सुटकेस ७ (अंतिम)

Primary tabs

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
14 May 2020 - 1:27 am

सुटकेस १सुटकेस २सुटकेस ३सुटकेस ४सुटकेस ५सुटकेस ६सुटकेस ७


बेल वाजली.
मी पुढे होऊन दरवाजा उघडला. राजनभाई पुढे ऊभा होता. आणि त्याचे दोन चमचे.
"भाई, आपको यहा नही आना चाहिये था!" मी दरवाजात म्हणालो.
"सलाम भाभीजी" म्हणत तो आत आला. बायको या एकंदर प्रकाराने अवाक झाली.
"भाई निचे चलके हम बात करते है" मी त्याला समजावले.
"पैले वो दस लाख की थैली दे.. फिर हम निचे जाएंगे"
"मै सच कह रहा हू.. बंबईमे कीसीने चुरा ली.."

भाई खुर्चीवर बसला. बाकी दोन चमचे सोफ्यावर सुस्तावले.

"कोण आहेत हे लोक? कसले दहा लाख?" बायको चिंताग्रस्त होत म्हणाली.
"तू आता जा, मी तुला नंतर सगळं सांगतो.." मी म्हणालो.

"नही" भाईने पिस्तुल हातात घेत म्हटले. "वो यही रूकेगी.."

"भाई?"

"तुने अहमदाबाद जाकर जो कांड किया है? तुझे लगता है वो इतना आसान है.." पिस्तुल चिऊवर रोखत तो म्हणाला. " सवाल एक करोड दस लाख का है. वो पाने के लिए मै कुछ भी कर सकता हू.."

"लेकीन आपही ने कहा था.. आदमी को जिंदा रखना पडता है तभी पैसा मिलता है.."
"तो तुझे कहा मार रहा हू.. तेरी बच्ची को मार रहा हू..."

"रूको मै देता हू.."
भाई थोडा रीलॅक्स झाला.

मी बायकोला आणि चिऊला आतल्या खोलीत बंद केले. आणि कपाटातली बॅग घेऊन हॉलमध्ये आलो. आतल्या कप्प्यात त्यानेच दिलेले चकचकीत पिस्तुल होते.

"भाई आपने यहा आके बहोत बडी गलती कर दी"
धाड..... धाड.....धूडूक...धाड...ढिचीक..
वायूच्या वेगाने गोळ्या चालल्या. एक माझ्या हाताला चाटून गेली. मात्र ते तिघे रक्ताच्या थारोळ्यात स्पष्ट दिसत होते.
बायकोने बाहेर डोकावले. आजवरच्या आयुष्यात तिला बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता.

आवाज ऐकून शेजारी पाजारी धावत आले पण आत यायची कुणाची हिंमत झाली नाही.

किती वेळ गेला कुणास ठाऊक पण पोलीस येऊन त्यांनी कधी बेड्या ठोकल्या आणि स्टेशनला घेऊन आले माझे मलाच कळले नाही.

एका अंधाऱ्या खोलीत बंदिस्त मी. दिवस की रात्र काहीच कळेना. अखेर आपण यात सापडलोच. पुर्ण गळ्यापर्यंत रूतलो. सुटकेचा आता कुठलाच मार्ग नाही. कदाचित ही अंधार कोठडीच मरेपर्यंत आपल्याला जखडून ठेवणार. आशेचा किरण आपल्या नशीबी नाही.

करकरत दरवाजा उघडला गेला.

एक हवालदार मला घेऊन दुसऱ्या एका खोलीत आला. तिथे स्वच्छ प्रकाश होता. टेबल होते. आणि दोन खुर्च्या. समोरासमोर.
मी एका खुर्चीवर बसलो. आणि हवालदार निघून गेला. तिथे ठेवलेल्या मगातले भरपूर पाणी पिलो. थोडी हुशारी आली. डोकं हलकं हलकं वाटायला लागलं.

जरावेळाने एक सुटाबुटातला ऑफिसर त्या खोलीत आला. त्याने दार लावून घेतले. त्याच्या हातात कसलीतरी फाईल होती. समोरच्या खुर्चीवर तो बसला. आणि म्हणाला,
"तो तुम हो जगदीश खत्रे. मै कमल कुमार. क्राईम ब्रॅंच मुंबईसे आया हू... थोडा लेट हुआ. वहासे यहा आनेतक... लेकीन चलता है. So, tell me your story. शुरूसे..."

"मुझे अपने वकीलसे बात करनी है." मी म्हणालो.

त्याने हबकून माझ्याकडे पाहिले.

"फिल्मे बहोत देखता है क्या? तेरेको क्या लगा.. मै इधर बैठके क्या च्युतिया काट रहा हू? ईधर तेरेको कुछ भी नहीं मिलेगा. देख... प्यारसे बात कर रहा हू... प्यार से ही जवाब दे दे बेहतर रहेगा"

"वो मेरा कानूनी अधिकार है.. आप ऐसे कैसे मुझे रोक सकते है.?"

"शायद तुझे अलग ढंगसे समझाना पडेगा.." तो रिव्हॉल्व्हर काढत म्हणाला. "मै यहा तेरे मौत का फर्मान लेके आया हू.. बहोत आसान है तुझे मारना.. तुझे अभी गाडीमे डालके कहीभी ले जाएंगे.. और बाकी तुने इनकाऊंटर क्या होता है सुना ही होगा.."

"कौन हो आप?"

"अब आया ना लाइन पे... मै राजनभाईके लिए काम करता हू... तेरा स्टोरी मालूम है मुझको... बस देखना चाहता हू तू कितना सच बोलता है?"

"लेकीन राजनभाई को तो मैने अभी मारा.."

तो खो खो हसायला लागला..

"अबे कौनसा माल फुका है तुने... राजनभाई को मारेगा?? हलवा समजा है क्या... अंडरवर्ल्ड का मजाक बना दिया .. साला.."

"फिर वो कौन था?"

"नाम नहीं पुछा उसका कभी? अस्लम शेख... राजनभाई पंटर था... चुतिया था साला.. अच्छा हुआ उडा दिया.."

तो थोडं पाणी पिला.. मग सिगारेट पेटवली. धूर सोडत म्हणाला..

"राजनभाईने बोला है. तेरेको उडानेके लिए. अगर तुझे जिंदा रखा.. तो उसे सॉलिड रिझन चाहिये.. जो तुझे अभी देना है.. नही तो..." रिव्हॉल्व्हर टेबलावर ठेवत तो गरगर फिरवत म्हणाला..

"क्या मुझे एक सिगारेट मिल सकती है.."

"शुअर... " त्याने पाकिट पुढ्यात टाकले.
मी सिगारेट पेटवली. आणि एक कश घेतला.

"कहा मिलेगा ये राजनभाई?"

"दुबई मे.. जाएगा?"

"वैसे मेरी गलती क्या है? जिससे मुझे मौत की सजा मिल रही है?"

"तु ही बता?"

"वो सुटकेस.. जो मैने टोयोटा कारसे उठायी थी!"

"बिलकुल सही.. अगर तुने उठायी नही होती तो आज तू यहा नही होता."

"लेकीन मैने उसे वापस करने की पुरी कोशीश की..."

यावेळी त्याने माझ्याकडे पाहिले.
मी त्याच्याकडे पाहिले. आणि म्हणालो,

"यानी वो जो दो लुख्खे आये थे पहली बार सुटकेस लेने... मुझे पक्का मालूम है.. वो राजनभाईनेही भेजे थे.."

"ये भी सही है. अब सवाल है.. तुझे ये कब मालूम पडा और कैसे?"

"पहले यतो मै ये साफ करना चाहता हू की.. मैने आपकी सुटकेस उठायी.. और आप लोगोने मेरा फायदा.. हिसाब बराबर हुआ..."

"ठिक है. ये भी मान लिया..."

"दुसरी गलती मैने की... अस्लम शेख को उडा दिया.. मेरे पास कोई चारा नही था.."

"नही रे.. वो गलती नहीं है. वो खुद चुतिया था. इसिलिए मारा गया.. राजनभाईभी बोले.. अच्छा हुआ च्युतिया लुडक गया.."

"मतलब मैने ऑलरेडी आपका एक काम कर दिया है. तो मुझे और एक गलती माफ होनी चाहिये.."

"हा... " आता तो सरसावून बहला. "उसी के लिए मै यहा आया हू... जरा उस गलती के बारे मे बताव.."

"जतिनभाई... "

"कमाल है... उसकोभी तुने टपकाया... अबे हमकोभी नही पता था ये... खाली तुझपे शक था.. वाकई तेरा स्क्रू ढिला है. ये बहोत बडी गलती तुने की है."

"क्या करता.. वो सुटकेस उसके घरपे दिखाई दिया.. और मुझसे रहा नही गया.. बडे थंडे दिमाग से मैने उसे मारा है... और उसकी लाश को घर के पिछे जमीन मे दफनाया... मुझे तो खुदपेभी यकीन नही आ रहा है..."

त्याने चकचकीत रिव्हॉल्व्हर टेबलवर पुन्हा एकदा गरागरा फिरवले.

"राजनभाई तुझे माफ नही करेगा.." रिव्हॉल्व्हर लोड करत तो म्हणाला.

"और वो दस लाख.. जो बंबईमे चोरी हो गये?"

"वो अस्लम का आयडीया था.. बिलकुल च्युत्या जैसा.." रिव्हॉल्व्हर हातात त्याने घट्ट पकडले.
"लगता है तेरे पास कोई सॉलिड रिझन नही है." रिव्हॉल्व्हर त्याने माझ्या डोक्यावर धरली.

"और वो सुटकेस.. जतिनभाईके घरसे जो मैने उठायी थी.. वो अहमदाबाद के गटरमे अभी भी पडी हुयी है.. सिर्फ मै जानता हू वो कहा है. उसमे वाकई एक करोड रूपया है.. " मी हलके स्मित केले. "इसे मैने आखरी दाव के लिये बचा के रखा था.."

एव्हाना त्याचे रिव्हॉल्व्हर माझ्या कपाळावर टेकले होते. बोट ट्रिगरवर होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलके स्मितही

समाप्त


✍ यांचे सर्व लेखन
कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

14 May 2020 - 6:23 am | चांदणे संदीप

जतिनभाई आहेच का अजून! मग स्टोरी का संपवली. अजून स्कोप आहे. दुबई खुणावतेय.

पुढची कथा:
जगदीशने घरात गोड्या झाडून केलेले ३ खून एव्हाना इतके लोकप्रिय झाले की, दिल्ली आणि नोएडा भागात सेटल झालेला त्याचा एक लहानपणीचा मित्र जो तिकडे अपहरण आणि खंडणी प्रकारातला बेताज बादशहा झालेला होता, शामसिंह रजपूत, त्याला हे समजताच त्याने मुंबईला येऊन कोठडीत जगदीशची भेट घेऊन सगळा प्रकार समजावून घेतला. जगदीशचा जामीन करवला आणि जगदीशला बायको मुलीसहित ओरिसातल्या भुवनेश्वरला निवांत जगता येईल अशी व्यवस्था करून दिली. नवीन नाव आणि नवीन ओळख दिली. राशनकार्ड पासून पासपोर्टपर्यंत सारं नवीन. आयुष्यात परत कधीही फिरून न येण्याच्या अटीवर.

जगदीशचं आयुष्य जरी ठीकठाक चाललं असलं तरी आत कुठेतरी त्याला रोज, दारावर टकटक होईल का? कुणाचा अनोळखी फोन येईल का? परिसरात कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे का? अशी भीती अहोरात्र वाटत राही. ह्या सगळ्याचा एकच उपाय होता. दुबईला जाऊन जतिनभाईचा खात्मा.

भुवनेश्वरचा त्याचा हा ठिकाणा त्याला कधीच सेफ वाटला नव्हता. मग त्याने धाडसी निर्णय घेतला. रजपूतला न काही कळवता तो साऱ्या बिऱ्हाडानिशी मध्य प्रदेशातल्या जबलपूर येथे येऊन दाखल झाला. जबलपूर ही मध्यप्रदेशाची संस्काराची राजधानी म्हणून ओळखली जाते त्यामुळे जगदीशने ते शहर निवडलं. शिवाय हिंदी भाषिक राज्य म्हणजे रोजच्या जीवनात फार कटकट नाही.

काही दिवसांतच सारं सेटलं झालं. जगदीश एका आर्मीच्या ट्रकचे चासीसचे पार्ट बनवणाऱ्या छोट्या कारखान्यात सेल्स मॅनेजर म्हणून लागला. बायको शेजारात रूळली. मुलगी आर्मी स्कूलमध्ये जाऊ लागली.

तीन वर्ष झाली. जगदीशला कंपनीकडून दुबईला एका क्लायंटकडे जाण्याबद्दलची सूचना मिळाली. एकूण पाच जणांची टीम होती. जगदीशला हवे होते ते आपसूक घडून आले होते. घरी आल्यावर बायकोला त्याने सांगितल्यावर तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून त्याने त्याचा इतर काहीही विचार नसल्याचे पटवून दिले. अजून चार जण सोबत आहेत शिवाय चारच दिवसांची ट्रीप आहे असेही सांगितले. बायकोचा विश्वास बसला तरीही मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन तिने जगदीशला शपथ घ्यायला लावलीच.

अजून आठ दिवसांनी निघायचे होते. व्हिजा, येण्याजाण्याची तिकीटं, दुबईमध्ये रहाण्याखाण्याची व्यवस्था हे सारं जगदीशलाच करायला सांगितलेलं बॉसने. ह्या सगळ्या तयारीबरोबरच जगदीशने अजून एक काम केले. शामसिंह रजपूतला एक फोन फिरवला व आयुष्यात एक शेवटची मदत करण्याबद्दल विनंती केली. दीड तास त्यांची फोनवर सखोल चर्चा झाली. रजपूत कडून मदतीचे आश्वासन मिळताच त्याच्या अंगात नवीन उत्साह संचारला व कधी एकदा दुबईच्या मातीवर पाय ठेवतो असं झालं त्याला.

आता बास, जव्हेरभौ युवर टर्न नाऊ!

सं - दी - प

वामन देशमुख's picture

14 May 2020 - 6:58 am | वामन देशमुख

मूळ कथा आणि हा प्रतिसाद - दोन्ही आवडले.

पर्व दुसरे...

आता बास, जव्हेरभौ युवर टर्न नाऊ

!

प्रचेतस's picture

14 May 2020 - 8:12 am | प्रचेतस

हे पण भारी झालंय.

जव्हेरगंज's picture

14 May 2020 - 11:57 am | जव्हेरगंज

@सं - दी - प,
जमलंय की!! पुढे वाढवा आता.. होऊन जाऊद्या एक धमाका!!

चांदणे संदीप's picture

14 May 2020 - 1:30 pm | चांदणे संदीप

बास का भाऊ? चेष्टाच गरिबाची? ;)
स्टोरी काय मी कायबाय खरडीन... पण शैली?
तुमच्या दौताची शाईच घट्ट आहे. एकदा उमटली की पुसत नाही. ___/\___

सं - दी - प

पैलवान's picture

14 May 2020 - 7:04 am | पैलवान

काहीतरी राहून गेल्यासारखे वाटतयं.
मजा नाही आली.

हे म्हणजे रोहित शर्माकडून दीडशे दोनेशे ची अपेक्षा असताना त्यानं एकशे पाच वर औट होण्यासारखं झालं.

प्रचेतस's picture

14 May 2020 - 8:17 am | प्रचेतस

गेम ऑफ थ्रोन्सच्या फायनल एपिसोडसारखं झालं थोडक्यात. शेवटच्या भागाने निराशा केली. पण एकंदरीत ही मालिका मस्त झाली एकदम. वाचताना मजा आली, थरार अनुभवता आला.

जेम्स वांड's picture

14 May 2020 - 10:18 am | जेम्स वांड

+१

मी पुन्हा मिपा वर आलो आणि याचे चार पाच भाग झाले होते..
त्यामुळे तेंव्हा वाचले नाही..
आता पूर्ण भाग 1 पासून वाचतो..

राजाभाउ's picture

14 May 2020 - 11:47 am | राजाभाउ

कथा न संपवता, ती पुर्ण करावी अशी विनंती

ईश्वरदास's picture

14 May 2020 - 5:19 pm | ईश्वरदास

@जव्हेरगंज,
क्या गुंडा बनेगा रे तू?
मैं तो साला मस्त पॉपकॉर्न ले कर बैठा था के ये लंबा चलेगा.

ऐसा नहीं करने का रे बाबा.
जा अब मस्त फटाफट अगला सुटकेस भर के ला.
तब तक मै शाम और राजू को देखकर आता है.

:)

घाईत संपवल्यासारखी वाटली, पण छानच

अर्धवटराव's picture

15 May 2020 - 5:13 am | अर्धवटराव

नवीन कथा प्रकार जन्मला मिपावर... सिरीयल पूर्ण तर करायची पण शेवटचं टोक ओपन ठेवायचं :)
याचीही एक स्पर्धा होऊ शकेल. असे कथानक कोण व्यवस्थीत पूर्ण करतं ते.
निर्णय मात्र ओरिजनल लेखकाने द्यायचा.

निनाद's picture

15 May 2020 - 7:00 am | निनाद

कथा वेधक होती!

पुढील भागाची आतूरतेने वाट बघावी लागत होती. वेगवान कथानक आणि अनपेक्षित वळ्णे यामुळे वाचक उत्तम गुंतला जातो.
पण शेवट फार लवकर झाला. महत्त्वाचे म्हणजे शेवटी थोडे बेयरींग सुटले. कारण पोलिस स्टेशन ला आणलेला खुनाचा आरोपी ज्याला कुणाचाच वरदहस्त नाही - तो किती मार खाईल! शिवाय अनेक लिगल डेटेलिंग यायला हवे होते. पिसी आणि जेसी ची भागड अशीच सोडता येणार नाही. बायकोच्या घराच्या फ्रंटला कोणतेही काँप्लिकेशन्स दिसत नाहीत. तो अँगल फारच सुरळीतपणे उलगडत जातो. खुन करण्यासाठी असलेली निगरगट्टता येण्यामागची कारणे अजून ठळक व्हायला हवी होती. हे सगळे पाहता अजून तीन भाग तरी हवे होते असे राहून राहून वाटते आहे. पण वेगवान कथेसाठी, वाचकाला विचार करण्याची सवड न देता कथानकात गुंतवण्यासाठी कौतुक करावे तेव्हढे कमीच! कथा पूर्ण करण्यासाठी ही अनेक धन्यवाद!!

पुढील लेखनाची वाट पाहतो आहोत.

राजाभाउ's picture

15 May 2020 - 11:52 am | राजाभाउ

मधेच समाप्त असे लिहून जव्हेरभौ नी जो चावटनपणा केला हाय त्याचा समस्त जव्हेरभौ फैनक्लब तर्फे तिव्र णिशेध व त्याणी लवकरत लवकर पुढिल भाग लिहावा अशी जाहिर विणंती
एवडे बोलून मी काली बसतो.

जव्हेरभाऊ ने विजुभाऊ या आयडी ने लेखन केले तर
40 एक भागानंतरही अपूर्ण ठेवतील कथा ;)

@ विजुभाऊ

जव्हेरभाऊ ने विजुभाऊ या आयडी ने लेखन केले तर 40 एक भागानंतरही अपूर्ण ठेवतील कथा ;)

एकसंध कथानक छोट्या छोट्या भागांमध्ये वाचताना मला फार त्रासदायक वाटते, त्यामुळेच दोसतार - २१ येथे तुम्हाला मोठे भाग लिहिण्याची विनंती केली होती 😀
आता दोस्तार [अंतिम] अशा शीर्षकाची प्रतीक्षा आहे, म्हणजे सुरुवातीपासून सगळे भाग सलग वाचून कथानकाचा आस्वाद घेता येईल.

संजय क्षीरसागर's picture

15 May 2020 - 7:04 pm | संजय क्षीरसागर

अंडरवर्ल्डवर मनोगतवर जवळजवळ दोन वर्ष गंगाधरसुत सातत्यानं "कामथे काका" नांवाची सिरियल लिहित होते. जबरदस्त डिटेलिंग, भाषेवर कमालीचं प्रभुत्व आणि सायकॉलॉजिचा तगडा अभ्यास. तुम्हाला मजा येईल वाचायला.

कामथे काका

जव्हेरगंज's picture

16 May 2020 - 4:23 pm | जव्हेरगंज

बहोत बहोत धन्यवाद सर्वांचे.

कथा यापेक्षा ही अजून चांगली झाली असती. हे सपशेल मान्य. मध्ये एकदा गोधळलो आणि वाट लागली.
प्रतिक्रिया बघून कथा लिव्हायच्या नसतात हे माहित होतं तरीही फसलो =))
पण कथा प्रमाणिकपणे संपवायचा पुर्ण प्रयत्न केला आहे. असो.
या धाग्यावरच्या सर्व रोखठोक प्रतिक्रिया आवडल्या.. पुनश्च धन्यवाद!!!

सातही भाग सलग वाचले.. खास जव्हेरगंज टच असलेली कथा अर्थातच आवडली!