लॉकडाऊन : अकरावा दिवस .
काय चुकले ...व आता पुढे काय .......?
नमस्कार मिपाकर , काय घरीच बसून आहात ना... की बाहेर उगीच कोणी फिरताहेत हे पाहाण्यासाठी तुम्ही देखील उगीच बाहेर पडत आहात? काय आहे नदीला पूर आला तरी रंजन म्हणून " पाणी बघायला " येता का असे विचारणारा " मानव" हा मोठा विचारी पण विचित्र प्राणी पृथवीतलावर आहे ! असो. घरातच रहा. कण्टाळा आला तरी जो वर व्हायरस ला कण्टाळा येत नाही अगदी तोवर ! आजचा विचार गाभा म्हणू रोगराई व कायद्याने निर्माण होणार्या समस्या .
१२ मार्च रोजी मी पुण्यास गेलो होतो आकुर्डी वरून . तेन्व्हा पुण्यात बरेच लोक रूमाल ,मास्क जे जमेल ते लावून वावरत होते. माझ्या महितीप्रमाणे दिल्लीतील इस्लामी सम्मेलन मलेशियात फेब्रुवारीतच भरले होते . तिथून बरेचसे प्रतिनिधी दिल्लीला आले कारण त्याना का कोणास ठाउक दिल्लीलाही आणखी एक सम्मेलन करायचे होते. त्या संस्थेचे मुख्यालय निझामुदीन येथे आहे. भारतातील पहिली केस पुण्यातच सापडल्याने १२ मार्चला पुण्यात अवेअरनेस निर्माण १२ तारखेलाच होता याचा साक्षीदार मीच आहे.
आता दुर्दैव असे की हा पुण्यातील लोकांमधील अवेअरनेस दिल्ली पोलीस व केंद्र सरकार व केजरीवाल सरकार यांच्यात निर्माण व्हायला वेळ लागला ही अक्षम्य चूक आहे. त्यात केन्द्रीय आरोग्य विभागाने " ही आरोग्य तातडी " नाही ,काळजी करायचे कारण नाही असेही मार्च च्या मध्यास म्हटल्याचे पुढे आले आहे। आता शाहीनहीन बाग गूंडाळण्याची तारीख पाहू ! २४ मार्च २०२० . म्हणजे भारत देशात रोग नियंत्रण कायदा १९३७ इतका दुबळा आहे की त्यात कायदेशीर पळवाटा काढून निषेधाचा रस्त्यातील अडसर तसाच ठेवण्यात आला.हे किराणा मालाचे दुकान नव्हे तर तो निषेध व्यासपीठ आहे त्याला तुमचा हुकूम लागू होत नाही असे समर्थन मुस्लीम संयोजकांकडून करण्यात आले। सर्व अवेअरनेस जनतेने ठेवायचा व कायदेपंडितांनी व आमदार खासदारांनी संगनमत करून कायदेच असे बनवायचे की रस्त्यात दहीहंडी करता यावी,गणपती बसवता यावा, निषेध करण्यासाठी टेन्ट टाकता यावा ! याला लोकशाहीतील सांस्कृतिक विकृत चैन म्हणतात . सार्वजनिकपणातील राष्ट्रधर्मा पेक्षा आम्हाला धर्म , परंपरा ,उत्सव अधिक महत्वाचे आहेत कारण आमची व्होट बँक त्यावर अवलंबून आहे. पण हे सारे हिशेब त्या दुष्ट व्हायरसला कसे कळणार हो ? त्याचे काम एकच ,एक मानवी पेशी गाठायची, तिच्यावरचे कुलूप उघडून आता शिरायचे व तिचे अन्न वापरून स्वतः: ला दुप्पट , हजारपट करायचे ,तिला फोडायची व बाहेर येऊन पुन्हा भरलेल्या पेशीचा शोध.
अचानक रेल्वे बंद २३ ला झाल्या ,सर्व नाही तरी बर्याचशा सबब ते निझामुदीन वाले अडकून पडले असे त्यांचे म्हणणे आहे. आप पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान म्हणतात त्यांनी २३ मार्च रात्री १२ ला ए सी पी व डी सी पी दिल्ली पोलीस यांना १००० लोक अडकून पडल्याची माहिती दिली होती .पोलिसांनी त्यांच्या वाहातुकीची दखलच घेतली नाही . ( दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत ) तिकडे विमानतळावर काही फ्लाईटचे थर्मल चेकिंग व काहींचे नाही असा घोळ केल्याने पुण्यात रोगाचा नारळ दुबई मार्गाने फुटला .
बरे आता "लॉकडाऊन" झाले . काय चालू राहणार काय बंद राहाणार हे वरवर ठरले तरी मॉल व मंडई ,तसेच बँका यांचा एस ओ पी सरकारने जाहीर केला नाही. पोलिसांनी जणू राष्ट्राविरोधी बंड सुरू झाल्यासारखे बडवायला सुरुवात केली . या बाबत काही कागदपत्रे घोषित करून ( उदा औषधाचे बिल , मुव्हमेन्ट पास ) ती नसतील तर थेट पोलिसांच्या ताब्यात असे काही केले असते तर लोकांशी एक समजुतीचा करार झाला असता . आता जे विमानतळावरून किंवा घरून क्वॅरंटाईन मधून पळून गेले त्यांच्यावर कोणत्या कायद्याने एफ आय आर करायची याला सुद्धा डोके लढवावे लागेल सरकारला ! कारण निर्भया खटलयातले वकील सैद्धांतिक कारण दाखवून या "सुसाईड बॉम्बर ची वकीली करायला मोकळे.
सर्व जगाने यासाठी एकत्र येऊन " वर्ल्ड सर्व्हायवल इमरजेंसी ऎक्ट " सारखे काहीतरी निर्माण करावे ज्यात , एट्रोसिटी ,प्राणी संरक्षण,, वन सरंक्षण ,मानवी हक्क , एवढेच काय पर्यावरण संरक्षण हे दुय्यम मानले गेले पाहिजे। म्हणजेच या कायद्याची अशी तरतूद झाली की देह हां जाळलाच पाहिजे तर ते सर्व जगाने मानवी वंश टिकण्याच्या दृष्टीने मान्य केले पाहिजे. त्यास सरपण लागत असेल तर वृक्षप्रेमी आडवे आले तर त्याना तुरुंगाची हवा दाखविली पाहिजे.
या घटनेचा एक धडा भारत काय सर्वच देशानी घेणे गरजेचे आहे की मानवी जीवन हे अगदी संविधानापेक्षाही महत्वाचे आहे. त्यासंबंधीचा कायदा हा सर्वोच्च हवा ! धर्म , परंपंरा , भावना दुखविणे ,मूलभूत हक्क हे सगळे नंतर . या विषाणूच्या हलयात जे वाचले ते देवाने ,अल्लाने वाचवले पण जे गेले ते त्यांच्या कर्माने अशी दुराग्रही भूमिका ही मांडली जाईल ती फार नंतर ! धर्म , परंपंरा , भावना दुखविणे ,मूलभूत हक्क, शेअर बाजार , मार्केट शेअर , बॅलन्स ऑफ़ ट्रेड याना विषाणूंच्या जगतात या मूल्याना काडी इतकीही किंमत नाही ! त्याना कळते मी स्पर्शाने , पाण्यातून , ,अन्नातून ब्लड ट्रांस्फ्यूएजन मधून,,हवेतू,,,सम्भोगात,,,,चुं बनातून वा डासासारख्या एखाद्या वाहकातून कसे कोणत्या मार्गाने प्रवास करायचा व् मानववाकडे त्याचे उत्तर लैंगिक एकनिष्ठा, औषधि, लसी ,द्रव व् अन्न शुद्धीकरण ,मास्क, संरक्षक पोशाख या स्वरूपात आहे. या विशिष्ट विषाणूची " वर्तणूक " पहाता सर्वात आवश्यक व् नाइलाज ( खरे तर एकमेव इलाज म्हणून ) सामाजिक विलगीकरण आवश्यक आहे. यात नमाज ,आरती,, रविवारचा मास , यात्रा, उरूस , बगाड यांची आहुती पडली तरी चालेल ,कारण अम्बानी , रतन टाटा ,अक्षयकुमार यानी ही आपल्या ही आपल्या परीने कशाची तरी आहुती या यद्न्यात टाकली आहे. हजारो डॉक्टर , नर्सेस , पोलीस , होमगार्ड , सफाई कामगार ,वॉचमैन धोका पत्करून टाकीत आहेत.
वाचने
19916
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
सहमत
+१
लवकरात लवकर उपाय ( औषधे)
गुड मॉर्निंग.
In reply to गुड मॉर्निंग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदारी - माकड
आजच पेपरमध्ये बातमी वाचली आता
In reply to आजच पेपरमध्ये बातमी वाचली आता by प्रचेतस
ही कारवाई करायला माणशी एक पोलीस लागेल !
In reply to ही कारवाई करायला माणशी एक पोलीस लागेल ! by संजय क्षीरसागर
ड्रोन द्वारे
In reply to आजच पेपरमध्ये बातमी वाचली आता by प्रचेतस
खुलासा प्लीज.
In reply to खुलासा प्लीज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरच्या आणि खालच्या प्रतिसादात
In reply to आजच पेपरमध्ये बातमी वाचली आता by प्रचेतस
जुन्या वस्तीतील घरे खेटून
In reply to जुन्या वस्तीतील घरे खेटून by शाम भागवत
https://maharashtratimes.com
In reply to https://maharashtratimes.com by प्रचेतस
टेरेसवर फिरणारे नाही हो.
In reply to टेरेसवर फिरणारे नाही हो. by शाम भागवत
मी एकटाच गॅलरीत फिरल्याने काय
In reply to टेरेसवर फिरणारे नाही हो. by शाम भागवत
जवळपास प्रत्येकजणच गच्चीवर
In reply to जवळपास प्रत्येकजणच गच्चीवर by प्रचेतस
आमच्या इमारतीच्या गच्चीला
In reply to टेरेसवर फिरणारे नाही हो. by शाम भागवत
बरोब्बर !
In reply to आजच पेपरमध्ये बातमी वाचली आता by प्रचेतस
अवघड आहे, आम्ही जातो
आताच राज ठाकरे यांचे संयत
In reply to आताच राज ठाकरे यांचे संयत by चौथा कोनाडा
१८०
In reply to १८० by चौकस२१२
आज काल सगळेच १८० अंशवाले आहेत
मी रोज तासभर भटकून येतो. पण
In reply to मी रोज तासभर भटकून येतो. पण by कंजूस
मी सुद्धा सकाळ-संध्याकाळ
In reply to मी सुद्धा सकाळ-संध्याकाळ by संजय क्षीरसागर
मी पण
सर्व देश हॉस्पिटले बांधत
आर ठाकरेंचे आजचे भाषण आवडले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tata's IHCL opens up hotels to medical professionals; 7 establishments across Noida, Mumbai, Goa, Agra to offer roomsIn reply to आर ठाकरेंचे आजचे भाषण आवडले ! by मदनबाण
गोळ्या कशाच्या ...?
In reply to गोळ्या कशाच्या ...? by चौकटराजा
हे राजकारणी लोक काहिही बरळत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tata's IHCL opens up hotels to medical professionals; 7 establishments across Noida, Mumbai, Goa, Agra to offer roomsIn reply to हे राजकारणी लोक काहिही बरळत by मदनबाण
ताडमतोड रोखठोक प्रतिसाद !
In reply to ताडमतोड रोखठोक प्रतिसाद ! by चौथा कोनाडा
इटका जबाब ..
In reply to गोळ्या कशाच्या ...? by चौकटराजा
'यांना' गोळ्या घाला म्हनायला पण हिंम्मत लागते,
In reply to 'यांना' गोळ्या घाला म्हनायला पण हिंम्मत लागते, by विनोद वाघमारे
दिल्ली पोलीस
सिंहावलोकन
उगाचच ट्रेंड आहे म्हणून
+1
प्रचंड प्रक्षोभक आणी सॉलिड
In reply to प्रचंड प्रक्षोभक आणी सॉलिड by arunjoshi123
गुगलचे स्पीच टू टेक्स्ट हे अ