लॉकडाऊन : अकरावा दिवस .

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
4 Apr 2020 - 8:48 am
गाभा: 

काय चुकले ...व आता पुढे काय .......?

नमस्कार मिपाकर , काय घरीच बसून आहात ना... की बाहेर उगीच कोणी फिरताहेत हे पाहाण्यासाठी तुम्ही देखील उगीच बाहेर पडत आहात? काय आहे नदीला पूर आला तरी रंजन म्हणून " पाणी बघायला " येता का असे विचारणारा " मानव" हा मोठा विचारी पण विचित्र प्राणी पृथवीतलावर आहे ! असो. घरातच रहा. कण्टाळा आला तरी जो वर व्हायरस ला कण्टाळा येत नाही अगदी तोवर ! आजचा विचार गाभा म्हणू रोगराई व कायद्याने निर्माण होणार्या समस्या .

१२ मार्च रोजी मी पुण्यास गेलो होतो आकुर्डी वरून . तेन्व्हा पुण्यात बरेच लोक रूमाल ,मास्क जे जमेल ते लावून वावरत होते. माझ्या महितीप्रमाणे दिल्लीतील इस्लामी सम्मेलन मलेशियात फेब्रुवारीतच भरले होते . तिथून बरेचसे प्रतिनिधी दिल्लीला आले कारण त्याना का कोणास ठाउक दिल्लीलाही आणखी एक सम्मेलन करायचे होते. त्या संस्थेचे मुख्यालय निझामुदीन येथे आहे. भारतातील पहिली केस पुण्यातच सापडल्याने १२ मार्चला पुण्यात अवेअरनेस निर्माण १२ तारखेलाच होता याचा साक्षीदार मीच आहे.

आता दुर्दैव असे की हा पुण्यातील लोकांमधील अवेअरनेस दिल्ली पोलीस व केंद्र सरकार व केजरीवाल सरकार यांच्यात निर्माण व्हायला वेळ लागला ही अक्षम्य चूक आहे. त्यात केन्द्रीय आरोग्य विभागाने " ही आरोग्य तातडी " नाही ,काळजी करायचे कारण नाही असेही मार्च च्या मध्यास म्हटल्याचे पुढे आले आहे। आता शाहीनहीन बाग गूंडाळण्याची तारीख पाहू ! २४ मार्च २०२० . म्हणजे भारत देशात रोग नियंत्रण कायदा १९३७ इतका दुबळा आहे की त्यात कायदेशीर पळवाटा काढून निषेधाचा रस्त्यातील अडसर तसाच ठेवण्यात आला.हे किराणा मालाचे दुकान नव्हे तर तो निषेध व्यासपीठ आहे त्याला तुमचा हुकूम लागू होत नाही असे समर्थन मुस्लीम संयोजकांकडून करण्यात आले। सर्व अवेअरनेस जनतेने ठेवायचा व कायदेपंडितांनी व आमदार खासदारांनी संगनमत करून कायदेच असे बनवायचे की रस्त्यात दहीहंडी करता यावी,गणपती बसवता यावा, निषेध करण्यासाठी टेन्ट टाकता यावा ! याला लोकशाहीतील सांस्कृतिक विकृत चैन म्हणतात . सार्वजनिकपणातील राष्ट्रधर्मा पेक्षा आम्हाला धर्म , परंपरा ,उत्सव अधिक महत्वाचे आहेत कारण आमची व्होट बँक त्यावर अवलंबून आहे. पण हे सारे हिशेब त्या दुष्ट व्हायरसला कसे कळणार हो ? त्याचे काम एकच ,एक मानवी पेशी गाठायची, तिच्यावरचे कुलूप उघडून आता शिरायचे व तिचे अन्न वापरून स्वतः: ला दुप्पट , हजारपट करायचे ,तिला फोडायची व बाहेर येऊन पुन्हा भरलेल्या पेशीचा शोध.

अचानक रेल्वे बंद २३ ला झाल्या ,सर्व नाही तरी बर्याचशा सबब ते निझामुदीन वाले अडकून पडले असे त्यांचे म्हणणे आहे. आप पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान म्हणतात त्यांनी २३ मार्च रात्री १२ ला ए सी पी व डी सी पी दिल्ली पोलीस यांना १००० लोक अडकून पडल्याची माहिती दिली होती .पोलिसांनी त्यांच्या वाहातुकीची दखलच घेतली नाही . ( दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत ) तिकडे विमानतळावर काही फ्लाईटचे थर्मल चेकिंग व काहींचे नाही असा घोळ केल्याने पुण्यात रोगाचा नारळ दुबई मार्गाने फुटला .

बरे आता "लॉकडाऊन" झाले . काय चालू राहणार काय बंद राहाणार हे वरवर ठरले तरी मॉल व मंडई ,तसेच बँका यांचा एस ओ पी सरकारने जाहीर केला नाही. पोलिसांनी जणू राष्ट्राविरोधी बंड सुरू झाल्यासारखे बडवायला सुरुवात केली . या बाबत काही कागदपत्रे घोषित करून ( उदा औषधाचे बिल , मुव्हमेन्ट पास ) ती नसतील तर थेट पोलिसांच्या ताब्यात असे काही केले असते तर लोकांशी एक समजुतीचा करार झाला असता . आता जे विमानतळावरून किंवा घरून क्वॅरंटाईन मधून पळून गेले त्यांच्यावर कोणत्या कायद्याने एफ आय आर करायची याला सुद्धा डोके लढवावे लागेल सरकारला ! कारण निर्भया खटलयातले वकील सैद्धांतिक कारण दाखवून या "सुसाईड बॉम्बर ची वकीली करायला मोकळे.

सर्व जगाने यासाठी एकत्र येऊन " वर्ल्ड सर्व्हायवल इमरजेंसी ऎक्ट " सारखे काहीतरी निर्माण करावे ज्यात , एट्रोसिटी ,प्राणी संरक्षण,, वन सरंक्षण ,मानवी हक्क , एवढेच काय पर्यावरण संरक्षण हे दुय्यम मानले गेले पाहिजे। म्हणजेच या कायद्याची अशी तरतूद झाली की देह हां जाळलाच पाहिजे तर ते सर्व जगाने मानवी वंश टिकण्याच्या दृष्टीने मान्य केले पाहिजे. त्यास सरपण लागत असेल तर वृक्षप्रेमी आडवे आले तर त्याना तुरुंगाची हवा दाखविली पाहिजे.

या घटनेचा एक धडा भारत काय सर्वच देशानी घेणे गरजेचे आहे की मानवी जीवन हे अगदी संविधानापेक्षाही महत्वाचे आहे. त्यासंबंधीचा कायदा हा सर्वोच्च हवा ! धर्म , परंपंरा , भावना दुखविणे ,मूलभूत हक्क हे सगळे नंतर . या विषाणूच्या हलयात जे वाचले ते देवाने ,अल्लाने वाचवले पण जे गेले ते त्यांच्या कर्माने अशी दुराग्रही भूमिका ही मांडली जाईल ती फार नंतर ! धर्म , परंपंरा , भावना दुखविणे ,मूलभूत हक्क, शेअर बाजार , मार्केट शेअर , बॅलन्स ऑफ़ ट्रेड याना विषाणूंच्या जगतात या मूल्याना काडी इतकीही किंमत नाही ! त्याना कळते मी स्पर्शाने , पाण्यातून , ,अन्नातून ब्लड ट्रांस्फ्यूएजन मधून,,हवेतू,,,सम्भोगात,,,,चुं बनातून वा डासासारख्या एखाद्या वाहकातून कसे कोणत्या मार्गाने प्रवास करायचा व् मानववाकडे त्याचे उत्तर लैंगिक एकनिष्ठा, औषधि, लसी ,द्रव व् अन्न शुद्धीकरण ,मास्क, संरक्षक पोशाख या स्वरूपात आहे. या विशिष्ट विषाणूची " वर्तणूक " पहाता सर्वात आवश्यक व् नाइलाज ( खरे तर एकमेव इलाज म्हणून ) सामाजिक विलगीकरण आवश्यक आहे. यात नमाज ,आरती,, रविवारचा मास , यात्रा, उरूस , बगाड यांची आहुती पडली तरी चालेल ,कारण अम्बानी , रतन टाटा ,अक्षयकुमार यानी ही आपल्या ही आपल्या परीने कशाची तरी आहुती या यद्न्यात टाकली आहे. हजारो डॉक्टर , नर्सेस , पोलीस , होमगार्ड , सफाई कामगार ,वॉचमैन धोका पत्करून टाकीत आहेत.

प्रतिक्रिया

कबिर's picture

4 Apr 2020 - 9:36 am | कबिर

सर्व अवेअरनेस जनतेने ठेवायचा व कायदेपंडितांनी व आमदार खासदारांनी संगनमत करून कायदेच असे बनवायचे की रस्त्यात दहीहंडी करता यावी,गणपती बसवता यावा, निषेध करण्यासाठी टेन्ट टाकता यावा ! याला लोकशाहीतील सांस्कृतिक विकृत चैन म्हणतात . सहमत

कुमार१'s picture

4 Apr 2020 - 9:41 am | कुमार१

प्रतिकूल परिस्थितीत आपले डोके कसे शांत ठेवायचे, हे सध्या छान शिकत आहे.

कंजूस's picture

4 Apr 2020 - 10:12 am | कंजूस

लवकरात लवकर उपाय ( औषधे) शोधणे हेच एकमेव उत्तर आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2020 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकटराजासेठ, लॉकडाऊनच्या मालिकेत विषय प्रस्तावाची चांगली मांडणी. पानंची पानं लिहावे असे. बाय द वे, काल मेणबत्ती या विषयावर मस्त बोलता आलं. बाकी, एकेक दिवस पुढे जात राहतो, दिवस थांबून राहात नाहीत हेच खरं. दहा दिवस संपलेत. बाकीचे दिवसही असेच घरात बसून निघून जातील.

आज जरा कंटाळा आलाय. बाकी, वेळ मिळेल तसा धाग्यात येत राहीन.

फार मनावर, नकोस घेऊ हट्ट मनाचे
हाच मदारी, करतो माकड प्रत्येकाचे.

- दिलीप बिरुटे

कंजूस's picture

4 Apr 2020 - 11:55 am | कंजूस

लहानपणी हा खेळ करणारे येत असत. दोन माकडे. एक धरम आणि दुसरी हेमा. तसे मुखवटे लावत. प्रथम एक वेगळ्याच नटीचे मुखवटे लावून धरमला दाखवण्यात येई.धरम मान फिरवून रागावून बसे. चिडून एका पिचक्या बांबूने मदारीलाच झोडपायचा. मग हेमाचा मुखवटा लावल्यावर धरम खुश.
"तिंबुड त्ता त्ता त्या" च्या गाण्यावर धरम उलट्यासुलट्या कोलांट्या मारुन बच्चे लोकांना खुश करायचा.
मग पुढचा एपिसोड -
हेमासाठी साडी घेऊन जाणे. दोनचार फाटकी कापडं पाहून हेमा तोंड फिरंगटून बसायची. एक जरीचा काठ पोतडीतून काढून दिल्यावर हेमा खुश. फोटो सेशन.
धरम आरशात तोंड बघून केस विंचरायचा. काय धमाल खेळ असे. खेळ संपत आल्यावर माझा धाकटा भाऊ शर्ट ओढून सांगायचा "चल लवकर, आता तो पैसे मागणार." मग कटायचो हळूच.
घरी जाऊन मग हाच खेळ आम्ही खेळायचो. एक जत्रेतलं डमरू आणि
"तिंबुड त्ता त्ता त्या"
"तिंबुड त्ता त्ता त्या"
"तिंबुड त्ता त्ता त्या"
आजची श्टोरी संपली.

आजच पेपरमध्ये बातमी वाचली आता टेरेसवर फिरणाऱ्या नागरिकांवर पण कारवाई होणार.
अवघड आहे.

बातमीची लिंक द्याल का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2020 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली गॅलरीत तरी यायचं की नाही ? तसंही अंधारात गॅलरीत येऊन काहीही उपयोग नाही.
ते पाच वाजताचं बरं होतं, तुमच्यासारख्या तरुण तरुणींचा उत्साह गॅलरीतून तरी पाहता येत होता. ;)

-दिलीप बिरुटे

वरच्या आणि खालच्या प्रतिसादात लिंक दिली आहे.

आता फक्त गॅलरीतच या भो (आपापल्या)

शाम भागवत's picture

4 Apr 2020 - 12:06 pm | शाम भागवत

जुन्या वस्तीतील घरे खेटून असतात. त्यामुळे एका गच्चीतून दुसऱ्या गच्चीत यापध्दतीने आरामात लांबवर हिंडता येते. त्यासंबंधात आहे का?
कृपया लिंक देऊ शकाल का?
हल्ली कोणत्याही बातमीची मोडतोड करून वेगळाच अर्थ पसरवायचा व्हायरस खूप फैलावलाय. :)

शाम भागवत's picture

4 Apr 2020 - 12:15 pm | शाम भागवत

टेरेसवर फिरणारे नाही हो.
टेरेसवर एकत्र जमणारे.

जाऊ दे. प्रत्येक जण आपल्या दृष्टिकोनातून बातमी वाचून मनांत साठवत असतो. काहीच चूक नाही त्यात. सहज प्रक्रिया आहे ती.
असो.

मी एकटाच गॅलरीत फिरल्याने काय होणारेय?
मी एकटाच माॅर्निंग वाॅकला गेल्याने काय होणारेय?

असा प्रश्न पडणाऱ्या हुषार माणसांची संख्या वाढली की गर्दी होते.
अशा हुषार माणसांच मनोगत सोशल मिडियात वाचून मग जरा कमी हुषार माणसंही बाहेर पडतात.

मी तरी बाहेर पडणार नाहीये. मी एकदम ढ आहे. माझा नंबर सर्वात शेवटी. :)
असो.

जवळपास प्रत्येकजणच गच्चीवर येतो. संध्याकाळी ६ च्या पुढे नजर टाकली असता बहुतेक सर्वच टेरेसवर प्रत्येकी किमान १० जण तरी असतात, आमच्या टेरेसवरून जवळपासच्या इमारतीतील पन्नासेक टेरेस सहज दिसतात.

आमच्या इमारतीच्या गच्चीला कुलुप लावलेल असतं.
चावी फक्त माझ्याकडेच असते.

(मनीच्या बाता : गण्या लेका मठ्ठचेस, एकदा पायमोकळे करून यायला हवं.)

संजय क्षीरसागर's picture

4 Apr 2020 - 12:25 pm | संजय क्षीरसागर

जमावबंदी आहे, तसंच विनाकारण वाहनावर फिरल्यास ते जप्त होईल पण एकटयानं सेफ डिसटंसिंगनी फिरायला काही प्रॉब्लम नाही कारण त्यानं संसर्ग फैलावत नाही.

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2020 - 1:42 pm | चौथा कोनाडा

अवघड आहे, आम्ही जातो सोसायटीच्या गच्चीत संध्याकाळी चालण्याचा व्यायाम करायला. दोन चार लोक असतात, नाकवर मास्क आणि अंतर अर्थातच असते.

पिंपरीत एका सोसायटीच्या गच्चीत सामुदायिक नमाज पडताना १५ जणांना अटक झालीय अशी बातमी आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2020 - 11:39 am | चौथा कोनाडा

आताच राज ठाकरे यांचे संयत भाषण ऐकले. छान बोलले.
कोरोना विषयी कळकळीचे बोलले, नाबलिग मरकट लोकांना फटके दिले !
खरं तर आता राज ठाकरे यांनाच मोदी यांचा अधिकृत प्रवक्ता म्हणून नेमायला काय हरकत आहे ? एक विचार माझा !

चौकस२१२'s picture

4 Apr 2020 - 2:44 pm | चौकस२१२

राज ठाकरे यांनी जे १८० अशातून वळण घेतले त्यात पत घालवली...अर्थात व्यक्तिपूजा जिथे परमोच्च आहे तिथे काय हे चालणारच..."साहेब जिथे तिथे आपण" मग साहेब बीकेसी चा असो किंवा बारामतीचा

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2020 - 8:45 pm | चौथा कोनाडा

आज काल सगळेच १८० अंशवाले आहेत, जास्त काय बोलणार ?

मी रोज तासभर भटकून येतो. पण कुणाशी बोलत उभा राहात नाही. जमावबंदी आहे.

संजय क्षीरसागर's picture

4 Apr 2020 - 11:48 am | संजय क्षीरसागर

५ किमी फिरतो. १४४ कलम जमाव बंदीला लागू आहे. सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून पायी चालणार्‍या व्यक्तीला काहीही धोका नाही कारण वायरस हवेतून पसरत नाही. अर्थात, सगळे घरात बसल्यानं रस्त्यावर आपण एकटेच असतो त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग कुणाशी करणार ?

१.५ शहाणा's picture

5 Apr 2020 - 11:57 am | १.५ शहाणा

मी पण रोज ५ किमी फिरतो , आजूबाजूला कोणीही नसल्याने व एकटाच असल्याने सोशल डिस्टन्सिंग ओपोआप साधले जातेच ,

सस्नेह's picture

4 Apr 2020 - 1:08 pm | सस्नेह

सर्व देश हॉस्पिटले बांधत असताना तिकडे पाकिस्तानी कब्रस्ताने बांधत आहेत असे दूरचित्रवाणीवर पाहिले
काय ही दूरदृष्टी ! धन्य .

आर ठाकरेंचे आजचे भाषण आवडले !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tata's IHCL opens up hotels to medical professionals; 7 establishments across Noida, Mumbai, Goa, Agra to offer rooms

चौकटराजा's picture

4 Apr 2020 - 2:01 pm | चौकटराजा

हे राजकारणी लोक काहिही बरळत असतात . राज काय भूमिका घेतात याची फिकीर व्हायरसला आहे का ? हे सर्वात महत्वाचे आहे . आपल्या टी आर पी साठी माध्यमे नावाचे बिनडोक लोक त्याला प्रतिक्रिया विचारत असतात अन तो देत ही असतो. ज्याच्या हाती निर्णय प्रकियेची दोरी सोडा सूत देखील नाही त्याची प्रतिक्रिया " केवळ सनसनाटी " असते म्हणून देणे हे माध्यम नावाचे भिकार** लोकच करू जाणोत ! त्यांना गोळ्या बंदुकीतल्या घालायच्या व जे क्वॅरंटाईन मधून पळून जाऊन बाहेर फिरले त्यांना काय लिम्लेट च्या गोळ्या द्यायच्या ? ठाकरे त्यांना काढा शोधून ! असतील तर जमात एवढेच ते ही अपराधी आहेत.

हे राजकारणी लोक काहिही बरळत असतात .
राज ठाकरे कुठेही बरळले नाहीत तर व्यवस्थित बोलले आहेत.

राज काय भूमिका घेतात याची फिकीर व्हायरसला आहे का ? हे सर्वात महत्वाचे आहे .
त्यांनी व्हयरसची नव्हे स्वतःची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे.

आपल्या टी आर पी साठी माध्यमे नावाचे बिनडोक लोक त्याला प्रतिक्रिया विचारत असतात अन तो देत ही असतो.
आजची मुलाखत समजा जरी टीआरपीसाठी असेल तरी त्यांचे मुद्दे योग्य आहेत.

त्यांना गोळ्या बंदुकीतल्या घालायच्या व जे क्वॅरंटाईन मधून पळून जाऊन बाहेर फिरले त्यांना काय लिम्लेट च्या गोळ्या द्यायच्या ? ठाकरे त्यांना काढा शोधून ! असतील तर जमात एवढेच ते ही अपराधी आहेत.
जे क्वारंटाइन मधुन पळुन जात आहेत मग ते कोणत्याही धर्माचे असोत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली गेलीच पाहिजे. परंतु जेव्हा हिंदुस्थानात राहणारी एक "जमात" जर या महामारीचा वापर जिहादच्या स्वरुपात करत असतील, डॉक्टर आणि नर्स तसेच पोलिस यांच्याशी या गंभीर परिस्थितीत गैर वर्तन करत असतील तर अश्या पिसाळलेल्या कुत्र्यांना गोळ्याच घातल्या पाहिजेत.

१५ कोटी ची "जमात" १०० कोटींवर [ अर्थातच हिंदु ] वर भारी पडतील अशी विधाने , आम्हाला आझादी हवी , शाहीन बाग आणि आता करोना जिहाद !
राष्ट्रीय सुरक्षिततेला बाधा आणणारी विधाने, आंदोलने आणि धार्मिक उन्माद आता फार वरच्या स्तरावर पोहचला असुन आता मिलेटरी बोलवण्याची वेळ आली आहे असे वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tata's IHCL opens up hotels to medical professionals; 7 establishments across Noida, Mumbai, Goa, Agra to offer rooms

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2020 - 8:47 pm | चौथा कोनाडा

ताडमतोड रोखठोक प्रतिसाद ! इटका जवाब पत्थारसे !

चौकटराजा's picture

4 Apr 2020 - 8:56 pm | चौकटराजा

हे असे जबाब लिहून अग्नी धगधगता ठेवणे अगदी सोपे आहे ! उलट सुलट असे हजारो रेफररन्स नेटवर आहेत. कोणत्याही सरकारची निर्वाणीची चाल आहे कुठे ? चार लोकांच्या कुल्यावर फटाके मारायचे म्हणजे झाले? राज ने स्वतः: च्या पक्षाचा जो काही इंटेलिजनस असेल त्याचा उपयोग करून पुरावे नावासकट पोलिसांना सादर दार करून एफ आय आर दाखल करून आता लढाईत प्रत्यक्ष उतरावे.एक नागरिक म्हणून त्याचा तो हक्क आहे व कर्तव्यही .उगाच चार मिडीयावाले आले की दे मुलाखत हे आता बद्ध व्हावे ! तो व्हायरस राहिला बाजूला . यांचे हे गोळी पुराण चालू आहे.

बाकि कुणा राजकारण्यात ती आहे कि नाहि याचि शंका वाटते. बाकि चांगल्या कामाची, पोलिसांची ते नेहमीच बाजु घेतात.
मरकज वाले त्या आरोग्य सेवकां बरोबर, नर्स बरोबर जसे वागले, ते बघुन तुमच्या डोक्याचि शीर उडाली नाहि, हे बघुन जरा आश्चर्य वाटले, कारण अशीच माणसे आज समाजात वाढत आहेत, जो पर्यन्त आपल्या घरा मध्ये कुणा बरोबर अस होत नाहि, तो पर्यन्त फक्त मजा बघत असतात.

गोंधळी's picture

6 Apr 2020 - 6:32 pm | गोंधळी

मला समजत नाही की महाराष्ट्र पोलीसांनी परवानगी नाकारली तर मग दिल्ली पोलीस जे का मोदी व शाहाच्या हातात आहे त्यांना का नाही जमलं ?
काय कारण असाव?
म्हणजे मोदी व शाहा हेच ह्या गोष्टींसाठी जबाब्दार आहेत अस दिसते आहे. पण ह्याचा जाब त्यांना कोण विचारणार?

चौकस२१२'s picture

4 Apr 2020 - 2:56 pm | चौकस२१२

काय चुकले ...व आता पुढे काय .......?
सिंहावलोकन तर झाले पाहिजे आणि होईल पण ते करताना सर्व परिस्थितीचे ध्यान ठेवावे ... टीका करणे नेहमीच सोप्पे असते पण त्या जागी आपण असतो तर आपली काय परिस्थितीत असती हे हि जरा विचार करावा.. आणि जगात कोणत्या देशात काय परिस्थिती काय उपलब्धता यावर पण खूप अवलंबून असते..
सिंगापुर सारखा क्षेत्रफळाने छोटा ( पण ६० लाख लोकसंख्या ) देश काय करू शकेल त्याची तुलना एकवेळ हाँग कोन्ग शी होऊ शकेल ,, किंवा इंडोनेशिया ची भारताशी ...
पण हे लक्षात ना घेता बरेचदा माध्यमे आणि आपण पण सर्वांगीण विचार करीत नाही... आणि देतो ठोकून मग त्यात सरकार वॉर राग काढणे , राजकारण करणे हा अंतस्थ हेतू हि असतो ( सरकार कोणाचे का हि असेना )
तेव्हा जरा दमाने घयावे...सर्वानीच

प्रचेतस's picture

4 Apr 2020 - 3:50 pm | प्रचेतस

उगाचच ट्रेंड आहे म्हणून डालगोना कॉफी बनवली.
मजा आली.

जालिम लोशन's picture

4 Apr 2020 - 5:29 pm | जालिम लोशन

सहमत,

प्रचंड प्रक्षोभक आणी सॉलिड राडा माजवणारा धागा काढावा म्हणतोय पण टायपिंगचा प्रचंड कंटाळा येतो राव. टाईप करणे म्हणजे अगदीच नेभळट पद्धत झाली राडा करायची. जालावरही हातपाय वापरता यावेत असं काहीतरी तंत्रज्ञान निघालं पाहिजे लवकर.

चौथा कोनाडा's picture

4 Apr 2020 - 8:53 pm | चौथा कोनाडा

गुगलचे स्पीच टू टेक्स्ट हे अ‍ॅप वापरा, टंकनाचा व्याप टाळा.
हवे ते बोला, मतं मांडा, वादग्रस्त विधाने करा, होऊ द्या शब्दबद्ध !
काढा धागा खुशाल मग, होऊ दे धागा शतकी, आहेच निस्ता राडा,
अरुणजोशी१२३, आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं !