विशाळगडावरील पीर बाबा
हजरत पीर मलिक रहान बाबा
लढा पावनखिंडीचा यातील भाग ७ मिपावर सादर करायला मुक्त विहारींनी सुचवल्यावर तो लवकरच सादर करत आहे. त्यात विशाळगड सध्या कसा दिसतो याची अंदाज यायला सोबतची फीत सादर आहे. गड चढताना आता जरी पूल बांधल्यामुळे येता यायला सोईचे झाले तरी समोरच्या बसेस पार्किंगच्या माथ्यावरून दरीत उतरून विशाळगडाच्या चढाला सुरवात होते. ऐतिहासिक काळात सुर्वे- दळवी यांच्या सैन्याचा तळ त्या पार्किंग भागात होता. म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्याला भिडायला दरीत उतरून यावे लागले. भाग ७ मधे महाराजांनी ते कसे घडवले ते वाचा. फितीत शेवटी एक नव्याने बांधलेला बुरुज दिसतो. प्रेमीजनांनी लिहिलेली नावे असलेला.... त्यांची एक दुजे के लिए टाईप प्रेम कहानी सफळ झाली की नाही... असे भाष्य तिथे केले आहे... .... या संदर्भात आणखी एक वाचनात आले की ह्या पिराच्या महतीचे कारण... सन १९५२ मधे एका घरगुती भांडणात चोरीचा आळ घरातील सासरेबुवांनी आपल्या दोन सुनांवर घेतला. त्यांनी आम्ही चोरी केली नाही म्हटल्यावर इरेला पडलेल्या सासऱ्यांनी विशाळगडावर जाऊन पिरासमोर खरे खोटे करायचे ठरले. त्याप्रमाणे ते विशाळगडाच्या माथ्यावर पोहोचले. तिथे त्या काळात असे होत असे की हातात बेड्या घालायच्या व जो निर्दोष असेल त्याच्या बेड्या आपोआप सुटतात. ज्याच्या बेड्या निघत नाहीत त्यावर असे काही जे बोलले असेल तो खोटा व दोषी ठरतो. त्याप्रमाणे दोन्ही सुनांच्या बेड्या गळून पडल्या पण मग सासऱ्यांनी पण ही परीक्षा द्यावी असा आग्रह झाला. तेंव्हा त्या सासऱ्यांच्या हातातील बेड्या सुटल्या नाहीत... पुढे त्या सासऱ्यांना वाईट दशा आली... वगैरे वगैरे.... आता ती चालरीत पुढे सुरु आहे किंवा नाही याचा शोध विशाळगडावर जाणाऱ्यांनी जरूर घेवून त्यांचा अनुभव सादर करावा ही विनंती...वर्गीकरण
प्रतिक्रिया
कमर अली दरवेश
गेलोय इथे
इतरांचे काय अनुभव आहेत?
दर्ग्याशेजारी एक मशीद आहे आणि
पीर अन किल्ले
होना
या बाबतीत मी ओबामाला मानले
मलिक रेहान याने हा किल्ला घ्यायचा अनेकदा प्रयत्न केला होता...
सहजच या मलिक रेहान चा इतिहास
कोल्हापूर जिल्ह्याच्या
अगदी बरोबर!
एका व्हिडिओ बनवणाऱ्यांना विचारणा केली आहे
वरील संदर्भात फोटो सादर करत आहे...
मलिक रेहान दर्ग्याचा ईतिहास
महत्वाच्या विषयाला हात घातला आहेत...
विशाळगडाच्या मोहिमेची सांगता