ती कळ्या देऊन गेली..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
16 Jun 2020 - 12:42 pm

ती कळ्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली...

कवडसे तिरपे उन्हाचे सांडलेले
गणित वेळेचे प्रयत्ने मांडलेले
छेद त्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली..

शब्द होते, सूर होते भोवताली
गीत जुळले अन् अचानक सांज झाली
गझल ती ठेवून गेली, चांदणे घेऊन गेली..

क्षण जरी गेले उडोनी कापुराचे
दरवळे पण दार अजुनी गोपुराचे
कोपरा उजळून गेली, चांदणे घेऊन गेली..

कविता

प्रतिक्रिया

मनोज's picture

16 Jun 2020 - 1:29 pm | मनोज

मस्त आहे..मीटर मध्ये वाचता येते आहे !!

मन्या ऽ's picture

21 Jun 2020 - 11:18 am | मन्या ऽ

मला कविता नीट म्हणता (ऐकवता) येत नाही. पण आज पहिल्यांदाच कविता मोठ्या आवाजात म्हणता (ऐकवता) आली.

कविता अप्रतिमच आहे..
हे वे सां न :)

प्राची अश्विनी's picture

22 Jun 2020 - 9:07 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!:)

चांदणे संदीप's picture

16 Jun 2020 - 3:31 pm | चांदणे संदीप

कविता वरूनच गेली
वर, मला घेऊन गेली! ;)

(नंतर निवांत वाचतो)
सं - दी - प

प्राची अश्विनी's picture

16 Jun 2020 - 5:09 pm | प्राची अश्विनी

:):)

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jun 2020 - 8:32 am | ज्ञानोबाचे पैजार

अरे? तुम्ही इथेच आहात काय?
मला वाटले ती चांदणे घेउन गेली

रच्याकने :- कविता आवडली.. ती गेली तरी जाताना बरेच काही देउन गेली आहे.

पैजारबुवा,

गझल ती ठेवून गेली, चांदणे घेऊन गेली..

बरोबर असंच करायला पाहिजे होते, :-)) :-))

--

मुळ कविता आवडली..

पहिल्या कडव्यात 'ती' म्हणजे रात्र वाटली.. सकाळ झाली आणि चांदण्या भरल्या रात्री ला ती उचलून निघून गेली..

पण दुसऱ्या कडव्यात पुन्हा सांज झाली त्यामुळे ती एक व्यक्ती वाटली

तिसऱ्या कडव्यात तीच्या आठवणी..

त्या कळ्यांची आताशा फुले झाली..

चांदण्या भरल्या नभाला ती उचलून निघून गेली.. असे वाचावे..

प्राची अश्विनी's picture

19 Jun 2020 - 11:43 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!
ती येते आणिक जाते... या अजरामर कवितेचा इतका प्रभाव आपल्या सर्वांवर (त्यात मीसुध्दा आले) आहे ना, त्यामुळे ती म्हणजे ती हे पटकन लक्षात नाही येत. :)

सत्यजित...'s picture

20 Jun 2020 - 7:21 pm | सत्यजित...

प्रभूंनी हे गीत लेखनाच्या 'प्रतिभे'स उद्देशून लिहिल्याचे बर्‍याच जणांना माहित नसावे! आपण उल्लेख केलेला पाहून,हे वाचलेले आठवले.

प्राची अश्विनी's picture

22 Jun 2020 - 9:08 am | प्राची अश्विनी

बरोबर. प्रतिभेला उद्देशून.

रातराणी's picture

17 Jun 2020 - 10:59 am | रातराणी

सुरेख!!

सस्नेह's picture

17 Jun 2020 - 11:17 am | सस्नेह

मस्त !

कौस्तुभ भोसले's picture

17 Jun 2020 - 4:09 pm | कौस्तुभ भोसले

वाह

पहाटवारा's picture

17 Jun 2020 - 10:33 pm | पहाटवारा

मस्त जमलिये ..
तुमच्या कवीता नुसत्या वाचनीय नसतात तर त्यात गेयता असते ..
उत्तम गीतकार बनू शकाल !
-पहाटवारा

वीणा३'s picture

18 Jun 2020 - 1:32 am | वीणा३

सुरेख

सत्यजित...'s picture

18 Jun 2020 - 12:34 pm | सत्यजित...

सुरेख कविता!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2020 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

वा वा वा! तरल..भावपूर्ण!

प्राची अश्विनी's picture

19 Jun 2020 - 11:43 am | प्राची अश्विनी

सर्वांना मनापासून धन्यवाद!

सतिश गावडे's picture

20 Jun 2020 - 10:43 pm | सतिश गावडे

छान आहे कविता. आवडली.

प्राची अश्विनी's picture

22 Jun 2020 - 9:08 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!