ये दिल हे की मानता नही !

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2020 - 10:13 pm

ये दिल हे की मानता नही !
काय करणार माणसाच्या मनाचं असतच अस कितीही केल तरी ते ऐकतच नाही . मन हे तर न उलगडणार कोडच आहे माझ्यासाठी, ते मेंदू आणि हृदय नक्की कशात असत मुळी कळतच नाही . एरवी असा प्रश्न नाही पडत माला सगळ्याच गोष्टी मना प्रमाणे होतातच अस नाही . विचार सुचण किवा करण हे मनाच काम मग त्यावर प्रक्रिया करणे हे मेंदू किवा हृदयाच काम मग घडते ती कृती . असो ....... पण ह्यासगळ्यात काही गोष्टी अश्या गुंतागुंतीच्या होऊन जातात की मग कळतच नाही काय करव कसं वागाव .

प्रेमाच्या बाबतीत पण असच होत, लहान पणा पासून आपण सिनेमा, प्रेमकथा आजुबाजूची प्रेमी युगूल हया माध्यमातून जे निरागस ,उत्कट ,निर्व्याज प्रेमाची व्याख्या आपल्या अंतर मनात केलेली असते. ती वास्तवच्या चटक्यांनी पुसली जाते . बर ते ठरवून वगैरे होत अस पण नाही हा !! आयुष्यात प्रत्येक वळणावर अशी अनोळखी माणस भेटतात काहीचा स्वभाव काहींच बोलणं ,वागण काहींच अस्तित्वच भुरळ पडून जात, मग होते देवाण घेवाण विचारांची आठवणींची कळू लागतात स्वभाव आणि एक अनामिक बांध तयार होतो सहवास हवाहवासा वाटतो . इतपर्यंत सगळं ठीक असत . पण पुढचा गोंधळ करत ते आपल मन ते शोधत असत कोणीतरी जे भरून काढेल पोकळी हक्काच्या व्यक्तिची जोडीदाराची मग सुरू होते गुंतागुंत आणि त्याच शेवट नेहमी हवा असा होतो असा नाही हा !! ते प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबुन असत की त्याने ते कस व्यक्त कराव ह्यात अविचारी माणस सरशी करतात आणि विचारी माणसांची कुचंबणा होते . असतात तर हे सगळे मनाचेच खेळ .

मग सुरू होतो मागोवा ती व्यक्ति काय खरच करत असेल तसा आपला विचार ? ती आपल्या साठी आपण तिच्या साठी योग्य आहोत ? ह्या विचारात मग विरून जातात क्षण निखळ मैत्रीचे. आणि ह्या सगळ्या प्रश्नात उकलत आपल्यात बर्‍याच गोष्टीं मध्ये असमानता किंवा विरोधाभास आहेत. ह्याची ही काही अडचण नसते, पण समोरची व्यक्ति जर का तसा विचर करत असेल तर !! धर्म, जात, भाषा, पैसा, अडका ठिकाण हे सगळं काही गौण ठरत . जर तसा नसेल तर मात्र गुंता वाढत जातो मग आपण असतो दोन समांतर रेषा ज्या काल्पनिक क्षितीज्यावर पण न जुळणार्‍या अश्या . एकतर्फी प्रेम हे नेहमी त्रासदायकच ठरत, व्यक्त केल तर अपेक्षाभंग किवा सुख, न केल तर घुसमट .

माझ्यासाठी प्रेम ही एक सुंदर संकल्पना आहे . हळुवार नाजुक भावना ही त्या दोघांमधल घट्ट नात निर्माण करणारी .फक्त डोळ्यात पाहीलं न तरी मनातलं ओळखणारी . ती रंगरूप, पैसा, समाज, वय, प्रतिष्ठा नातेवाईक अश्या कुठल्याही बाह्य गोष्टीं मुळे कसलाही फरक नपडणारी त्यात केवळ शरीराला महत्व नसून एकमेकांबद्दलच्या जाणीवेला आहे . हो जाणीव !! ती जर नसली तर कुठल्ही नात तग धरू शकत नाही . त्या दोघांनी भरपूर स्वप्न पाहवीत आणि एकत्र पूर्ण करावीत . घरट निर्माण करव दोघांच कडी काडी एकत्र करून .सहवासात आयुष्य घालवाव अगदी शेवट पर्यंत . पण अस आदर्शवादी प्रेम हे हल्लीच्या भौतिकवादी जगात मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल . असो ....... पण आत्ताच्या काळात कोणी नाही करत विचार ह्याचा . प्रत्येक जण स्वत:च्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा बाळगून असतो . प्रत्येकाच्या अपेक्षा सारख्याच असतील अस नाही . म्हणून, किमान त्या समजून घेण देखील कोणी गरजेच समजत नाही.

आश्यावेळी ते व्यक्त न केलेल बर असत ते जपून ठेवव हृदयाच्या कप्प्यात आठवणींच्या गाठोड्यात कायमच. पण काय करणार, ये दिल हे की मानता नही !!!

प्रेमकाव्यआस्वाद