भाग २ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय. - ४. तळघरातील बंद खोल्या ५. बा(पा)दशाह नाम्यातील ४०२ -४०३ पानांचा संदर्भ

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
20 Jun 2020 - 2:09 am
गाभा: 

भाग २ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय.

४.तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले जाणे.
५. बादशाहनामामधील ४०२-४०३ पानावरील भाषांतरातून निर्माण होणारे निष्कर्ष.

४.तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले जाणे

कै. ओकांच्या लेखनातून ताजमहालाच्या तळघरात काही असे अवशेष दडवले असावेत कि ते इतरत्र कुठेही ठेवले तर गवगवा होऊन त्यातून त्या काळातील जनतेत असंतोष पसरेल. त्यापेक्षा तिथल्या तिथेच ते खोलीत बंद करून टाकले तर सोईचे होईल. असे मत मांडले आहे.
शहाजहानचा उद्देश पत्नीच्या सन्मानार्थ तिच्यासाठी कबर बनवायचा होता असे असेल तर मग सात स्तरावरील बांधकामात इतर तळघरात पासून ते इतर - सवाल-जबाब इमारती, नगारखाना व समोरच्या जिलूखाना इमारतीत व आसपासच्या कबरी, खोल्या बांधायची गरज काय?
याचे कारण म्हणजे या इमारती ऐत्या तयार होत्या. म्हणून ताब्यात घेतल्या गेल्या कालांतराने त्यांची उपयोगिता संपल्यावर त्यातील नको असलेल्या वस्तू अडगळीचे सामान म्हणून त्या खोल्यात टाकून वरून विटांनी त्या खोल्या बंद केल्या गेल्या. वगैरे वगैरे…

एबा कोच 'दि कंप्लीट ताजमहाल' पुस्तकात यावर काय प्रकाश टाकतात?
तहखाना या शीर्षकाखाली पान १४८ वर इतरांना ज्या तहखान्यात खाली जायला शक्य नाही तिथे त्या गेल्या. तिथल्या विटांचे बांधकाम करून बंद केलेल्या भागाचे क्र.२११,२१२, २१३ फोटो सादर केले आहेत. ते तहखाने का बंद केले असावेत यावर त्यांनी भाष्य अपेक्षित आहे त्या काय म्हणतात ते समजून घेऊ.
पान १४८ वर २ फोटो व १आकृतीमधून त्या समजावून देतात.

1

(ताजमहालाची मुख्य संगमरवरी इमारत लाल रंगाच्या दगडी चौथर्‍यावर उभी आहे.) त्या लाल चौथर्‍याच्या यमुना नदीच्या पात्राकडील बाजूला चौथर्‍याच्या पोटात एक 'गॅलरी' (जिथून राजाच्या राण्या आपल्या लवाजम्यासह ताजमहाल पहायला येत तेंव्हा नदीपात्रातील रम्य संध्याकाळ, गारवा अनुभवता यावा म्हणून ती गॅलरी वापरली जात असली पाहिजे. (त्या must शब्द वापरतात.) आता तिथे प्रकाश व्यवस्था नष्ट आहे.
सात कमानींचा तहखान्यातील टेरेस म्हणून उल्लेख औरंगजेबाने आपल्या सन १६५२मधील अहवालात ('तहखाना ई कुर्सी हफ्तादर' ) केला होता. सध्या या तहखाना टेरेसला जायला दोन्ही बाजूला खाली उतरायला जिने आहेत. सध्या ते लोखंडी जाळ्यांनी बंद करून टाकले आहेत. त्यामुळे अंधारी मार्ग पुढे कुठे-कुठे जात असावा याचे विविध तर्क लोक करत राहतात.

1

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या सात मोठ्या खोल्या भिंती बांधून बंद केलेल्या दिसतात, त्यांचे तोंड यमुना नदीच्या बाजूला उघडते. (थोडक्यात त्या बंद भिंतीला पाडून फार तर यमुना नदी दिसेल अर्थात त्या तसे लेखी म्हणताना दिसत नाहीत.) भिंती का व कोणी बांधल्या? याचा खुलासा त्यांच्या लेखनात दिसत नाही. विषयाला कलाटणी देऊन - अशा प्रकारची रचना लाहोरच्या मुगल लाल किल्ल्यातील शीशबुर्ज महालात (रावी?) नदीच्या पात्राकडे तोंड करून दिसून येते. असे म्हणून सोडून देतात.
इंग्रजी काळात सन १८७४ मधे J W Alexander यांनी तहखान्याचा उल्लेख केला होता. नंतर लॉर्ड कर्झनच्या कारकीर्दीत त्यांनी विशेष पुढाकार घेऊन ताजमहालाची शान ओळखून अत्यंत दुर्लक्षित भागांची साफ सफाई करून घेतली आपल्या विचारांप्रमाणे बागेत विलायची झाडांची निवड करून बागेची शोभा वाढवली वगैरे इतरत्र वाचायला मिळते. परंतु त्यांनी या बंद भिंती बाबत आत काय असेल? याची उत्सुकता म्हणून नोंद घेतली नसल्याचे लक्षात येते. त्यांनी आणखी काय केले याची नोंद पुढील भागात येईल.

५. बादशाहनामामधील ४०२-४०३ पानावरील भाषांतरातून निर्माण होणारे निष्कर्ष.

कै. ओकांनी आपल्या पुस्तकात अब्दुल हमीद लाहोरींच्या पादशाह नाम्यातील छापलेल्या Vol 1 मधील ४०२-४०३ पानावरील मजकूराची दखल एबा कोच यांनी घेतलेली नाही. जानेवारी १६३२ मधे ताजनहालाची (बुनियाद) पाया बांधायला सुरवात झाली. मात्र दुसऱ्या उरुसावेळी दि २६ मे १६३३ रोजी काय घडले ते पान ९८वर त्यांनी आवर्जून सांगितले आहे. तो पर्यंत ताजमहालाचे बांधकाम कुठवर आले होते याचे चित्रही सादर केले आहे. पण कुठेही मुळ फारसी लेखनाचे उतारे त्यांनी दिलेले नाहीत. पान २५६ वर मात्र मुमताज महलच्या १२ व्या मृत्यु दिनाच्या निमित्त १६ फेब्रुवारी १६४३च्या रात्री साजरा झालेल्या उरुसाच्या सोहळ्याचे सविस्तर वर्णन बादशाह नाम्यातील संदर्भातून दिले आहे. (बहुतेक तो Volume II असावा) त्या तसा उल्लेख करताना दिसत नाहीत. पण सामान्य माहिती प्रमाणे पहिल्या दहा वर्षाच्या शहाजहानच्या कारकीर्दीसाठी पहिला व पुढच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीचा दुसरा भाग Volume II लिहिला होता. नंतर ते काम त्यांच्या शिष्याने चालू ठेवले. महंमद सालेह कानबो यांनी देखील शहाजहाननामा उर्फ ‘अमल ए सलीह’ नामक ग्रंथ खाजगी पातळीवर लिहिला होता. त्यांचा संदर्भ पण एबा कोच यांच्या काही ठिकाणी केला आहे.
त्याची दखल नंतरच्या भागात येईल.
….
पुढील भागात...
६. नगारखाना
७. गोशाळा
८. बावडी.

प्रतिक्रिया

ताजमहाल हा औरंगजेबाच्या काळात होता . म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्या वेळेस असायला हवा.
ती जर इतकी महत्वाची वास्तू असेल तर शिवाजी महाराजांच्या कोणत्याच इतिहासात ताजमहालाचे ( किंवा तत्सम वास्तुचे ) वर्णन कुठेच येत नाही

विजुभाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक घटनांचे तपशील उपलग्ध नाहीत. अगदी महत्वाच्या घटनेबद्दलही आपण फक्त तर्काचा आधार घेऊ शकतो, अस्सल पुरावे नाहीत. उदाहरणे कितीतरी आहेत, जसे महाराज आग्र्यातून कसे निसटले, परत येण्याचा मार्ग काय होता, संभाजी महाराज नक्की कसे कोणत्या मार्गाने आले, वाटेत काय संकटे आली इत्यादी. फार काय, महाराजांच्या जन्मतारखेबद्दलही वाद होता. तीच कथा पन्हाळा ते विशाळगड प्रवासाची. अगदी ऐन पेशवाईत शिवाजी महाराजांचे कोणतेही चित्र आपल्याकडे नव्हते (किंवा आपल्यापर्यंत पोचले नाही म्हणा). या परिस्थितीत अनेकांनी आपल्या कल्पनेच्या वारूवर स्वार होऊन आपल्याला योग्य वाटतील ते तपशील आपल्या लिखाणात बेधडक वापरले आहेत. अश्या परिस्थितीत ताजमहालाचे काय घेऊन बसलात, तसा अस्सल उल्लेख मिळणं कठीण, किंबहुना अशक्य आहे.

आज राष्ट्रपती भवन पहायला जायला सामान्य माणसाला जितके जिकिरीचे असते तसेच त्या काळातील लोकांना राजा, त्याचा वाडा, आतील वास्तू प्रयत्न करून पण पहायला अशक्य होते. सिवाला(त्याच्या मुलाला) तिथे मांडलिकत्व देण्याच्या कारवाईसाठी बोलावले होते. ते ही मिर्झाराजे जयसिंगांच्या आग्रहाने. त्यामुळे ताज महाल पहायचा विचारही त्यांनी केला नसेल, पण रामसिंहाशी भेटीत आग्ऱ्याच्या आसपासच्या परिसरातील महत्त्वाचे सरदारांच्या हवेल्या, जकात चौक्या, परतीच्या वाटेवरचे सरायांचे मुख्य लोक, कर्ज देणाऱ्या साहूकारांच्या पेढ्या, हलवायाच्या मिष्टान्न भांडारांची माहिती, पंडित पंडे यांच्या बाबत जितकी मिळेल तशी माहिती काढून आपल्या लोकांना कामाला लावायला हालचाली करायला शक्य झाले असेल.
या दरम्यान शहाजहानला गादीवर बसवायला माझ्या वंशजांनी कशी मदत केली वगैरे सांगताना ताजमहालाचा विषय निघाला असायला नक्कीच शक्य आहे.
औरंगजेब दिल्लीची राजधानी सोडून आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात राहायला येण्याचे कारणच शहाजहानचा मृत्यू हे होते. आठ वर्षांच्या प्रदीर्घ एकांतवासात खितपत राहून तो मृत्यू जानेवारी १६६६ मधे झाला. त्याच्या संगमरवरी कबरीचे काम मे महिन्यापर्यंत बांधकाम चालू असले पाहिजे. म्हणजे एका अर्थाने ताजमहालाचा विषय ताजा होता. म्हणून ताजमहालाच्या संदर्भात चर्चा नक्कीच झाली असेल. (हे माझे विचार आहेत. कै पुना ओकांच्या बोलण्यात ताजमहालाच्या आसपासच्या परिसरातच कुठे तरी सिवाला नजरकैदेत ठेवले गेले असावे असे येत असे.)

शहाजहानचा उद्देश पत्नीच्या सन्मानार्थ तिच्यासाठी कबर बनवायचा होता असे असेल तर मग सात स्तरावरील बांधकामात इतर तळघरात पासून ते इतर - सवाल-जबाब इमारती, नगारखाना व समोरच्या जिलूखाना इमारतीत व आसपासच्या कबरी, खोल्या बांधायची गरज काय?
याचे कारण म्हणजे या इमारती ऐत्या तयार होत्या. म्हणून ताब्यात घेतल्या गेल्या कालांतराने त्यांची उपयोगिता संपल्यावर त्यातील नको असलेल्या वस्तू अडगळीचे सामान म्हणून त्या खोल्यात टाकून वरून विटांनी त्या खोल्या बंद केल्या गेल्या. वगैरे वगैरे…

इथे तर्काचा अतिरेक झालेला आहे. ताजमहालच्या आधीची आणि नंतरची अनेक थडगी आजही आहेत. त्या सगळ्यांमध्ये अश्या प्रकारची बांधकामे सापडतात. त्यामुळे तशी एक पद्धत अथवा architecture पॅटर्न होता, एवढंच. त्या इमारती आधी होत्या असं म्हणायचं असेल तर त्याला भक्कम अस्सल पुरावा हवा. तो आजवर माझ्या पाहण्यात आलेला नाही.

पु नां च्या पुस्तकातील बादशाहनाम्याच्या उल्लेखात मंझील-इ-आलिशान व गुंबझ ह्याच शब्दांचा उल्लेख आला आहे, तो ही जयसिंगच्या त्या जागच्या जुन्या हवेलीचा उल्लेख म्हणून.मराठीत आलिशान या शब्दछटेचा अर्थ फार्सीमध्ये थोडा वेगळा म्हणजे एक उत्तम दर्जाचे घर असा घेता येतो. त्यावरून फार तर तिथे एक घर होते एवढे म्हणता येईल. जयसिंगच्या दप्तरातले काही कागद आजही राजस्थान स्टेट अर्काव्हिस बिकानेर येथे आहेत. त्यातून या घराचा काही उल्लेख मिळत नाही, आणि ते जाण्याचे जयसिंगला काहीही वाईट वाटलेले दिसत नाही. त्याचे वंशज पुढच्या ३ पिढ्या मोगल बादशहाच्या सेवेतच होते.

पुण्यात शनिवारवाड्याच्या जागेवरही पूर्वी जुनी घरे होतीच, त्यांना मोबदला देऊन दुसरीकडे जागा दिली, आणि मग ती घरे पाडून तिथे पेशव्यांनी वाडा बांधला. यावरून अशी प्रथा त्या काळात मोगलातच नव्हे तर मराठ्यातही प्रचलित होती.

आग्ऱ्याच्या यमुना नदीच्या काठावर काहींच्या कबरी पडीक तर काही सुव्यवस्थित अवस्थेत आहेत. त्यांचे तपशील एबा कोच यांनी सांगितले आहेत. नंतरच्या भागात त्यांवर लिहायची वेळ येईल. पाहू माझा उत्साह किती काळ टिकतो ते!

इथे तर्काचा अतिरेक झालेला आहे. ताजमहालच्या आधीची आणि नंतरची अनेक थडगी आजही आहेत. त्या सगळ्यांमध्ये अश्या प्रकारची बांधकामे सापडतात. त्यामुळे तशी एक पद्धत अथवा architecture पॅटर्न होता, एवढंच. त्या इमारती आधी होत्या असं म्हणायचं असेल तर त्याला भक्कम अस्सल पुरावा हवा. तो आजवर माझ्या पाहण्यात आलेला नाही.

कुठल्या त्याची माहिती सादर केली आहे.
इतिहासकारांना भर कागदावर कुठले पुरावे सापडतात यावर जास्त अवलंबून असतो. हातच्या काकणाला आरसा कशाला? आजही असे आता पडीक झालेले वाडे ,हवेल्या आहेत. त्यांच्या तळघरांची रचना, मांडणी, नदीकाठी वास्तू उभारायला नदीच्या तिरावर काय काय नियोजन करावे लागले असेल? त्याला कोणते मटेरियल वापरले गेले असेल? याची प्रात्यक्षिके करायला काय हरकत आहे? जसे मी पुर्वीपासून म्हणतो कि गंजत पडलेल्या तोफा, गोळे यांचे फायरपॉवर डेमॉन्सट्रेशन व्हायल हवे. ते ही आर्मीच्या देखरेखीखाली... मग कळेल त्यांची मारक क्षमता वगैरे...

ताजमहाल ही पाहण्याची वस्तू तेव्हा नसावी कारण ती कबर आहे. जन्नत ( स्वर्ग) याची कल्पना बऱ्याच धर्मांत, मनुष्यगटांत होती. प्रत्येकालाच स्वत:/ प्रिय मेल्यावर स्वर्गात जावे असे वाटते. किंवा कबरीभोवती स्वर्ग करावासा वाटतो. श्रीमंतांना हे अधिक शक्य होते. पर्शिअन कल्पनेप्रमाणे स्वर्गात चार बाग, कारंजे आणि पाच स्वर्गीय फळझाडे आहेत. तसेच ताजमहाल परिसरात घडवले गेलेले. पाणी देण्यासाठी सर्वबाजूंनी जो खोल्यांचा रूंद कट्टा आहे त्याच्या गच्चीवर नाला आहे. त्याचेच पाणी खालच्या कारंज्यांत उडायचे. ( हिस्ट्री चानेल फिल्म आहे.) त्याकाळी पखालीने वरती पाणी आणून घालणारे पाणके राबवले जात.
ब्रिटिशांनी ती फळझाडे उडवली आणि दुसरी पाणी न द्यावी लागणारी उंच झाडे लावली.
अर्थात हे त्यावेळी कडेकोट बंदोबस्तात असणार. फक्त माळी जात असतील. तिथे जनता किंवा शिवाजी कुठून जाणार?

शशिकांत ओक's picture

21 Jun 2020 - 9:05 pm | शशिकांत ओक

1

झाडू-बादली घेतलेले नमाजी टोपीवाल्याचे जोडपे तिथले सफाई कामगार असल्यासारखे वाटतात. अशा किंवा यांच्या वरिष्ठ मुकादमांकडे कुलुपाच्या किल्या असायची शक्यता आहे...
आपले मत काय पडते ... अशा लोकांना हाताला धरून काही माहिती काढता येईल काय?

शाम भागवत's picture

21 Jun 2020 - 9:13 pm | शाम भागवत

व्वा! छान कल्पना!

शशिकांत ओक's picture

21 Jun 2020 - 9:12 pm | शशिकांत ओक

ताजमहाल ही पाहण्याची व(वा)स्तू तेव्हा नसावी कारण ती कबर आहे.

उरुसाला दर वर्षी सुरवातीपासून हजारोंची गर्दी होत असे... तो विषय नंतरच्या भागात कुठे तरी येईल... कदाचित खुद्द कबरीपर्यंत आत जायला मात्र सगळ्यांना शक्य होत असेल असे नाही हे मात्र खरे...
मात्र इतर दिवशी आजकालच्यासारखे पहायला शक्य नसणार... वर्षांतून एकदा हवाईदलातील विमाने जनतेला पहायला सोडतात तसे काहीसे...

गामा पैलवान's picture

23 Jun 2020 - 3:02 am | गामा पैलवान

मनो,

ताजमहालच्या आधीची आणि नंतरची अनेक थडगी आजही आहेत. त्या सगळ्यांमध्ये अश्या प्रकारची बांधकामे सापडतात.

मोगलांच्या राज्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात तिचं घर सरकारजमा होत असे. असे होऊ नये म्हणून काही मृतांचे वंशज घरात कबर बांधीत. जेणेकरून बादशहास ते घर ताब्यात घेता येणार नाही.

असंच काहीसं धोरण राबवून मूळ हिंदू वास्तूंची थडगी बनवली नसतील? एक शंका आली मनात. कारण की मुस्लिम वास्तू सगळ्या कबरी आणि थडगी कशी. भरजरी थडग्यांत चिरनिद्रा घेत पहुडलेले हे राज्यकर्ते जिवंतपणी कुठे रहात होते?

आ.न.,
-गा.पै.

घराची कबर बनवण्याबद्दलची माहिती मीच मागे टाकली होती. तसा एक academic research पेपर कुणीतरी लिहिला होता त्यावर आधारित ती माहिती होती.

प्रत्यक्ष बादशहाला मात्र असे कोणतेही नियम आड येत नसत. तो परमेश्वराचा अवतार. अक्षरशः 'हम करेसो कायदा' अशी ती राजवट होती.

हिंदू मंदिरे, श्रद्धास्थाने त्या काळी भ्रष्ट केली जात होती, पाडली जात होती, गाभाऱ्यातल्या देवता मशिदीच्या पायऱ्यांखाली टाकल्या जात होत्या. हिंदूना चोर, बंडखोर ठरवून त्यांच्या मुंडक्यांचे मिनार गावाबाहेर रचून ठेवले जात.
(जिज्ञासूंनी परदेशी प्रवाश्यांची प्रवास वर्णने आणि Meenakshi Jain. Flight of Deities and Rebirth of Temples: Episodes from Indian History पाहावे)

असे प्रकार एखाद-दुसरे नसून प्रत्येक बादशहाच्या राजवटीतील शेकडो आहेत. (नक्की तपशील श्री. गजानन मेहेंदळे यांनी जमा केले होते, ते बहुदा त्यांच्या आगामी पुस्तकात छापतील).

बुतशिकन ही त्या काळातली बहुमानाची पदवी होती आणि हिंदू महाराजांना देखील 'मुती-अल-इस्लाम' म्हणजे इस्लामचे सेवक असं प्रत्येक फर्मानात लिहिलेलं सापडेल. थोडक्यात सांगायचे तर असा प्रकार ताजमहालबद्दल झाला असेल तर तो मोगलांनी एखादा पराक्रम सांगावा अश्या अभिमानाने मिरवला असता, आणि फारसी इतिहासकारांनी ते लिहून ठेवलं असतं.( जसं बाकी मंदिराबद्दल लिहिलेले सापडते).

इथे आपण फक्त एक भिंत बंद आहे म्हणजे त्यामागे काहीतरी दडलेलं असेल असे अंदाज करून आपलंच हसं करून घेतो. खरं तर अभ्यासकांसाठी ती जागा खुली आहे (नाही तर एब्बा Koch तिथे कश्या पोचल्या?), फक्त सरकारी पद्धतीने सगळे कागद जमा करून अधिकाऱ्याच्या सवडीने आणि मर्जीने आजही ती जागा पाहता येईल, फक्त त्याला लागणारा वेळ आणि परिश्रम फार आहेत. असे हास्यास्पद दावे केल्याने (काही) इतिहासकारांच्या हातात आपण कोलीत देतो आणि ते मग त्याचा फायदा घेऊन बाकी मंदिरे पाडली नाहीत असा कांगावा करतात.

खरं तर अभ्यासकांसाठी ती जागा खुली आहे (नाही तर एब्बा Koch तिथे कश्या पोचल्या?), फक्त सरकारी पद्धतीने सगळे कागद जमा करून अधिकाऱ्याच्या सवडीने आणि मर्जीने आजही ती जागा पाहता येईल, फक्त त्याला लागणारा वेळ आणि परिश्रम फार आहेत.

तो फोटो काढायला रीतसर परवानगी मिळवली गेली होती. पण नंतर कै. ओकांच्या नावाचा व मतांचा गवगवा होऊ लागल्यावर त्यांच्याकरिता तो मार्ग खुंटला. कानपुरचे नानासाहेब गोखले म्हणून उद्योजक होेते. त्यांची खूप मदत काकांना झाली होती. पण तळघराचे नाव काढले की नकार घंटा असे होत होते! माझी कानपुरात बदली झाली होती त्यावेळी मी त्यांना जेके टेंपलच्या आसपासच्या बंगल्यात आवर्जून भेटलो होतो.
आजही तळघरात अभ्यासकांना जाऊन दे म्हणून एक कोर्ट केस आग्रयाच्या कोर्टात पडून आहे.
यावर मदत करायला कै पुनांची मुलगी सौ जयश्री वैद्य व चिरंजीव श्री संतोष ओकांना (दोघेही पुणेकर आहेत.) आग्र्यात निमंत्रित केले होते. एबा कोच यांचे पुस्तक विकत घ्यायला या केसमुळे मला प्रेरणा मिळाली.
ही केस चालवायला सुप्रीम कोर्टाचे रामजन्म भूमी केसमधे गाजलेले वकील लखनौचे श्री हररिलाल जैन आहेत. मला त्यांच्याशी संपर्क करायला मिळाला. त्यांना मी विचारणा केली कि आपण ताजमहालातील तहखान्याला उघडावे यासाठी केस लढवता आहात. तर एबा कोच या बाईंनी लिहिलेले ताजमहालावरचे पुस्तक आपण वाचले आहेत ना?
'मला माहित नाहीत या बाई व त्यांचे पुस्तक'...! ते म्हणाले. आपण अशी अपेक्षा करतो की वकील केसची तयारी करतात म्हणजे त्या बाबतची सर्व माहिती गोळा करून तयार असतात...
नंतर मनोंच्या संदर्भातून ते पुस्तक मिळवायची प्रेरणा झाली.
'मला त्यातील तळघराबाबतची पाने फोटो काढून पाठवा' असे वकील साहेबांनी म्हटले, तसे मी पाठवली. आपल्या सारख्या प्रख्यात वकीलाच्या प्रचंड पुस्तकसंग्रहात हे पुस्तक असले पाहिजे म्हटल्यावर, हो हो म्हणाले.

वाटले की हे बडे बडे वकील आपल्या मागे मागे जुनियरांची रांग लावून इतके का ऐदी होतात?
केसचे काय होईल ते होईल. सफाईकामगारांकडून किती खोल्यांना भिंती बांधून बंद केले आहे? त्यातील नदीच्याकडे तोंड करून किती व कबरीकडे तोंड केलेल्या खोल्यात किती? अशी माहिती तर काढता येईल कि नाही?

कोर्टात केसेसची कशी दुर्गती होते ...
1. Lohamandi resident says Taj belongs to
Man asks civil court to tell board to produce register of properties
Court rejects writ, fines man Rs 500 for filing stay application
UP Sunni Waqf Board
2. Although the higher courts, including the UP High Court and the Supreme Court, have refused to entertain any litigation over the monument's history, there is no dearth of cases being filed in the lower courts by religious zealots, demanding that the Taj Mahal be declared a Hindu temple.
3. A group of 6 lawyers had petitioned the Agra district court on the same issue, based on the 'evidence' given by P N Oak in his book 'True Story of The Taj'. They had demanded that the basement of the Taj Mahal be opened and all rooms be searched for the evidence of Taj Mahal's Hindu origin. BJP MP Subramanian Swami had also made a similar demand.

मनो,

थोडक्यात सांगायचे तर असा प्रकार ताजमहालबद्दल झाला असेल तर तो मोगलांनी एखादा पराक्रम सांगावा अश्या अभिमानाने मिरवला असता, आणि फारसी इतिहासकारांनी ते लिहून ठेवलं असतं.( जसं बाकी मंदिराबद्दल लिहिलेले सापडते).

बादशाहनाम्यात ताजमहाल बांधल्याची नोंद आहे का? पु.ना.ओकांच्या म्हणण्यानुसार मूळ आवृत्तीत नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

मनो's picture

23 Jun 2020 - 10:31 pm | मनो

गा. पै.

> पु.ना.ओकांच्या म्हणण्यानुसार मूळ आवृत्तीत नाहीये.

पु ना ओकांचं असं म्हणणं नाहीये. मी त्याच्या पुस्तकातील पान सोबत जोडतो आहे त्यावरून ते असं कुठेच म्हणत नाहीयेत. उलट ते ठामपणे बादशहनाम्याचा आधार घेऊन तो पुरावा म्हणून वापरत आहेत.

(चित्र दिसले नाहीतर ही लिंक वापरा)
https://ibb.co/kcRpz85

page

त्यांनी फारसी पाठ आणि इंग्रजी भाषांतरही दिलं आहे पुढे, त्यातून मी वर टाकलेली माहितीच कळते. तो काही तिथे मंदिर होते याचा पुरावा होऊ शकत नाही. पु नां च्या मांडणीत कुठे गफलत झाली आहे तेही सांगता येईल, पण तो मोठा विषय होईल, इथे प्रतिसादात सध्या इतकेच लिहितो.

गामा पैलवान's picture

23 Jun 2020 - 11:21 pm | गामा पैलवान

मनो,

माहितीबद्दल धन्यवाद. पण शंका कायम आहे. पु.ना.ओकांनी कसला पुरावा म्हणून बादशाहनामा (वा भाषांतर) वापरलं आहे? तो मजकूर बहुतेक पुढील पानांवर आहे.

मी वाचलेल्या 'भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका' या ओकांच्या मराठी पुस्तकात बादशाहनाम्यात ताजमहाल बांधल्याची नोंद नाही असं स्पष्टपणे वाचल्याचं आठवतं. पण याबाबत चूकभूल देणेघेणे.

आ.न.,
-गा.पै.

पु ना ओकांच्याच पुस्तकात खालील नोंद सापडली - इथे त्यांनीच लिहिले आहे की बांधकामाचे तपशील बादशहानाम्यात दिलेले आहेत.

त्या पानाचे छायाचित्र
https://ibb.co/XzQ8kYj

IMG-20200623-112130537-2

'भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका' हे पुस्तक माझ्याकडे नाही, तेंव्हा त्याबद्दल काही सांगू शकत नाही.

गामा पैलवान's picture

24 Jun 2020 - 12:22 am | गामा पैलवान

मनो,

माहितीबद्दल धन्यवाद. पु.ना.ओकांनी उल्लेखलेलं बांधकाम थडग्याचं आहे, ताजमहालचं नाही.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

26 Jun 2020 - 10:46 pm | दुर्गविहारी

वाचतो आहे. एकंदरीत चर्चा रोचक आहे.

गामा पैलवान's picture

27 Jun 2020 - 1:09 pm | गामा पैलवान

शशिकांत ओक,

माझ्या माहितीप्रमाणे भारतीय पुरातत्त्वखात्याने ताजमहालाचे आधुनिक सर्वेक्षण केलेले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. ताजमहाल ही एक जागतिक वारसा असलेली वास्तू आहे. तिचा सर्व्हे केला गेला नसेल तर ती बेजबाबदारपणाची परिसीमा होय.

यासंबंधी अधिक माहिती मिळेल काय? धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

शशिकांत ओक's picture

27 Jun 2020 - 11:21 pm | शशिकांत ओक

सुप्रीम कोर्टाचा रट्टा बसला होता त्यालाही २ वर्षे उलटली ... पुढे काय झाले कोणास ठाऊक
The court asked the Centre to consider whether some other ag ..

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/64102364.cms?utm_source=c...