Whatsapp University
Whatsapp University मध्ये जगातील कोणत्याही ( अस्तित्वात असलेल्या व नसलेल्या ) रोगावर रामबाण जालीम इलाज क्षणार्धात उपलब्ध होतात.
"चांगली बातमी, वुहानच्या कोरोना विषाणूचे लसूण पाण्याच्या एका वाटीने बरे केले जाऊ शकते. जुन्या चिनी डॉक्टरांनी त्याची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. बर्याच रूग्णांनी हे देखील प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे. आठ चिरलेल्या लसूणच्या पाकळ्यामध्ये सात कप पाणी घाला आणि उकळवा.उकडलेले लसूण खा आणि पाणी पिणे, एका रात्रीत सुधारणा आणि उपचार."
// कृपया पास करा//
हा मेसेज वाचून मला खालील प्रश्न पडले...
1. हा व्हायरस चायना मध्ये आहे व इतरत्र तुरळक एखादा पेशंट आहे. मग ही लसणीची भानगड कुणी कुठं या पेशंट वर टेस्ट केली?
2. नोव्हा करोना व्हायरस उघडकीस येऊन जेमतेम 8/10 दिवस होत आहेत. इतक्या कालावधीत हे लसणीचे पाणी पाजून त्या पेशंट च्या पुन्हा टेस्ट करून करोना रोग नाहीसा झाला हे डॉक्टर नी कधी डिक्लेअर केले?
3. चायना तील सरकार मूर्ख आहे म्हणून 8 दिवसात 10000 बेड चे हॉस्पिटल तातडीने उभारले. त्याऐवजी लसूण पाणी घेऊन 1 वैद्य भारतातून चीन मध्ये नेला असता तर पुरेसा होता.
4. एअर इंडिया चे स्पेशल विमान पाठवून चायना मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याची काहीही गरज मोदी सरकारला नव्हती. त्याऐवजी 10 किलो लसूण पाठवली असती की काम तमाम!
असले मेसेज पाठवणारे कुठे भेटले तर हे प्रश्न त्यांना जरूर विचारा !!!
प्रतिक्रिया
हा हा हा
Blame this also on Neharu.
धाग्याच्या विषयाशी शष्प संबंध
जाऊ द्या डॉक!
माईंनी बराच काळ धरून ठेवलेले
हा हा हा
कांदा चिरून बराच काळ उघडा
आपण म्हटलेलं कोणी मानेल न
आणी ते प्रसिद्ध हास्पीटलातले
हो हो ते राहिले.
आजकाल व्हॉटसप्प विद्यापीठाचे
forwarded as received हे
प्रश्न
अशा मेसेजेसमुळे
एकदम बरोबर
गोमूत्र...
आमदार - खासदार यांचे वैयक्तीक
वाट्सॅप युन्वरसीटीचा फार तान घेऊ नये.
आपल्या इतर मतांचा आदर आहेच,
तंबाखू बंबाखू वालं इकडं अजून
एक अवांतर.
आणि घरोघरी चौदा ब्यांन्का बंद
कावळ्यांची शाळा
ह्या प्रवृत्ती वेळीच ठेचायला