व्हॅलेंटाईन्स डे, प्रेम आणि गूगल ट्रेंड्स (संयत प्रगल्भता)

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
21 Feb 2020 - 11:21 am

धागा लेख उद्दीष्टात गैर आणि झेपण्यास अवघड अशी कोणतीच बाब नाही आणि मिपाच्या सर्वसाधारण मो़कळ्या चौकटीत बसणारे आहे तरी सुद्धा तुलनेची माहिती देताना काही शब्द प्रयोग येऊ शकतात हे लक्षात घेऊन कुणि अती प्रगल्भतेच्या आशेने आले तर हिरमोड होऊ नये म्हणून धागा शीर्षकात संयत प्रगल्भता हे नमूद केले आहे.

गूगल ट्रेंड्स ही लोक गूगलवर काय शोधतात याची ढोबळ तौलनिक माहिती उपलब्ध करणारी रोचक सेवा आणि विवीध विषयास अनुसरुन मी मिपावर वेळोवेळी गूगल ट्रेंड्सचे विश्लेषण उपलब्ध करत आलो आहे त्याच मालेत यावेळी व्हॅलेंटाईन डे .

सर्वसाधारण समज आणि वास्तवात बर्‍याचदा अंतर असते. अगदी गेल्या १६ वर्षांचा विकिपीडियाचा ईतिहास लक्षात घेतला तरी पॉर्न आणि लैंगिक विषयाचे लेखांना आधिक हिट्स मिळतात हे आपसूक आहे पण विकिपीडियात लैंगिकतेवर सेंसॉरशीप नसूनही लेखन आणि संपादन करताना ते विषय टॉपवर नसतात उलट त्यांचा क्रम तळाला लागण्याची शक्यता अधिक शिवाय उपद्रवींपेक्षा रचनात्मक संपादनांची क्षमता आणि चिकाटी अधिक असते. सांगण्याचा उद्देश्य उपद्रवाच्या शक्यता खर्‍या असल्या तरी सर्वसाधारणपणे जगात बहुतेक लोक बहुसंख्य वेळा सभ्यतेने वावरत असतात - हवेतर तो माझा व्यक्तिगत विश्वास म्हणा.

व्हॅलेंटाईन'स डे म्हटले की बर्‍याच जणांच्या मनात लैंगिक स्वैराचाराची धास्ती येत असेल. पण या आठवड्यात मी जगभरचे तौलनिक गूगल ट्रेंड अभ्यासले तर वस्तुस्थिती वेगळी असावी. वर्षभर जगभरात देशानुरुप पोर्न किंवा सेक्स विषयक शोध लव्ह शब्दावरील शोधांपेक्षा अधिक असतात . तिन्ही शब्दांच्या वर्षभराची शोध रेषा पाहिली तर सरळ दिसतात पण सात दिवसांचा छोटा काळ अभायसला तर दिवसाभराच्या काळात मोठी सायक्तीकल अपडाऊन दिसते. केवळ १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेला पोर्न किंवा सेक्स विषयक शोध कर्व डाऊन असताना त्या शोधांना ओलांडून लव्ह शब्दाची कमान उंचच उंच जाते. प्रेम केवळ १४ फेबलाच अधिक दाखवावे का हा विषय वेगळा पण १४ फेबला लैंगिकतेची कमान वर जाताना दिसत नाही. एखाद दोन दिवस नंतर सेक्स शब्दाचा शोध रेग्युलर सायकल मेंटेन करत अत्यल्पसा वर जाताना दिसतो नाही असे नाही पण व्हॅलेंटाईनडे मुळे त्या शोधात प्रचंड चढ उतार होताना दिसत नाही.

लेखाचा मतितार्थ वर आलेलाच आहे. जिज्ञासूंसाठी पुढे थोडे अधिक डिटेल्स देतो.

व्हॅलेंटाईन डे वरील वर्षभरात घेतला जाणारा शोध आणि अगदी व्हॅलेंटाईन डे बद्दलचे शोध कोणत्या देशातून अधिक येतात या क्रमवारीत फरक पडतो. युरोमेरीका अगदी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच क्रमवारीत टॉपवर जाते-नेपाळ पाकीस्तान बांग्लादेशही क्रमवारीत बरेच वर जाऊन पुन्हा लागली खाली येतात, आता काही दिवस उलटून गेलेत तसे पनामा होंंडूरास नकाराग्वा एक्वाडोर पुर्तोरीको पहिल्या पाचात दिसतात तर तेच गेल्या १२ महिन्याचा आलेख पाहीला तर नेपाळ किंवा इराण पहिल्या दोन क्रमांकात नंतरचे तीन होंंडूरास पनामा कोलंबीआ दिसतात. व्हॅलेंटाईन डे या शब्द शोधा सोबत सेक्सच्युअल टर्मस फारशा दिसत नाहीत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लव्ह आणि संबंधीत क्वोट्स इत्यादीवर शोध होताना दिसतो. अगदी कंडोम शब्दावरील शब्द शोध व्हॅलेंटाईन डे किंवा व्हॅलेंटाईन आठवड्यात नित्याच्या दैनंदीन सायक्लिकल चढउतारापेक्षा कोणताही अधिकचा चढ उतार दाखवताना दिसत नाही.

दक्षिण आशिया इन जनरल भारत आणि महाराष्ट्रातही, व्हॅलेंटाईन डे च्या बाजूने जसे शोध वाढतात तसे अँटी व्हॅलेंटाईन डेच्या बाजूनेही शोध वाढताना दिसतात.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे शुद्धलेखन व्याकरण व व्यक्तीगत टिका टाळण्यासाठी आभार

समाजमाध्यमवेध