Skip to main content

[शशक' २०२०] - हेवा

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 17/04/2020 07:07 या दिवशी प्रकाशित केले.

हेवा




उर्वशीचं रात्री उशिरा येणं, उशिरा उठणं, नवऱ्याने तिची सरबराई करणं राधा खिडकीतून बघायची आणि तिच्या सुखाचा हेवा करायची. ते सुख मिळावं म्हणून मनोमन प्रार्थना करायची. एक दिवस राधा उर्वशीच्या कायेत शिरली. आज राधेने उशिरा उठून नवऱ्याने केलेला नाष्टा आरामात खाल्ला. दिवसभर तो काम करत होता आणि राधा आराम करत होती. संध्याकाळ झाली; नवऱ्याने राधेला तयारी करायला सांगताच ती खुशीत तयार झाली. एक येऊन गाडी राधेला घेऊन गेली. रात्री उशिरा घरी परतताना राधेला स्वतःचीच किळस वाटत होती. शरीर उर्वशीचं असलं तरी मन तर राधेचं होतं. दार उघडताच नवऱ्याने पैशांसाठी हात पसरले आणि समोरच्या घरातून तिच्याकडे बघणाऱ्या उर्वशीकडे बघत राधेने डोळे पुसले....


वाचने 34881
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

+१ माझ्यासाठी ही विजेती कथा. एकदम बेस्ट, लेखन, धक्का इ

रात्री उशिरा घरी परतताना राधेला स्वतःचीच किळस वाटत होती. हे शेवटी यायला हवं होतं खरंतर.. पण तरीही सुपर्ब!!! आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट! +१

+१

+१

+१ - (कथा आवडलेला) सोकाजी

+१

+१

+1

+१ सं - दी - प

संवेदनाशील !

+१

+

मस्त कथा

आवडली

आवडली पैजारबुवा,

+१ कोरोना सोडून इतर विषय असल्याने जास्त कौतुक

+१

+1

+१

+१ "प्रसाद" पण आवडलेली आहे हे नम्रपणे नमुद करुन खाली बसतो!

+१

+१

ज ब रा ट!

+१

+1

भारी

+१

+१

भारी

+१

+१

असा अनुभव आहे. एखादीनं डायमंड नेकलेस घेतला तर आधी तिचा नवरा पैसे काय मार्गानं मिळवतो याची खबर काढली जाते. राधा फारच बालिश वाटली. किमान गाडी आल्यावर, पुढे काय वाढून ठेवलंय हे कुणाही स्त्रीला कळायला हवं.

आवडली

+१ आवडली! 'उर्वशी' आणि 'राधा' ही अप्रत्यक्षपणे पात्रांची व्यक्तिमत्वे अधोरेखित करणारी नावे फार समर्पक वाटली!

+१

+१

+1

+१

ज्योतीताई खूप अभिनंदन उत्तम कन्सेप्ट !

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

धन्यवाद मलाही अपेक्षित नसलेला प्रतिसाद मिळाला

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

धन्यवाद मलाही अपेक्षित नसलेला प्रतिसाद मिळाला

In reply to by ज्योति अळवणी

परकायाप्रवेशावरील ही बहुधा मिपावरील पहिलीच कथा असावी (आणखी असल्यास जरूर दुवे द्यावेत). याबद्दल लेखिकेचे अभिनंदन. मात्र कथेत अगदी ढोबळ म्हणता येतील अशा विसंगती आढळल्या: १. परकायाप्रवेशावरील साहित्यात (उदा. गुजरातेतील राजा विशालदेवाचा मुलगा राजपुत्र हरिपाळ याच्या मृत देहात चक्रपाणी महाराजांनी केलेला परकायाप्रवेश ) परकायाप्रवेशाची सिद्धी अवगत असलेली व्यक्ती फक्त दुसर्‍या मृत शरीरातच प्रवेश करू शकते, आणि तिचे मूळ शरीर अचेतन अवस्थेत रहाते , असे वाचायला मिळते. या कथेतील राधेने जिवंत असलेल्या ऊर्वशीच्या शरिरात कसाकाय प्रवेश केला? आणि शरीरांची अदलबदली झाली असे म्हणावे तर ऊर्वशीला सुद्धा ही सिद्धी अवगत होती, आणि दोघींनी निश्चित वेळ ठरवून परस्पर संमतीने हा बेत ठरवला होता का? तसे असेल तर ऊर्वशीने राधेला वस्तुस्थिती का सांगितली नाही ? ... असे प्रश्न उपस्थित होतात. २. अशी सिद्धी अवगत असलेली राधा ही महान योगिनी असली पाहिजे. तिला योगसामर्थ्याने ऊर्वशीबद्दलची माहिती मिळाली नव्हती का?
एक येऊन गाडी राधेला घेऊन गेली.
३. नवरा स्वतः घरीच रहातो, आणि आपल्याला कुणाबरोबर तरी बाहेर पाठवतो, यावरून राधेला काहीच समजले नाही का? की तिलाही काहीतरी भलतेच करून बघावे, अशी सुप्त इच्छा होती ? ४. गाडीतून जाताना, किंवा नंतर 'तो' प्रसंग घडून येण्यापूर्वी राधेने परत आपल्या मूळ शरीरात प्रवेश का केला नाही ? त्यात कोणती अडचण होती ? (इथे पुन्हा राधेच्या सुप्त मनात तसल्या चोरट्या सुखाची लालसा होती, असे वाटून जाते).

चित्रगुप्त जी, आपणास या शशकचा मूळ उद्देश लक्षात आलेला नाही; असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. मूलतः 'grass is always green on the other side'; या उक्तीप्रमाणे राधेला सुरवातीस उर्वशीचे केवळ सुखासीन आयुष्य दिसते... परंतु त्यातील पीडा तिला कशी समजावी? (आणि मी ते केवळ 100 शब्दात कसे मांडावे? म्हणून मग मी लेखन स्वातंत्र्य घेत 'परकाया प्रवेश' या माध्यमातून उर्वशीचे दुःख राधेपर्यंत पोहोचवले)