अनामिक

Rohini Mansukh's picture
Rohini Mansukh in जे न देखे रवी...
28 Jan 2020 - 10:14 am

भटक्यांना जसं
गाव नसतं
प्रत्येक नात्याला
नाव नसतं

ओळखदेख नसताना
आपण कुणाशीतरी हसतो
तीच तर पहिली पायरी
आपण तिथेच तर फसतो

कधीकधी एकमेकांशी
रंगतात गप्पा
हळूहळू व्यापू लागतो
मनातील कप्पा

बंधु, सखा, प्रियकर
नक्की कोण ते ठरत नसतं
आपल्याच भावनांचं आकलन
आपल्याला होत नसतं

समाजमान्य चौकटीत
ते बसणारं नसतं
म्हणूनच ते जास्त
फुलवायचंही नसतं

अचानक जुळून येतं
आणि अचानकच संपतं
एक आठवण बनून
फक्त मनामध्ये उरतं

त्याची स्पष्ट व्याख्या
किंवा ठिकाणठाव नसतं
अशा प्रत्येक नात्याला
काही नाव नसतं

- सौ. रोहिणी विक्रम मनसुख

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

2 Feb 2020 - 11:30 am | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haan Main Galat... :- Love Aaj Kal