Whatsapp University

Primary tabs

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
5 Feb 2020 - 8:33 pm
गाभा: 

Whatsapp University मध्ये जगातील कोणत्याही ( अस्तित्वात असलेल्या व नसलेल्या ) रोगावर रामबाण जालीम इलाज क्षणार्धात उपलब्ध होतात.

"चांगली बातमी, वुहानच्या कोरोना विषाणूचे लसूण पाण्याच्या एका वाटीने बरे केले जाऊ शकते. जुन्या चिनी डॉक्टरांनी त्याची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. बर्‍याच रूग्णांनी हे देखील प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे. आठ चिरलेल्या लसूणच्या पाकळ्यामध्ये सात कप पाणी घाला आणि उकळवा.उकडलेले लसूण खा आणि पाणी पिणे, एका रात्रीत सुधारणा आणि उपचार."

// कृपया पास करा//

हा मेसेज वाचून मला खालील प्रश्न पडले...
1. हा व्हायरस चायना मध्ये आहे व इतरत्र तुरळक एखादा पेशंट आहे. मग ही लसणीची भानगड कुणी कुठं या पेशंट वर टेस्ट केली?
2. नोव्हा करोना व्हायरस उघडकीस येऊन जेमतेम 8/10 दिवस होत आहेत. इतक्या कालावधीत हे लसणीचे पाणी पाजून त्या पेशंट च्या पुन्हा टेस्ट करून करोना रोग नाहीसा झाला हे डॉक्टर नी कधी डिक्लेअर केले?
3. चायना तील सरकार मूर्ख आहे म्हणून 8 दिवसात 10000 बेड चे हॉस्पिटल तातडीने उभारले. त्याऐवजी लसूण पाणी घेऊन 1 वैद्य भारतातून चीन मध्ये नेला असता तर पुरेसा होता.
4. एअर इंडिया चे स्पेशल विमान पाठवून चायना मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याची काहीही गरज मोदी सरकारला नव्हती. त्याऐवजी 10 किलो लसूण पाठवली असती की काम तमाम!

असले मेसेज पाठवणारे कुठे भेटले तर हे प्रश्न त्यांना जरूर विचारा !!!

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Feb 2020 - 11:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे रे मंदार. आपणास हवा तसा ईतिहास वळवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनही ह्या विद्यपीठाचा उपयोग होतो. विशिष्ट विचार्सरणीच्या राजकीय पक्षाने तर खास ह्यासाठी पुर्णवेळ माणसे कामास ठेवली आहेत. भारताच्या पहिल्या पंतप्रधानाच्या 'वाईट सवयी' पासुन ते मनमोहन सिंगांचे नाकर्तेपण.. सर्वकाही वाचायला मिळते .

mrcoolguynice's picture

6 Feb 2020 - 6:52 am | mrcoolguynice

Blame this also on Neharu.

धाग्याच्या विषयाशी शष्प संबंध नसताना यशस्वी कलाकारांनी आपले पूर्वग्रह आणि आकस पुढे आणलेच.

mayu4u's picture

6 Feb 2020 - 11:52 am | mayu4u

ज्यांची दुकानं बंद पडतायत असे लोक तडफडत बोंब मारतायत... आपण शांतपणे मजा घेऊया!

तेजस आठवले's picture

6 Feb 2020 - 3:22 pm | तेजस आठवले

माईंनी बराच काळ धरून ठेवलेले बेअरिंग सुटल्याने त्या आता "मोकळ्या" झाल्या हे काय कमी आहे ! श्रीगुरुजींनी बरोबर ओळखले होते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Feb 2020 - 4:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तेजसा, अरे 'गोली मारो सालो को.. चले जाव.. वगैरे नौटंकी होती " म्हणणार्या मोठमोठ्या लोकांचे बेअरिंग सुटले तेथे आमची काय कथा?

कांदा चिरून बराच काळ उघडा ठेवल्यास आपल्या परिसरातले सर्व व्हायरस शोषून घेतो आणि म्हणून काळा पडतो / सडतो. म्हणून कांदे चिरून घरात ठेवल्यास करोना व्हायरसची भीती उरणार नाही.

हे आधुनिक संशोधन वाचून मीही एक थियरी मांडेन म्हणतो:

पाव उघडा बराच काळ ठेवल्यास तो परिसरातली बुरशी स्वतःकडे आकर्षून घेतो. तस्मात घरात नेहमी पाव बुरसत ठेवल्यास सर्व फंगल इन्फेक्शन्सपासून मुक्त राहता यावे.

आपण म्हटलेलं कोणी मानेल न मानेल म्हणून पुलं, नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील, इन्फोसिसवाले नारायण मूर्ती यांच्या वचनांच्या रुपात कायप्पा वगैरेवर प्रकाशित करण्याची प्रथा आहे. ते न जमल्यास "एक कारगिल सैनिक" किंवा "एक माजी लष्करी अधिकारी" यांच्याही नावे लोक व्यक्त होतात. शेवटी जनहित महत्वाचे. कसे ?

आणी ते प्रसिद्ध हास्पीटलातले मुख्य आरोग्य अधिकारी (फोन नं. सकट जातीने) राहिलेच की वो.

गवि's picture

6 Feb 2020 - 2:00 pm | गवि

हो हो ते राहिले.

आणि युनोप्रमुख, युनेस्कोप्रमुख हेही.

चौथा कोनाडा's picture

6 Feb 2020 - 6:00 pm | चौथा कोनाडा

आजकाल व्हॉटसप्प विद्यापीठाचे पदवीधर, डॉक्टरेट लोक भेटले तर आदरांजलीचे पुष्पचक्र वाहून पुढे चालू लागतो.
हे लोक कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नसतात, फार मागं लागलं तर म्हणतात "फॉर्वडेड मध्ये आलंय"

सुबोध खरे's picture

6 Feb 2020 - 7:28 pm | सुबोध खरे

forwarded as received हे लिहून असे लोक आपली अकलेची दिवाळखोरी मात्र दाखवत असतात.

आमच्या नातेवाईकांच्या ग्रुप मध्ये असे ढकलपत्र पाठवणारे काही ज्येष्ठ नातेवाईक आहेत.

उदा कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने जुन्यात जुना किडनीचा आजार बारा होतो सारखे.

परंतु मी आणि आमचे मेहुणे (हे एक वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ आहेत) आताशा दुर्लक्षच करतो.

मित्रहो's picture

7 Feb 2020 - 1:57 pm | मित्रहो

मुळात हे लिहिणाऱ्याला माहिती असते की फॉरवर्ड करणारे आणि वाचणारे सुद्धा वर धागालेखकाने विचारले तसे प्रश्न विचारीत नाही म्हणून कुणी काहीही लिहितो आणि दुसरा काहाही फॉरवर्ड करतो.

उपयोजक's picture

7 Feb 2020 - 3:11 pm | उपयोजक

विनाकारण व्हॉटसअॅप बदनाम होते.कोणतेच माध्यम वाईट नसते.ते वापरणारे लोक किती सजग आहेत त्यावरुन ठरते.

II श्रीमंत पेशवे II's picture

14 Feb 2020 - 2:14 pm | II श्रीमंत पेशवे II

एकदम बरोबर -अगदी खरं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2020 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोमूत्र सर्व आजारावर रामबाण उपाय आहे, वाट्सप युनवरसिटीत वाचायला मिळतं. सध्याच्या सरकारचंही अशा पारंपरिक जड़ीबूटीना प्राधान्य आहे असे ऐकिवात आहे.

-दिलीप बिरुटे
(वाट्सप विद्यापीठाचा विद्यार्थी) ;)

आमदार - खासदार यांचे वैयक्तीक मत हे सरकारचे अधिकृत मत आहे अस आपण समजतात का? तसे असेल तर सर्वच पक्षाचे नेते बरेच मुक्ताफळे उधळत असतात त्यांना सरकारी मत म्हणायचे?

पवार साहेबां सारख्या मुरलेल्या राजकारण्याला सुद्धा आपली परस्पर विरोधी वैयक्तिक मते लपवता आली नाहीत (याला काही लोक, संधीसाधू, राजकिय प्रगल्भता, दूरदृष्टी, राजकीय खेळी, गेम प्लॅन ईत्यादी संबोधतात ) आणि तुम्ही निवडक राजकारण्यांची मुक्ताफळे ही सरकारी मत समजता?

सरकारने सरकारी दवाखान्यात गोमूत्र औषध म्हणून देण्यास सुरवात केली आहे का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2020 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकार म्हणजे तरी काय असतं ? तर लोकांनी लोकांना निवडून दिलेल्या बहुमत असलेल्या प्रतिनिधींचं एक मंडळ म्हणजे सरकार नै का. जेव्हा सरकारातील असे हे प्रतिनिधी बोलतात, मतं मांडतात तेव्हा त्यांची मतं ही सरकाराच्या विचारांची मतं आहेत असे म्हणावे लागते. कोणते एक मत म्हणजे सरकारी मत, आणि कोणतं एक मत म्हणजे गैरसरकारी मत असे विशेष म्हणुन समजता येत नाही. पण, काही मुक्ताफ़ळं ही सरकारची मतं असू शकतात आणि नसूही शकतात, याला काही एक अशी सिमारेषा आहे, असे वाटत नाही. किंवा ठरवता येत नाही असे वाटते.

उदा. एखाद्या बहुमत मिळालेल्या वरीष्ठ सभागृहाच्या बहुमताने मान्य केलेल्या सरकारच्या मुख्य प्रतिनिधीने उद्यापासून पाचशेची नोट अंमलात येणार नाही, अशी केलेली घोषणा ही सरकारी मतंच असते, असे वाटते. म्हणून सरकारच्या समर्थक पंडितांनी व्यक्त केलेली अनेक अडचणींची मतं प्रसंगानुरुप व्यक्तीगत आणि घटनेच्या नुसार वेगवेगळ्या खात्याचे सरकार समर्थक प्रतिनिधीची मतं प्रसंगानुसार ही सरकारी मतं असतात, उरलेली ती मुक्ताफळे असेही असू शकते असं माझं व्यक्तीगत मत आहे.

राहीलं सरकारने गोमुत्र औषध म्हणून देण्यास सुरुवात केली आहे का ? खरं तर तुम्हाला गोमुत्राबद्दल म्हटल्याने किंचित राग आलेला दिसतो. सरकारचा या गोमुत्रावर, बकरीच्या लेंड्यापासून बनवलेल्या औषधावर विश्वास असेल आणि ते देत असतील किंवा तशी घोषणा करणार असतील तर मला काहीही विरोध करण्याचे कारण नाही. माझा काही डायरेक्ट या गोमुत्रावर, बक याच्या लेंड्यापासून बनवल्या जाणा-या औषधांना विरोध नाही आणि रागही नाही. पण सध्याच्या सरकारच्या लोकांच्या प्रतिनिधींची मतं पाहता अशा गोष्टींना त्यांचा पाठींबा आहे असे वाट्ते. असा कोणताही विदा माझ्याकडे नाही हे नम्रपणे नमुद करतो. परंतु गोमुत्र हे सर्व आजारांवर परफेक्ट औषध आहे, असे वाट्सप युनवरसिटीत मेसेज येत असतात म्हणूण तसे म्हणालो आहे.

पण पण पण. प्रतिसाद संपवता संपवता आपलं मी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की, उत्तरप्रदेशातील पीलभीत मधील सरकारी आयुर्वेदीक महाविद्यालय आणि दवाखान्याच्या प्राचार्यांनी अशा गोमुत्रास हेल्थ ड्रींक म्हणून मान्यता घेण्याची की देण्याची तयारी केली होती असे वाचनात आले होते. म्हणून सरकारचंही तसं मत असेल किंवा नसेल तर मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही

पण पण पण.... हे गोमुत्र किंवा लेंड्यासारख्या असलेल्या गोळ्या आणि त्याचं औषध मात्र मी घेणार नाही, हे नम्रपणे नमुद करतो. :)

ता.क. प्रतिसाद हलकेच घ्यावा फार तान घेऊ नये. हळूहळू माझी मतं सरकार विरोधी मतं म्हणून उपप्रतिसादांचा भूंगा लावू नये ही नम्र विनंती. ;)

०दिलीप बिरुटे

आपल्या इतर मतांचा आदर आहेच, पण फक्त लोकप्रतिनिधी म्हणजे सरकार असे नाही, पण मूळ विषय बाजूला ठेवून चर्चा भरकटत नेण्यात रस नसल्याने मी इथेच थांबतो.

( बाकी गोमूत्र, कापूर वैगेरे उपचार पद्धती आजतरी हास्यास्पद आहे असे माझे मत, पण याचा सरकार सोबत लावलेला संबंध पटला नाही म्हणुन प्रतिसाद प्रपंच)

तंबाखू बंबाखू वालं इकडं अजून नाही वाटतं आलं ,,,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2020 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाट्सप युनवर्सिटीचे पितामह भीष्म म्हणजे आदरणीय ते या देशाचे...ते काय....त्यांचं ते नाव... नेमकं मला अशा वेळी आठवत नाही.

ते नाही का ? गटारात नळी टाकून गॅस निर्माण करणारे... संत कबीर, गुरु नानक, और बाबा गोरखनाथ साथ बैठकर चर्चा, विमर्श करते थे...!

कोणत्या विद्यापीठात इतकं ज्ञान मिळू शकतं ?

-दिलीप बिरुटे

आणि घरोघरी चौदा ब्यांन्का बंद करण्याचे रिझव ब्यान्केचे आदेश पोहोचलेत.
--------
चुलीखाली पैसे लपवायचे तर त्या मातीच्या चुली नाहीत. ठेवायचे कुठे? त्या फारवर्डाची वाट पाहणारे वाटसपकर.
----------
मी या युनिवर्सिटीत नसलो तरी याचे विद्यार्थी भेटले की उपयुक्त धडे वाचून दाखवत असतात. तिकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना संताप येतो.

शशिकांत ओक's picture

11 Feb 2020 - 1:26 pm | शशिकांत ओक

व्हॉट्सअॅप मंचावर आपापले राग गायन केल्याशिवाय सकाळी जावसंच वाटतं नाही असा काहींचा कल आलिकडे झाला आहे काय? तिकडे ट्रंप काका कमोडवरून चिव चिव करत परदेश, स्वदेश नीती (?) चालवतात. त्यामुळे त्याच्यां हाताखालच्या लोकांना आज पासून छुट्टी तर झाली नाही ना याची धास्ती वाटते. तिथून काहींना प्रेरणा मिळत असेल...!
व्हाट्स अ‍ॅपचा दरारा असाच आहे. या विश्वविद्यालयातील लोकांना जेएनयु चे असल्याचा आभास निर्माण होतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2020 - 2:10 pm | अमरेंद्र बाहुबली

ह्या प्रवृत्ती वेळीच ठेचायला हव्यात. मुले पळवणारी टोळी आलीय असा मॅसेज पसरून भारतभर 2018-2019 साली 50 लोक मारले गेले लिंचिंग मध्ये. Indian whatsapp lynching म्हणून ती प्रसिद्ध आहे. उद्या तुम्ही आम्ही मरण्याआधी ह्या प्रवृत्ती मारा. ही पहा लिंक.
https://en.m.wikipedia.org/wiki/Indian_WhatsApp_lynchings