corona आणि ज्योतिष

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in काथ्याकूट
25 Apr 2020 - 11:08 pm
गाभा: 

corona आणि ज्योतिष

जगभरातल्या ज्योतिषांनी ह्यावर खूप लिहून झालेय तरी पण एक चर्चा

काही पाश्चात्य ज्योतिषांनी हे अगोदर होणार असे सांगून झाले आहे पण त्यांची कालगणना आपल्या पुढे आहे असे वाटते तसेच अभिग्या आनंद ह्या १४ वर्षांच्या बाळ ज्योतिषाने देखील हे वर्तवले होते (खरे खोटे देव जाणे)

आत्ता पण सूर्य मेषेत (त्याच्या उच्च राशीत)असल्यामुळे हि साथ आटोक्यात यायची चिन्हे आहेत असे बरेच जण म्हणत आहेत

पण मकरेत ग्रहांचे अधिक्य असल्यामुळे काही निश्चित सांगता येत नाहीत तरी जाणकारांनी विवेचन करावे

तसेच एक प्रश्न पडतोय सारखा कि दोन बलाढ्य आणि दूरगामी परिणाम करणारे ग्रह -गुरु आणि शनी हे स्वतःच्या राशीत असताना तसेच राहू केतू हे पण त्यांच्या उच्च राशीत (मथून आणि धनु) असताना अशी घटना कशी काय घडू शकते?(गुरु नोव्हमेंबर पासून धनु राशीत आणि शनी २४ जानेवारी पासून मकरेत )

उलट काहीतरी चांगले घडावयास हवे होते

कोणी ह्यावर सांगू शकेल काय?

तसेच मेदिनीय ज्योतिषाबद्दल कोणी मार्गदर्शन करू शकेल काय?

त्यात देशांच्या,शहरच्या पत्रिका बनवून भविष्य वर्तवता येते असे ऐकले आहे त्यानुसार अमेरिकेची मिथुन रास येते भारताची मकर इ.

काळपुरुषाच्या पत्रिकेत मकर रास दहाव्या स्थानी येते त्यावरून कर्मस्थान बघतात आता सगळे ठप्प असल्यामुळे कसे काय? हे कोणी सांगू शकेल काय?
कृपया मार्गदर्शन करावे

धन्यवाद

प्रतिक्रिया

जाणकारांच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

अनन्त्_यात्री's picture

27 Apr 2020 - 10:26 am | अनन्त्_यात्री

ज्योतिष"शास्त्रा"कडून मार्गदर्शनाची अपेक्षा केल्याचे वाचून करमणूक झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2020 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्याही ग्रह तार्‍यांचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही, असे माझे मत असले तरी एक मिपाकर म्हणून या विषयाबाबत तज्ञ नसलो तरी दिसला धागा की टाक प्रतिसाद वृत्तीमुळे मत व्यक्त करणे आले. बाकी, जोतिषशास्त्रांचा अशा विविध विषयांवर अचूक अभ्यास असणे आवश्यक आहे, आणि दुर्दैवाने ते नाही, असे वाटते. वरील विषयांवर प्रचंड मते मतांतरे वाचनात आली आहेत.

माझं मत असं आहे की, १ मे नंतर रुग्णांचे प्रमाण कमी होत जाईल. जून २१ नंतर एकदमच रुग्ण संखेत घट दिसेल. कारण १) शनी महाराज असलेल्या स्थीतूतून स्थिती बदलत आहेत. आणि कारण दुसरं असं की, २६ डिसेंबरचं सूर्यग्रहण नकारात्मकर परिणाम देणारे होते असे समजू म्हणून २१ जूनचे सूर्यग्रहण सकारात्मक बदल देणारे असूही शकते.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

27 Apr 2020 - 3:43 pm | प्रचेतस

हा सरांचा नम्रपणा आहे, वास्तवात ते ज्योतिषशास्त्राचे उत्तम जाणकार आहेत.

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2020 - 6:02 pm | चौथा कोनाडा

तज्ञ नसलो तरी दिसला धागा की टाक प्रतिसाद वृत्तीमुळे

सर असे मस्त विनोद करतात कि प्रतिसाद वाचायला मजा येते ! असो.

सर, जवळजवळ प्रत्येक धाग्याला प्रतिसाद टाकतीलच हे भाकीत पट्टनाडीवरील एका धाग्यात एका तज्ज्ञाने २०११ मध्येच वर्तवले होते हे वाचल्याचे पुसटसे आठवते.
सर, काय सांगाल या भाकीताबद्दल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2020 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ताडपत्रावरील अभ्यास उर्फ नाडीभविष्य हा मोठा विषय आहे. आपण म्हणता त्या प्रमाण एखाद्या ताडपट्टीत पडदब अशी तामीळ अक्षरं स्पष्ट नक्की दिसत असतील आणि पुढे मप असंही दिसतं असेल, त्याचा अर्थ असा की प्रा.डॉ.दि.बी. हे मिपावर प्रतिसाद लिहितील. आपल्या मराठी लोकांचा तामीळ भाषेचा अभ्यास कमी पडतो त्यामुळे त्यातील भविष्यवाण्या आपल्याला समजून घेता येत नाही. तामीळभाषा तज्ञाकडे एकदा मला ते सर्व समजून घ्यायचं आहे. मला तर वाटतं. 'क' 'र' 'न' याचा अर्थ 'कोरोना' असे पाचशेवर्षापूर्वी निश्चितच एखाद्या पट्टीवर लिहून ठेवलेले असेल. एका पट्टीचं आयुष्य किमान चार पाचशे वर्ष असे वाचल्याचं आठवतं. अभ्यासकांना विचारलं पाहिजे की कोरोनाचा उल्लेख आपल्या भाकितात येतो का म्हणून...!

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2020 - 1:01 pm | चौथा कोनाडा

भारी लिव्हलंय, हसून फुटलो !
तरी, बघा बाबा, वैयक्तिक संपर्क साधा. काहीतरी आदेश असेलच की ! पुजाबिजा करून काय दर्शन होतेय का बघा !
HDNFH23

Jayant Naik's picture

24 Jun 2020 - 6:35 pm | Jayant Naik

उत्तम विनोद अगदी सहज केलाय.

सुबोध खरे's picture

29 Apr 2020 - 7:51 pm | सुबोध खरे

कोणत्याही ग्रह तार्‍यांचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही, असे माझे मत असले तरी

लहानपणी मी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिर्विद श्री दा कृ सोमण याना एक प्रश्न विचारला होता कि खरोखर आकाशस्थ ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो का?
यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिले कि

ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही
परंतु दुराग्रहाचा मात्र नक्की होतो.

लवकरात लवकर परिस्थिती सुधारावी आणि कोरोनावर एखादे औषध सापडावे हीच प्रार्थना

लस बनायला खूप वेळ लागणार असल्याचे सांगत आहेत खरंच एखादे औषध सापडणे फार गरजेचे झालेय

आपल्या देशासाठी तर लसीपेक्षा CURE औषध सापडणेच चांगले

गामा पैलवान's picture

27 Apr 2020 - 4:33 pm | गामा पैलवान

Prajakta२१,

करोना ही फुगवलेली बेडकी आहे. तुमची शंका रास्त आहे की :

दोन बलाढ्य आणि दूरगामी परिणाम करणारे ग्रह -गुरु आणि शनी हे स्वतःच्या राशीत असताना तसेच राहू केतू हे पण त्यांच्या उच्च राशीत (मथून आणि धनु) असताना अशी घटना कशी काय घडू शकते?

मी ज्योतिषतत्ज्ञ नाही तसंच विषाणूतत्ज्ञही नाही. मात्र जी माहिती पर्यायी स्रोतांकडून उघडकीस येतेय त्यावरून करोना ही टीचभर कोंबडी व हातभार मसाला असा प्रकार आहे. एक ज्योतिष जिज्ञासू म्हणून तुम्ही या मार्गानेही विचार करून पाहावा म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

अनन्त्_यात्री's picture

27 Apr 2020 - 5:03 pm | अनन्त्_यात्री

पर्यायी स्रोतांकडून करोनाविषयक काय माहिती उघडकीस येतेय ती जाणून घेण्यास उत्सुक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2020 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पर्यायी स्त्रोत काय म्हणत आहेत ? काय उपाययोजना सुरु आहेत ? त्याबद्दल माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे. लॉकडाऊन हाच अंतिम पर्याय आहेच. पण त्याही पुढे काय आहे ?

च्यायला, वाटल्यास पुन्हा एकदा दिवाबत्ती करू पण काही तरी पर्यायी प्रतिबंध झाला पाहिजे.

-दिलीप बिरुटे

मराठी कथालेखक's picture

28 Apr 2020 - 6:38 pm | मराठी कथालेखक

करोना ही फुगवलेली बेडकी आहे

गा.पै. सर,
माझेही काहीसे असे मत आहे. पण याबाबत तुमचे मत विस्ताराने ऐकायला आवडेल. या आधी कुठल्या धाग्यावर मांडले असल्यास कृपया लिंक द्यावी.
कोरोना विषयावर मिपावर विस्तृत चर्चा झाली असे वाटत नाही. डॉ खरें यांचा एक धागा सोडल्यास बाकी कोणते धागे माझ्या पाहण्यात आले नाहीत. लॉकडाऊन वाले धागे मी फारसे उघडले नाहीत (कारण "लॉकडाउनचा अमुक दिवस" यात कोरोनाबद्दल काही चर्चा असेल असे वाटले नाही ..)
बाकी करोना की कोरोना हा ही एक गोंधळ आहे. Corona या spelling प्रमाणे मराठीत कोरोना व्हायला हवे. सकाळ, लोकमत व चॅनेल्सवर कोरोनाच लिहितात, लोकसत्ता मात्र करोना. शासनाच्या पत्रकांत काय उल्लेख आहे ते नीटसे पाहिले नाही. डॉ बिरुटे सर याबाबत काही मार्गदर्शन कराल काय ?

हा एक कोरडे सरांचा लेख वाचावा असे सुचवतो - थेट नाही पण अप्रत्यक्ष संबंध बराच आहे.

मराठी कथालेखक's picture

29 Apr 2020 - 4:45 pm | मराठी कथालेखक

स्पॅनिश फ्लू चा ना ? वाचला आहे

गामा पैलवान's picture

30 Apr 2020 - 12:42 am | गामा पैलवान

मराठी कथालेखक,

करोनाची भानगड म्हणून एक स्वतंत्र लेख टाकला आहे : https://www.misalpav.com/node/46631

कृपया वाचून आपले मत नोंदवणे.

धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

30 Apr 2020 - 8:44 pm | मराठी कथालेखक

गा. पै,

आपला लेख दिसत नाहीये.
You are not authorized to access this page. अशी error येते आहे.

सतिश गावडे's picture

27 Apr 2020 - 7:56 pm | सतिश गावडे

दोन बलाढ्य आणि दूरगामी परिणाम करणारे ग्रह -गुरु आणि शनी हे स्वतःच्या राशीत असताना तसेच राहू केतू हे पण त्यांच्या उच्च राशीत (मथून आणि धनु) असताना अशी घटना कशी काय घडू शकते?

गुरु आणि शनी तसेच राहू केतू या चौघांचेही चंद्र बळ कमी पडले असावे म्हणून हे दिवस पाहायची वेळ त्यांच्यावर आली असावी.

पाटीलबाबा's picture

29 Apr 2020 - 7:38 pm | पाटीलबाबा

माझ्या मते ऊत्तम ज्योतिष जानकार सुहास गोखले म्हणून होते पण टिकाकारांनी पळवून लावले.

Prajakta२१'s picture

29 Apr 2020 - 10:49 pm | Prajakta२१

ज्योतिषात तीन गण आहेत मनुष्य,देव आणि राक्षस २७ नक्षत्रांना हे गण allot केले आहेत मनुष्य स्वभावाचे ज्योतिष व पत्रिकेनुसार विश्लेषण करताना ह्या गणांची पण मदत होते
साधारणतः मनुष्य गणी माणसे स्वार्थी पण पापभिरू,देवगणी माणसे स्मार्टली कार्यभाग उरकणारी आणि राक्षस गणी माणसे हेकेखोर ,वर्चस्ववादी असतात
एका ठिकाणी वाचले होते कि राक्षस गणी माणसांचे जीवन थोडे संघर्षमय असते
पण माझे निरीक्षण कॉन्ट्रडीक्टरी आहे राक्षस गणी माणसे इतरांच्या जिवावर स्वतः आरामात जगत असतात असे घरी दारी दोन्ही कडे पहिले आहे
आजकाल राक्षसगणी लोकच जास्त यशस्वी झालेले पहिले आहेत त्यामानाने मनुष्यगणी लोक मध्यममार्गी जीवन जगतात आणि देव गणी लोकांचा एकदमच उत्कर्ष होतो असे पहिले आहे
राक्षसगणी लोकांच्या सान्निध्यात आल्यावर आपली energy त्यांनी शोषून घेतल्यासारखी वाटते फील्स like drained विथ them.
ह्याबद्दल कोणी काही सांगू शकेल का?

सध्या सूर्याने वृषभ राशीत प्रवेश केला आहे
एक महिना सूर्य वृषभ राशीत आहे
तसेच मंगळ कुंभ राशीत गेला आहे
ह्याचे चांगले परिणाम घडावेत हीच अपेक्षा

आत्ताच एका फेसबुक ऍस्ट्रोलॉजि groupvar लेख वाचला

त्यानुसार june एन्ड ला गुरु परत धनु राशीत जाणार आहे (३१ मार्च पूर्वीसारखी स्थिती ) पण भारताची मकर रास असल्याने जुलै ते नोव्हेंबर भारताने काळजी घेन्याची गरज व्यक्त केली आहे एप्रिल ते जून गुरु मकरेत आहे त्याचा म्हणावा तेवढा फायदा झाला नाहीये साथ आटोक्यात राहायला हवी होती किंवा
संपायला हवी होती यावर जाणकारांची मते वाचायला आवडतील
मकरेतल्या गुरूचा अमेरिकेला होणारा त्रास स्पष्ट दिसतोय त्या मानाने (एका मागून एक काहीतरी पेटतेय सारखे)

२१ जुन ला ग्रहण आहे सगळ्यांनी काळजी घ्यावी

अवांतर -न्यूझीलन्ड ची काय रास असावी ? कोरोनामुक्त झाल्याने उत्सुकता वाटली एवढेच

मराठी_माणूस's picture

22 Jun 2020 - 10:33 am | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/arthvrutant-news/article-on-trap-investing-in-t...

ह्या आजच्या लेखात असे म्हटले आहे की नॉर्वेच्या माजी पंतप्रधानांनी एक वर्षापुर्वी श्वसनाचा एक रोग २०२० मधे जगभर पसरु शकतो.
ह्याचे खुप आश्चर्य वाटते, त्यांनी ते कशाच्या आधारवर भाष्य केले असेल ?

मराठी_माणूस's picture

22 Jun 2020 - 10:35 am | मराठी_माणूस

*२०२० च्या पहील्या तिमाहीत

शाम भागवत's picture

22 Jun 2020 - 11:18 am | शाम भागवत

नाॅर्वेच्या पंतप्रधानांच्या सिक्सथ् सेन्स बद्दल काही कल्पना नाही पण ....

मंदीमध्ये सोन्यासारखे शेअर मातीमोल किमतीला मिळतात, पण त्या वेळेस गुंतवणूक करायला रोकड सुलभता नसते. आपलेच पैसे योग्य वेळेस शेअर्स न विकल्याने अडकून पडलेले असतात. खालच्या किमतीला आपले झालेले नुकसान डोळ्यासमोर दिसत असल्याने नवीन गुंतवणुकीस इच्छा नसते.

लेखातले वरचे वाक्य मात्र महत्वाचे आहे. बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला असेल.

गामा पैलवान's picture

22 Jun 2020 - 9:57 pm | गामा पैलवान

मराठी_माणूस,

करोनाची साथ पूर्वनियोजित होती. चीनच्या बुरख्याआडून अमेरिकी प्रस्थापितांनी या विषाणूचा बागुलबुवा प्रसारमाध्यमांतनं उभा केला आहे. अँथनी फौची ( का फौसी ) या इसमाने वूहानच्या प्रयोगशाळेस २०१४ ते २०१९ पर्यंत ३७ लाख डॉलर्स पुरवले. तत्संबंधी बातम्या (इंग्रजी दुवे) :

१. https://www.dailymail.co.uk/news/article-8211291/U-S-government-gave-3-7...
२. https://www.washingtontimes.com/news/2020/apr/27/anthony-fauci-should-ex...
३. https://nypost.com/2020/04/29/dr-fauci-backed-controversial-wuhan-lab-st...

फौची हा एक प्रचंड भ्रष्ट मनुष्य आहे. हा गेले ३६ वर्षं एड्सची लसवर संशोधन करीत होता म्हणे. किती पैसा खाल्ला असेल त्याने?

करोना हे एक थोतांड आहे.

आ.न.,
-गा.पै.

मराठी_माणूस's picture

23 Jun 2020 - 12:45 pm | मराठी_माणूस

करोना हे एक थोतांड आहे.

म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ? कारण लखो लोक बाधीत आहेत आणि काहींचा दुर्दैवी अंत झाला आहे ही तर वस्तुस्थिती आहे ना ?

गामा पैलवान's picture

23 Jun 2020 - 6:19 pm | गामा पैलवान

मराठी_माणूस,

हा साधा फ्लू आहे. लाखो लोकं सर्दीपडश्यानेही बाधित असतात.

करोनामृत हे करोनामुळे मृत झालेले नसून करोना अंगात असतांना मृत्यू पावलेले आहेत. त्यांना इतर व्याधी बऱ्याच प्रमाणावर होत्या, ज्या करोनापायी वर्धित झाल्या.

आ.न.,
-गा.पै.

मराठी_माणूस's picture

24 Jun 2020 - 11:44 am | मराठी_माणूस

ज्या करोनापायी वर्धित झाल्या.

म्हणजेच करोनामुळे आहेत त्या व्याधी बळावतात आणि प्रसंगी प्राणावर बेततात असा अर्थ होतो आणि त्यामुळेच करोनाला दुर्लक्षीत करता येत नाही .

गामा पैलवान's picture

24 Jun 2020 - 6:01 pm | गामा पैलवान

एकदम बरोबर!
-गा.पै.

सुबोध खरे's picture

22 Jun 2020 - 6:50 pm | सुबोध खरे

मंदीमध्ये सोन्यासारखे शेअर मातीमोल किमतीला मिळतात, पण त्या वेळेस गुंतवणूक करायला रोकड सुलभता नसते. आपलेच पैसे योग्य वेळेस शेअर्स न विकल्याने अडकून पडलेले असतात. खालच्या किमतीला आपले झालेले नुकसान डोळ्यासमोर दिसत असल्याने नवीन गुंतवणुकीस इच्छा नसते.

या साठी एक अनुभवाने तयार केलेली युक्ती.

आपण अगोदर घेतलेले काही समभाग अगोदरच फार उच्च किमतीला असतात उदा. एखादा समभाग ४ हजार रुपये किमतीचा असेल (फायझर) तर त्याची किंमत ८ हजार होण्याची शक्यता फार कमी असते. त्याचा संपूर्ण कालावधीतील उच्चांक ५१७० आहे.

या उलट काही समभाग काहीच कारण नसताना केवळ बाजार पडला म्हणून खाली पडले असले उदा ( स्टेट बँक ऑफ इंडियाचे) तर ते समभाग तुम्हाला अतिशय आकर्षक किमतीला मिळू शकतात.

मी फायझरचे १० समभाग १९ मे ला ४३०० ला काढले आणि त्याच पैशात स्टेट बँक ऑफ इंडिया चे २५० समभाग १६० रुपयाला घेतले आज तेच समभाग १८७ रुपयाला आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडिया काही केल्या बुडणे शक्य नाही( ती बुडू देणे म्हणजे सरकारच बुडणे).पुढच्या वर्षभरात हा समभाग २४० पर्यंत जाण्याची शक्यता बरीच जास्त आहे.

आश्चर्य म्हणजे फायझरचे समभाग पडून उलट ३७०० च्या आसपास आहेत.

आणि अशा महामारीच्या कठीण काळात आपली संचित ठेव (FD इत्यादी) मोडून समभाग घेणे फार धोक्याचे असू शकते. कारण घरच्या कुणाला आजार झाला तर मोठ्या रकमेची गरज भासू शकते आणि त्या वेळेस बाजार पडलेला असेल तर व्याज सोडाच मुदलातच खोट येऊ शकते.

शाम भागवत's picture

22 Jun 2020 - 11:51 pm | शाम भागवत

आत्ताची पुलबॅक रॅली असावी का? तसं असेल तर नफा पदरात घेतलेला बरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jun 2020 - 11:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय नै, काय खायचं प्यायचं खाऊन पिऊन घ्या. काय बोलायचं पाहुण्या-रावळ्यांशी बोलून घ्या.
एखाद्या ग्रहावरचा मोठा धुमेकेतू येऊन टकरला तरी चालेल पण दररोजचा हा तान नको आता.

:)

-दिलीप बिरुटे