देवा, थांबव हा कहर....

Primary tabs

SwapnilB.0611's picture
SwapnilB.0611 in जे न देखे रवी...
15 May 2020 - 7:26 pm

आता तरी फुटू देरे देवा तुला पाझर,
खूप झाला आता हा कोरोना चा कहर...

कोण करतो कोण भरतो,अशी येथे गत आहे,
श्रीमंतांनी आणला आजार,गरीब आता भोगत आहे...

मुठभर लोकांच्या नालायक पना मुळे, हा आजार पसरतो आहे,
त्यांच्या सोबतच मरणाऱ्या गरिबांना, तू का विसरतो आहे...

मान्य करतो चूक आमची, माजलो होतो जास्त,
कळली चूक आम्हाला, अजून किती करशील त्रस्त...

तुझ्या नियमांना आव्हान देऊन, करत होतो मनमानी,
पिंजऱ्यात केले कैद आम्हाला, मोकाट केलें सारे प्राणी...

पुरे झाली देवा शिक्षा, कर तूच आता रक्षा,
वाचव साऱ्या जगाला, मागतो येवढीच आता भिक्षा....

कविता

प्रतिक्रिया

Prajakta२१'s picture

16 May 2020 - 9:49 pm | Prajakta२१

+१११