मिपा दिवाळी अंक छापील आवृत्ती मागवण्याबद्दल सर्वकाही..

प्रशांत's picture
प्रशांत in प्रश्नोत्तरे
4 Nov 2019 - 2:18 pm

दिवाळी अंक मागवण्याविषयी माहिती आणि तपशील.

.

यावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे हे आता सर्वांना माहीत झालं आहे. तो मागवताना अनेकांना अडचणी येत असल्याचं समजतं आहे. तो मागवण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. आणि हा धागा यातील अडचणींचे निवारण करण्यासाठी काढत आहोत.

पर्याय १:

खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा.

https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019

पर्याय २:

२) पैसे नेट बँकिंगने (NEFT किंवा RTGS) खालील खात्यात जमा करा आणि +91 99210 08845 या नंबरवर transaction डीटेल्स, आपलं नाव, पूर्ण पत्ता (भारतातील) sms करा.

बँक खाते तपशील:

Payee: Sukrut prakashan

Bank: Bank of India

Branch: Laxmi Road branch

Account no: 050520110001006

Account type: CA

IFSC code: BKID0000505

वरील पर्यायाद्वारे अंक घरपोच मागवण्यासाठी अंक मूल्य रु.२५० आणि कुरियर / टपालखर्च रु. ७० असे एकूण रु. ३२० NEFT किंवा RTGS ने ट्रान्सफर करावेत.

पर्याय ३.

पुण्यातील मंडळी खालील पत्त्यावरुन सकाळी १० ते ६ या दरम्यान अंक घेऊ शकतात. यात टपाल खर्च वाचेल.

सुकृत प्रकाशन,
द्वारा : सुनीता दांडेकर,
३९०/ब/१, नारायण पेठ, दत्तधाम सोसायटी,
मुंजोबाचा बोळ (बेडेकर मिसळ गल्ली)
पुणे ३०

चिंचवड भागात अंक पाहिजे असल्यास या नंबर वर Whatsapp करा 7588624212

वरीलपैकी कोणत्याही मार्गाने अंक मागवण्यात किंवा मिळण्यात अडचण आल्यास / एरर आल्यास या धाग्यावर नोंदवा. किंवा प्रशांत या आयडीला व्यनि करा किंवा 7588624212 नंबरला व्हाट्सऍप करा.

ज्यांना अंक मिळाले आहेत त्यांनीही अंकाबद्दल इथे नोंदवावं.

दिवाळी अंक

प्रतिक्रिया

अंक पर्याय १ ने मागवलेला आहे.

नि३सोलपुरकर's picture

4 Nov 2019 - 6:39 pm | नि३सोलपुरकर

पर्याय १ ने अंक मागवलेला आहे. (मिपा पानावरील लिंक वरुन )

अवांतर : चिंचवड भागासाठीचा पर्याय नंतर वाचनात आला.
_/\_

नि३सोलपुरकर's picture

9 Nov 2019 - 10:08 am | नि३सोलपुरकर

४ तारखेला पर्याय १ ने मागवलेला आणी उत्तरादा़खल मिळालेल्या निरोपाप्रमाणे (समस) ६ तारखेला पोहोचणारा / मिळणारा अंक अद्याप मिळाला नाही .

नि३

पाषाणभेद's picture

4 Nov 2019 - 11:23 pm | पाषाणभेद

मी ऑनलाईन मागवला. उद्या डिलेव्हरी आहे. बघूया काय होते ते.

:-)

पाषाणभेद's picture

7 Nov 2019 - 2:02 pm | पाषाणभेद

आजच अंक घरी आला. अंक चांगला दिसतो आहे. गुटगुटीत अन बाळसेदार आहे. लवकरच अंक मोठा होवो या शुभेच्छा.

अर्धा र - जसे वार्‍याने मधला तसा - निट टंकन झालेला नाही. काही ठिकाणी दोन शब्दांमध्ये जास्त जागा सुटली गेली आहे एवढी तिट लागलेली आहे.

अंक तयार होण्यात सर्व मान्यवरांनी घेतलेले कष्ट दिसत आहे. त्या सर्वांनी पदराला खार लावून लष्कराच्या भाकर्‍या भाजलेल्या आहेत त्या चविष्ट झाल्यात हे सांगणे न लगे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2019 - 2:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रशांतसेठ, आता पुढील लॉट कसा मिळेल ?
अजून दोघे तिघे राहीलेत औरंगाबाद मधे.

कळावे.

-दिलीप बिरुटे

फारएन्ड's picture

10 Nov 2019 - 4:33 am | फारएन्ड

नक्कीच हवा आहे.

जॉनविक्क's picture

10 Nov 2019 - 6:30 am | जॉनविक्क

एकूण अंक ? अलास्कामधे हा अंक मिळायची सोय होईल का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2019 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपणास खरंच इच्छा असेल तर टपालखर्च आणि अंकाची किंमत पाठवून द्यावी, अंक जरूर मिळेल.

-दिलीप बिरुटे

प्राडॉ, टपालखर्च आणि अंकाची किंमत तुमच्याकडे पाठवावयाची का? मला मलेशियात हवा आहे अंक.

- (अंकोत्सुक) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2019 - 7:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पर्याय क्रमांक एक किंवा दोन वापरा सेठ,अंक मिळून जाईल.

-दिलीप बिरुटे

जॉनविक्क's picture

10 Nov 2019 - 7:24 pm | जॉनविक्क

मोहन's picture

11 Nov 2019 - 2:16 pm | मोहन

अंक मिळाला. छान जमला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2019 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंक आवडल्याचे अनेकांनी कळवले, प्रयोग आवडल्याचा मेसेज जेव्हा येतो, तेव्हा खूप आनंद होतो. मिपाकरांच्या प्रोत्साहनामुळे इथे अनेक नवेनवे प्रयोग पाहिले याही प्रयोगाचा साक्षीदार होताना मजा आली. काही मिपाकर म्हणतील सर काहीच पोच दिली नाही म्हणून हां प्रपंचं Thanks मिपाकर. :)

-दिलीप बिरुटे
(मिपाकर)

गुल्लू दादा's picture

11 Nov 2019 - 7:41 pm | गुल्लू दादा

खूप छान झालाय हा प्रयोग. याचा भाग होता आले म्हणून विशेष आनंद आहेच. प्रा.डॉ.बिरुटे सरांमुळे अंक लवकर आणि घरपोच मिळाला. त्यांचे परत परत आभार मानून त्यांना परकं करत नाही. अंकात घेतलेली मेहनत दिसून येतेय. कोमलताई बद्दल सहानुभूती आहे. त्यांना झालेल्या त्रासाची जाणीव आहे. एका परिवारात घडलेली चूक म्हणून निश्चितच त्या मोठेपणा दाखवतील. बाकी अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्व मिपाकरांचे अभिनंदन. तुमची मेहनत फळाला लागली आहे. तुम्ही लावलेल्या रोपट्याला अशीच गोड गोड फळे आणि थंडगार सावली दरवर्षी मिळत राहो हीच निर्मात्यापाशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद...!