सुटकेस ६

Primary tabs

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
9 May 2020 - 1:40 pm

सकाळी उठलो. चांगले प्रसन्न वाटत होते. आंघोळ वगैरे करून काऊंटरवरच्या म्हाताऱ्याला हिशोब दिला. आणि रस्त्यावर आलो. एका हॉटेलमध्ये फाफडा की काय तसले खाल्ले. आणी वडापने अहमदाबाद ला जायला निघालो. दोन अडीच तासांचा प्रवास मोठ्या मुश्कीलीने काटला. काल रात्री आपल्या हातून भयंकर गोष्ट घडली. गांज्याच्या नशेने माणूस एवढे उत्तेजित होते? काही कळेना. कदाचित माझ्याच मनात आतमध्ये कुठेतरी असे काही करायची सुप्त ईच्छा दडली असावी. पण पुन्हा असल्या फंद्यात पडायचे नाही असे मनोमन ठरवले.

वडाप अहमदाबादमध्ये घुसले तसे रोख चारशे रूपये देऊन उतरलो. आळस झटकून तोंड धुतले. आणि एक हॉटेलमध्ये नाष्टा केला. मग रिक्षास्टंडवर जाऊन चंदेरी बजारचा ऍड्रेस विचारला.
"२०० होगा" तो म्हणाला.
"ठिक है" म्हणून मी बसलो. आणि बऱ्याचशा गल्ल्या वगैरेतून रिक्षा पळायला लागली.
मला वाटले मोदींचे मोठमोठे पोस्टर बघायला भेटतील. पण कसलं काय. एकही पोस्टर नव्हते. इथली लोकं मोदींना ओळखतात तरी का असा प्रश्न पडावा.

बऱ्याचशा वेळाने ते चंदेरी बझार आले. नाव आणि तिथल्या परिसराचा अजिबातच काही संबंध नव्हता. जुनी पत्र्याची मोडकळीस आलेली घरे. रिक्षावाल्याला दर्शन हॉटेलच्या समोर घ्यायला लावले. घर क्रमांक ३०१ इथंच असावं.
"मुझे तुरंत वापसभी जाना है. रूक सकते हो तो रूको." मी रिक्षावाल्याला म्हटले. तो तयार झाला. मी पुढे जाऊन एकाला जतिनभाईचा पत्ता विचारला. त्याने एका जुनाट छप्परवजा घराकडे जाण्यास मला सांगितले. मी तिथे जाऊन दरवाजा ठोठावला.
आतून एक म्हातारा पण तगडा दाढीवाला पुरुष बाहेर आला.
"कौन?"
"जतिनभाईसे मिलना था.."
त्याने पिशवीकडे बघितले समजून गेला. म्हणाला, "अंदर आ जाव. इधर बैठो."

गरीबीच्या अवकळा दाखवत असलेल्या त्या झोपडीत मी एका लाकडी खुर्चीवर बसलो. विश्वास नाही बसत ही अशी माणसे अंडरवर्ल्ड मध्ये आहेत.
"नये लगते हो.." त्याने पिशवी चेक करत विचारले.
"जी.." मी अंधारी खोली न्याहाळत त्याला म्हणालो.
त्याने पिशवीतील कपडे बाहेर काढले. आणि कपड्याची आतमध्ये लपवलेली पांढरी पाकीटे फोडून चाखून पाहिले.
"असली है... शाब्बास.." कदाचित तो माझ्या इमानदारीवर खुश झाला असावा.
"मै रोकडा लाता हू.." म्हणून आत कुठेतरी गेला.

त्या अंधाऱ्या झोपडीत राहून राहून माझी नजर फळीवर ठेवलेल्या एका सुटकेसकडे जात होती. मी जवळ जाऊन पाहिले. च्यावी लावायच्या ठिकाणी पुर्ण मोडतोड झाली होती. माझ्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. ही तीच सुटकेस होती. जिला मी खिळा ठोकून उघडले होते.

च्यायला!

मी येऊन खुर्चीवर गपगार बसलो. जतिनभाई आतून एक थैली घेऊन आला. "लो" तो म्हणाला.
मी थैली उघडून बघितले. करकरीत नोटांची बंडले अस्ताव्यस्त पडली होती.
"कितना है?"
"दस पेटी.." म्हणजे दहा लाख. तरीच एवढी कमी होती.

मी तिथून बाहेर पडलो आणि रिक्षाने स्टेशनवर आलो.
मग राजनभाईला फोन लावला.
"भाई, काम हो गया.. लेकीन एक लफडा है."
"क्या हुआ?"
"वो सुटकेस मिल गया."
"कौनसा?"
"वही जो मैने टोयोटा कार से उठाया था"
"------"
"और सोचो वो कहा मिला.?"
"कहा?"
"जतिनभाईके घर मे.."
"सच बोल रहा है तू?"
"बिलकूल"
"एक काम कर तू सिधा निकलके यहा आजा, मै देखता है आगे क्या करनेका" तो फोन ठेवत म्हणाला.

पण ही सुटकेस त्याच्याकडे पोहोचली कशी. अंडरवर्ल्ड किती तगडं पसरलंय सालं. जतिनभाई सारखे गद्दार कितीतरी असतील.

रेल्वेत बसलो. आणि परतीचा प्रवास सुरु केला. निव्वळ झोपलो. या अनपेक्षित सुटकेने जरा सुखावलो. भार हलका झाला. आता या असल्या भानगडीत पुन्हा पडायचे नाही असे मनोमन ठरवले.

मुंबई गाडी जेव्हा थांबली तेव्हा प्रचंड तहान लागली होती. मग प्लॅटफॉर्मवर बिस्लेरी घेतली. आणि फळांचा ज्युस पिलो.
नंतर जागेवर येऊन बघतो तो काय? थैली गायब!!
प्रचंड शोधले. डबे पालथे घातले. स्टेशनभर धावलो. मुंबईचे भामटे चोर फार निष्णात असतात. पुन्हा टेन्शन. सवाल दहा लाखांचा होता. राजनभाईला फोन लावणारंच होतो की थोडा विचार केला.
जतिनभाईकडून पैसे घ्यायचेत हे मला कोणी सांगितलेच नव्हते. ना सलीमने, ना राजनभाईने.
जतिनभाईने आपल्याला पैसे दिलेच नाहीत असा कांगावा मी करु शकत होतो. किंवा मी त्याबाबतीत अनभिज्ञ होतो. तसाही आता जतीनभाई गद्दार ठरला होता. स्टोरी तयार होती. पचवायला एकदम सोपी.

मग त्याच रेल्वेने पुण्यात आलो. घरी गेलो. तसा लवकरच आल्याने बायकोने विशेष चौकशी केली नाही. जरा वेळ झोपलो.

फोन वाजला तसा उठलो. राजनभाई फोनवर होता.
"पहुंच गया क्या?"'
"जी भाई."
"अरे वो रोकडा दिया था जतिनभाईने, कब देना मेरेको"
"कैसा रोकडा, उसने तो मुझे कुछ भी नहीं दिया.."
"रुक मै उपर आता हू"
च्यायला! हा बिल्डिंगच्या खाली ऊभा आहे की काय?

क्रमशः


यांचे सर्व लेखन
कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 2:28 pm | चांदणे संदीप

जतिनभाईच्या तंगड्या जतिनभाईच्याच गळ्यात जातात का काय असे वाटत असतानाच त्या तंगड्या आता जगदीशच्या कंबरड्यात बसायची वेळ आली. =))

सं - दी - प

अनिंद्य's picture

9 May 2020 - 9:34 pm | अनिंद्य

वाचतोय

मागचा भाग जरा पटला नव्हता पण हा भाग मस्तच

प्रचेतस's picture

9 May 2020 - 10:57 pm | प्रचेतस

हायला, लैच जबराट

प्रत्येक वेळेस ज्याम जोरदार कल्लाटण्णी मिळतेय
लै भारी . जव्हेरभाउ

बिपीन सुरेश सांगळे's picture

10 May 2020 - 1:01 pm | बिपीन सुरेश सांगळे

भन्नाट प्रवास आहे कथेचा

बोलघेवडा's picture

10 May 2020 - 2:16 pm | बोलघेवडा

जव्हेरगंज साहेब, लय भारी कथा. आपल्या लिखाणाचा मी पहिल्यापासूनच पंखा आहेच. येऊ देत सर पुढचे भाग असेच पटापट.

ईश्वरदास's picture

10 May 2020 - 8:00 pm | ईश्वरदास

मस्तच, येऊद्या पटपट अजून.

मानसी१'s picture

11 May 2020 - 10:19 am | मानसी१

प्रकरण इतक गळ्याशी असताना कोणी दहा लाखाची पिशवी जागेवर सोडुन जाइल का? शिवाय खाली उतराय्ची गरज काय? खडकीतुन वाटेल ते विकत घेता येते.

जव्हेरगंज's picture

11 May 2020 - 10:26 am | जव्हेरगंज

पिशवी कोणतरी हिसकावून घेतली असेही समजू शकता.

नावातकायआहे's picture

11 May 2020 - 11:07 am | नावातकायआहे

लै भारी! पु भा प्र

मानसी१'s picture

11 May 2020 - 11:11 am | मानसी१

अतिशय छान चाल्लिये कथा. आजचा भाग जरा बिनसला. जतीन भाई ती सुटकेस उघडयावर ठेवतिल ते पण नाही पटल. पण त्याचा काहीतरी ट्वीस्ट असवा. :)
बाकि खुप दिवसानी अशी कथा आलीये. मस्त वाटतय.

OBAMA80's picture

11 May 2020 - 11:18 am | OBAMA80

कथेत गुंतत चाललो आहे...काही तरी झोल आहे तो नक्कीच कळेल नंतर...पुलेशु

राजाभाउ's picture

11 May 2020 - 12:49 pm | राजाभाउ

मस्त चाललीय पुभाप्र

पैलवान's picture

12 May 2020 - 4:16 pm | पैलवान

"रुक मै उपर आता हू"

भाई बिल्डिंग च्या खाली आहे म्हटल्यावर शेवटच्या वाक्याला एकदम अंगावर काटा आला...

राजाभाउ's picture

13 May 2020 - 11:31 am | राजाभाउ

पुढचा भाग कधी?