मैत्री असावी...
मैत्री
मैत्री असावी
खळखळत्या वाहत्या
झऱ्यासारखी
रातराणीच्या सुगंधासारखी
आसमंतात दरवळणारी
मैत्री
मैत्री असावी
उनाड वाऱ्यासारखी
केसाची बट अलगद
झुलवणारी
मनसोक्त हसणारी
हसविणारी
संकटसमयी धावुन
येणारी
मैत्री
मैत्री असावी
पावसाच्या
पहिल्या सरीसारखी
सुखाच्या सरींनी
चिंब भिजवणारी
मैत्री
मैत्री असावी
पहाटेच्या समीरासारखी
गारवा देणारी
मैत्री
मैत्री असावी
उगवतीसारखी
नवा आशेचा किरण होऊन
आयुष्य तेजोमय कराणारी!
- Dipti Bhagat
काव्यरस
वाचने
2983
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता, सुरेख लिहिता
मैत्री मैत्री असावी पावसाच्या पहिल्या सरीसारखी सुखाच्या सरींनी चिंब भिजवणारीहे खासच. मैत्री असावी शब्दा सारखी चेहरा नसताना, अर्थ जाणणारी|| मैत्री असावी कविते सारखी शब्द असताना भावना जपणारी|| ~ प्रिती-राधासुंदर चारोळी!
In reply to सुंदर कविता, सुरेख लिहिता by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)
मैत्री
मैत्री मैत्री असावी उनाड वाऱ्यासारखी केसाची बट अलगद झुलवणारी मनसोक्त हसणारी हसविणारी संकटसमयी धावुन येणारीनिव्वळ अप्रतिम.. लिहीत रहा.. वाचत आहे..छान
प्रिती-राधा, गणेशदा, कौस्तुभ