Coronaचे साईड इफेक्ट्स

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
12 May 2020 - 11:59 am
गाभा: 

असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...

आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...

आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!

''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''

संपादक मंडळ

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

19 May 2020 - 5:58 pm | चौकस२१२

आता आम्हाला कोरोना बरोबर जगायला शिकायचं आहे, हे त्याचं उत्तर. हि सत्य परिस्थिति आहे ..
मोदि जे म्हणतील त्यात त काळच दिसत.. bar मोदी जाऊदेत जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांनी असेच निर्णय घेतले आहेत ते हि कोणत्याही अधरशिवाय ! सग्ले एकजात बिनडोक आहेत का

ऋतुराज चित्रे's picture

19 May 2020 - 6:16 pm | ऋतुराज चित्रे

हो, त्यांनी आपापल्या देशात हा रोग येऊ नये म्हणून काहीही प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या पुढील सर्व कृती ह्या गोंधळी स्वरूपाच्याच होत्या. त्यांचे समर्थन होऊ शकत नाही.

चौकस२१२'s picture

19 May 2020 - 6:29 pm | चौकस२१२

ऋतुराज चित्रे कलले नहि आप्ले विधन कोनाला उद्देशुन होते ते , कोनि आपापल्या देशात हा रोग येऊ नये म्हणून काहीही प्रयत्न केला नव्हता.?

ऋतुराज चित्रे's picture

19 May 2020 - 8:05 am | ऋतुराज चित्रे

कोरोनाचा पहिला रुग्ण चीन मध्ये आढळला. त्यानंतर तेथे ह्या रुग्णांची संख्या वाढू लागली. हा संसर्गजन्य रोग आपल्या देशात येऊ नये म्हणून जगातील किती देशांनी आपली आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद केली? ज्या देशांकडे ह्या रोगास हाताळण्यासाठी पुरेशी वैद्यकीय सुविधा आहे अशा देशांनी अति आत्मविश्वासाने दुर्लक्ष केले असेल तर समजू शकते,परंतू ज्या देशांकडे अशी वैद्यकीय सुविधांची कमतरता होती त्या देशांनी तरी अशी काळजी घेतली का? लॉक डाऊन सारखा घातक निर्णय घेऊन टाकला,ज्यामुळे आर्थिक आणि जिवीत नुकसानीचा आकडा वाढण्यास मदत झाली. ह्याचा अर्थ शेवटपर्यंत कोरोना आपल्या देशात प्रवेश करत नाही तो पर्यंत सगळे देश (अपवाद असतील) आपल्या अर्थव्यवस्थेलाच जपत होते.

चौकटराजा's picture

19 May 2020 - 9:40 am | चौकटराजा

कारण मानवी स्वभाव असा आहे ... शिवाजी जन्मावा दुसर्याचा घरात ..... काही झाले तर ते इतरांना होईल मी मात्र अजरामर आहे .... ........ही यादी फार लांबेल. एकतर चीन हा आचरट ,लबाड ई ई देश .आहे असा जगात समज आहे. त्यांनी थक्क करणारी प्रगती केली असली तरी तिला एक काळी बाजू आहे. त्यामुळे मिळू दे साल्याना शिक्षा ..... शाकाहारी लोकांच्या देशात तो करोना का फिरोना कशाला येईल ?( असले कारण भारतालाच लागू ) तिसरे कारण फारतर तो स्वाईन फ्लू इतकाच घातक असेल असा अंदाज . आणि आपण सांगितलेले महत्वाचे कारण " अर्थव्यवस्थेच्या काळजीला प्राधान्य --ती पण कशी २० टक्के लोकांच्या हातात ८० टक्के संपत्ती. आज देखील दारू वरचा महसूल बुडतो आहे त्याची काळजी सरकारला टेस्ट पेक्षा जास्त आहे !! सरकारने क्रॉस चेकींग केले असते तर त्यांना कळले असते जे फुकट जेवण जेवताहेत जे ५ किलो फुकट किंवा स्वस्त गहू घेताहेत तेच दारूच्या लाईनीत उभे आहेत. तेच रस्त्यावर मास्क ना लावता फिरत आहेत.

चौकस२१२'s picture

19 May 2020 - 8:23 am | चौकस२१२

https://www.youtube.com/watch?v=9wC0pO8_Sys
गडकरी साहेबांची हि मुलखात पहा .. करोना बरोअबर कसे जगायचं अनि एकुन अर्थ व्यवस्था काय प्रयत्न चालू आहेत त्याबद्दल ५९ मिनिटांपासून ते बोलतात ( गंमत म्हणजे गाडगीळांनी जरा पंचाईत झाली ५९ मिंटापासून पुढे गाडी अर्थकारण कडे गेली !)
त्यांनी कुबेरांना लीडरशिप वॉर एक मस्त विधान दिलाय १:०३
गाडगीळांनी एक मस्त खोचक प्रश्न विचारला आहे मोदी आणि तुमचे नाते यावर १.०६
रुतलेली गाडी उपमा मस्त १.०८
चीन अवलंबून असणे , संधी १.०९
अंबानींबरोबर चे बोलणं 1.22
मासेमारी उद्योग १.१३ त्यातील आकडेवारी आणि उपाय योजना ( स्थानिक मासेमाऱ्यांची समुद्रत आत जाण्याची क्षमता वाढवणे
सध्या जे मेक इन इंडिया आणि आत्म निर्भय वैगैरे त्यामागील काम पण बघा कि जे हा नेता अनेक वर्षे करीत आहे ...
बिस्कीट योउदोगाला दिलेल्या कल्पना ..१:१४ :५३
झाकीर नाईक जसा धाधाड गीतेतील आणि कुराणातील गोष्टी सांगायचा तसे हे गडकरी आर्थिक आकडेवारी धडधात सांगतात ..आणि नुसती आकडेवारी नाही तर उद्योग कसा वाढवावा यातील कल्पना
हा ..अर्थात भाजपचा नेते अम्हणून झोडपायचा असेल तर गोष्ट वेगळी (मग बघूच नका .. ) एक कार्यक्षम मंत्री आणि नेता आणि खास करून उद्योगाशी जोडलेलं नेता म्हणून बघायचे असेल तर बघा ..

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 12:01 pm | संजय क्षीरसागर

आणि बिजेपीकडे असलेला तो एकमेव पर्याय आहे !

अर्थात, फकिरीबाण्याशी तुलना अशक्य आहे. राजीव शुक्लाला त्यांनी रोखठोक सांगितलं होतं की ते जेमतेम हायस्कूलपर्यंत जाऊ शकले. सतराव्या वर्षी घरदार सोडून जे निघाले ते आजपर्यंत भटकतायंत. आणि जे काही शिकले ते डायरेक्ट जीवनातून ! याला म्हणतात कॉन्फिडन्स. पण लोकांचा भर रितसर शिक्षणावर असतो कारण जीवनातून शिक्षण घेतलेल्याला भज्याची गाडी लावणं ही देशानी दिलेली रोजगाराची अपूर्व संधी वाटू शकते. आता राज्यकारभार चालवतांना लोकमत डावलून कसं चालेल ? त्यामुळे फकीराला नाईलाजानं एक्सटर्नली डिग्री घ्यावी लागली .

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 11:52 am | सुबोध खरे

२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

आली संक्षींची प्युबीक रिंग

किती लोकांना ३ दिवसात घरी पाठवत आलं असतं?

गाडीच्या स्लीपरच्या एका डब्यात ८ प्रवासी जातील असे ९ कप्पे असतात ( ७२ प्रवासी) या ऐवजी प्रत्येक कप्प्यात २० प्रवासी ( सीट वर ४+४ बर्थ वर ४+४ आणि बाजूच्या सीट आणि बर्थ बावर २ + २ म्हणजे एकूण १८० प्रवासी. शिवाय मधल्या जागेत १०० प्रवासी म्हणजे एका डब्यात ७२ ऐवजी २८० प्रवासी( साधारण चौपट) प्रवास करत आहेत हे गृहीत धरा.असे २३ डबे (अर्धा गार्डचा अन अर्धा ब्रेक व्हॅनचा सोडून द्या)म्हणजे एक गाडीत ६४४० प्रवासी जातील त्यात अधिक लटकत जाणारे ६०० वाढवा म्हणजे ७००० प्रवासी झाले.

आता मुंबई सी एस टी हुन २२ मार्च ला दर १० मिनिटांनी एक गाडी सोडली असे गृहीत धरल्यास एक दिवसात १४४ गाड्या सोडता येतील. म्हणजेच एक दिवसात १० लाख प्रवासी गेले. म्हणजेच एकंदर तीन दिवसात ३० लाख प्रवासी जाऊ शकतील. कोट्यवधी प्रवासी कसे जाणार हो?

बरं मुंबई ते लखनौ हा प्रवास कमीत कमी २४ तास आहेच. त्याच्या पुढे गोरखपूर दरभंगा कटिहार पूर्णिया पाटणा भागलपूर येथे जायला अजून कमीत कमी १२ तास लागतात.

त्यातून अख्ख्या गाडीत ७००० पैकी फक्त एक कोव्हीड चा रुग्ण असेल आणि तो गर्दी झालेल्या डब्यात २८० पैकी फक्त २० लोंकाना संसर्ग करेल एवढे गृहीत धरले तरी २८८० रुग्ण २४ तासात लखनौला पोहोचतील.

म्हणजेच काही न करता तीन दिवसात लखनौ मध्ये ८७०० कोविडचे रुग्ण

या प्रत्येक रेल्वे गाडीला लागणारे २ लोको पायलट एक गार्ड असंख्य इतर कर्मचारी त्या गाडयांना घाट चढवण्यासाठी लागणारी बँकर इंजिने त्यांचे लोको पायलट हे सर्व दर १५ मिनिटाने कर्जत लोणावळा किंवा कसारा इगतपुरी इ मध्ये यांची सोय करावी लागेल. या कर्मचाऱ्यांना आपल्या डिव्हिजन मधून परत आणण्यासाठी गाड्या उलट्या आणाव्या लागतील. म्हणजे मुंबई तुन पुण्याला पोचलेले लोको पायलट गार्ड तिकीट तपासनीस खानपान व्यवस्थेचे कर्मचारी इ. हि सगळी जगड्व्याळ प्रणाली संक्षी म्हणाले म्हणून एका रात्रीत इकडची तिकडे होईल का?

पुढे हे १० लाख प्रवासी लखनौहून पुढे कसे जाणार? चालत?

एका बस मध्ये १०० प्रवासी कोंबले तरी १००० बस मध्ये १ लाख प्रवासी जातील. त्यात परत कोव्हिडचा रुग्ण असला तर सगळे १०० जण लटकतील.

तसेच दहा हजार बसेस केवळ मुंबईतून लखनौ साठी सोडणे हि अतिशयोक्ती होईल. ते काही बसने २४ तासात पोचणार नाहीत.

पण एकदा मोदीद्वेषाचा चष्मा कळवलं कि दुसरा काही दिसेनासं होतं आणि सारासार विचार बंद होतो.

बरं हे नजरचूकीने झालं असं ही म्हणता येत नाही. कारण तोच प्रतिसाद तीन तीन वेळेस येतो आहे.

म्हणजे द्वेषाची पातळी किती खाली गेली आहे ते पाहून घ्या.

इतका टोकाचा द्वेष प्रकृतीला बरा नाही. कारण ज्याचा द्वेष करता आहात त्याला शष्प फरक पडत नाही. (त्याच्या पर्यंत ते पोचतच नाही)
तुम्ही उगाचच आपला रक्त तापवून घेता.

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 12:08 pm | संजय क्षीरसागर

> त्यातून अख्ख्या गाडीत ७००० पैकी फक्त एक कोव्हीड चा रुग्ण असेल आणि तो गर्दी झालेल्या डब्यात २८० पैकी फक्त २० लोंकाना संसर्ग करेल एवढे गृहीत धरले तरी २८८० रुग्ण २४ तासात लखनौला पोहोचतील

आता लॉकडाऊन ओपन करुन सरकार काय साधतं आहे ? लोकांना घरी पाठवायच्या सोयी कशासाठी चालू आहेत ? सगळे प्रवासी नॉन कॅरिअर्स आहेत का ?

ऋतुराज चित्रे's picture

19 May 2020 - 1:59 pm | ऋतुराज चित्रे

मुळात सरकारने लॉक डाऊन करण्यापूर्वी मजूर स्थलांतराचा विचार केला असेल असे वाटत नाही. मुळात कसलाच विचार केला नाही. ना पर्यटकांचा, ना विद्यार्थ्यांचा, ना प्रवाशांचा. ही सगळी लाखो स्थलांतरितांचे गणित आत्ता मांडायला सुरुवात झाली.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 3:24 pm | सुबोध खरे

मुळात सरकारने लॉक डाऊन करण्यापूर्वी मजूर स्थलांतराचा विचार केला असेल असे वाटत नाही.

याचा आपल्याकडे काही पुरावा वगैरे असेलच!

का असाच नाक्यावरच्या पक्याने (ज्याला राजकारणातील सर्व काही कळत) फुशारकी
मारली ती आपण काही तरी नवीन ऐकल्याच्या आनंदात इथे पाठवताय?

ऋतुराज चित्रे's picture

19 May 2020 - 3:40 pm | ऋतुराज चित्रे

याचा आपल्याकडे काही पुरावा वगैरे असेलच!
कोट्यवधी प्रवासी कसे जाणार हा सरकारला प्रश्न पडला हे तुम्हाला कधी आणि कसे समजले? आणि मग आत्ता लॉक डाऊन च्या काळात त्यांना का गावी पाठवले जात आहे. अर्थात सभ्य भाषा अपेक्षीत.

कोट्यवधी प्रवासी कसे जाणार हा सरकारला प्रश्न पडला हे तुम्हाला कधी आणि कसे समजले

त्याला फार काही हुशार असायची गरज नाही. आपल्या रेल्वे कडे फक्त २००० गाड्या चालवता येतील इतकेच डबे ( ५५००० रोलिंग स्टॉक) आहेत ते सुद्धा भारतभर पसरलेले आहेत ते एक दिवसात सर्व मोठ्या शहरात आणून त्यातून काही लाख लोकांना नेण्याचा अव्यापारेषु व्यापार जमणार नाही हे सांगायला एखादा रेल्वेतील माध्यम दर्जाचा अधिकारी सुद्धा पुरेसा आहे.

युद्धाच्या वेळेस लष्करी सामग्री आणि सैनिक एकदम सीमेवर पोचवण्यासाठी २-३ आठवडे लागतात. हे ज्यांना माहिती आहे ते असे करोडो लोकांना तीन दिवसात हलवले जाईल सारखी भंपक वक्तव्ये करीत नाहीत.

ऋतुराज चित्रे's picture

19 May 2020 - 9:12 pm | ऋतुराज चित्रे

करोडो लोक आणि २-३ दिवसांची मर्यादा ही कोणी घालून दिली होती? करोडो लोक एकदम उठून आजही निघालेले नाहीत,तेव्हाही निघाले नसते. लॉक डाऊन घोषित करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा विचार केला असता तर पुरेसे दिवस हातात होते सरकारच्या, कोरोनाचे रुग्णही फार नव्हते. करोडो स्थलांतरीत दूरची गोष्ट, परराज्यात,गावात,शहरात गेलेल्या विद्यार्थी,प्रवासी, पर्यटकांचा तरी विचार केला होता का? त्यांची संख्या तर नक्कीच करोडो नव्हती. त्यामुळे सरकारने ह्या गोष्टींचा विचार केला नव्हता हे निश्चित. आणि करोडो लोकांना तीन दिवसात हलवणे कसे अशक्य आहे हे तुम्ही नाही ,दोन आठवड्यापूर्वी आयटी सेल ने पसरवलेला बचावात्मक फॉरवर्ड आहे. मागील महिन्यात ह्या प्रश्नाला कोणीही समाधानकारक उत्तर देत नव्हते. तुम्हीही. उगाचच लष्कराचे उदाहरण देऊन लष्कराला बदनाम करु नका. लष्कर मनात आले आणि घेतला निर्णय असे कधीही करत नसते, चोवीस तास रिस्क आणि आपत्ती व्यवस्थापनाचा वापर करते. आणि दुसऱ्याला कमी लेखण्याची भाषा आवरता आली तर बघा.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 12:31 pm | सुबोध खरे

फ़लेटनिंग ऑफ कर्व्ह म्हणजे काय?

वैद्यकीय सुविधा वाढवणे म्हणजे काय?

हर्ड इम्म्युनिटी म्हणजे काय हे समजून घ्या

मग चर्चा करू.

तोवर आपले पूर्वग्रहदूषित विचार बाजूला ठेवा.

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 12:43 pm | संजय क्षीरसागर

कर्व फ्लॅट झालायं का ? वैद्यकीय सुविधात अपूर्व वाढ झाली आहे का ? आपण हर्ड इम्युनिटीचा पर्याय नाकारला आहे .

आता वरच्या गोष्टींबरोबर हे पण सांगा >

आता लॉकडाऊन ओपन करुन सरकार काय साधतं आहे ? लोकांना घरी पाठवायच्या सोयी कशासाठी चालू आहेत ? सगळे प्रवासी नॉन कॅरिअर्स आहेत का ?

चौकस२१२'s picture

19 May 2020 - 5:22 pm | चौकस२१२

कर्व फ्लॅट झालायं का ..
हो झालाय .. ऑस्ट्रेलिया मध्ये येथे आलेख पहा
https://www.health.gov.au/news/health-alerts/novel-coronavirus-2019-ncov...
आपण मध्येच थांबून आलेखाचा आढावा घेतलात तर तो वाढत दिसणारच
आणि या मागचे मुख्य कारण बंधने पालने हे आहे
आणि नमूद करण्यासारखे हे कि ऑस्ट्रेलिया सारखा देश भारताचं मानाने निर्यात आयात वर जास्त अवलंबून असतो तरी त्यांनी हे निर्बंधाचे कडू अवशध प्यायले ..
येथे तो सपाट होण्याआधी वाढलं होता जसे भारताचाच सध्या वाढत आहे .. जर बंधने पाळली तर तो सपाट व्हायला मदत होईल पण त्यासाठी सर्व देशाने कसोटीला सामोरे जायला पाहिजे .. वांझोटे वाद घालण्या पेक्षा

तस्मात, त्यांचा प्रतिसाद वाचून त्या अनुषंगानं उत्तर द्या.

> भारताचाच सध्या वाढत आहे .. जर बंधने पाळली तर तो सपाट व्हायला मदत होईल पण त्यासाठी सर्व देशाने कसोटीला सामोरे जायला पाहिजे ..

देशात आतापर्यंत कडक लॉकडाऊन होता, मग कर्व का फ्लॅट झाला नाही ?

चौकस२१२'s picture

19 May 2020 - 6:12 pm | चौकस२१२

मी संख्या शस्त्रनय नाही परंतु सर्वसामान्य तर्क असा
- कि भारतातील प्रसार हा एक तर पूर्ण पाने निदर्शनास आला आहे का ?
- एकूण लोकसंख्येच्या मानाने कदाचित हा काळ अजून हा आलेख अर्थपूर्ण होण्यास पुरेसा नसेल..
इतर देशातकदाचित जो काळ gelaa आहे , जी लोकसंख्या आहे , ज्या दर्जाच्या चाचण्या झालाय आहेत आणि ज्या पद्धतीने निर्बंध लादले आणि पळाले गेले त्याप्रमाणे त्या त्या देशाचा आलेख आहे
आज कदाचित दूर पॅसिफिक मध्ये असाही छोटा देश असेल कि जिथे बहरून आलाच नसले आणि काही बंधानेच नसतील म्हणून "काही बंधने नको" हे उत्तर होऊ शकत का

आज जगातील सर्व तज्ञ , नेते यांनी निर्बंध ठेवा असाच पवित्र घेतलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यानं त्याचे चांगले फळ मिळत आहे पण केवळ मोदी विरोध म्हणून आपल्याला हे नाकारल्याचे असले तर बोलणे खुंटले .. किती हा द्वेष...
गुण दोषांसकट माझ्य देशात सरकार ने जा काही केलं त्या मुले परिस्थिती बरीच बरी आहे यासाठी मी तरी सरकारशी खुसपट काढत वांझोटा वाद घालणार नाही आज येथे आलेल्ख सपाट झालेला दिसतोय ..
बाकी आपली मर्जी

प्रश्न खर्‍यांना होता आणि तो त्यांचा प्रतिसादाला अनुसरुन होता.

> भारतातील प्रसार हा एक तर पूर्ण पाने निदर्शनास आला आहे का ?

मग लॉकडाऊननी काय साधलं ?

इथून सुरुवात आहे

> २२ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

गामा पैलवान's picture

19 May 2020 - 1:14 pm | गामा पैलवान

लोकहो,

बहुतेकांची अशी धारणा आहे की लशीकरणामुळे पूर्वीच्या पिढ्यांचे कमी आयुर्मान आता वाढले आहे. रोग केवळ जंतूंमुळे निर्माण होतात व ते निवारण करायला लस हवीच.

मात्र या पुस्तकात काही वेगळी माहिती मिळते : https://www.amazon.co.uk/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten...

पाश्चात्य देशांत स्वच्छतेच्या सवयी लागल्याने रोगांचा प्रसार आटोक्यात आला असं लेखिका डॉक्टर सुझन हम्फ्री हिचं मत आहे. तिने ते अनेक प्रकारचे विदा मिळवून पुस्तकात मांडलं आहे. साथीचे रोग लशी टोचण्याच्या बरेच आधी आटोक्यात आले होते. एकंदरीत वैद्यकीय इतिहास वेगळाच असावा असं दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 3:26 pm | सुबोध खरे

देवीच्या रोगाबद्दल किंवा पोलिओ बद्दल आपले मत असेच आहे का?

कारण भारत देशाच्या स्वच्छतेबद्दल कुणाला फारशी शंका नाहीये म्हणून विचारलं.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 3:26 pm | सुबोध खरे

देवीच्या रोगाबद्दल किंवा पोलिओ बद्दल आपले मत असेच आहे का?

कारण भारत देशाच्या स्वच्छतेबद्दल कुणाला फारशी शंका नाहीये म्हणून विचारलं.

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 3:44 pm | संजय क्षीरसागर

लॉकडाऊनमुळे > कर्व फ्लॅट झालायं का ? वैद्यकीय सुविधात अपूर्व वाढ झाली आहे का ? आपण हर्ड इम्युनिटीचा पर्याय नाकारला आहे (त्यालाच लॉकडाऊन म्हणतात)

आता वरच्या गोष्टींबरोबर हे पण सांगा >

आता लॉकडाऊन ओपन करुन सरकार काय साधतं आहे ? लोकांना घरी पाठवायच्या सोयी कशासाठी चालू आहेत ? सगळे प्रवासी नॉन कॅरिअर्स आहेत का ?

चौकटराजा's picture

19 May 2020 - 6:43 pm | चौकटराजा

मला वाटते असा कडक लॉकडाउन नव्हताच ! जिथे जिवाणू व विषाणू सारे एकच असा समज आहे .जिथे अजूनही डॉ लोक देखील नक्की लक्षणे काय आहेत हे सांगताना घोळ घालीत आहेत. इथे अशिक्शित मजूर लोकाना यातील गाम्भीर्य कसे कळणार. काल मी औषधे सम्पली म्हणून बाहेर पडलो तर असे दृश्य पाहिले की एक कार आली ( आहेरे गटातील माणूस ) खाली उतरला .जनरल स्टोर चे शटर वर गेले व कुणी पाहात नाही असे वाटून आतून एक कॅरम बोर्ड बाहेर आला व कारमध्ये अदृश्य झाला . दुकानाचा माणूस पुन्हा आहेरे गटाला व्यापारी.( हे सारे रेड झोन मध्ये ) आता त्याच्या हातातही मोजे नव्हते ना कारवाल्याच्या .तेंव्हा एकदम शास्त्रोक्त सोशल डिस्टानसिंग पाळता येणार नाही म्हणून मोठी किंमत मोजून सरकारानी बंद जाहीर केला .पगार तर द्यावे लागणार मग करा दारूची दुकाने चालू .कारण मुख्य मंत्र्यानी आधीच खाजगी क्षेत्राला आवाहन केले होते की पगार कापू नका .यात मोदीना नावे ठेवणे वा त्यांची बाजू अंधपणे घेणे दोन्ही ही चूक .कारण विषाणू ची वर्तणूक पूर्ण समजणारा माणूस आज तरी जगात नाही. खास करून तो नव्याने संचार करीत असताना.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 7:21 pm | सुबोध खरे

१) मुंबईत रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग ((DOUBLING TIME) सुरुवातीला ७ दिवस होता तो ९ नंतर १० ११ आणि आता १३ दिवस झाला आहे.

आपण संख्याशास्त्रज्ञ आहात ना मग कर्व्ह फ्लॅट होतोय कि नाही ते समजून घ्या.

२) मुंबई सर्व खाजगी रुग्णालयातील ८० % बेड्स शासन कोव्हीड साठी घेत आहेत. BKC, गोरेगाव, महालक्ष्मी येथे अतिरिक्त बेड टाकले जात आहेत. आमच्या सारख्या खाजगी डॉक्टरांना १५ दिवस तेथे काम करण्यासाठी बोलवायला सुरुवात केली आहे.
सुरुवातीला सर्व रुग्णांना व्हेंटिलेटरवर टाकले जात असे. तेंव्हा हजारांनी रुग्ण आले असते तर बहुसंख्य हे व्हेंटिलेटर नसल्यामुळे दगावले असते. आता अधिक माहिती आणि ज्ञान उपलब्ध झाल्यामुळे कोणत्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडणार आहे आणि कोणाला नुसते ऑक्सिजन मास्क ने वाचवता येईल हे समजून त्याप्रमाणे उपचार सुरु आहेत.
जर लॉक डाऊन केले नसते तर अत्यवस्थ रुग्णांचा पूर आला असता आणि आपल्याकडे अंदाजाप्रमाणे १५ मे पर्यंत ८ लाखाच्या वर रुग्ण आले असते आणि त्यातील ८० हजार ते १ लाख रुग्ण उपचार न मिळाल्यामुळे दगावले असते.

३) जोवर लस किंवा खात्रीचे औषध निर्माण होत नाही तोवर केवळ तरुण माणसांना बाहेर सोडल्यास त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होईल आणि वृद्ध किंवा इतर आजार असलेले लोक यापासून दूर राहतील आणि तितके मृत्यू कमी होतील. जेंव्हा लस तयार होईल तेंव्हा ती अशा रुग्णांना प्राधान्याने दिली जाईल म्हणजे त्यांचे संरक्षण होईल.

४) कोट्यवधी लोकांना घरी जाता आले असते इ सारखी भंपक वक्तव्ये करून जनतेत घबराट पस्रवल्यामुळे लोक उपाशी तापाशी पायी जायला निघाले आहेत.
याच जागी जर युद्ध असते आणि बॉम्ब हल्ला होत असता तर हि माणसे अशी पायी गेली असती का? गपचूप जिथे आहेत तिथे राहिली असती.
केवळ सरकार वर टीका करण्यासाठी विरोधकांनी आणि अतिशहाण्या लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे हे गरीब मजूर स्थलांतर करू लागले आहेत.

सरकारवर दबाव आणून आणि आम्ही तुमच्या तिकिटाचे पैसे भरतो किंवा तुमच्यासाठी हजारो बस उपलब्ध करतो सारख्या अफवा पसरवून घबराट पसरवली आहे यामुळे हे भयभीत मजूर गावी जाताना स्वतःबरोबर आपल्या गावांना सुद्धा रोग सुद्धा पसरवणार आहेत.
यामुळे गावचे आणि शहरी लोकांत तेढ निर्माण होणार आहे

याचे राजकीय पक्षांना काहीही घेणे देणे नाही आपली पोळी भाजून घेतली कि झाले.

मी कोणतीही विस्तृत माहिती लिहिणार नाही ( जेथे जावे तिथे हेच पुराण लावायचा कंटाळा आला आहे)

ज्यांना पाहायची आहे ती सर्व माहिती जालावर उपलब्ध आहे.

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 7:44 pm | संजय क्षीरसागर

> जर लॉक डाऊन केले नसते तर अत्यवस्थ रुग्णांचा पूर आला असता आणि आपल्याकडे अंदाजाप्रमाणे १५ मे पर्यंत ८ लाखाच्या वर रुग्ण आले असते आणि त्यातील ८० हजार ते १ लाख रुग्ण उपचार न मिळाल्यामुळे दगावले असते.

सध्या त्या ८ लाख लोकांना बाधित करु शकणार्‍यांची परिस्थिती काय आहे ?

आणि सकाळचे प्रश्न अनुत्तरित आहेतच :

लॉकडाऊनमुळे > कर्व फ्लॅट झालायं का ? वैद्यकीय सुविधात अपूर्व वाढ झाली आहे का ? आपण हर्ड इम्युनिटीचा पर्याय नाकारला आहे (त्यालाच लॉकडाऊन म्हणतात)

आता वरच्या गोष्टींबरोबर हे पण सांगा >

आता लॉकडाऊन ओपन करुन सरकार काय साधतं आहे ? लोकांना घरी पाठवायच्या सोयी कशासाठी चालू आहेत ? सगळे प्रवासी नॉन कॅरिअर्स आहेत का ?

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 7:55 pm | सुबोध खरे

माझा प्रतिसाद नीट वाचा आणि त्याबद्दल जालावर वाचा

मी तुम्हाला स्पून फिडींग मुळीच करणार नाही.

हवं तर शोधा

नाही तर प्यूबिक रिंग सारखं

मीच हुशार आहे
मी हुशारच आहे
मि हुशार आहेच

चालू द्या

प्रश्नाकडे वस्तुनिष्ठतेनं पाहा आणि उत्तर नसेल तर कबूल करा.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 10:50 pm | सुबोध खरे

मीच हुशार आहे
मी हुशारच आहे
मि हुशार आहेच

चालू द्या

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 7:28 pm | सुबोध खरे

सरकार आता लोकांना का घरी जाऊ देत आहे.

राजकीय अपरिहार्यता (political compulsion)

जिकडे तिकडे भडकाऊ वक्तव्ये केल्यामुळे लोकांचा धीर सुटू लागला आहे यातून दंगली उसळल्या तर त्या नियंत्रणात आणण्यासाठी बाळाचा वापर करावा लागेल त्यातून अधिकच मनुष्यहानी आणि वित्तहानी होईल.

विरोधी पक्षानि हि राष्ट्रीय आपत्ती आहे हे समजून राजकारण बाजूला ठेवून सरकारला सहाय्य केले असते तर अशी स्थिती नक्कीच आली नसती.

परंतु लष्करावर सुद्धा विश्वास नसलेले आणि उडी किंवा बालाकोटचे सुद्धा पुरावे मागणारे नतद्रष्ट विरोधी पक्ष असल्यावर अधिक काय होणार आहे?

महाभारत घडूनही आपसात घमासान युद्ध करू पण बाह्य संकट असताना आम्ही १०५ आहोत असे म्हणून लढणारे कौरव पांडव यांच्याकडून आपण काहीही शिकत नाही हीच शोकांतिका.

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 8:22 pm | संजय क्षीरसागर

> जिकडे तिकडे भडकाऊ वक्तव्ये केल्यामुळे लोकांचा धीर सुटू लागला आहे ?

इतके कडक लॉकडाऊन लावून, मोदींनी सांगितल्याप्रमाणे थाळ्या, टाळ्या, दिवे सगळं करुन, अतोनात हालापेष्टा सहन करुन, पुन्हा करोनाबरोबर जगायला हवं असं जेंव्हा मोदी सांगतात तेंव्हा लोकांचा संयम सुटायला लागला आहे.

त्यामुळे मूळ प्रश्न असा होता :

२२ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 8:40 pm | संजय क्षीरसागर

ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 10:55 pm | सुबोध खरे

तीन दिवसात करोडो लोक कसे घरी गेले असते तेवढं सांगा म्हणजे मग पुढची चर्चा करू
नाही तर तुमचं आपलीच पुंगी वाजवणं चालू द्या

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 11:09 pm | संजय क्षीरसागर

ट्रायल लॉकडाऊन करुन नक्की काय साधलं ? मधले दिवस वाया का घालवले ? सर्जिकल स्ट्राईकसारखा लॉकडाऊन न करता, लोकांना घरी सुखरुप पोहोचता येईल असा अवधी देऊन, एका प्री-डिक्लेअर्ड तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

सरकारने नाही असे त्यांना वाटत असेल...

ते म्हणजे मोदी !

त्यांची वृत्तीच फकिरी आहे ते कोणताही स्ट्राइक केंव्हाही करुन जनतेला अंचबित करतात. लोकांचे जे अतोनात हाल झाले ते सर्व फकिराला माया वाटतात. घेतलेल्या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करणं नाही, न खेद न खंत.

सरकारने नाही असे वाटत नाही तर ? हम्म बरोबर आहे...

पण PM असे असतील असे वाटले न्हवते हो कधी ? अजूनही विश्वास बसत नाही पण तुम्ही बोलताच इतकं सोपं आणि सुस्पष्ट की दुसरा काही विचारही मनात येत नाही.

असुदे, PM(वर्तनाने) बदलावेत म्हणून आपण काय उपाय सुचवाल ?

संजय क्षीरसागर's picture

20 May 2020 - 12:23 am | संजय क्षीरसागर

फकिराची वृत्ती बदलण्याचा एकमेव उपाय म्हणजे फकिराला संसारात आणणं !

पण मोदी आता कुणाशी पाट लावण्याची शक्यता शून्य. त्यात पुन्हा यशोदाबेनला राजी करण्याचा प्रश्न येतोच. आधीच त्यांनी इतकी वर्ष वाट बघण्यात घालवली आहेत.

त्यामुळे पीएम बदलण्यापेक्षा पीएम हटवणं देशाच्या हिताचं आहे.

सांप्रतात नितीन गडकरी हा बिजेपीकडे उत्त्म पर्याय आहे. एकदम संसारी, संवेदनाशील आणि सुशिक्षित माणूस !

त्यांना सध्या रस्तेच बनवूद्या, म्हणजे वाहतूक व्यवस्था अजून सुरळीत होईल जे सध्या फार आवश्यक वाटते. दुसरे एखादे स्थळ हुडकू शकाल का ? जे फकीर नसेल व जनतेतही तितकेच लोकप्रिय व प्रभावी असेल ज्याच्या एका इशाऱ्यावर लोकं डोळे झाकून विश्वास ठेवतील ?

आयर्नमॅन's picture

20 May 2020 - 12:46 am | आयर्नमॅन

युती करून BJP ने त्यांना पंतप्रधान बनवले तर ? ते ही अत्यन्त सालस संसारी, संवेदनशील मितभाषी व अत्यन्त उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असलेले व्यक्तमत्व आहे

डोनाल्ड ट्रँप विवाहित असल्याने कोविड काळातील सर्वोत्कृष्ट अमेरिकन अध्यक्ष ठरतात असेही प्रशस्ती पत्रक देऊन टाका ?

संजय क्षीरसागर's picture

20 May 2020 - 1:02 am | संजय क्षीरसागर

.

ती नेमकी यासाठीच.

संजय क्षीरसागर's picture

20 May 2020 - 12:57 am | संजय क्षीरसागर

उमेदवारी अर्ज भरतांना मोदी मॅरिटल स्टेटसमधे डॅश मारायचे, म्हणजे नरो वा कुंजरोवा ! गुजराथमधे त्यांचे बलदंड सहकारी अमित शहा काहीही करु शकतील असा दरारा होता. अजूनही त्यांच्या चेहेर्‍याकडे पाहून त्यांच्या कर्तबगारीची कल्पना येतेच. त्यामुळे मुख्यमंत्री असेपर्यंत फॉर्म कसाही भरला तरी काहीही फरक पडत नव्हता.

पीएमचा उमेदवारी फॉर्म भरतांना नेमकी गोची झाली. तिकडे यशोदाबेननी आपले सर्वगुण संपन्न पतीराज, पदावर विराजमान होत नाहीत तोपर्यंत भात सोडण्याचा निर्धार जाहीर केला. आपल्याकडे सोशल मेडिया इतका भारी आहे की बातमी वार्‍यासारखी पसरली.

आता मोदींना रास्त प्रश्न पडला, इतकी वर्ष मिरवलेली फकिरी पणाला लावायची की अडवानींसारख्या स्वतःच्या राजकीय गुरुला एनवेळी धोबीपछाड मारुन जमवलेला सत्तेचा जुगाड जिंकायचा ? शेवटी सत्तालोलुपता कुणाही राजकारण्याला सोडणं अशक्य, तस्मात मोदींनी स्वतःच्या मॅरिटल स्टेटसमधे मोठ्या नाईलाजानं लिहिलं मॅरीड.

आयर्नमॅन's picture

20 May 2020 - 1:27 am | आयर्नमॅन

जिथे आपला हेका सोडणे सामान्यांना जमत नाही तिथे त्यांनी निवडलेले राजकारणी कसे वेगळे असतील ?

चौकस२१२'s picture

20 May 2020 - 6:02 am | चौकस२१२

प्री-डिक्लेअर्ड तारखेला .. किति दिवस्नि भौ? त्यत कहि झाल अस्त तर तुम्हिच इथे ओरअडत अस्त "येवधे दिवस का घलवले "
You can't have your cake and eat it (too) ऐकलय का?

चौकस२१२'s picture

20 May 2020 - 6:16 am | चौकस२१२

"महाभारत घडूनही आपसात घमासान युद्ध करू पण बाह्य संकट असताना आम्ही १०५ आहोत असे म्हणून लढणारे कौरव पांडव यांच्याकडून आपण काहीही शिकत नाही हीच शोकांतिका."
अगदि अगदि माझ्या मनातील बोललात .. पण या नतद्रष्ट लोकांचं मागे लागून काही उपयोग नाही आपली खरे साहेब शक्ती यात घालू नका ...
हो आपण मान्य करू कि भारतीय आणि सर्व जगातील सरकारांनी लोकडवून सारखे मूर्ख उपाय योजले ते हलकट बदमाश आणि इतर ( अपार्लमेंटाय शब्द)
लोकडवून का आणि परत घेण्याचा सज्जड प्लॅन काय याचे पालुपद / धुगन आपटत बसूदे लोकांना
"त्यांची आपल्यासारख्या अनुभवी आणि संयत उत्तर देणार्या कडून उत्तर घेण्याची " लायकी नाही
आणि हो "मला जे वाटते ते लिहिणार म्हणणारे "शिक्षा " पण आहहेत्च लोकशाही आहे
आपण कृपया आपला गप्पा बसण्याचाच अधिकार वापरा
फार झालं ...

गामा पैलवान's picture

19 May 2020 - 9:22 pm | गामा पैलवान

नमस्कार खरे डॉक्टर,

तुम्ही विचारलंत की :

देवीच्या रोगाबद्दल किंवा पोलिओ बद्दल आपले मत असेच आहे का?

सध्या हे पुस्तक वाचतोय (चाळतोय खरं तर) : https://www.amazon.co.uk/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten...

त्यात अनेक धक्कादायक तथ्ये नोंदवली आहेत. त्यातले देवीच्या लशीबद्दल एकदोन परिच्छेद :

Dryvax, patented by the company that later became Wyeth, is the oldest smallpox vaccine and
has been used since the late 1800s. The methods used to propagate Dryvax resulted in mixtures
of viruses commonly called “quasispecies.” In 2011, Qin et al. genetically characterized the
modern Dryvax and stated that all brands of smallpox vaccines prior to the late 1990s were rarely
subjected to clonal purification. They concluded that Dryvax was of horse and human viralorigin, describing the vaccine as a “molecular fossil”:

... ... ... ... ... ... ... ...

In 2008, after more than 100 years of use, the Centers for Disease Control (CDC) called for
quarantine and destruction of all remaining Dryvax.

हे खरंय का?

आता पोलियोकडे वळूया.

माझ्या एका मित्राचा अनुभव सांगतो. तो लहान असतांना त्याला पोलियोच्या लशीची जोरदार प्रतिक्रिया आली. त्यात त्याचा उजवा हात व डावा पाय लुळा पडला. त्यावर मात करून तो स्वत: आधाराविना चालू शकतो (शाळेत अतिशय हुशार. राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीधारक आहे. पण पंगुत्वामुळे १० वी नंतर विज्ञान शाखा मिळाली नाही. वाणिज्य घेऊन नंतर आय आय एम अहमदाबाद मधनं एम बी ए केलं.). खरी करुण कहाणी त्याच्या धाकट्या बहिणीची आहे. तिला आईबाप लस टोचायला (पाजायला?) अनेकदा घेऊन गेले. पण क्रमांक आल्यावर चलबिचल होऊन मागे हटायचे. तिलाही नंतर जोरदार पोलियो झाला. डॉक्टरांच्या मते लस दिली नाही म्हणून तिचं असं झालं.

सामान्य माणसाने काय करावं? मी काय मत ठरवू पोलियोच्या लशीबद्दल? पोलियो प्रवण जनुकं असतील काय दोघांच्यात? मग आईबापांना काहीच कसं झालं नाही? पोलियोचं खरंच उच्चाटन झालंय का? की हल्ली त्याला musculur dystrophy म्हणतात? की multiple sclerosis असंही म्हणतात?

पोलियोसंबंधी हे विधान खरं आहे का? : In Africa, meanwhile, the vaccine itself is spawning virulent strains.
संदर्भ : https://www.sciencemag.org/news/2019/07/surging-cases-have-dashed-all-ho...

मला या विषयांतलं फारसं काही कळंत नाही. उपरोल्लेखित पुस्तकाची पीडीएफ आहे सोळासतरा एमबीची. तुम्हांस हवी असल्यास कृपया व्यनितनं संपत्ता कळविणे.

आ.न.,
-गा.पै.

चांगली चर्चा चालू आहे दोन्ही बाजूंची मते समसमान वाटत आहेत पण भारतासारख्या देशात लॉक डाऊनला पर्याय नाही असेच वाटते

फक्त लॉक डाऊन करताना थोडे नियोजन आवश्यक
कालच ठरलेल्या वेळेत दूध घेतले कुठे किराणा मिळतोय का ते बघायला दुसऱ्या बाजूला गेले तर त्या रोड वर पिकनिक असल्यासारखे लोक हातात पिशव्या घेऊन हिंडत होते कारण ५-६ दिवस सगळी दुकाने बंद होती त्यांचा पण इतका दोष नाही म्हणता येणार तरी लोक मास्क वापरात होते म्हणून जरा हुश्श करून चालले होते तर बाजूच्याच एका बिल्डिंग मध्ये घरात बसलेल्या एका माणसाने इतक्या जोरात थुंकीची पिचकारी टाकली कि मी फ्रीझच झाले (थोडी बाजूला होती पण जवळच )त्याच्याकडे रागाने बघितले तर तो विजयि मुद्रेने माझ्याकडे बघत होता निर्लज्जासारखा .लिहिताना पण किळस वाटतीये पण जाऊदे )
ह्या प्रसंगावरून भारतात लॉक डाऊनचीच गरज आहे फक्त
तसेच किराणा ,मेडिकल मध्ये कधी कधी वस्तूंची देवाणघेवाण करताना नोटांना थुंकी लावण्याचे प्रकार (हे बँकेत पण घडतात आजकाल कमी झालेत ),खोकताना,शिंकताना हात न ठेवणे हीच जिथे स्टॅंडर्ड प्रॅक्टिस आहे त्या देशात लॉक डाऊन ला पर्याय नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते

देशातील लोक बदलणार नसतील तर लॉक डाऊन हाच पर्याय राहतो

सध्या लॉक डाऊन जिथे शिथिल होतेय तिथे लगेच पुढच्या दिवसात रुग्ण सापडत आहेत त्यामुळे परत तिथे लॉक डाऊन अशी परिस्थिती आहे

संजय क्षीरसागर's picture

19 May 2020 - 11:14 pm | संजय क्षीरसागर

> फक्त लॉक डाऊन करताना थोडे नियोजन आवश्यक होते

हाच तर मुद्दाये !

मराठी कथालेखक's picture

19 May 2020 - 11:27 pm | मराठी कथालेखक

लॉक डाऊन हाच पर्याय राहतो

हरकत नाही.. पण
१) लॉक डाऊन किती काळ किंवा कोणत्या निकषांची पुर्तता होईपर्यंत चालू ठेवायचे हे स्पष्ट असायला हवे. हे निकष काहीही असू शकते पण ते स्पष्टपणे मांडायला हवे. (उदा एकूण कोरोना रुग्ण वा दिवसाला सापडणारे नवीन रुग्ण वा अमूक इतक्या लोकांची टेस्टिंग , अमूक इतके हॉस्पिटल्स वा इतर मेडिकल सुविधा तयार होणे, किंवा यातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं गुणोत्तरही असू शकतं) आणि मग ह्य निकषांची पुर्तता होईपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवायची सरकारची नक्की तयारी आहे का ? मग भले तीन , चार वा सहा महिने लागोत. .. आणि लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर कोरोनाचा धोका नाहीसा वा अगदी नगण्य असेल याची शाश्वती सरकार देवू शकेल का ? नाहीतर अर्थव्यवस्थेचे तूप गेले आणि कोरोनावर मात करण्याचे तेलही गेले अशी स्थिती व्हायची (तूप म्हणजे फक्त म्हणीपुरतं.. सध्याची अर्थव्यवस्था 'तूप' म्हणण्यासारखी नक्कीच नव्हती.. पण ते असो). लॉकडाउनने कोरोनाचा धोका केवळ काहीसा लांबणीवर पडणार असेल आणि ते ही मोठी किंमत चुकवून तर मग असे लॉकडाउन खरेच योग्य का ?
२) लॉक डाऊन काळात जर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही भागात बंद राहणार असतील (तुम्ही वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे की ५-६ दिवस दुकानं बंद होती) तर पर्यायी आणि प्रभावी वितरण व्यवस्था असायला हवी. 'मिळेल ते खा' अशी भूमिका प्रशासनाने घेणे अयोग्य आहे.
३) गरीब कामगार, व्यावसायिक ज्यांचे उत्पन्न बंद झाले आहे त्यांच्या उदरनिर्वाहाची योग्य व्यवस्था आणि प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. लक्षात घ्या की हे लोक गरीब आहेत पण भिकारी नाहीत, लॉकडऊनपुर्वी हे लोक आत्मनिर्भरच होते. लॉकडाऊनने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले आहे.

आणखीही मुद्दे असू शकतील पण काही मुद्दे आता मांडलेत.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 11:28 pm | सुबोध खरे

अशा तुरळक केसेस सर्वत्र होतात परंतु 1980 ते 90 च्या दशकात रोज 500 ते 1000 बालकांना होणाऱ्या पोलिओ ची आता भारतात एकही केस नाही हे कोणत्या स्वच्छतेमुळे झालं?
Until early 1990s India was hyperendemic for polio, with an average of 500 to 1000 children getting paralysed daily

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3734678/

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 11:28 pm | सुबोध खरे

अशा तुरळक केसेस सर्वत्र होतात परंतु 1980 ते 90 च्या दशकात रोज 500 ते 1000 बालकांना होणाऱ्या पोलिओ ची आता भारतात एकही केस नाही हे कोणत्या स्वच्छतेमुळे झालं?
Until early 1990s India was hyperendemic for polio, with an average of 500 to 1000 children getting paralysed daily

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3734678/

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 11:35 pm | सुबोध खरे

कोणत्या पक्षाच्या सरकारने आम्ही लॉक डाऊन करणार नाही असे सांगितले आहे?
सर्व पक्षीय सरकारे लॉकडाऊन पाळत आहेतच ना आणि केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये रुग्ण संख्या केवळ लॉक डाऊन मुळे आटोक्यात आली आहे असे असताना केवळ श्री मोदींवर टीका करण्यासाठी वाटेल ते आरोप करताना राज्य शकट कसे चालते याची निदान किमान माहिती तरी मिळवायला हवी होती.

आराम खुर्चीत बसून यंव करायला हवं होतं त्यांव करायला हवं होतं म्हणून भाषणे देणारे लोक आता लॉक डाऊन मधून बाहेर कसं पडायचं याचा सज्जड प्लॅन आम्हाला सांगा म्हणून मागणी करतात हे पाहून त्यांची कीव करावीशी वाटते.
स्वतः फक्त उंटावरून शेळ्या हाकत टीका करत आहेत.
ज्यांना हा प्लॅन पाहिजे त्यांनी तो स्वतः शोधा.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 11:35 pm | सुबोध खरे

कोणत्या पक्षाच्या सरकारने आम्ही लॉक डाऊन करणार नाही असे सांगितले आहे?
सर्व पक्षीय सरकारे लॉकडाऊन पाळत आहेतच ना आणि केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये रुग्ण संख्या केवळ लॉक डाऊन मुळे आटोक्यात आली आहे असे असताना केवळ श्री मोदींवर टीका करण्यासाठी वाटेल ते आरोप करताना राज्य शकट कसे चालते याची निदान किमान माहिती तरी मिळवायला हवी होती.

आराम खुर्चीत बसून यंव करायला हवं होतं त्यांव करायला हवं होतं म्हणून भाषणे देणारे लोक आता लॉक डाऊन मधून बाहेर कसं पडायचं याचा सज्जड प्लॅन आम्हाला सांगा म्हणून मागणी करतात हे पाहून त्यांची कीव करावीशी वाटते.
स्वतः फक्त उंटावरून शेळ्या हाकत टीका करत आहेत.
ज्यांना हा प्लॅन पाहिजे त्यांनी तो स्वतः शोधा.
जालावर सगळं उपलब्ध आहे.

सुबोध खरे's picture

19 May 2020 - 11:35 pm | सुबोध खरे

कोणत्या पक्षाच्या सरकारने आम्ही लॉक डाऊन करणार नाही असे सांगितले आहे?
सर्व पक्षीय सरकारे लॉकडाऊन पाळत आहेतच ना आणि केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये रुग्ण संख्या केवळ लॉक डाऊन मुळे आटोक्यात आली आहे असे असताना केवळ श्री मोदींवर टीका करण्यासाठी वाटेल ते आरोप करताना राज्य शकट कसे चालते याची निदान किमान माहिती तरी मिळवायला हवी होती.

आराम खुर्चीत बसून यंव करायला हवं होतं त्यांव करायला हवं होतं म्हणून भाषणे देणारे लोक आता लॉक डाऊन मधून बाहेर कसं पडायचं याचा सज्जड प्लॅन आम्हाला सांगा म्हणून मागणी करतात हे पाहून त्यांची कीव करावीशी वाटते.
स्वतः फक्त उंटावरून शेळ्या हाकत टीका करत आहेत.
ज्यांना हा प्लॅन पाहिजे त्यांनी तो स्वतः शोधा.
जालावर सगळं उपलब्ध आहे.

डॉक्टर साहेब आपण अगदी अचूक निदान केलात या मनोवृत्तीचा.. पण काय लोकशाही आहे ना त्यामुळे तुमचं या विधानावर एक तर लोक तुटून पडणार किंवा भलतेच tangent काही तरी बोलणार
ह्यानं ना चीन सारखी एकाधकाऱषीः किंवा गेला बाजार निदान सिंगापुर सारखी खमके सरकार पाहिजे मग बसतील "भरलेल्या" बांबूचे फटके

मोदींजींबाबतच्या तुमच्या मताशी मला सहमत व्हावेत लागेल कारण तुम्ही Avenger's चे तुमचे वर्षन इथे सांगत आहात ज्यात आऊट ऑफ 14 मिलियन 506 शक्यतांमधून नेमकं एकदाच आपण मोदींजींना अचूकपणे दोषी सिद्ध केलेत. आपल्या कौशल्याला सलाम.

गामा पैलवान's picture

20 May 2020 - 3:28 am | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

1980 ते 90 च्या दशकात रोज 500 ते 1000 बालकांना होणाऱ्या पोलिओ ची आता भारतात एकही केस नाही हे कोणत्या स्वच्छतेमुळे झालं?

स्कार्लेट फीव्हर नावाचा एक आजार आठवला. त्यावर लस विकसित केली होती. मात्र ही लस फारशी गुणकारी नव्हती. तरीपण हा आजार अपोआप नामशेष झाला (किंवा आटोक्यात आला म्हणू. चूभूदेघे). हल्ली यावर प्रतिजैविके वापरतात असं ऐकून आहे.

पोलियोचं तसंच झालं नसेल हे कशावरून? प्रभावी लशीच्या दाव्यास काही सांख्यिकीय आधार आहे का?

आ.न.,
-गा.पै.