"आकाश केशरी होते ..."

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
21 Apr 2020 - 2:28 pm

"आकाश केशरी होते ..." उषा मंगेशकरांनी गायलेल्या गाण्याचे बोल शोधतोय....
IMG_7545[1]

ACEY7610[1]

IMG_4895[1]

IMG_4893

IMG_4793

MJ jun2013 015

019

IMG_4802

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Apr 2020 - 9:11 pm | चौथा कोनाडा

वाह चौकस२१२, सुंदर केशरी आकाशचे जबरदस्त फोटो !
सगळेच फोटो आवडले.

आणि स्पेशल थॅन्क्स, या सुंदर गाण्याची ओळख करून दिल्याबद्दल !

आकाश केशरी होते ...
- सुधीर मोघे

आकाश केशरी होते
आकाश केशरी होते ... ।।

तिन्ही सांजेच्या तीराला शीतळली नव्हती पुरती
क्षितिजाची लालस ज्वाला जरी मावळतीचे वारे
सांगावा आणित होते जरी तारे फिकट होते
चंद्रोदय नव्हता झाला चंद्रोदय नव्हता झाला
आकाश केशरी होते ।।

पाण्यात बुडाले बिंब.काळोख दाटुनी आला
कशिद्याचा चमचमणारा जणू गर्भरेशमी शेला
रंगांचे पक्षी निजले. झोपल्या दिशाही दाही
तो नव्हता आला तरीही, चंद्रोदय नव्हता झाला
आकाश केशरी होते ।।

कळले ही नाही बाई तो स्वतः कुठुनी आला
निमिषात बुडाली केंव्हा रात्रीची चंदनवेळा
जरी नव्हते भानावर मी मज इतुके अंधुक कळले
मी मिठीत जेंव्हा शिरले चंद्रोदय नुकता झाला
आकाश केशरी होते ।।

हे मी पार्लेकर यु ट्यूबवरील व्हिडियो गाण्यावरून वरून टंकबद्ध केलं आहे.
चूकभूल देणे घेणे.

हे उषा मंगेशकरांनी गायलं आहे कि नाही हे माहित नाही. आंजावर/ यु ट्यूबवर सापडले नाही !

चौकस२१२'s picture

22 Apr 2020 - 3:31 am | चौकस२१२

धन्यवाद .. मला पण कुठे आंतरजालावर नाही सापडले

जव्हेरगंज's picture

21 Apr 2020 - 9:18 pm | जव्हेरगंज

अप्रतिम फोटो!!

वीणा३'s picture

21 Apr 2020 - 9:19 pm | वीणा३

सुरेख फोटो 

कंजूस's picture

21 Apr 2020 - 9:33 pm | कंजूस

छान!

पैलवान's picture

22 Apr 2020 - 6:51 am | पैलवान

रंगांची उधळण अगदी प्रेक्षणीय!

चौकस२१२'s picture

22 Apr 2020 - 7:45 am | चौकस२१२

किमया निसर्गाची, दक्षिण गोलार्धातील , अगदी कमी प्रदूषण ,,,, माझा कर्तृत्व काहीच नाही...असलंच काही श्रेय तर शब्द + चित्र यांचा मेळ घालण्याची किंवा रंगमंच कसा सजवावा याची थोडी फार कला ../ अनुभव
साधा एस एल आर कॅमेरा पण नाही ...

पैलवान's picture

22 Apr 2020 - 12:36 pm | पैलवान

कानिफनाथ मंदीर
1

आमचं शेत
1

हर्णे
1

मुंढवा नदी पुल (या संध्याकाळी काहीतरी विशेष होतं कारण रंग फारच खुलले होते)
1

मुंढवा नदीपुल (एक सामान्य संध्याकाळ)
1

दिवे घाट
1

चौथा कोनाडा's picture

22 Apr 2020 - 12:52 pm | चौथा कोनाडा

एक नंबर ! सुंदर !

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2020 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा

एक नंबर फोटो हो पैलवान! :)

ऋतु हिरवा's picture

22 Apr 2020 - 7:25 pm | ऋतु हिरवा

कविता सुंदर आहे

मन्या ऽ's picture

25 Apr 2020 - 11:27 am | मन्या ऽ

वाह! खुपच सुंदर क्षण टिपलेत.. आवडले. :)
@चौथा कोनडा, सुंदर कवितेसाठी धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2020 - 12:04 pm | चौथा कोनाडा

_/\_

किल्लेदार's picture

28 Apr 2020 - 1:57 am | किल्लेदार

स्वराज्याचा केशरी रंग !!!

0

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2020 - 12:04 pm | चौथा कोनाडा

भारी !

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो
हि कविता आठवली !

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

15 May 2020 - 11:54 pm | सौ मृदुला धनंजय...

बा !!खूपच सुंदर .सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. केशरी रंगाची उधळण.