भाग २ एबा कोच दि कंप्लीट ताजमहाल पुस्तक परिचय.
४.तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले जाणे. ५. बादशाहनामामधील ४०२-४०३ पानावरील भाषांतरातून निर्माण होणारे निष्कर्ष.
… ४.तळघरातील काही खोल्यांना विटांच्या बांधकामाने बंद केले जाणे कै. ओकांच्या लेखनातून ताजमहालाच्या तळघरात काही असे अवशेष दडवले असावेत कि ते इतरत्र कुठेही ठेवले तर गवगवा होऊन त्यातून त्या काळातील जनतेत असंतोष पसरेल. त्यापेक्षा तिथल्या तिथेच ते खोलीत बंद करून टाकले तर सोईचे होईल. असे मत मांडले आहे. शहाजहानचा उद्देश पत्नीच्या सन्मानार्थ तिच्यासाठी कबर बनवायचा होता असे असेल तर मग सात स्तरावरील बांधकामात इतर तळघरात पासून ते इतर - सवाल-जबाब इमारती, नगारखाना व समोरच्या जिलूखाना इमारतीत व आसपासच्या कबरी, खोल्या बांधायची गरज काय? याचे कारण म्हणजे या इमारती ऐत्या तयार होत्या. म्हणून ताब्यात घेतल्या गेल्या कालांतराने त्यांची उपयोगिता संपल्यावर त्यातील नको असलेल्या वस्तू अडगळीचे सामान म्हणून त्या खोल्यात टाकून वरून विटांनी त्या खोल्या बंद केल्या गेल्या. वगैरे वगैरे… एबा कोच 'दि कंप्लीट ताजमहाल' पुस्तकात यावर काय प्रकाश टाकतात? तहखाना या शीर्षकाखाली पान १४८ वर इतरांना ज्या तहखान्यात खाली जायला शक्य नाही तिथे त्या गेल्या. तिथल्या विटांचे बांधकाम करून बंद केलेल्या भागाचे क्र.२११,२१२, २१३ फोटो सादर केले आहेत. ते तहखाने का बंद केले असावेत यावर त्यांनी भाष्य अपेक्षित आहे त्या काय म्हणतात ते समजून घेऊ. पान १४८ वर २ फोटो व १आकृतीमधून त्या समजावून देतात.
(ताजमहालाची मुख्य संगमरवरी इमारत लाल रंगाच्या दगडी चौथर्यावर उभी आहे.) त्या लाल चौथर्याच्या यमुना नदीच्या पात्राकडील बाजूला चौथर्याच्या पोटात एक 'गॅलरी' (जिथून राजाच्या राण्या आपल्या लवाजम्यासह ताजमहाल पहायला येत तेंव्हा नदीपात्रातील रम्य संध्याकाळ, गारवा अनुभवता यावा म्हणून ती गॅलरी वापरली जात असली पाहिजे. (त्या must शब्द वापरतात.) आता तिथे प्रकाश व्यवस्था नष्ट आहे.
सात कमानींचा तहखान्यातील टेरेस म्हणून उल्लेख औरंगजेबाने आपल्या सन १६५२मधील अहवालात ('तहखाना ई कुर्सी हफ्तादर' ) केला होता. सध्या या तहखाना टेरेसला जायला दोन्ही बाजूला खाली उतरायला जिने आहेत. सध्या ते लोखंडी जाळ्यांनी बंद करून टाकले आहेत. त्यामुळे अंधारी मार्ग पुढे कुठे-कुठे जात असावा याचे विविध तर्क लोक करत राहतात.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या सात मोठ्या खोल्या भिंती बांधून बंद केलेल्या दिसतात, त्यांचे तोंड यमुना नदीच्या बाजूला उघडते. (थोडक्यात त्या बंद भिंतीला पाडून फार तर यमुना नदी दिसेल अर्थात त्या तसे लेखी म्हणताना दिसत नाहीत.) भिंती का व कोणी बांधल्या? याचा खुलासा त्यांच्या लेखनात दिसत नाही. विषयाला कलाटणी देऊन - अशा प्रकारची रचना लाहोरच्या मुगल लाल किल्ल्यातील शीशबुर्ज महालात (रावी?) नदीच्या पात्राकडे तोंड करून दिसून येते. असे म्हणून सोडून देतात.
इंग्रजी काळात सन १८७४ मधे J W Alexander यांनी तहखान्याचा उल्लेख केला होता. नंतर लॉर्ड कर्झनच्या कारकीर्दीत त्यांनी विशेष पुढाकार घेऊन ताजमहालाची शान ओळखून अत्यंत दुर्लक्षित भागांची साफ सफाई करून घेतली आपल्या विचारांप्रमाणे बागेत विलायची झाडांची निवड करून बागेची शोभा वाढवली वगैरे इतरत्र वाचायला मिळते. परंतु त्यांनी या बंद भिंती बाबत आत काय असेल? याची उत्सुकता म्हणून नोंद घेतली नसल्याचे लक्षात येते. त्यांनी आणखी काय केले याची नोंद पुढील भागात येईल.
५. बादशाहनामामधील ४०२-४०३ पानावरील भाषांतरातून निर्माण होणारे निष्कर्ष.
कै. ओकांनी आपल्या पुस्तकात अब्दुल हमीद लाहोरींच्या पादशाह नाम्यातील छापलेल्या Vol 1 मधील ४०२-४०३ पानावरील मजकूराची दखल एबा कोच यांनी घेतलेली नाही. जानेवारी १६३२ मधे ताजनहालाची (बुनियाद) पाया बांधायला सुरवात झाली. मात्र दुसऱ्या उरुसावेळी दि २६ मे १६३३ रोजी काय घडले ते पान ९८वर त्यांनी आवर्जून सांगितले आहे. तो पर्यंत ताजमहालाचे बांधकाम कुठवर आले होते याचे चित्रही सादर केले आहे. पण कुठेही मुळ फारसी लेखनाचे उतारे त्यांनी दिलेले नाहीत. पान २५६ वर मात्र मुमताज महलच्या १२ व्या मृत्यु दिनाच्या निमित्त १६ फेब्रुवारी १६४३च्या रात्री साजरा झालेल्या उरुसाच्या सोहळ्याचे सविस्तर वर्णन बादशाह नाम्यातील संदर्भातून दिले आहे. (बहुतेक तो Volume II असावा) त्या तसा उल्लेख करताना दिसत नाहीत. पण सामान्य माहिती प्रमाणे पहिल्या दहा वर्षाच्या शहाजहानच्या कारकीर्दीसाठी पहिला व पुढच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीचा दुसरा भाग Volume II लिहिला होता. नंतर ते काम त्यांच्या शिष्याने चालू ठेवले. महंमद सालेह कानबो यांनी देखील शहाजहाननामा उर्फ ‘अमल ए सलीह’ नामक ग्रंथ खाजगी पातळीवर लिहिला होता. त्यांचा संदर्भ पण एबा कोच यांच्या काही ठिकाणी केला आहे.
त्याची दखल नंतरच्या भागात येईल.
….
पुढील भागात...
६. नगारखाना
७. गोशाळा
८. बावडी.
वर्गीकरण
वाचने
11987
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
ताजमहाल हा औरंगजेबाच्या काळात
विजुभाऊ, छत्रपती शिवाजी
In reply to ताजमहाल हा औरंगजेबाच्या काळात by विजुभाऊ
शिवाजी महाराज ताजमहाल बघायला गेले होते?
In reply to ताजमहाल हा औरंगजेबाच्या काळात by विजुभाऊ
शहाजहानचा उद्देश पत्नीच्या
इथे तर्काचा अतिरेक झालेला आहे. ताजमहालच्या आधीची आणि नंतरची अनेक थडगी आजही आहेत. त्या सगळ्यांमध्ये अश्या प्रकारची बांधकामे सापडतात. त्यामुळे तशी एक पद्धत अथवा architecture पॅटर्न होता, एवढंच. त्या इमारती आधी होत्या असं म्हणायचं असेल तर त्याला भक्कम अस्सल पुरावा हवा. तो आजवर माझ्या पाहण्यात आलेला नाही.
पु नां च्या पुस्तकातील बादशाहनाम्याच्या उल्लेखात मंझील-इ-आलिशान व गुंबझ ह्याच शब्दांचा उल्लेख आला आहे, तो ही जयसिंगच्या त्या जागच्या जुन्या हवेलीचा उल्लेख म्हणून.मराठीत आलिशान या शब्दछटेचा अर्थ फार्सीमध्ये थोडा वेगळा म्हणजे एक उत्तम दर्जाचे घर असा घेता येतो. त्यावरून फार तर तिथे एक घर होते एवढे म्हणता येईल. जयसिंगच्या दप्तरातले काही कागद आजही राजस्थान स्टेट अर्काव्हिस बिकानेर येथे आहेत. त्यातून या घराचा काही उल्लेख मिळत नाही, आणि ते जाण्याचे जयसिंगला काहीही वाईट वाटलेले दिसत नाही. त्याचे वंशज पुढच्या ३ पिढ्या मोगल बादशहाच्या सेवेतच होते.
पुण्यात शनिवारवाड्याच्या जागेवरही पूर्वी जुनी घरे होतीच, त्यांना मोबदला देऊन दुसरीकडे जागा दिली, आणि मग ती घरे पाडून तिथे पेशव्यांनी वाडा बांधला. यावरून अशी प्रथा त्या काळात मोगलातच नव्हे तर मराठ्यातही प्रचलित होती.
मनो यांनी मांडणी योग्य केली आहे
In reply to शहाजहानचा उद्देश पत्नीच्या by मनो
भाग ४ मधे अशा वास्तू आग्र्य्याच्या यमुनेकाठी
In reply to मनो यांनी मांडणी योग्य केली आहे by शशिकांत ओक
ताजमहाल ही पाहण्याची वस्तू
एकंदरीत चित्रावरून
व्वा! छान कल्पना!
In reply to एकंदरीत चित्रावरून by शशिकांत ओक
सत्यस्थिती उलट आहे...
मृत्यूपश्चात घर सरकारजमा
घराची कबर बनवण्याबद्दलची
In reply to मृत्यूपश्चात घर सरकारजमा by गामा पैलवान
कै. ओकांच्या पुस्तकात देखील तळघरात जाऊन काढलेला एक तरी फोटो आहे.
In reply to घराची कबर बनवण्याबद्दलची by मनो
बादशाहनाम्यात ताजमहाल बांधल्याची नोंद ....
गा. पै.
In reply to बादशाहनाम्यात ताजमहाल बांधल्याची नोंद .... by गामा पैलवान
धन्यवाद! पण ....
In reply to गा. पै. by मनो
पु ना ओकांच्याच पुस्तकात
In reply to धन्यवाद! पण .... by गामा पैलवान
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to पु ना ओकांच्याच पुस्तकात by मनो
वाचतो आहे. एकंदरीत चर्चा रोचक
ताजमहालाचे सर्वेक्षण
सुयोग्य प्रतिक्रिया
In reply to ताजमहालाचे सर्वेक्षण by गामा पैलवान