अहिराणीनी बात

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
16 Dec 2019 - 11:28 am

- डॉ. सुधीर रा. देवरे

महाराष्ट्रमा मराठीन्या तशे पाह्य त्ये पासष्ट बोलीभाशा दखातीस. त्या बठ्ठास्मा अहिराणी भाशाना पट्टा आडवा उभा भयान मोठा त्ये शेच, पन ह्या पट्टामजारला आथा तथा कामसकरता जायेल लोक महाराष्ट्रभर आनि महाराष्ट्रना बाहेरबी आपली भाशा इमाने इतबारे बोली र्‍हायनात- समाळी र्‍हायनात. नाशिक सिडको, औरंगाबाद, पुना, मुंबई, सुरत आशा काही शहरस्माबी आज अहिराणी भाशा हात पाय पसरी र्‍हायनी. (आज अहिराणी बोलनारा लोक येक कोटीना आसपास दखातंस.)

शिकेल सवरेल लोकसतीन अडानी लोकस्ले अहिराणीवाचू दुसरी भाशा येत नही म्हनीसन का व्हयेना त्या नाइलाजे आपापला घरमा- गावमा अहिराणीमा यव्हहार करतंस. अहिराणी भाशा बोलाले त्या अजिबात सरमातं नहीत. याना उलट शिकेल सवरेल लोकं आपली भाशा जतन करानं ते दूरच शे पन ती भाशा आपुले कशी अजिबात येत नही हायी आजूबाजूना बिगर अहिराणी लोकस्मा दखाडाले उतावळा आंबा पिकाडतंस. म्हंजे आपली मायबोली अहिराणीले त्या सोताच गावंढळ भाशा समजतंस. बाकिना आपला आजूबाजूना शिकेल सवरेल लोक आपली बोलीभाशाले गावंढळ समजतं व्हतीन, आशे त्यासले वाटस. (आशा बळेजना समज मनमातीन काढाकर्ता ‘अहिराणी याळ’ना माळेक उच्‍छाव लोकस्मा भाशा जागरन कराकर्ता हाटकून व्हवाले पाहिजेत.)

बोलीभाशा बोलाले सरमावाना कारनंस्मातलं येक कारन, आपू उलसा व्हतून तैनपशी शाळमा शिकाडानी पध्दतबी शे. लहानपनपशी शाळमा कोनी अहिराणी बोलनं ते गुरजी- सर आशा पोरस्नी टिंगल करेत, हाऊ आनभव सगळास्ले येवामुळे ‘आमनी भाशा गावंढळ शे’ आशी आपला मनमा हायी कायमनी आढी बठी गयी. (आतानं शिकशन शासरं बोली भाशामा शिकाडानी कोशीश करी राह्यनं.) जठे जठे मराठी भाशा बोलतंस तठे चार मानसस्मा बोलानी हायी भाशा नही, आशा समज करीसन अहिराणी बोलाले त्या चरकतंस.

आडवा उभा उत्तर महाराष्ट्रना जवळजवळ दोनशे मैल डोंगरखाल ते तीनशे मैल सूर्यखालना पट्टा हाऊ अहिराणी भाशाना पट्टा शे. या पट्टामा धुळा, नंदुरबार, जळगाव आनि नाशिक या चार जिल्हा शेतंस. ‍धुळा – नंदुरबार ह्या आख्खा जिल्हा आणि नाशिक - जळगाव ह्यास्ना निम्माशिम्मा भाग अहिराणी बोलस. आवढा मोठा मचनच याप आपली अहिराणी बोलीना शे. (म्हनीसनच ह्या सगळा पट्टाले आजबी खानदेश म्हननं पडयी.) महाराष्ट्रमजार कोकनी भाशा सोडी ते आवढा मोठा पट्टा दुसरी बोली भाशाना ‍कथा दखात नही. (ह्या पट्टामजारला काही आदिवाशी भाऊ त्यास्न्या सोतान्या जराश्या येगयेगळ्या भाशा बोलतंस, तरी त्या भाशास्वरबी अहिराणीना पक्का पगडा टहाळबन दखासच.)

अहिराणी बोलीना इतला सावठा आडवा उभा याप व्हयी आनि जर परत्येक दहा मैलवर भाशा बदलाना भाशाना आंगनाच नेम व्हयी ते आपली अहिराणी बोलीच तव्हढी आठून तठून जशीनतशी आनि तिनामा कोनताबी बदल न व्हता कशी दखाइ? भाशा शासरंना नियमखाल तिनामा त्या त्या तालुकास्मा, जिल्हास्मा, गावस्मा बदल दखावालेच जोयीजे. तिना काही शब्द, काही वाक्य, काही हेल यास्मा बदल दखाइच. कोनतीबी आनि कितीबी उलसा भागनी भाशा राहिनी तरी थोडाबहुत बदल हाऊ तिन्हा मुळना सभावच र्‍हास. जशा तो अहिराणी भाशामा आठोंग तठोंग दखास. हायी महाराष्ट्रभरन्या आपल्या जठल्यातठल्या सगळ्याच बोली बोलनारा लोकस्ले ठाऊक शे. म्हनीसन बाकिन्या बोलीस्ना लेखक, इदवान लोक येकच भाशाना थोडाबहुत बदलले कमी बहुत समजतं नहीत. शुध्द- अशुध्द समजतं नहीत. आमना जिल्हामजारली अमुक बोली खरी आणि तमुक जिल्हामजारली भाशा आमनी भाशातीन कमी दरजानी शे, आशे कोनीच आनि कोनतीच बोली भाशाना लोकस्नी म्हनाले नको. आशी अस्सलबिस्सलनी चावळ बोली भाशास्मा व्हत नही आनि परमान भाशास्माबी व्हत नही. म्हनीसन कोनतीबी भाशा र्‍हाव, कोनीबी लोकस्नी त्या भाशाले आठून तठून येकच भाशा समजाले पाहिजे.

अहिराणी बोलीना लेखक आनि इदवान लोक यास्नी हायी गोट हाटकून ध्यानात घेवा. अहिराणी हायी अमूक जिल्हानी भाशा शुध्द आणि अमूक जिल्हानी भाशा देढगुजरी आशी चावळ कोनी करू नही. आशी चावळ जयी त्ये आपला अहिराणी पट्टानं बाहेर आशा परचारना काय पर्‍हेड व्हस, हायी कोनले सांगानी गरज नही.

समजा सकाळ पुनाना लोकस्नी बैठक जयी. आनि त्यास्नी व्यासपीठ वरथीन सांगं, ‘‘पुना हायी मराठी भाशानं केंद्र शे. म्हनीसन पुनानी मराठी हायीच खरी अस्सल शुध्द मराठी भाशा शे. बाकी महाराष्ट्रमा सगळा लोक जी मराठी बोलतंस ती मराठी अशुध्द शे. तिनामा ज्या लोक पुस्तकं लिव्हतंस त्या सगळा अशुध्द शेतंस. म्हनीसन आमनी पुनेरी भाशा सगळा महाराष्ट्रनी शिकी घेवाले पाहिजे आनि तिन्हामाच बोलाले पाहिजे, लिव्हाले पाहिजे.’’ आशे जर कोनी सकाळ म्हनं ते आक्‍खा महाराष्ट्रमा काय व्हयी, सांगा बरं? जे काय व्हयी, त्ये व्हऊ नही म्हनीसनच आशे कैन्हबी व्हनार नही. याना आरथं आशा शे, अहिराणी पट्टामजारला येखांदा गावले नहीथे येखांदा जिल्हाले, ‘आमनीच भाशा खरी अहिराणी शे आनि तमूक जिल्हानी नही,’ आशे म्हनता येनार नही.

आपला गावशिवना जिव्हाळा कोनलेबी र्‍हायीच हायी खरं शे. आपली गावशिवनी भाशाले जीव लावनंबी खरं शे. पन मन्हीच भाशा खरी आशी घमेंड कयी ते आपलं सोतानं नही पन आपली सगळास्नी जी भाशा शे अहिराणी, तिन्ह नुकसान नक्की व्हयी. म्हनीसन आठला सगळा लेखक, इदवान आनि अहिराणी भाशा बोलनारा सगळा भाऊस्ले मी कळकळन्या रावन्या करी र्‍हायनू, सगळा चार जिल्हासनी आपली भाशा आपू आपलीच म्हनूत. बागलानी (नाशिक जिल्हानी) हायी जशी मन्ही भाशा शे तशी जळगावनी अहिराणीबी मन्हीच भाशा शे, नंदुरबारनी भाशाबी मन्हीच शे आनि धुळानी भाशाबी मन्हीच शे. आनि अहिराणीनी बात करता करता बाकिन्या बठ्ठ्या बोलीभाशाबी मन्ह्याच शेतीस. बाकिन्या भाशा परक्या नहीत.

कोनतीच भाशा कमअस्सल र्‍हात नही आनि अस्सलबी र्‍हात नही. म्हनीसन आपू आपला गावपुरती भाशानी पोकळ घमेंड मनातीन काढीसन अहिराणी हायी आठून तठून येकच अहिराणी समजूत आनि ती यानंमोर्‍हे कशी जगयी वाचयी हायी ध्यानमा ठीसन तिनाकर्ता राबूत. अहिराणीना याप आशा भयान सावठा शे, पन भाशानी घमेंड करू नही. भाशाले जीव लायी हयाती राहू दिऊत. आशे कर्ता कर्ता आपू जगमजारल्या सगळ्या भाशास्ले जीव लाऊत, जरी त्या आपुले समजती नहीत.
(मालेगावले आत्तेच ‘अहिराणी दिन’ना वाजीगाजी जागर जया. म्हनीसन ‍अहिराणी बोलीना चारीमिरे गजर जया. त्या निमितखाल हायी मनचावळ. नचिकेत कोळपकर, राजेंद्र दिघे, स्वाती वाणी आनि राष्ट्र सेवा दलना सोबत कितीतरी नावं घेता इतीन आशा गंजच बठ्ठा लोकस्नी रातदिन राबीसन खस्ता खायी हाऊ अहिराणी लोकसंस्कृतीना जागर साजरा कया. भाशनंबिशनं हाटकून टाळीसन दुन्याले अहिराणी लोककलास्नं उजाळं दखाडं, जेवालेबी अहिराणी जिनसा वाढ्यात. म्हनीसन सगळास्न कौतीक.)
(अप्रकाशित. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

भाषालेख

प्रतिक्रिया

सुधीर काळे's picture

17 Dec 2019 - 10:28 am | सुधीर काळे

Were you our ambassador to Republik Indonesia?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 Dec 2019 - 12:18 pm | डॉ. सुधीर राजार...

सुधीर तुकाराम देवरे, दिल्लीला राहतात

सुधीर काळे's picture

17 Dec 2019 - 12:30 pm | सुधीर काळे

आम्ही जकार्ताला असताना बर्‍याचदा एकमेकांना भेटलो होतो व आमची बरीच मैत्री झाली होती. तुमचे नांव वाचून मला त्यांची आठवण झाली.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

18 Dec 2019 - 10:49 am | डॉ. सुधीर राजार...

त्यांनीच मला शोधून काढलं

जालिम लोशन's picture

17 Dec 2019 - 9:32 pm | जालिम लोशन

त्याना आई मरिन खाल्ल बुचक बाखोड. अर्थ कधी कळला नाही पण एक म्हातारी आम्हा मुलांना नियमीत ओरडायची.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

18 Dec 2019 - 10:50 am | डॉ. सुधीर राजार...

लाडाने घातलेली शिवी