पत्र मिळेल काय?

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
14 Nov 2008 - 7:18 pm

आजच्या मटामधील प्रकाश बाळ यांचा लेख.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3710606.cms

यात व्यक्त झालेल्या मतांवर चर्चा करता येईलच परंतु सध्या मला इच्छा आहे ती यात उल्लेखलेले सरदार पटेल यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेले पत्र.

कुणाकडे याचा दुवा / प्रत आहे काय?

इतिहासचौकशी

प्रतिक्रिया

चित्रा's picture

14 Nov 2008 - 8:38 pm | चित्रा

दुवा दिसला नाही, पण कोणी राम पुनियानी (मुंबई आयआयटीत प्राध्यापक होते आणि एकता नावाच्या गटाचे सेक्रेटरी आहेत त्यांच्या गूगलवरील पुस्तकात वरील उल्लेख मिळाला). नवजीवनच्या एका खंडात मूळ पत्र असावे.

सुनील's picture

14 Nov 2008 - 8:58 pm | सुनील

धन्यवाद. म्हणजे आता नवजीवनच्या मागे लागले पाहिजे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

14 Nov 2008 - 11:08 pm | विकास

सर्वप्रथम म.टा. मधील प्रकाश बाळ यांच्या लेखासंदर्भातः
आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, तो एकांगी वाटला... त्यातील बरेच मुद्दे प्रतिवाद करून खोडता येऊ शकतील, पण वेळे अभावी आत्ता तरी नाही...

मूळ मुद्दा, जो येथे सुनील यांनी मांडला आहे आणि तो पटेलासंदर्भातील त्यांचे "कॅबिनेट मंत्रीमंडळातील सहकारी"श्यामाप्रसाद मुखर्जी, यांच्याशी झालेल्या गांधीहत्येच्या पत्रव्यवहारासंदर्भात. त्यात पटेल म्हणालेत की, "सावरकर व संघ हे महात्माजींच्या हत्येत सहभागी होते की नाही, हे न्यायालयात सिद्ध होईल की नाही, हे मला सांगता येणार नाही. पण संघानं व सावरकरांनी जे विद्वेषाचं वातावरण तयार केलं आहे, त्याची परिणती गांधीजींच्या खुनात झाली, याबाबत माझ्या मनात काडीमात्र शंका नाही. (म.टा.)"

वर चित्राने प्रतिसादात एक संदर्भ दिला आहेच. पण तसे पटेल म्हणाले असले तरी आश्चर्य वाटायचे कारण नाही. पटेल हे गांधींचे निस्सिम भक्त होते. म्हणूनच त्यांना देशातील प्रांतिक काँग्रेस कमिट्यांनी बहुमताने निवडून दिलेले असताना आणि नेहरूंना एकही मत मिळालेले नसताना, लोकशाहीच्या तत्वावरील ही निवड, केवळ महात्मा असली तरी, केवळ एक व्यक्ती असलेल्या गांधीजींनी म्हणाले म्हणून त्यांनी नाकारली आणि नेहरूंना पंतप्रधानपद बहाल केले. असेही म्हणले जाते की गांधीजींच्या जाण्यानंतर पटेलांची तब्येत खालावली होती. त्यांना त्यांनी गृहमंत्री म्हणून जबाबदारी पाळण्यात कमी पडल्यासारखे वाटले. त्याच बरोबर आठवते त्या प्रमाणे, गोपाळ गोडश्यांनी असेही लिहीले होते की त्यांना (म्हणजे ज्यांना ज्यांना गांधीहत्येत शिक्षा झाली त्या सर्वांना) पटेल गृहमंत्री होते तो पर्यंत तुरूंगात योग्य वागणूक मिळाली. अर्थात ह्यासंदर्भात केवळ गोपाळ गोडसे म्हणतात तोच एक संदर्भ असल्याने त्याला किती महत्व देयचे हा संशोधनाचा आणि वादाच विषय होऊ शकतो. पण तरी देखील हा संदर्भ आहे इतकेच म्हणावेसे वाटते. त्याच प्रमाणे ह्या दुव्यात आंबेडकर सावरकरांच्या वकीलाशी काय म्हणालेत याचा संदर्भ आहे. त्यात देखील एक (अधोरेखीत मी केलेले) वाक्य आंबेडकरांच्या तोंडी असे दिले आहे की, "“There is no charge against your client. Quite worthless evidence has been concocted. Several members of the Cabinet were strongly of the opinion that Savarkar should not be implicated on mere doubt. But, because of the insistence of a top-ranking leader, he was implicated in this case. Even Sardar Patel could not go against him. You fight the case fearlessly. You will win." थोडक्यात त्यातून पटेलांना त्या विशिष्ठ काळात जे काही वाटत होते ते स्पष्ट दिसते.

राम पुनियांनीच्या पुस्तकाचा वर उल्लेख दिला आहे. ह्याच पुस्तकाचा संदर्भ बर्‍याचदा "रीसायकल" झालेला आढळतो... हे पुनियानी साहेब आय आय टी त बायोटेकचे प्राध्यापक आहेत. त्यांचे लिखाण हे कम्युनिस्ट पद्धतीचे आहे. आहे म्हणून मला देणेघेणे नाही, हा उल्लेख केवळ एका बाजूने हे लिखाण आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. जे पुनियानी सावरकरांनी, संघाने हिंदूत्वाबद्दल प्रचार केल्याने गोडसे जन्माला आला असे म्हणत गांधी हत्येला "गिल्ट बाय असोसिएशनने" जोडतात, तेच पुनियानी ९/११ च्या, काश्मिरमधील आणि श्रीलंकेतील अतिरेकी हल्ल्यांच्या संदर्भात मात्र त्यांना जन्माला घालणार्‍या विचारांना आणि संघटनांना, व्यक्तींना दोष देण्याऐवजी सरकारना दोष देतात. इतकेच नव्हे तर ते "जस्टीफाय (सिद्ध)" करण्यासाठी ते त्यात भगतसिंगला पण आणतात!

आता परत मूळ लेखासंदर्भात आणि त्यात विनाकारण पटेलांना आणल्याबद्दल एकच प्रश्न विचारावासा वाटतो, सरदार पटेलांनी नेहरूंना ११ नोव्हेंबर १९५० साली चीन संदर्भात पत्र लिहीले होते. ते संपूर्ण पत्र वाचण्यासारखे आहे. त्यात ते कम्युनिस्टांबद्दल काय म्हणतात आणि नेहरूंना चीन पासून सावध रहाण्याचा सल्ला देत आहेत. अर्थात ते नेहरूंनी ऐकले नाहीच आणि स्वतंत्र भारतावर प्रथमतः त्याच्यानंतर १२ वर्षांनी (६२ साली) नामुष्की ओढवून आणली... पटेलांची खालील वाक्ये वाचण्यासारखी आहेतः

  1. Communist mentality of "whoever is not with them being against them", this is a significant pointer, of which we have to take due note.
  2. Recent and bitter history also tells us that Communism is no shield against imperialism and that the communists are as good or as bad imperialists as any other.
  3. Chinese irredentism and communist imperialism are different from the expansionism or imperialism of the western powers. The former has a cloak of ideology which makes it ten times more dangerous. In the guise of ideological expansion lie concealed racial, national or historical claims.
  4. Instead of having to deal with isolated communist pockets in Telengana and Warrangal we may have to deal with communist threats to our security along our northern and north-eastern frontiers, where, for supplies of arms and ammunition, they can safely depend on communist arsenals in China.

इतिहासातील वाक्ये सांगायची असतील आणि एखाद्या ऐतिहासीक व्यक्तीस तीला मरून अर्धे शतक उलटल्यावर पण वेठीस धरायचे असेल तर ते कुणालाही आणता येईल. कम्युनिस्ट मानस हे वर पटेलांनी म्हणल्याप्रमाणे, "threats to our security" म्हणून पाहीले पाहीजे. आणि मग त्यांच्या संशोधनातील संदर्भ वापरले पाहीजेत. मला सांगा वरील वाक्ये वाचल्यावर म.टा.च्या बाळांच्या डोक्यात काही प्रकाश पडेल का? :-)