आणि आत एक पाऊस..

पाटिल's picture
पाटिल in जे न देखे रवी...
14 Jun 2020 - 1:43 pm

हवा कुंद झालीय.
आभाळ गच्च भरून आलंय.
आणि तुझ्या विरहात,
मी कातर झालोय sss.
छ्या! काय फालतूगिरीय ही !

त्यापेक्षा
हवा बेफाम झालीय
आणि कुत्र्यांना सीझनची
चाहूल लागलीय,
असं बोला.
थेट.
मुद्द्याचं.

रिमझिम पाऊस आणि
ओल्या मातीचा सुवास.
छि: छि: छि:
हे तर अगदीच टुकार झालं.
चावून चोथा... थू:

बरं मग पावसाळी गझला,
निदान मेघमल्हार तरी??
आता मात्र हद्द झाली..!
चला फुटा इथून.

बाहेर एक पाऊस.
वेड्यासारखा.
उभा-आडवा.
रपारप.
दणादण.
आणि आत एक पाऊस
स्मूथ.
घनदाट.
ऊबदार.
कनवाळू.
मेलॅन्कोलीक.
हलका हलका

असलं काही असेल
तर सांगा..

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

14 Jun 2020 - 2:55 pm | अनन्त्_यात्री

ओळखीचा वाटला.
आवडलं मुक्तक!

पाटिल's picture

14 Jun 2020 - 4:45 pm | पाटिल

@अनन्त_यात्री ....धन्यवाद...!

गणेशा's picture

14 Jun 2020 - 5:43 pm | गणेशा

आणि आत एक पाऊस
स्मूथ.
घनदाट.
ऊबदार.
कनवाळू.
मेलॅन्कोलीक.
हलका हलका

ह्या ओळी छान आहेत खुप..

पाटिल's picture

14 Jun 2020 - 10:03 pm | पाटिल

@ गणेशा.. धन्यवाद..!

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jun 2020 - 8:23 am | ज्ञानोबाचे पैजार

च्यायला, आधी मी मेकॅनिक वाचले, काही टोटल लागेना, मग परत वाचले तर मेलॅन्कोलीक., मग त्याचा अर्थ शोधला अन मग कविता आवडली
पैजारबुवा,

रातराणी's picture

15 Jun 2020 - 10:47 am | रातराणी

छान आहे.

वीणा३'s picture

15 Jun 2020 - 11:55 pm | वीणा३

शेवटचा पॅरा आवडला!

विजुभाऊ's picture

16 Jun 2020 - 8:02 am | विजुभाऊ

मस्त . झकास आहे मुक्तक