Skip to main content

[कविता' २०२०] - आस

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/05/2020 20:49 या दिवशी प्रकाशित केले.

आस




अशाच या कातरवेळी निशब्द असावा आसमंत सारा त्यासमयी रवि तु क्षितिजाच्या कुशीत निजावा रवि तुज निजवताना वारा ही गाई झुळझुळ गाणे ती लुकलुकणारी चकोर ही बघ तुज कथा सांगे अशाच एका कातरवेळी बघ. कोण पणती त्या तुळशीसमोर लावे मंद अश्या त्या प्रकाशात माझा ऊर भरुन वाहे तेव्हा दुरवर कोठेतरी मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा 'आस' लागे मनास कान्हा तसाच ऐकु येईल का रे मज एक दिन तुझा मधुर पावा..


वाचने 8018
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

अशाच एका कातरवेळी बघ. कोण पणती त्या तुळशीसमोर लावे मंद अश्या त्या प्रकाशात माझा ऊर भरुन वाहे
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले ... मस्त.. +१