय,उच्चमध्यमवर्गीय स्त्रियांबद्दलच लिहिणार आहे.

ही स्त्री स्वतःकडे नेहमीच कमीपणा घेते. तिच्याही नकळत. बहुतेक स्त्रिया ह्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा कमी दर्जाच्या पगारावर नोकऱ्या करतात. असं एक अर्थशास्त्रीय अहवाल सांगतो. एरवीही खुर्च्या आणि सतरंजी टाकली असेल तर ती पुरुषांना खुर्ची ऑफर करुन स्वतः सतरंजीवर बसेल. चमचे मोजकेच असतील तर पुरुषांना चमचे देईल आणि स्वतः बोटांनी खाईल.

हे थोडं सिरीयस होतंय ना?

ती नेहमी विनोदाचा विषय होते. "स्त्रियांना टक्कल का पडत नाही? कारण त्यासाठी डोकं असावं लागतं." किंवा 'कारचे उजव्या ,डाव्या बाजूंचे आरसे मागची वाहनं पाहण्यासाठी असतात. स्वतःचा चेहरा बघण्यासाठी नाही."- अशा प्रकारचे असंख्य विनोद तिच्यावर होतात. आत्मविश्वासाच्या अभावापायी तीही अनेकदा गोंधळल्यासारखी वागते.

ती जेव्हा रिक्षाने जाते तेव्हा रिक्षावाल्याला "डावीकडे वळा, उजवीकडे वळा"असं स्पेसिफिक न सांगता ती "इकडे वळा ,तिकडे वळा "असं सांगते. त्यामुळे रिक्षावाला गोंधळात पडतो.

तिचा नवरा गाडी चालवत असेल तर ती नवऱ्याला खूप सूचना करते. "अहो,अहो,(अरे)समोरून ट्रक येतोय". "तो हातगाडीवाला मधे येतोय.""हात दाखवा"."हळू चालवा. किती स्पीड!" त्यातून तिला स्वतःला गाडी चालवायला येत असेल तर विचारुच नका. नवऱ्याच्या शेजारी बसून तीच मनानं गाडी चालवत असते.

सूचना तर ती खाद्यपदार्थ बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या, उदाहरणार्थ डोसेवाला, सँडविच स्टॉलवाला, कॅन्टीनवाला, पाणीपुरीवाला यांनाही खूप करते. पानी तीखा रखो, मोठा चटणी मत डालो, बटर लावू नको, कांदा घालू नको, चीज कमी, तवा साफ करुन मग बनवा, ज्यादा करपने मत दो दोसा डोसा. वगैरे.

नवऱ्याच्या खिशातले उरलेले पैसै घेणे ही चोरी आहे असं ती समजत नाही. नवऱ्यानं धुवायला टाकलेल्या पँटच्या खिशामधे तसेच राहिलेले पैसे तिचेच असतात. ते घेणं म्हणजेही चोरी नव्हे.

तुम्ही रस्त्यानं चालला असाल आणि एखाद्या स्त्रीला विचारलंत,"इथं गुलमोहर सोसायटी कुठं आहे हो?" तर ती चेहरा मख्ख ठेवून,तोंडानं "च्यक्"असा आवाज करत म्हणते,"काही कल्पना नाही. माहीत नाही." ती राहते त्या परिसरातलंही तिला अनेकदा नीटसं काही माहीत नसतं. किंवा मग कशाला उगीच कोणा अनोळखी व्यक्तीशी जास्त बोलावे? असंही असेल. तेच एखाद्या तेरा/चौदा वर्षाच्या सायकलवाल्या पोराला विचारा. तो बरोब्बर पत्ता सांगतो.

एखादी बाई कार चालवत असेल तर तिच्या चेहऱ्यावर "बघा मी कार चालवतेय" असा 'भाव' असतो. स्टीयरिंग व्हील घट्ट धरलेलं असतं. पुरुष मात्र तुलनेत सहजतेनं गाडी चालवतो. अर्थात यामागे कारणं आहेतच. टु व्हीलर चालवतानाही बायका बऱ्याचदा दोन्ही पाय खाली सोडून चालवतात. कोणत्याही क्षणी थांबण्याच्या तयारीत असल्याप्रमाणे. मोठा क्यू लागला असेल तर अनेक स्त्रिया थेट रांग मोडून पुढे येतात किंवा रांगेत कोणालातरी विनंती करता येते का ते पाहतात.

नटण्यामुरडण्याची आवड प्रत्येक माणसाला असते. आपण सुंदर दिसावं असं सर्वांनाच वाटतं. स्त्रीही त्याला अपवाद नाही. पुरुषाला आकर्षित करण्यासाठी नटणं ही सहज प्रवृत्ती आहे.
इतरांवरचा विशेषतः सासूवरचा राग नवऱ्यावर ,मुलांवर काढणे,नवरा उशीरा आला तर त्याच्यावर संतापणे हा तर तिचा हक्कच आहे. नवऱ्यावर वेळप्रसंगी अगदी बॉसिंगही करणे हे तिचं खास वैशिष्ट्य. तुम्ही नीट पाहिलंत तर खूप घरांत स्त्री बॉस असते. प्रेमानं, कधी चुचकारुन, कधी कष्ट करुन, कधी सुंदर दिसून, कधी पैसे कमवून,कधी प्रेम वगैरे करुन ,कोणत्याही मार्गाने पण ती अधिकार गाजवते. ह्याला अपवाद आहेतच.

कोणत्याही गोष्टीत,"तुम्हां पुरुषांना नाही कळणार ते"असं म्हणून त्या पुरुषाला 'गिल्ट'देतात.

अनेकींना आधुनिक जगाची माहिती नसते. ती करून घेण्याची इच्छा नसते. बातम्या ती फारश्या लक्ष देऊन पाहत नाही. तिला सासू सूनेच्या सिरियल्स मनापासून आवडतात. हो! उगीच खोटं कशाला बोलायचं? त्यामुळंच तिला डोनाल्ड ट्रंप, क्षी जिनपिंग, जीडीपी, रुपायाचं घसरणं,अंदाजपत्रक, निवडणुका यांत स्वारस्य नसतं. तिच्या ह्या अज्ञानामुळे तिला तुच्छ लेखायची संधी पुरुष सोडत नाहीत. नवरा, मुलं,अगदी नातवंडंही "तुला काही कळत नाही" असं बेलाशक बोलतात. तिला उपदेश करतात. ती चिडते पण निमूटपणे ऐकून घेते.

लांबच्या प्रवासात जिथं प्रथम टॉयलेट उपलब्ध आहे तिथं जाण्याची संधी न घेता ,"मला नाही लागलेली"असं म्हणून पुढे निर्जन ठिकाणी किंवा अवघड जागी "आता मला लागलीय.
टॉयलेट दिसलं की गाडी थांबव"असं ती बिनदिक्कत म्हणते.

बाळंतपण,प्रसूतीवेदना, मासिक पाळी ह्या बाबतीत पुरुषांना कळत नसतं. त्याचा फायदा घेऊन त्यांना ताण देणं आणि क्वचित त्यांची मजा बघणे हे ती वेळप्रसंगी करु शकते.

"आईची आठवण आली" असे सांगून चेहरा मलूल करुन ती पुरुषाला हतबल करु शकते.

आपल्या कष्टाचं ह्या घरात चीज होत नाही. त्या अमक्या तमक्याचं स्थळ सांगून आलं होतं पण......असे म्हणून पुरुषाला नमवणं तिला चांगलंच जमतं.

तर अशा ह्या स्त्रीलीळा! ती तिच्या मनाचा थांगपत्ता लागू देणार नाही. तिच्याशिवाय ही दुनिया चालणार नाही. बच्चू! संभलके।

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

24 Jul 2020 - 3:02 pm | श्वेता२४

मी तुमची पंखा आहे. उपरोक्त लेखातील तिचा नवरा गाडी चालवत असेल तर ती नवऱ्याला खूप सूचना करते. टु व्हीलर चालवतानाही बायका बऱ्याचदा दोन्ही पाय खाली सोडून चालवतात. कोणत्याही क्षणी थांबण्याच्या तयारीत असल्याप्रमाणे. हे दोन्ही मला लागू पडतं. बाकी इल्ला! पण तुमच्या लेखीतील इतर हो,्टी कुठल्या ना कुठल्या स्त्रीयांमध्ये पाहिली आहे, त्यामुळे लेख अगदी खुसखुशीत झालाय.
कोणत्याही गोष्टीत,"तुम्हां पुरुषांना नाही कळणार ते"असं म्हणून त्या पुरुषाला 'गिल्ट'देतात.
हहपुवा
"आईची आठवण आली" असे सांगून चेहरा मलूल करुन ती पुरुषाला हतबल करु शकते.
तुमचं निरीक्षण भारी आहे.

ही सगळ्यात त्रासदायक गोष्ट!!
श्रावण

मी खाली लाईक च बटान शोधत होतो :)

श्वेता२४'s picture

24 Jul 2020 - 3:04 pm | श्वेता२४

आजारी वाटत असताना काय होतंय म्हणून विचारलं की 'कसंतरी होतंय' हे ठरलेले उत्तर! ;)

डॅनी ओशन's picture

24 Jul 2020 - 3:43 pm | डॅनी ओशन

मस्त लिहिलंय हो आज्जीबाई.

टवाळ कार्टा's picture

24 Jul 2020 - 6:39 pm | टवाळ कार्टा

आयडी आवडला

- रस्टी

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 Jul 2020 - 3:58 pm | हणमंतअण्णा शंकर...

सूचना तर ती खाद्यपदार्थ बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या, उदाहरणार्थ डोसेवाला, सँडविच स्टॉलवाला, कॅन्टीनवाला, पाणीपुरीवाला यांनाही खूप करते. पानी तीखा रखो, मोठा चटणी मत डालो, बटर लावू नको, कांदा घालू नको, चीज कमी, तवा साफ करुन मग बनवा, ज्यादा करपने मत दो दोसा डोसा. वगैरे.

माझी एक अत्यंत बिची मैत्रीण हॉटेलात गेल्यावर वेटरला तोडक्या हिंदीत आख्खी रेसिपी सांगते. शेवटी वेटर नाईलाजाने आतून "चेफ" ला घेऊन येतो. मग त्याला ती अत्यंत लाघवीपणाने सुंदर इंग्रजीत तिला जे आणि जसं हवं ते पुन्हा यथासांग सांगते. तिच्या ज्ञानाने स्तिमित झालेला चेफ मग स्वतःचे सर्व कौशल्य पणाला लावून तिला हवे तसे पदार्थ धाडून देतो. केवळ तिच्याच मुळे हॉटेलात बेचव पदार्थ खावे लागत नसल्यामुळे मी तिच्या ताटाखालचे मांजर होतो. झोमॅटो गोल्डचा पुरेपूर उपभोग घेता आला तिच्या कृपेने.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2020 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा

आज्जीबाई , सलाम तुम्हाला!

वीणा३'s picture

25 Jul 2020 - 1:32 am | वीणा३

माझ्या नवऱ्याचे २ पैसे :P
१. जेवण काय करू असं नवऱ्याला विचारल्यावर तो जो पदार्थ सांगेल तो न करणे
२. २ गोष्टी संपल्या आहेत म्हणून दुकानात गेला कि फोनवरून मोठी लिस्ट पाठवणे
३. फोन वेळच्या वेळी अपडेट/क्लीन न करणे.
४. गाडीचे वेग वेगळे वॉर्निंग लाईट्स बघायचं विसरणे
५. जेवायच्या वेळेपर्यंत काय जेवायला मिळणार आहे याचा पत्ता नसणे.
६. कायतरी पदार्थ बनवायचा प्लॅन केला कि नेमका महत्वाचा पदार्थ घरात नसणे , मग तो आणण्यासाठी त्याच्या मागे लागणे. आणायला मी पण जाऊ शकते, पण मी गेले तर त्याला मुलं सांभाळायला लागतील म्हणून तो जातो लगेच :D
७. कोणाबरोबरही फोन वर २-३ तास बोलू शकणे, मग ती मैत्रीण असो, आई असो किंवा नणंद असो.
८. घरभर केस पडणे (ह्यात माझी चूक नाहीये, माझी मोठा (लहान असताना) आणि आता छोटा माझ्या केसाला दोरी असल्यासारखे धरून उभे राहतात. त्यामुळे जे केस नीट बांधले असले तरी असे गळतात कि विचारू नका, ते दोघे बाहेर असतील तर अजिबात नाही गळत)

आजारी वाटत असताना काय होतंय म्हणून विचारलं की 'कसंतरी होतंय' हे ठरलेले उत्तर! ;) - अगदी सेम. हे कसातरी म्हणजे काय ला उत्तर नसणे.

स्वच्छंद's picture

25 Jul 2020 - 12:38 pm | स्वच्छंद
गवि's picture

29 Jul 2020 - 10:06 am | गवि

हॅहॅहॅ..

आणखी काही

गरीब बिचाऱ्या भाजीवाल्याने काही का किंमत लावली असेना, त्यात आणखी दोन पाच रुपये कमी करायला लावणे. भाजीवाले स्त्रियांना बहुधा अगोदरच सरचार्ज लावून किंमत सांगत असावेत.

कपडेच नव्हे तर कोणत्याही वस्तूबाबत आणखी व्हरायटी उपलब्ध आहे का हे विचारणे / शोधणे (रंग, किंमत, क्वालिटी वगैरे बाबतीत). सर्व शक्य कोटीतले चॉईस पाहून झाल्याशिवाय प्रत्यक्ष खरेदी न करणे.

आपल्या नवऱ्याबद्दल त्याला अजिबातच काही दुनियादारी जमत नाही असा आत्मविश्वास असणे. (टीप: इन जनरल आहे हे. यात अस्मादिकांचा काही व्यक्तिगत अनुभव आहे असे मानू नये अशी लम्र विनंती इ इ )

पियुशा's picture

29 Jul 2020 - 10:58 am | पियुशा

अजुन एक नवरयाकडून दर महिन्याला पॉकेट मनी घेऊन झालेले खर्च डबल करूँ सांगणे न पैसे शंपे म्हणून पुन्हा पैसे उकळ ने ;)

जगप्रवासी's picture

30 Jul 2020 - 3:58 pm | जगप्रवासी

नवऱ्याला दहावेळा विचारतील जेवणाला काय करू आणि नवऱ्याने कुठलाही पदार्थ सांगितला तरी तो या गेल्या दिवसांत कसा झाला किंवा आता कसा बनवू शकत नाही हे पटवून देऊन "मग अमुक तमुक बनवते" असं बोलून स्वतःच्या मनातला पदार्थ बनवतात

नावातकायआहे's picture

30 Jul 2020 - 5:43 pm | नावातकायआहे

आज्जे
दंडवत!!

Bhakti's picture

30 Jul 2020 - 9:24 pm | Bhakti

बहुतेक स्त्रिया ह्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा कमी दर्जाच्या पगारावर नोकऱ्या करतात. असं एक अर्थशास्त्रीय अहवाल सांगतो.

"अगदी comfort zone तोडायला खुप खुप तडजोडी कराव्या लागतात,ते जमलं पाहिजे."योग्य लिहलय.

. एरवीही खुर्च्या आणि सतरंजी टाकली असेल तर ती पुरुषांना खुर्ची ऑफर करुन स्वतः सतरंजीवर बसेल. चमचे मोजकेच असतील तर पुरुषांना चमचे देईल आणि स्वतः बोटांनी खाईल.

हो ना ..ही सवय कधी सुटेल स्त्रीयांची काय माहित..

अगदी अफलातून निरीक्षण.. आवडलं

आज्जी,

लेख काही इतका आवडला नाही. या विषयावर पीएच.डी. केलेले लोक्स आहेत मिपावर (की होते? #पुमिराना!) भरपूर लिहू शकला असता. कुठे गेल्या त्या पाशवी शक्ती? कुठे गेले ते त्यांच्याविरुद्ध आयडी पणाला लावून लढणारे क्रांतिवीर? अरेरे! पुन्हा एकदा पुमिराना!

(तुमच्या धाग्याला शतकवीराचा सन्मान मिळावा ह्यासाठी ही हळूच लावलेली काडी!)

Prajakta२१'s picture

1 Aug 2020 - 12:22 am | Prajakta२१

चांगला लेख
तर अशा ह्या स्त्रीलीळा! ती तिच्या मनाचा थांगपत्ता लागू देणार नाही. तिच्याशिवाय ही दुनिया चालणार नाही. बच्चू! संभलके।>>>>>>>>>>
कार्यालयीन जीवनात स्त्रियांचे राजकारण जवळून पहिले आणि अनुभवले असल्याने वरील वाक्य तंतोतंत जुळते
स्त्रीलीलेवरून आत्तापर्यंतच्या वरिष्ठ स्त्रिया आणि त्यांच्या लीला आठवल्या (त्यात चांगल्या लीला पण आहेत )
अवांतर:
कार्यालयात स्त्री-पुरुष गुणोत्तर ५०-५० असले कि समतोल साधला जातो
जास्त बायका किंवा पुरुष आले कि समतोल बिघडतो (हे दोघांनी करू शकणाऱ्या कार्यक्षेत्रांबाबतीत आहे.
जिथे फक्त स्त्रिया /पुरुषांची मक्तेदारी/हातखंडा असलेली क्षेत्रे नाही )

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Aug 2020 - 3:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख मस्तच जमलाय, पण अजुनही काहीकाही अ‍ॅडवता आले असते.
--मनातले ओळखावे (नवर्‍याने) अशी अपेक्षा असणे--उदा. बाहेर गेल्यावर हॉटेलमध्ये काय मागवायचे? मुले म्हणणार पिझ्झा, मी म्हणणार साउथ ईंडीयन आणि बायको म्हणणार रोटी भाजी. आता असे काँबिनेशन आणायला वेटरला काहीच हरकत नसते, त्याला फक्त पैशाशी मतलब. पण बायको म्हणणार, नको. मला एकटीला एव्हढे जाणार नाही, त्यापेक्षा मी पण साऊथ ईंडीयन खाते.
आणि खाउन बाहेर पडलो, की "खरेतर आज मी दुपारी नीट जेवलेच नाहिये, त्यामुळे रोटीभाजी पोटभर झाली असती." घ्या म्हणजे आता पुढचे २ तास आपल्याला गिल्ट येणार.
--शेजार्‍याने/मित्राने काही वस्तू किवा पैसे उधार मागितले की आपल्याला औदार्याचा पुळका येणार तोच बायको डोळ्याच्या कोपर्‍यातुन काहीतरी खाणाखुणा करताना दिसते. आता सगळेच समोरासमोर असल्याने स्पष्ट बोलता येत नाही आणि वस्तु देउन टाकली जाते. त्यानंतर पुढचा १ तास आपल्याला व्यवहार ज्ञान कसे नाही आणि लोक आपल्या भोळ्या स्वभावाचा कसा फायदा घेतात, हे ऐकणे आले.
---सासर/माहेरचे लोक--जाउदे, हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे, नव्हे पुस्तकाचा म्हटले तरी चालेल (मी होते म्हणुन ईतकी वर्षे काढली, दुसरी असती तर....)

स्वधर्म's picture

5 Aug 2020 - 12:54 pm | स्वधर्म

हे जबरदस्त वाक्य राहिलं की! कोणताीही गोष्ट ठरवताना आपली निवड ठोस सांगायची नाही, फक्त मोघम बोलायचं, किंवा काहीपण चालेल असंही. पण जर का निवड चुकली, तर मात्र वरील वाक्याचा प्रसाद द्यायचा. टीप: हे वाक्य कोथिंबीरीच्या पेंडीपासून फ्लॅटपर्यंत सार्या गोष्टींना लागू आहे.

श्वेता२४-तुम्ही माझ्या पंखा आहात.हे वाचून आनंद झाला. माझं निरीक्षण भारी आहे असं वाटतं तुम्हांला?थँक्यू.

पैलवान-चिडक्या मांजरीचे फोटो आवडले. किती बोलकी प्रतिक्रिया!वा! मस्त.

ईश्वरदास-तुम्हांलाही चिडकी मांजर आवडली वाटते!
श्वेता२४-कर्रेक्ट!

डॅनी ओशन- धन्यवाद

टवाळ कार्टा-आयडी आवडला. रस्टी.-काय बोलणार!

हणमंत अण्णा शंकर-अगदी बरोब्बर वर्णन.

अत्रुप्त आत्मा-"आजीबाई सलाम तुम्हांला"तुम्हांलाही वालेकुम सलाम.

वीणा३-तुम्ही तर पाच सहा नव्या गोष्टी अँड केल्यात!ब्राव्हो.

गवि-"अभिप्राय इन जनरल आहे.व्यक्तिगत अनुभव नाही. "असं कितीही लिहलंत तरीही अंदरकी बात समझनेवाले समझ गये है!

पियुशा-नवऱ्याकडून तुम्ही सांगितलेला पैसे उकळण्याचा मार्ग बायका अवलंबतातच.

जगप्रवासी-तुमची अँडीशन आवडली. योग्य तेच लिहिलंयंत.
नावात काय आहे-"आज्जे ,दंडवत."आशीर्वाद पुत्रा!

Bhakti-"अफलातून निरीक्षण. आवडलं. योग्य लिहिलंय."अभिप्राय वाचून समाधान वाटलं.

एस्-तुम्ही काडी लावलीत खरी,पण फारसा भडका उडाला नाही.

प्राजक्ता-"चांगला लेख" थँक्यू. याबद्दल धन्यवाद. कार्यालयात ५०/५० हे गुणोत्तर पाहिजे. हे तुमचं म्हणणं पटलं.

राजेंद्र मेहेंदळे-"लेख मस्त जमलाय"असं म्हणून तुम्हीही एक,दोन मुद्दे अँडवले आहेत. ते एकदम पटले.

स्वधर्म- तुमचं म्हणणं अगदी खरं.गमतीदार.