बर्नी आणि ब्लूमबर्ग

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
21 Feb 2020 - 6:20 am

अमेरिकेत जेवहा अध्यक्षीय निवडणूक होणार असते तेव्हा दोन्ही पक्षांचा अध्यक्षीय उमेदवार निवडण्यासाठी जी प्रथा आहे त्यात सार्वजनिक पद्धतीने जाहीर चर्चा हा एक भाग आहे
मिपावर जर याबाबत कोणी माहितगार असतील तर त्यांना हा प्रश्न आहे:
वेस्टमिनिस्टर पद्धतीच्या संसदीय लोकशाही आपल्याला बहुतेक माहित आहे तेव्हा त्या दृष्टीकोणातून हा प्रश्न आहे .
- वेस्टमिनिस्टर पद्धतीत पक्ष हा आपला उमेदवार त्यांच्या त्यांच्या अंतर्गत पद्धतीने निवडतो .. तेवहा त्यांच्या अंतर्गत सभांमध्ये प्रत्येक इच्छुकाला आपण कसे जास्त योग्य आहोत हे मांडण्याची संधी दिली जात असणार.. पण ती जी काय बतावणी होत असेल ती फारशी जाहीर नसते .. म्हणजे जनते समोर नसते .. याउलट अमेरिकन पद्धती मध्ये ती जाहीर असते...माझा प्रश्न त्याबद्दल च आहे कि जाहीर सभेमध्ये उमेदवार एकमेकांबद्दल ज्या पदहतीने बोलतात तेव्हा हे कळत नाही कि हे दोघेही एकाच पक्षाचे आहेत कि विरुद्ध पक्षाचे ?

उदाहरण सध्याचे जाहीर डेमोक्रॅटिक पक्षाचे परिसंवाद पहा बर्नी आणि ब्लूमबर्ग हे टोकाचे उमेदवार एक पक्का समाजवादी आणि दुसरा पक्का भांडवलवाडी पण दोन्ही हि एकाच पक्षासाठी .. प्रश्न तो नाही, प्रश्न हा कि ज्या पद्धतीने ते एकमेकांचे वाभाडे काढतात त्यामुळे त्यांच्या पक्षाची मानहानी नाही का होत?
हे मी प्रथम नमूद केलेल्या वेस्टमिनिस्टर सिस्टिम मध्ये निदान लोकांसमोर तरी येत नाही ...

बाकी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणणुकीतील बारकावे आणि प्रथा ( इलेकट्रोल कॉलेज वगैरे,) हे एक वेगळाच विषय आहे म्हणा