वुई मीस 'यू'!

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
9 Mar 2020 - 9:26 pm

भेटलेली संध्याकाळ
स्मरणात असते
न भेटलेल्या
संध्याकाळचे काय ?

त्या संध्याकाळी माझाही
कृष्ण आलाच नाही
योगा योगाने
वेगळ्याच मळ्याच्या दिशेनी धावलेल्या
राधेचा दुसराच कृष्ण
त्याच तळ्याकाठी गवसला

एकमेकांना आधार देत
परतत असताना
तुझं चाफ्याच्या फुलांच दुकान
वाटेत लागलं त्यानी नजर
चुकवलेलं मी पाहुन
नाही पाहिलं

त्याच्या कपाटात
तुझ्या फुलपुडीचे कागद
आणि गुंडाळून ठेवलेले
दोर होते सोबतीला
तुझी विसरलेली
मोरपंखी बांधणीची
ओढणी होती
तुझा काचेचा बाऊल
गुंडाळून ठेवलेली

हातं लावून पहाता
ओढणी ओलसर लागली
म्हणून त्याचाही हात त्यावर
ठेवून पुरुषांचे डोळे ओलावले
तर चालतात म्हणून सांगितलं

अजूनही त्या तळ्याकाठी
त्याच्या सोबत फिरायला जाताना
तुझीच ओढणी वापरते
तू त्याच्या सोबत घोडा घोडा म्हणून
खेळलेली चींचेची फांदी शहारते
हलकेच पानगळ होते
ओढणी ओलसर होते
तेव्हा बरे वाटते
माझ्याही विसरलेल्या
ओढणीची त्या निमीत्ताने
तेवढीच आठवण होते.

तुम्ही बसलेल्या झोक्यावर
आता गादी माझी आहे
त्यावर तुझी ओढणी आंथरते
आधी गुलजारचे मेरा सामान
लौटा दो त्याच्या सोबत
एकाच सुरात गाते आणि ..
जगजीतची तू विसरलेली
गझल त्याच्याकडून म्हणवून घेते
आणि पद्मा गोळ्यांच्या
चाफ्याच्या झाडाचे
विडंबन म्हणून दाखवते

त्याच्या आळ्यात
तूच तळ्यात मळ्यात
खेळलीस आणि दुसर्‍याच्या
आळ्यात त्यांच्या मळ्यात
जाऊन तूझ आपलं लक्ष
आधीच्या तळ्या कडे
असू देत, मीही त्याच
तळ्याकाठी वावरते
तुळशीला पाणी
घालून दिवेलागणी
नंतर वृंदावनाला
प्रदक्षिणा घालून
तूझ्या काचेच्या बाऊल मध्ये
मी लावलेल्या गुलांबांच्या
पाकळ्यांसोबत तुळशीची पाने
आणि मंजिर्‍या देखिल ठेवते
अन भल्या पहाटे
देवघरातल्या अनादी
आदीम कृष्णावर
बकुळी मोगरा गुलाब वाहते अन
पारीजातही वहाते.

त्याच्या न कळत
तुझ्या फुलपुड्यांचे
काही दोर मी
क्लोथलाईनच्या दोरीला
गुंडाळलेत संध्याकाळी
सुर्याची किरणे तिरपी
होतात दोरीवरचे
आमचे कपडे घडी करताना
मी माझा हात हलकेच उघडून
माझ्या मुठीत ती किरणांची
आठवण पुन्हा बांधून घेते
मनातच तळ्याची सैर
होते मन जरासे सैरभैर होते
रोजच्या करवा चौथीला
चहा गाळताना
पिठ चाळताना
चंद्र येईलसा वाटते
तेवढ्यात झुल्यावरून
किलबील ऐकुयेऊन
तंद्री भंगते पाठीशी
मावळतीच्या सुर्यालाच
आलिंगन देते कृष्णाच्या
आठ्वणीचे अद्वैत
चंद्राच्या साक्षीने
साजरे करताना
तू विसरलेली
जगजीतची गझल
साकारत असते.

तुझे सामान नेण्यासाठी
कधी आलीसच
-आणि नक्कीच ये
तुझ्या मनाची
ओल कधीच रीती
होणार नाही तुझ्या
सामानाच चक्रवाढव्याजाची
परतफेड पूर्ण होणार नाहीच
ते तसेच वाढू दे
आणि पुन्हा पुन्हा
रतीबा सारखी ये

गुलजारची नज्म बनून ये
जगजीतची गझल बनून
तुझी गीते सजवून जा
माझे सामान मला मिळेल
ना मिळेल न मिळण्याचीच
शक्यता अधिक तुझ्या
शहारणार्‍या फांदीत्च
माझ्याही शहारणार्‍या
फांदीचे भास शोधेन
जोवर माझे सामान
मला गावणार नाही
-
जर येशील
तर तुझ्या फुलपुडीच्या
दुकाना शेजारीच
माझे कपाळांवर लावण्याच्या
टिकल्यांचे दुकान आहे
तिथले टिकलीचे पाकीट
तेवढे माझ्यासाठी आठवणीने
घेऊन येशील! प्लीज!
वुई मीस 'यू'!!

प्रेर्ना अर्थातच

miss you!मुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Mar 2020 - 11:37 am | ज्ञानोबाचे पैजार

येवढ सगळ एका टिकली साठी चाललं होतं होय?

वाचताना वाटत होते की प्राची ताईंची कविता वाचून मागाकाकांची कोणती तरी जूनी जखम परत भळभळायला लागली.

पैजारबुवा,

माहितगार's picture

10 Mar 2020 - 1:33 pm | माहितगार

:) विडंबन = विडंबन
तुमचा भळभळणारा समज - गैरसमज ही वाचकाचे अन्वयार्थ क्षेत्र पण तशी शक्यता नसावी

कवियत्रीला कवियत्रीच्याच विचाराची स्त्री व्यक्तीरेखा दुसर्‍या बाजूस भेटली तर उत्तरा दाखल काय स्रवेल या कल्पनेचा विस्तार प्रयास या कवितेतून केला एवढेच. मोकळे आमंत्रण देतानाच झोपाळ्यावर गादी माझी आहे आणि मग संसाराची नाळ टिकवण्यासाठी टिकलीचा विचार पण आहे. असो.

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2020 - 9:30 pm | प्राची अश्विनी

क्या बात! इजाजत मधली रेखा चितारलीत की!!!